सर्वप्रथम हे मान्यच करायला पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व महाराष्ट्राचे दैवत आहे. त्यांचे चरित्र अतुलनीय आहे. इतिहासात एक द्रष्टा राजा, कुशल राज्यकर्ता, सेनापती, संघटक, शककर्ता, प्रजाहितदक्ष; इतकेच काय - सिंहासनाधीश्वर, प्रौढप्रतापपुरंधर, राजाधिराज - अशी कितीतरी विशेषणे लावली तरी ती कमीच पडतील. त्यांच्या विषयी लिहिताना रामदासस्वामीं पासून ते आजपर्यंत कित्येक इतिहासकार, कादंबरीकर, नाटककार, चित्रपटकथालेखक यांची लेखणी थकली तरी त्यांचे संपूर्ण वर्णन लिहायला ती अपुरीच पडेल इतके उत्तुंग व्यक्तिमत्त्व! त्यामुळे महाराजांबद्दल आदर आहे हे सांगायला लागायची किंवा त्यासाठी कुठला पुरावा देण्याची गरज निदान मराठी माणसास नसावी.
आता हे सर्व असताना नुकत्याच काही घडामोडींमुळे त्यांच्या नावाचे संबोधन चर्चेत आले आहे. अमिताभ बच्चन काम करत असलेल्या कौन बनेगा करोडपती कर्यक्रमात एकीकडे 'मुघल-सम्राट औरंगजेब' असा उल्लेख असताना त्याच खाली केवळ 'शिवाजी' हा उल्लेख करणं हे अपमानास्पद वाटते हे खरेच! त्याबद्दल त्यांचा निषेध. परंतु हे लक्षात घ्यायला हवे की इथे अपमान हा संबोधनाच्या तुलनेतून निर्माण झाला आहे. इतर ठिकाणी स्टँड-अलोन उल्लेख असेल तर 'शिवाजी' म्हणणं तुम्हाला चुकीचं वाटतं का? असेल तर पुढे काही प्रश्न निर्माण होतातः
१. भोंडल्यामध्ये 'शिवाजी अमुचा राजा..' ह्या गीतात बदल करावेत का? इथे गाणारे महाराजांना प्रेमाने 'शिवाजी' म्हणतात, त्या प्रेमाचे काय? प्रेमापेक्षा आदर कायम मोठाच असतो का? ते ठरवणे व्यक्तिसापेक्ष असायला हवे ना?
२. लहानपणी 'शिवाजी म्हणतो' हा खेळ खेळायचो, त्यात महाराजांचा उल्लेख एकेरी असला तरी कधी अनादर वाटला नाही, किंबहुना तसे कधी डोक्यातही आले नाही. त्याचे काय?
३. शिवाजी महाराजांचा आदर सर्वांनी ठेवावा - ही जबरदस्ती आहे का? एखाद्याला नसेल वाटत, तर आपण तो आदर त्या/तिच्यावर लादावा का?
४. वरचे उत्तर होय असेल तर मग एखादा म्हणेल की त्याच्या मते चंद्रगुप्त मौर्य सर्वश्रेष्ठ आहे. मग चंद्रगुप्ताचा 'सम्राट चंद्रगुप्त मौर्य महाराज' किंवा अशोकाचा उल्लेख 'सम्राट अशोक महाराज' आणि अशोकचक्राचे नाव 'सम्राट अशोक महाराज चक्र' असे करावे - ही सक्ती केली तर चालेल का? झाशीची राणी - असा एकेरी उल्लेख तरी मग का करायचा? झाशीच्या महाराणी लक्ष्मीबाई - असे संपूर्ण नाव घ्या.
५. अनेक इतिहासकार इतिहास लिहिताना प्रत्येक व्यक्तिबद्दल केवळ एक ऐतिहासिक व्यक्ति म्हणून भावनिक न होतासुद्धा लिहू शकतात. त्यामुळे सरदेसाई काय, किंवा गोविंद पानसरे काय - त्यांनी 'शिवाजी कोण होता' - असे एकेरी उल्लेख केले असले तरी फक्त त्या संबोधनावर न जाता त्यांनी उलट त्यांच्याबद्दल काय मोठे संशोधन समोर आणले आहे - ते योगदान जास्त महत्त्वाचे नाही काय?
