'छत्रपती शिवाजी महाराज' असे पूर्ण नाव घेणे ही जबरदस्ती आहे का?

Submitted by हरचंद पालव on 28 November, 2019 - 02:37

सर्वप्रथम हे मान्यच करायला पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व महाराष्ट्राचे दैवत आहे. त्यांचे चरित्र अतुलनीय आहे. इतिहासात एक द्रष्टा राजा, कुशल राज्यकर्ता, सेनापती, संघटक, शककर्ता, प्रजाहितदक्ष; इतकेच काय - सिंहासनाधीश्वर, प्रौढप्रतापपुरंधर, राजाधिराज - अशी कितीतरी विशेषणे लावली तरी ती कमीच पडतील. त्यांच्या विषयी लिहिताना रामदासस्वामीं पासून ते आजपर्यंत कित्येक इतिहासकार, कादंबरीकर, नाटककार, चित्रपटकथालेखक यांची लेखणी थकली तरी त्यांचे संपूर्ण वर्णन लिहायला ती अपुरीच पडेल इतके उत्तुंग व्यक्तिमत्त्व! त्यामुळे महाराजांबद्दल आदर आहे हे सांगायला लागायची किंवा त्यासाठी कुठला पुरावा देण्याची गरज निदान मराठी माणसास नसावी.

आता हे सर्व असताना नुकत्याच काही घडामोडींमुळे त्यांच्या नावाचे संबोधन चर्चेत आले आहे. अमिताभ बच्चन काम करत असलेल्या कौन बनेगा करोडपती कर्यक्रमात एकीकडे 'मुघल-सम्राट औरंगजेब' असा उल्लेख असताना त्याच खाली केवळ 'शिवाजी' हा उल्लेख करणं हे अपमानास्पद वाटते हे खरेच! त्याबद्दल त्यांचा निषेध. परंतु हे लक्षात घ्यायला हवे की इथे अपमान हा संबोधनाच्या तुलनेतून निर्माण झाला आहे. इतर ठिकाणी स्टँड-अलोन उल्लेख असेल तर 'शिवाजी' म्हणणं तुम्हाला चुकीचं वाटतं का? असेल तर पुढे काही प्रश्न निर्माण होतातः

१. भोंडल्यामध्ये 'शिवाजी अमुचा राजा..' ह्या गीतात बदल करावेत का? इथे गाणारे महाराजांना प्रेमाने 'शिवाजी' म्हणतात, त्या प्रेमाचे काय? प्रेमापेक्षा आदर कायम मोठाच असतो का? ते ठरवणे व्यक्तिसापेक्ष असायला हवे ना?
२. लहानपणी 'शिवाजी म्हणतो' हा खेळ खेळायचो, त्यात महाराजांचा उल्लेख एकेरी असला तरी कधी अनादर वाटला नाही, किंबहुना तसे कधी डोक्यातही आले नाही. त्याचे काय?
३. शिवाजी महाराजांचा आदर सर्वांनी ठेवावा - ही जबरदस्ती आहे का? एखाद्याला नसेल वाटत, तर आपण तो आदर त्या/तिच्यावर लादावा का?
४. वरचे उत्तर होय असेल तर मग एखादा म्हणेल की त्याच्या मते चंद्रगुप्त मौर्य सर्वश्रेष्ठ आहे. मग चंद्रगुप्ताचा 'सम्राट चंद्रगुप्त मौर्य महाराज' किंवा अशोकाचा उल्लेख 'सम्राट अशोक महाराज' आणि अशोकचक्राचे नाव 'सम्राट अशोक महाराज चक्र' असे करावे - ही सक्ती केली तर चालेल का? झाशीची राणी - असा एकेरी उल्लेख तरी मग का करायचा? झाशीच्या महाराणी लक्ष्मीबाई - असे संपूर्ण नाव घ्या.
५. अनेक इतिहासकार इतिहास लिहिताना प्रत्येक व्यक्तिबद्दल केवळ एक ऐतिहासिक व्यक्ति म्हणून भावनिक न होतासुद्धा लिहू शकतात. त्यामुळे सरदेसाई काय, किंवा गोविंद पानसरे काय - त्यांनी 'शिवाजी कोण होता' - असे एकेरी उल्लेख केले असले तरी फक्त त्या संबोधनावर न जाता त्यांनी उलट त्यांच्याबद्दल काय मोठे संशोधन समोर आणले आहे - ते योगदान जास्त महत्त्वाचे नाही काय?
६. मला आठवते की लहानपणी एका इतिहासप्रेमी (परंतु कर्माने केवळ गुंडगिरी करणार्‍या) माणसाने दटावले होते की 'महाराज आपल्या सर्वांच्या कित्येक पिढ्यांसाठी आदरस्थानी आहेत. त्यांना नुसते शिवाजी काय म्हणता? घरी वडिलांना पण अरे-तुरे करता का?' आता आम्ही कुणी अरे-तुरे करत नव्हतो हे खरे; पण आज-कालची मुले वडिलांना अरे-तुरे खरोखरच करतात, पण त्यामुळे कुठेही आदर कमी झाला आहे असे वाटत नाही. फक्त 'अहो जाहो' म्हटल्याने आदर दाखवला जातो आणि 'अरे-तुरे' केल्याने आदर राहत नाही - हे सरसकटीकरण नाही काय?

तुम्हाला काय वाटते ते नक्की सांगा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

स्वासा, लोटि, आक्रावाबफ, क्रांचा अशी लघुरूपंही प्रचलित असतीलच ना ? >> लोटि टर्मिनस आहे. त्यामुळे तिथेही 'लोकमान्य टिळक' एव्ढे लांबलचक नाव घेण्यापेक्षा नुसते 'लोकमान्य' किंवा नुसते 'टिळक' चालले असते. बाकी नावे कुठल्या विद्यापीठांना किंवा ठिकाणांना फारशी दिलेली माहित नाहीत. पण यापुढे द्यायची असल्यास त्यांचीही संपूर्ण नावे न देता 'सावरकर', 'फडके', 'चाफेकर' एव्ढी दिली तरी काही अपमान होत नाही. संपूर्ण नावे दिली तर तुम्ही म्हणता तशी या नावांची देखिल लघुरूपे होणार. मग तुमचा मुद्दा नक्की काय आहे? संपूर्ण नावे द्यावीत की देऊ नयेत?
शिवाय तुम्ही अशी वेगवेगळी नावे सुचवत चालला आहात, पण त्यांनाही तेच नियम लागू होतात - जे शिवाजी या नावाला. मग नक्की प्रॉब्लेम काय आहे? मला तर कुठेच संपूर्ण नाव घ्यायची सक्ती करू नये असे वाटते. कुणाचेही नाव असो. शिवाजी म्हणा वा शिवाजी महाराज म्हणा, सावरकर म्हणा वा विनायक म्हणा, बाळ म्हणा वा बाळासाहेब म्हणा, दामोदर म्हणा वा क्रांतिवीर म्हणा - नुसत्या उल्लेखावरून तो आदर आहे की अनादर हे ठरवणे बरोबर नाही, त्यासोबत येणार्‍या वाक्यांमधून कॉन्टेक्स्ट समजला तर कळेल की तो आदर आहे की अनादर. 'स्वातंत्र्यवीर सावरकरांना काडीची अक्कल नव्हती' - हा अपमान झाला आणि 'विनायकाची लेखणी कित्येकांना स्वातंत्र्यसमरात भाग घेण्यास उद्युक्त करून गेली' - हा सन्मान झाला.

संपूर्ण नावे द्यावीत की देऊ नयेत? >>> हा तुमचा प्रश्न आहे , माझा नाही. प्रेम सर्वांवर सारखेच असावे एव्हढेच म्हणणे आहे. एका बाजूच्या प्रेमावर शंका, शक्यता कशाला उपस्थित करायच्या ?

उदा एखादा सावरकरांचा उल्लेख विन्या असा करत असेल तर रिक्षावाला , आई वगैरे थिअरी तिथेही लागू होईलच ना ? विन्या, विनोबा असे उल्लेख चुकीचे नाहीत, जर तॉ व्यक्ती माझे प्रेम आहे असा क्लेम करत असेल तर.