६. मला आठवते की लहानपणी एका इतिहासप्रेमी (परंतु कर्माने केवळ गुंडगिरी करणार्या) माणसाने दटावले होते की 'महाराज आपल्या सर्वांच्या कित्येक पिढ्यांसाठी आदरस्थानी आहेत. त्यांना नुसते शिवाजी काय म्हणता? घरी वडिलांना पण अरे-तुरे करता का?' आता आम्ही कुणी अरे-तुरे करत नव्हतो हे खरे; पण आज-कालची मुले वडिलांना अरे-तुरे खरोखरच करतात, पण त्यामुळे कुठेही आदर कमी झाला आहे असे वाटत नाही. फक्त 'अहो जाहो' म्हटल्याने आदर दाखवला जातो आणि 'अरे-तुरे' केल्याने आदर राहत नाही - हे सरसकटीकरण नाही काय?
तुम्हाला काय वाटते ते नक्की सांगा.
आपण ज्ञ चा उच्चार द न य असा
आपण ज्ञ चा उच्चार द न य असा करतो. गुजरातीत तो ग्न असा होतो. उत्तरेकडे ग्य होतो आणि दक्षिणेत तो j n y असा होतो.
आणि हो आपण इतरांची आणि इतर शहरांची नावे चुकीची उच्चारतो. लाजपत राय ऐवजी लजपत राय, जलियावाला मेरठ ऐवजी मीरत, इंदौर ऐवजी इंदूर, दक्षिणेत सीता ऐवजी सीथा, सेतुपति ऐवजी सेथुपथी, पुत्रन ऐवजी पुथरन वगैरे.
दक्षिणेत सीता ऐवजी सीथा,
दक्षिणेत सीता ऐवजी सीथा, सेतुपति ऐवजी सेथुपथी, पुत्रन ऐवजी पुथरन वगैरे.
Submitted by हीरा on 8 November, 2020 - 22:36
नाही त ऐवजी थ असा उच्चार दक्षिण भारतीय लोक करीत नाहीत. ते इंग्रजी स्पेलिंग लिहिताना टीएच जरुर लिहितात पण उच्चार त असाच करतात. त्यांच्या मते टी चा उच्चार ट होतो आणि त हा उच्चार करायचा असेल तर स्पेलिंग टीएच असे लिहायला हवे.
माहित नसल्यामुळे, आपण इतर
माहित नसल्यामुळे, आपण इतर शहरांची नावे वेगळी उच्चारणे वेगळे. अमराठी लोकांनी इथे येऊन त्यांचेच चुकीचे उच्चार लादुन इथल्या गावांची नावेच बदलणे, वरुन Bombay is emotion म्हणुन त्याचे समर्थन करणे, त्याआडुन मराठी लोकांचा Bombay वरील हक्क नाकारणे वगैरे गोष्टी, मराठी माणुन बाहेरच्या राज्यात जाऊन करत नाही. ते काय पाटणा, सेतुपथी वगैरे असेल ते मराठी माणुन सुरुवातीचे काही दिवस करेल. पण एकदा योय्ग नाव कळले की तेच वापरेल. मुख्य म्हणजे नाव बदलाच्या आडुन स्थानीकांचा हक्क डावलणार नाही.
अभिनव + 1
अभिनव + 1
इकडं महाराजांच्या पेज वरती
इकडं महाराजांच्या पेज वरती शुद्धलेखन अन उच्चार काय डिस्कस होऊन राहिले?
हा महाराजांचा अपमान धरला जाऊ शकतो का?
"त ऐवजी थ असा उच्चार दक्षिण
"त ऐवजी थ असा उच्चार दक्षिण भारतीय लोक करीत नाहीत. ते इंग्रजी स्पेलिंग लिहिताना टीएच जरुर लिहितात पण उच्चार त असाच करतात. त्यांच्या मते टी चा उच्चार ट होतो आणि त हा उच्चार करायचा असेल तर स्पेलिंग टीएच असे" सहमतच.
मी बहुतेक ' दक्षिणेत ' ऐवजी ' दक्षिणेतल्या ' असे अधिक खुलासेवार लिहायला हवे होते. दक्षिणेतल्या स्पेलिंग प्रमाणे आपण आपल्या तऱ्हेने उच्चार करू जातो पण ते चुकीचे असतात कारण ते जरी th लिहीत असले तरी उच्चार त अथवा केरळात कधी कधी द करतात,
असेच मला म्हणायचे होते.