अजूनतरी कुणी केशव बळवंत हेडगेवार या नावाचा उल्लेख केशु, केशराय, केशबा असा केल्याचे आठवत नाही. याचा अर्थ या नावाबाबत कुणालाच प्रेम नाही असे म्हणायचे का ? तीच गोष्ट माधव बाबत.
बाळासाहेब देवरस असेच नाव प्रचलित असणे याचा अर्थ त्यांच्यावर प्रेम असणारा कुणीही नाही असे म्हणायचे का ? त्यांचेही नाव असेलच की. किमान बाळू, बाळा, बाळ्या म्हणणे दिसून आले असते.

अजूनही वेळ गेलेली नाही. आपण प्रेमाने असे उल्लेख करायला सुरूवात करूयात. त्याला कुणी आक्षेप घेईल असे वाटत नाही.

शिवाजी महाराज आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल एकेरी लिखाण करणार्‍या नरहर कुरुंदकराचं नाव आदरार्थी घेणार्‍याला शिवाजी महाराजांचं नाव आदरार्थी घेण्याला आक्षेप असु शकतो म्हणजे नेमका काय प्रकार आहे हे लक्षात आलंच असेल म्हणा..!

चुकूनही काही लोकांचा उल्लेख कायमच आदरार्थी कसा होतो ? हे काही त्या उंचीचेही नाहीत. मात्र काही विशिष्ट लोकांना महात्मा, तपस्वी, महर्षी अशा पदव्या लावायच्या आणि त्यासहीत त्यांचा आदरार्थी उल्लेख ठसवायचा, मात्र शिवाजी महाराजांबाबत प्रेमाचे उल्लेख करायचे यातही दांभिकपणा असू शकतो अशी शक्यता का बरे नाही मांडली गेली इथे ?

सेनापती बापटच्या ऐवजी बापट असा उल्लेख कधी वाचल्याचे स्मरत नाही. कुठले सेनापती होते ते ?
सामान्य वकूबाच्या माणसांना देवत्व बहाल करायचे आणि जे महाराष्ट्राचे दैवत आहे त्याच्याशी माझे कसे प्रेमाचे नाते आहे हे दर्शवण्यासाठी आपण एकेरी उल्लेख करायचे हे ढोंग आहे का ? आपण एकेरी उल्लेख करणारे तेव्हढ्या उंचीचे आहोत का ?

खासगीत जेव्हां आपण शिवाजी महाराज किंवा तत्सम उंचीच्या महापुरूषांचा एकेरी उल्लेख करतो तेव्हां ते प्रेमाने आहे हे समजतेच. पण योग्य त्या व्ञासपीठावर योग्य त्या उपाधींसह त्या त्या व्यक्तींचा उल्लेख होणे हे औचित्याल धरून असते यावर एव्हढी खर्डाघाशी का व्हावी ? शिवाजी महाराजांचा उल्लेख शिवराय असा होतो, तेव्हां दंगल होत नाही काही. ना कुणाला धमक्या आल्यात. कुठल्या प्रसंगी आपण ते उल्लेख केले हे आजूबाजूंच्यांना समजतेच की. ही जबरदस्ती आहे असे का वाटावे ?

आणि जर औचित्यभंग होत नाही अशी ठाम खात्री असेल तर शिवरायांवर प्रेम करणा-या महाराष्ट्राने त्यांच्या शाहीराचा उल्लेख बाब्या असा केला तर ते प्रेम नाही हे कसे काय ? त्यांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे असेच म्हणावे अशी सक्ती आहे का ?

उदा एखादा सावरकरांचा उल्लेख विन्या असा करत असेल तर रिक्षावाला , आई वगैरे थिअरी तिथेही लागू होईलच ना ? विन्या, विनोबा असे उल्लेख चुकीचे नाहीत, जर तॉ व्यक्ती माझे प्रेम आहे असा क्लेम करत असेल तर. >> हो, अगदी. काहीच हरकत नाही. तुम्ही शिव्या, संभ्या, विन्या, गोसावड्या - काहीही म्हणा हो. तुमचे प्रेम आहे की नाही हे कॉन्टेक्स्ट वरून कळेलच की! बाय द वे, माझ्या लिखाणात एकेरी उल्लेख हे, जसं नाव आहे तसं (अधिकची विशेषणे न लावता - शिवाजी, विनायक अश्या प्रकारे) आहे. तुम्ही म्हणता तशी विन्या वगैरे रूपे - हा एक वेगळा मुद्दा आहे. 'नावांची अर्धवट फोड करून -या लावून केलेली रूपे अपमानकारक वाटतात का' - असा एखादा धागा काढायला हरकत नाही. इथे चर्चा तश्या रूपांंची नाही.

एका बाजूच्या प्रेमावर शंका, शक्यता कशाला उपस्थित करायच्या ? >> कधी केल्या? शक्यता दोन्ही बाजूच्या उपस्थित केल्या आहेत. आधी तुम्हाला कळले नाही म्हणून नंतर वरती १,२ असे आकडे देऊन दाखवले आहे.

पुरोगामी गाढव, तुमची काहीतरी गफलत होते आहे. मी केवळ २ शक्यता मांडल्या: १. तुम्ही निखळ प्रेमापोटी म्हणता आहात आणि २. तुम्ही खिजवण्यासाठी म्हणता आहात. त्यांपैकी कोणती शक्यता खरी - हे काही मी जज केलेले नाही. त्यातल्या शक्यता १ नुसार तुमचे प्रेम खरे असेल तर काहीच हरकत तश्या हाका मारायला हे मी आधीच म्हटले आहे.

Submitted by हरचंद पालव on 5 December, 2019 - 10:32

हरचंद पालव, तुम्ही माझा प्रत्येक प्रतिसाद स्वतःवर ओढवून तर घेतच आहात आणि प्रत्येक प्रतिसादावर कॉण्टेक्स्क्ट आणि शंका, शक्यता मांडत आहात. मला माझे मत मांडायचे स्वातंत्र्य आहे की नाही ? इथे जी मतं व्यक्त होत आहेत त्याप्रमाणे मला प्रेम व्यक्त करता येईल की नाही ? तुम्ही या आधी कुणालाही असे नियम लावल्याचे दिसत नाही. माझ्याच प्रतिसादाच तुम्हाला शक्यता दिसत असतील तर तुमच्या छत्रपती शिवाजी महाराज की शिवबा यात काय दिसावे हे लोकांना ठरव ण्याचा अधिकार त्यांच्याकडे का नाही ? त्यासाठी मग इथे काथ्याकूट कशाला करायचा जर सगळे तुम्हीच ठरवणार असाल तर.

तुम्ही फक्त निकाल द्या, आम्ही कार्यवाही करू.

जर माझ्या उल्लेखाने तुमच्या मनाला वेदना झाल्या असतील तर तसे जरूर कळवा.

अच्छा. ठीक आहे, मग यापुढे नाही देत तुम्हाला प्रतिसाद. तुम्ही माझी वाक्ये उधृत करून जे प्रतिसाद लिहिले होते, ते मला पटले नाहीत (आणि कदाचित तुम्हाला ते आधीचे मुद्दे कळले नसावेत या समजुतीने) म्हणून मी तुम्हाला प्रतिसाद दिला. असो, तुम्हाला बाकीचे मुद्दे माहित असतील तर प्रश्न मिटला.

तुम्ही माझा उल्लेख करून सुरूवातीला प्रतिसाद दिले म्हणून मी वाक्ये उद्धृत केली आहेत. त्याआधीचे माझे प्रतिसाद म्हणजे माझी मतं आहेत ती. ती काही तुम्हाला एकट्याला उद्देशून नव्हती लिहीलेली. तुम्हाला पटण्या न पटण्याचा प्रश्नच नाही येत. तुम्हाला जे पटतंय ते तुमच्यापाशी. बाकी तुम्हाला स्वतःला डिफेण्ड करणे अत्यंत उत्तम जमते याबाबत तुमचे कौतुक आणि अभिनंदन !!

फक्त मला आरोपीच्या पिंज-यात उभे करणे सोडा. कारण त्याच गुन्ह्यासाठी तुम्हाला त्रास होत आहे म्हणून तुम्ही धागा काढला आहे. त्यामुळे माझ्या मनातही ज्या नावांबाबत मला सक्ती होते ते मी मांडले. तुम्हाला चालत नसेल, त्रास होत असेल तर तसे स्पष्टच सांगा. सबगोल़्मारी प्रतिसाद कशाला ?