इकडं महाराजांच्या पेज वरती
इकडं महाराजांच्या पेज वरती शुद्धलेखन अन उच्चार काय डिस्कस होऊन राहिले?
हा महाराजांचा अपमान धरला जाऊ शकतो का?

आजकाल कोणाचं काय दुखावलं जाईल
आजकाल कोणाचं काय दुखावलं जाईल काय सांगता नाय येत.
अभिनव + 1
अभिनव + 1
आता महाराज येतील आणी ठाणकनं
आता महाराज येतील आणी ठाणकनं डोक्यात तलवार आपटतील, म्हणतील भुक्कड लोकांनो याच साठी मी अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र करुन स्वराज्य जिंकले का? याच साठी मी दर्या खोर्यात, कडे कपारीत, जीव मुठीत धरत फिरलो का? याच साठी मी आणी माझे मावळे त्वेषाने लढलो का? याच साठी मी आणी माझे कुटुंबीय यांनी जनतेसाठी खस्ता खाल्ल्या का? आले मोठे वाद घालणारे !
बरेच लोक "आणि" मधला णि दीर्घ
बरेच लोक "आणि" मधला णि दीर्घ लिहितात. तो र्हस्व हवा.
जीव मुठीत धरत नवे प्राण
जीव मुठीत धरत नवे प्राण तळहातावर घेऊन
हे एकारांत (अरे तुरे)
हे एकारांत (अरे तुरे) आपल्याकडे अठराव्या एकोणीसाव्या शतकापर्यंत सुरू होते. समोरासमोर किंवा व्यक्तीला संबोधून बोलतानाच फक्त अहो, तुम्ही हे शब्द वापरले जात. उदा. पुतळाबाई, सईबाई ही सती गेली असेच म्हणत. अमुक बाई राणीसाहेब सती झाल्या किंवा अमुक बाई राणीसाहेबांनी सहगमन केले असे म्हटले जात नसे. अशी बहुमानार्थी अनेक वचने त्या मानाने त्या काळच्या मराठीत तुरळकच सापडतात. उलट हिंदीत (कदाचित पर्शियन- उर्दूच्या प्रभावामुळे) मात्र अशी आदरार्थी बहुवचने पुष्कळ असतात. ह्या बाबतीत संस्कृतमधले भाषेचे वळण मराठीने उचलले होते. गीतेमध्ये जागोजागी धृतराष्ट्र उवाच म्हणजे धृतराष्ट्र बोलला असेच आहे. राजाधिराज धृतराष्ट्र महाराज म्हणाले असे कुठेही नाही. भगवान उवाच हेही एकवचनी आहे.
पण गेली शंभर दीडशे वर्षे मराठीवर बहुधा हिंदीचा प्रभाव वाढत चालला असावा.
मराठीचा, फापटपसारा आणि अवडंबर न माजवणारा, रोख ठोक, थेट असा मूळचा नैसर्गिक रांगडेपणा हटत चालला आहे हे एका परीने चांगलेच असावे कदाचित. किंवा कसेही.
चांगली माहिती हीरा.
चांगली माहिती हीरा.
जेम्स लेन प्रकरणाबद्दल
जेम्स लेन प्रकरणाबद्दल नव्याने समजलेली माहिती:
ज्यावेळी शिवछत्रपती आणि मराठा इतिहासाबद्दल वादग्रस्त मजकूर पुस्तकात असल्याचं समजलं त्यावेळी पुरंदरे आणि इतर काही राईट विंग लोक ,इतिहासकार, अभ्यासक यांनी पुस्तकावर बंदी घालायची मागणी केली. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारने बंदी घातली.
पण काही लोक ही बंदी उठवावी यासाठी कोर्टात गेले होते. काँग्रेस सरकारने कोर्टात नीट बाजू मांडली नसावी कारण 2010 मध्ये कोर्टात बंदी उठवली गेली.
ही हिंदूस्थान टाइम्सची बातमी:
The Supreme Court on Friday dismissed the Maharashtra government’s plea to ban American author James W. Laine’s book Shivaji: Hindu King in Islamic India, paving the way for its circulation in the state.
A bench headed by Justice D.K. Jain upheld a 2007 order of the Bombay High Court, which had quashed the ban. The order came on a petition filed by filmmaker Anand Patwardhan, advocate Sangharaj Damodar Rupawate and activist Kunda Pramila, besides the author and publisher.