तुम्ही शिव्या, संभ्या, विन्या, गोसावड्या - काहीही म्हणा हो. तुमचे प्रेम आहे की नाही हे कॉन्टेक्स्ट वरून कळेलच की! >>

मला यात पडायचे नाही , पण मायबोलीवर जर महाराजांना या भाषेत बोललेल चालत असेल तर अवघड आहे Sad

जिजाऊ असं आलं की आपसूकच पूर्ण वाक्य आदरार्थी होते. शिवबा आलं की एकेरी. शिवाजीराजे आलं की आदरार्थी आणि शिवाजीराजा आलं की एकेरी. बाजीरावाला कुणी आदरार्थी बोलतंय ( फक्त वाक्यरचनेच्या दृष्टीने) असं मी क्वचितच वाचलंय. तीच गत इतर महापुरुषांची. बाबासाहेबांना कुठल्याही भीमगीतात बहुवचन दिलेलं नसेल. नरहर कुरुंदकरांनी महाराजांना सर्व वचनांत संबोधलं आहे हे त्यांचे सगळे लेखन वाचलेल्यांना लक्षात येईलच.
उद्या कुरुंदकर लोकोत्तर महापुरुष ठरले आणि त्यांचं नाव घरोघरी, लोकसंस्कृतीत खोलवर झिरपलं की त्यांनाही नरहर म्हणून एकेरीच संबोधतील.

==
अजूनतरी कुणी केशव बळवंत हेडगेवार या नावाचा उल्लेख केशु, केशराय, केशबा असा केल्याचे आठवत नाही. याचा अर्थ या नावाबाबत कुणालाच प्रेम नाही असे म्हणायचे का ? तीच गोष्ट माधव बाबत.
बाळासाहेब देवरस असेच नाव प्रचलित असणे याचा अर्थ त्यांच्यावर प्रेम असणारा कुणीही नाही असे म्हणायचे का ? त्यांचेही नाव असेलच की. किमान बाळू, बाळा, बाळ्या म्हणणे दिसून आले असते.

अजूनही वेळ गेलेली नाही. आपण प्रेमाने असे उल्लेख करायला सुरूवात करूयात. त्याला कुणी आक्षेप घेईल असे वाटत नाही
==
अत्यंत खोड्साळ वृत्तिने विचारलेले प्रश्न आहेत. ह्यात फुले, आंबेडकर, फार काय शरद पवार घालता आले असते. पण नाही. हेडगेवार आणि गोळवलकरच!
१. होय. शिवाजीचे जे स्थान आहे ते हेडगेवार आणि गोळवलकर आणि देवरस घेऊच शकत नाहीत. कितीही कट्टर संघनिष्ठ माणूस असेल तरी तो/ती हेच म्हणेल. शिवाजी अनेक शतकांत एक होतो. त्यामुळे तो प्रश्नच उद्भवू नये.
२. एखाद्या व्यक्तीबद्दल आदर म्हणून किंवा एक रीत म्हणून लोक अनेक वचन वापरतात. आदरार्थी अनेकवचन ह्यात आणखी काही छटा आहेत का ते माहित नाही. त्यामुळे प्रत्येक अनेकवचन = आदर असे नाही. प्रत्येक एकवचन = अनादर असेही नाही.
उदा. शरद पवार ह्या व्यक्तीबद्दल मला काडीचाही आदर नाही. पण एक रीत, सभ्यता, उपचार म्हणून मी त्यांचा उल्लेख अनेकवचनी करतो. शरद पवार अमुक म्हणाले. शरद पवारांनी पाठीत खंजीर खुपसला, शरद पवार जातीचे राजकारण करत असतात. इ.

कुणीतरी कुणाचा उल्लेख नर्‍या, विठ्या, बाळ्या करतो म्हणून त्यामागे प्रेमच असेल असा सरधोपट नियम नाही. राम, कृष्ण ह्या व्यक्तींच्या तोडीचा
शिवाजी आहे हा अपवाद आहे नियम नाही. असो. झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करणे अशक्य असते म्हणतात.

बघा बघा. मी प्रेमाने नावं घेतली तर इथे एकाला राग आला. हीच नावं का, तीच का नको म्हणून.
मग महाराजांच्या बाबतीतलं प्रेम दाखवायला गेलं आणि कुणी चौदावं रत्न दाखवायला गेलं तर ? दोष द्यायचा का ?

शिवबा, शिवाजी असे एकेरी उल्लेख केले म्हणजे त्या व्यक्तीला आदर नाही आणि छत्रपती शिवाजी महाराज मटले म्हणजे आदर आहे, हे नियम रेम्या डोक्यातूनच निघू शकतात.