आता हे संघराज रुपवते, कुंदा प्रमिला, आनंद पटवर्धन कोण आहेत, सध्या कोणासोबत काम करत असतात हे गुगल करून स्वतःच बघायला हरकत नाही.
या प्रकरणात छत्रपतींच्या सर्व जनतेला मनःस्ताप झाला ,शिवशाहीराना लक्ष्य केलं गेलं पण वरची तीन नावं मात्र लोकांना माहीत नसतात.
हा एक पॅटर्न लक्षात घेतला तर शिवाजी महाराजांबद्दल स्वतःच वाद निर्माण करून त्यातून राजकीय फायदा मिळवला जात आहे अशी शंका येते.
आनंद पटवर्धन याबाबत कुठेतरी
आनंद पटवर्धन याबाबत कुठेतरी बोलल्याचे सुद्धा आठवते आहे, हि गोष्ट लपवलेली आजिबात नव्हती. आनंद पटवर्धन फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन चा खंदा समर्थक आहे.
याच आनंद पटवर्धनांनी राम के
याच आनंद पटवर्धनांनी राम के नाम ही एक सुंदर डोक्युमेंटरी राम जन्म भूमी आंदोलनावर केली आहे. तिच जेव्हा प्रदर्शन होते तेव्हा भगवे उपरणे धारक गुंड दंगा करतात !
राम के नाम + विवेक (reason)
राम के नाम + विवेक (reason) दोन्ही डॉक्युमेंट्रीज अगदी भारीयेत.
पुस्तकावरून राजकारण करणारे,
पुस्तकावरून राजकारण करणारे, भांडारकरवर हल्ला करणारे, शिवशाहिराना आणि ब्राम्हण समाजाला उगाचच यात ओढणारे लोक आणि पुस्तकावरील बंदी उठवण्यासाठी कोर्टात जाणारे लोक हे सगळे एकाच विचारसरणीचे असणं, एकत्र काम करत असणं हे सगळं अतिशय रोचक आहे.
ते कोळसे पाटील आणि त्या वर उल्लेखलेल्या कुंदा प्रमिला अलीकडे एकत्र काम करत होते अशीही न्यूज सापडली.
२००९-१० साली सोशल मीडिया प्रभावी असता तर भांडारकरवर हल्ला करवण्याची हिंमत नसती झाली you-know-who ची.
आव असा आणलाय की २००७ साली
आव असा आणलाय की २००७ साली पुस्तकावरची बंदी उठवली तेव्हा यांची नावं लपवून ठेवली होती आणि आता ती अगदी उत्खनन करून शोधून काढलीत.
आणि हे सोशल मीडियाचं नवं पिल्लू जिथे तिथे सोडलं जातंय. याच सोशल मीडियाचा वापर करून भगवाधारी लोक मुसलमानांना मारा , बहिष्कार घाला, त्यांच्या बाय्कांवर बलात्कार करा असला संदेश पोचवताहेत. मॉब लिंचिंगचं शूटिंग करून ते व्हिडियो व्हायरल करताहेत. त्यांना काहीही होत नाही. याचा अर्थ साफ आहे. सोशल मीडियावर भगव्यांचा पूर्ण कंट्रोल आहे. अमित शहांनी तसं म्हटलंच आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पक्ष, सनातन संस्था, भिडे - एक बोटे यापैकी कुणी बंदी उठवू नये म्हणून कोर्टात गेले होते का ? यापैकी कुणीही जेम्स लेनच्या निषेधाचे पत्रक तरी काढले होते का ?
सोलापूरला बाबासाहेब पुरंदरे यांनी या पुस्तकाचे कौतुक केले होते. असे पुस्तक परदेशात जात आहे याबद्दल समाधान व्यक्त केले होते. त्या वेळी वरच्या मंडळींनी त्यांना असे का केले हे विचारले का ?
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन संघपरीवाराने मुस्लीम द्वेष वाढवला. त्यांच्या आडून अजेण्डा रेटला. मग त्यांची बदनामी केली जात असताना या संघटनांचा स्वत:चा स्टॅण्ड काय होता ? आजही काय आहे ? बाबासाहेब पुरंदरेंचे भाषण बरोबर की चूक ?
त्यांचा पुस्तकातला मजकूर आणि जेम्स लेननी केलेली बदनामी ही मिळतीजुळती आहे हा योगायोग समजावा का ?
अमेरिकेत कॅन्सल कल्चर बद्दल
अमेरिकेत कॅन्सल कल्चर बद्दल चुकचुकायचं, आणि इथे पुस्तकावरची बंदी काढा PIL टाकली कि हे लोक दंगेखोर हल्लेखोरांना सामील आहेत असा उटपटांग तर्कशुन्य निष्कर्ष काढायचा.
मज्जाणी लाईफ !
हे पुस्तक भारतात मिळत का?
हे पुस्तक भारतात मिळत का?
आणि हे सोशल मीडियाचं नवं
आणि हे सोशल मीडियाचं नवं पिल्लू जिथे तिथे सोडलं जातंय. याच सोशल मीडियाचा वापर करून भगवाधारी लोक मुसलमानांना मारा , बहिष्कार घाला, त्यांच्या बाय्कांवर बलात्कार करा असला संदेश पोचवताहेत. मॉब लिंचिंगचं शूटिंग करून ते व्हिडियो व्हायरल करताहेत. त्यांना काहीही होत नाही. याचा अर्थ साफ आहे. सोशल मीडियावर भगव्यांचा पूर्ण कंट्रोल आहे. अमित शहांनी तसं म्हटलंच आहे.
Submitted by भरत. on 16 April, 2022 - 07:07
बोल्ड केलेल्या वाक्यावर तीव्र आक्षेप! हिंदू कधीच असा विचार करू शकत नाहीत. पळवून आणलेल्या शत्रुपक्षातील महिलेची सुद्धा खणा-नारळाने ओटी भरून तिला सन्मानाने परत पाठवण्याचे संस्कार आमच्या राजाने आमच्यावर केले आहेत. त्यामुळे हिंदू मुस्लिमांवर आर्थिक, सामाजिक बहिष्कार घालायच्या गोष्टी करतील परंतु केवळ ते शत्रू आहेत म्हणून त्यांच्या स्त्रियांवर बलात्कार??? कदापि नाही. असले दुष्कर्म 'शांतीदूत', 'शांतताप्रिय' लोक करतात, इतिहास साक्षीला आहे या गोष्टीला.
विक्षिप्त मुलगा, तुम्ही
विक्षिप्त मुलगा, तुम्ही शीतनिद्रेतून अचानक जागे होता का? गेल्या काही दिवसांतल्या बातम्या ऐकल्यापाहिल्या नाहीत किंवा मायबोलीवरच्या पोस्ट्स वाचल्या नाहीत का?
असो.
तुमच्या "हिंदू कधीच असा विचार करू शकत नाहीत." या वाक्याशी सहमत. पण हिंदुत्ववादी असेच विचार करताना दिसतात.
आदित्यनाथच्या हिंदू युवा वाहिनीच्या मंचावरून त्यांच्या उपस्थितीत मुस्लिम महिलांना कबरीतून काढून त्यांच्यावर बलात्कार करा,असं भाषणं दिलं गेलं. त्या व्हिडियोची लिंक मी या आधी मायबोलीवर दिली होती. आता ते व्हिडियो उपलब्ध नाहीत. पण त्याबद्दलचा मजकूर आहे.
ट्विटरवर बजरंग मुनी शोधा. तो काय काय म्हणालाय आणि त्याने कसले हावभाव केलेत, ते ऐकून पाहून तुम्हाला
निषेध करावासा वाटला का ते सांगा.
ते व्हिडियो असलेल्या ट्वीट्सच्या लिंक मी अन्य धाग्यांवर दिल्याही असतील.
<शत्रुपक्षातील महिलेची सुद्धा खणा-नारळाने ओटी भरून तिला सन्मानाने परत पाठवण्याचे संस्कार आमच्या राजाने आमच्यावर केले आहेत> याबद्दल सावरकरांचं मत काय आहे ते वाचून पहा. त्यांना आद्य हिंदुत्ववादी म्हणायला हरकत नसावी.
फाळणीच्या वेळी इथून पाकिस्तानात जाणार्या स्त्रियांची खणानारळाने ओटी भरली नव्हती. तिकडे जे झालं, तेच इथेही होत होतं.
अवांतर - तुम्हीच मागे एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आम्हांला शाळेत शिकवलाच नाही हो, असं सांगितलं होतं ना?