भक्तिभावाने दिलेले शिवाजी विद्यापीठ हे नाव अचानक अनादरयुक्त ठरते.
छत्रपती शिवाजी हा उल्लेख अचानक पुरेसा आदरयुक्त वाटत नाही.

धन्य तो आदर आणि धन्य त्या आदराचे मोजमाप करणारे.

छत्रपती शिवाजी राजे यांना आदरार्थी संबोधण्याचा एवढा राग फक्त 'काही' लोकांनाच येऊ शकतो हे या येथील चर्चेतुन दिसुन येते. 'ते' लोक कोणाचे पाईक आहे हे आता लपुन राहिले नाही.

शिवाजी महाराजांवर प्रेम आहे तसेच ते अन्य लोकांबाबतही असायला हवे एव्हढाच मुद्दा आहे. की ते "आपले" आहेत म्हणून राग यावा ?
अपवाद कुठला आणि नियम कुठल्या याचे कायदे पण त्यांचेच असायला हवेत का ?
महाराजांचा उल्लेख एकेरी करण्यात प्रेम असेल तर लोकमान्य टिळक असाच उल्लेख का बुवा हा प्रश्न का नाही ? तिथेही प्रेम दिसायला का नको ? झोपेचं सोंग नेमकं कुणी घेतलं आहे ?

आदरार्थी संबोधण्याचा राग येतो हा शोध ज्या डोक्यातून निघाला त्या डोक्याला शिरसाष्टांग नमस्कार आणि १०० प्रदक्षिणा.

==
महाराजांचा उल्लेख एकेरी करण्यात प्रेम असेल तर लोकमान्य टिळक असाच उल्लेख का बुवा हा प्रश्न का नाही ? तिथेही प्रेम दिसायला का नको ? झोपेचं सोंग नेमकं कुणी घेतलं आहे ?
==
कारण उघड आहे. टिळक कितीही थोर असले तरी शिवाजीच्या तोडीचे नाहीत. शिवाजीसारखा युगपुरुष अनेक शतकांत एखादाच होतो. केवळ ब्राह्मण आहेत म्हणून टि़ळक, सावरकर वा अन्य कुणी (अगदी जाणता राजा अशी पदवी लावणारेही!) शिवाजीच्या बरोबरीचे होत नाहीत.
एकेरी उल्लेख केला तरच प्रेम असते हे संशोधन कसे केले ब्रिगेडने? एकेरी उल्लेख असूनही त्या व्यक्तीबद्दल प्रेम, आपुलकी असणे हा अपवादात्मक प्रकार आहे. विठोबा, राम, मारुती, कृष्ण, शिवाजी अशा काही मूठभर लोकांनाच तो लाभतो. हेडगेवार, टिळक, गोळवलकर, सावरकर ह्यांना नाही.

जय श्रीराम म्हणावे लागते आजकाल. सनातन मधे जाणे सोडले का ? ते राम, ते कृष्ण असेही उल्लेख चालत नाहीत. पुन्हा जाणे चालू करा बघू.

शिवाजी महाराजांचे आजचे वंशज हे दत्तक आहेत, त्यांच्या मूळ आई वडिलांचे नाव त्यांनी सोडले , कारण राज घराण्याच्या मांडीवर ते बसले, त्यांचे पालन पोषण झाले,

करणही कुंतीला हेच बोलला, मी कौंतेय नाही , राधेय आहे,
पंडु , धृतराष्ट्र हेही भरत कुळाचे नाव लावत होते, व्यासाचे नाही.

15।8। 1947 ला राजेशाही मेल्याने अनाथ झालेल्या प्रजेला गांधी नेहरू पटेल आंबेडकर ह्यांनी लोकशाहीरुपी मातेला दत्तक दिले.

तरी लोक जुन्या राजेशाहीची इतकी उठाठेव का करतात , ही गम्मतच आहे. राजकारणी करतात , कारण त्यांचे पोट भरते

एके काळी त्यांच्या नावे राजकारण करून धार्मिक ध्रुवीकरण केले, आज ते नाणे चलनी नाही म्हणून सक्ती वाटू लागली आहे का ? ज्या वेळी महाराजांच्या नावे उन्माद पसरवला जात होता तेव्हां ही अक्कल आली नाही का ? जो तो शिवाजी हे नाव आपल्या सोयीप्रमाणे वापरतो आणि आपल्यावर उलटू लागले की बोंबा मारत सुटतो.