परंतु केवळ ते शत्रू आहेत
परंतु केवळ ते शत्रू आहेत म्हणून त्यांच्या स्त्रियांवर बलात्कार??? कदापि नाही. असले दुष्कर्म 'शांतीदूत', 'शांतताप्रिय' लोक करतात, इतिहास साक्षीला आहे या गोष्टीला.
यांच्या कॅलेंडरमध्ये दसरा , नरकचतुर्दशी छापले नाहीत की काय ?
की ह्यांना अहिल्या इंद्र माहीत नाहीत ?
भीष्मांनेही 3 मुली पळवल्या होत्या.
पैशाचीक विवाह नावाचा एक विवाह होता ना ? तो शिकवल्याबद्दल व त्याने हिंदू धर्माची निंदा झाली म्हणून एका लॉ प्रोफेसरला काढून टाकले ना ?
फुलेंच्या आश्रमात कोण होते ?
बुधवार पेठेचा पाया औरंगजेबाने घातला व त्याचा कळस पेशवाईने चढवला ना ?
निर्भया केस मध्ये हिंदू : मुसलमान रेशो 5:1 होता.
सहावा नक्की मुसलमान होता का ? तो अल्पवयीन होता
मायनर अपराध्याचं नाव गुप्त
मायनर अपराध्याचं नाव गुप्त ठेवलं. म्हणून त्याला यांनी मुसलमान ठरवलं. त्याचं नाव आणि ओळख अजूनही गुप्तच आहे.
राज ठाकर्यांनी राजकीय बाबतीत
राज ठाकर्यांनी राजकीय बाबतीत अनेकदा बोलणे बदलले असेल. कधी भाजप विरोधात तर कधी पवार विरोधात, पण पुरंदर्यांच्या बाबतीत ते पहिल्या पासून कन्सिस्टंट आहेत. ती भूमिका त्यांनी कधीही बदललेली नाही. या एका गोष्टीकरता त्याच्याबद्दल कायम आदर वाटत आलेला आहे.
बाकी राजकीय भूमिका बदलण्यात ते एकटेच नाहीत. न बदलणारेच एखादे असतील.
जेम्स लेनचे पुस्तक बंदी हटवून
जेम्स लेनचे पुस्तक बंदी हटवून सर्वत्र उपलब्ध व्हावे यासाठी कोर्टात जाणारे तिघे- एक पुरोगामी डॉक्युमेंटरी मेकर, दुसरे आंबेडकरी चळवळीशी संबंधित आणि तिसऱ्या पुरोगामी कार्यकर्ती महिला ज्या कोळसे पाटील व तत्सम लोकांसोबत काम करत असतात.
पांडुरंग बलकवडे यांनी नुकतीच मुलाखत दिली आहे ज्यात त्यांनी म्हटलं की पुस्तकाचे प्रकाशक ऑस्कफर्ड प्रेस यांच्याकडे काही इतिहासप्रेमींनी तक्रार केली होती ज्यात स्वतः बलकवडे, पुरंदरे, जयसिंगराव पवार, निनाद बेडेकर, वसंतराव मोरे इत्यादी लोक होते. ऑक्सफर्ड प्रेसने माफीनामा पाठवला होता. हे सर्व डॉक्युमेंटेशन बलकवडे यांनी तत्कालीन काँग्रेसराष्ट्रवादी सरकारला देऊ केलं होतं कोर्टात मांडण्यासाठी पण सरकारने घेतलं नाही. आनंद पटवर्धन-रुपवते-कुंदा प्रमिला यांनी केस जिंकली.
व्हाईटहॅट, पांडुरंग बलकवडे
व्हाईटहॅट, पांडुरंग बलकवडे खरे बोलताहेत याची खात्री तुम्ही केली आहे का ? त्या पत्राची पांडुरंग बलकवडे यांची सही असलेली कॉपी द्या.
बलकवडे रेटून खोटं बोलतात हा त्यांचा इतिहास आहे. ते इतिहास परीषदेला हजर राहीले नव्हते. त्या ऐवजी झी वर गेले. हा संघाचा चॅनेल आहे. तिथे हवी तशी चर्चा करत बसले. विरोधकांना बलकवडे आणि अँकर यांनी बोलूच दिले नाही. अडचणीच्या प्रश्नांना त्यांनी बायपास काढला ज्याळा अँकरने पूर्ण मदत केली होती.
Pages