पूर्वी धर्माचे बनवलेले महाराज आज जातीचे झाले की असे प्रश्न पडू लागलेत. आता पुन्हा धर्माचे बनवले की पुन्हा यू टर्न घेतला जाईल.

शिवाजी, राम, कृष्ण सारख्या देवत्व लाभलेल्या व्यक्तिमत्त्वाशी त्यांचे चाहते/भक्त/पाईक वेगवेगळ्या वयात वेगवेगळ्या प्रकारे संलग्न होतात.
म्हणजे राम, कृष्ण, शिवबा ह्यांच्या बाललीला लहान असताना कानावर पडतात आणि त्यांच्या वाढत्या पराक्रमाच्या गोष्टी ऐकत त्यांच्या बरोबरच मोठे होणे असे बहुतेकांचे होते. ह्या वयात मान, आदर देणे वगैरे पेक्षा प्रेम, आपलेपण वाटणे, स्फूर्ती घेण्याची भावना मोठी असते. अशा लोकांचा एकेरी उल्लेख सुद्धा आदरार्थी म्हणुनच ग्राह्य धरावा.

संस्कारक्षम वय मागे पडून पुढे इतिहासात जेव्हा हळूहळू पराक्रमी, राजे व्यक्तींची जागा पुढारी, धोरणी, राजकारणी, क्रांतिकारी, स्वातंत्र्य सेनानी असे टिळक, सावरकर, गांधी लोक घेतात ह्या प्रभ्रृतींची ओळख आपल्याला होते तेव्हा ही माणसे ऑलरेडी प्रौढ आणि कर्तबगार म्हणूनच आपल्या समोर येतात. मोठया लोकांना आदर द्यावा ही आपल्याकडून केली जाणारी अपेक्षा सुद्धा वाढलेली असते.
तद्वत, सगळे ग्राह्य असावे.

हे शिवाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणण्याची सक्ती कधीपासून सुरु झालीये ? सोमीवर बऱ्याच ठिकाणी एखाद्याने अभ्यासपुर्वक काही चांगलं लिहिलेले असलं तरी त्यात कमेंटबॉक्समध्ये बहुतेक लोकं छत्रपती न लावल्याबद्दल दम देऊन जातात आणि काहीकाही ठिकाणी तर अगदी आईमाईवर येऊन शिव्या दिलेल्या असतात. म्हणजे एखाद्याने केवळ पुढे छत्रपती नाही जोडलं म्हणजे त्याला महाराजांविषयी कमी आदर असतो असा काही प्रकार दिसतोय.

अग्रीमा जोशुआ प्रकरणावर केतकी चितळेने एक पोस्ट लिहिली होती जिच्यात काहीप्रमाणात तथ्यही आहे पण तिचा जो उद्धार झालाय त्या पोस्टच्या कमेंटबॉक्समध्ये तो केवळ भयानक असाच आहे. म्हणून तिच्या बाकीच्या एपिलेप्सी वगैरे फेसबुकपोस्ट वाचल्या तर तिथेही तोच प्रकार आहे. छत्रपतींच्या आडून जी विकृती ओकण्याचं काम ही पोरं करत असतात त्याला काही सीमा नाहीये. केतकी व्यक्ती किंवा कलाकार म्हणून कशी आहे हे मला माहित नाही पण एवढ्या घृणास्पद ट्रोलिंगला तोंड देऊन ती तिच्या पोस्ट्स लिहीत असते त्याबद्दल कौतुकच वाटतं तिचं.

(वरील दोन्ही उताऱ्यांचा एकमेकांशी संबंध नाही)

जिद्दु, ते म्हणताहात ते सर्व ठीक आहे पण एखाद्याने कितिही आव आणला तरी थोडे तारतम्य पाळुन लिहिलं बोल्लं तर शेवटी मिळायचा असेल तर मान मिळातोच. उगीच एखादा जाणुनबुजुन आणि स्वत:ला सिद्ध वगैरे करण्यासाठी आगाउपणा करायला गेला की मग काही किंमत उरत नाही.

Pages