फटाकेमुक्त दिवाळी

Submitted by प्रकाश घाटपांडे on 26 October, 2013 - 08:12

दिवाळी हा खरा तर दिपोत्सव. त्यात हे फटाके कुठून घुसले काय समजत नाही.पुर्वी दुष्ट शक्तींना जवळपास फिरकू न देण्यासाठी ढोला सारखी वाद्ये वाजवली जायची.कदाचित दिवाळी सारख्या मंगल सणामधे दुष्ट शक्ती चा वावर नको म्हणुन फटाके वाजवण्याची प्रथा आली असावी.

फटाकेनिर्मितीत वापरले जाणा-या रसायनांमुळे अनेक प्रकारचे आजार संभवतात. फटाक्यांमुळे हवा आणि वातावरण दूषित होते.त्यामुळे श्वसानाचे आजार वाढतात. ध्वनीप्रदूषणाची पातळीही वाढते. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे श्रवण क्षमता कमी होते.फटाके फोडल्यामुळे कार्बन मोनॉक्साईड सारखे विषारी वायू वातावरणात पसरतात. ओझोनचा थर पातळ होतो.एकदा मराठी विज्ञान परिषदेचा फटाक्यामागील विज्ञान या कार्यक्रमात फटाक्यात वापरल्या गेलेल्या रसायनांबदद्ल स्लाईड शो कार्यक्रम दाखवला होता.
कॉपर मुळे श्वसननलिकेत त्रास कॅडमियम मुळे किडनीला धोका आणि अ‍ॅनेमिया.शिशाचा मज्जासंस्थेवर परिणाम अशा अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.तपशीलात थोडाफार फरक असू शकतो. अशा प्रदुषण करणार्‍या फटाक्यांपासून मुक्त राहून दिवाळी साजरी करता येणार नाही का? नक्कीच येईल. फटाक्या शिवाय दिवाळी ही कल्पनाच काहींना करवत नाही. कारण दिवाळी आणी फटाके यांची संलग्नता मेंदुमधे ठामपणे कोरली गेली आहे.पिढ्यान पिढ्या ती संक्रमित होत गेली आहे.कालसुसंगत नसलेल्या अनेक प्रथा परंपरा आज पाळल्या जातात.खर तर कालबाह्य रुढी परंपरा या एक प्रकारच्या अंधश्रद्धाच आहेत.मनाला वाटणार्‍या असुरक्षिततेमुळे ते मोडण्याचे धाडस आज बर्‍याच लोकांना होत नाही.अंधश्रद्धा निर्मुलनाची चळवळ ही एक व्यापक समाज परिवर्तनाची चळवळ आहे.त्यामुळे अंनिस फटाकेमुक्त दिवाळीचे अभियान नेहमी राबवते. विद्यार्थ्यांमधे ही पर्यावरण जागृतीचे प्रमाण वाढू लागल्यामुळे त्यांना फटाके मुक्त दिवाळीचे महत्व पटू लागले आहे.काही सुसंस्कृत पालक ही आपल्या मुलांना फटाक्यांचे दुष्परिणाम पटवून त्यापासून परावृत्त करु लागले आहेत. डॊ नरेंद्र दाभोलकरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काही युवकांनी व विद्यार्थ्यांनी स्वत:हून फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे ठरवले आहे.पाहू या काय होते ते!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्राणवायू ( ऑक्सिजन) च्या कमतरते मुळे करोना काळात मरण पावलेले लोक हे आपण ऐकेल वाचले पाहिले तरी सुद्धा फटाके वाजवून ध्वनी व वायुप्रदूषण केल्याशिवाय दिवाळी साजरीच करता येणार नाही का? प्रदूषणाशिवाय सण साजरे करता येतात. उत्साह व उत्सव नावाखाली उन्माद केला कि विचार करणारा मेंदु बधीर होतो. मग कळत पण वळत नाही अशी अवस्था होते.

आता तर यावर्षी प्रचंडच असणारे
गणपती दहीहंडीच्या उन्मादी वागण्यातूनच अंदाज येतोय
जीव नकोसा करणार हे फटाके वाजवून

पुलावरून जाताना प्लास्टिक च्या पिशव्या तुन निर्माल्य नदीत फेकणारे व दिवाळी फटाके वाजवणारे एकाच संवर्गातील वाटतात

मला वाटतं प्रदूषण हे कारण फटाके ल विरोध करताना देवू नये.
आवाजाचा त्रास होतो इथपर्यंत ठीक आहे.
प्रदूषण करणारे अनेक खूप गोष्टी आहेत त्या प्रचंड आणि खूप मोठ्या प्रमाणात जल आणि वायू प्रदूषण करतात.
पण त्याच्या कडे कोणी पक्ष देत नाही किंवा तो विषय चर्चेत पण कधी आणला जात नाही.
फटाके मुळे प्रदूषण ची intensity अगदीच शुल्लक आहे

उत्साह व उत्सव नावाखाली उन्माद
>>>

जात आणि धर्म ही एक मानवनिर्मित किड आहे.
जेव्हा मनुष्य स्वत:ला एका जातीधर्माशी जोडून घेतो आणि ईतर जातीधर्मीयांपासून वेगळा करतो. तेव्हा आपल्या जातीधर्माच्या समूहाबद्दल नकळतच एक अहंकार मनात येतोच. लोकं त्याला स्वाभिमान असे गोंडस नाव देतात. पण ती स्वत:शीच फसवणूक असते. जी गोष्ट आपल्याला निव्वळ जन्माने मिळाली आहे तिचा कसला डोंबलाचा अभिमान.

आणि मग त्या जातीधर्माचे वेगळेपण राखायला, त्याच्या परंपरा जपायला बरेचदा काय योग्य आणि काय अयोग्य याचा विचार न करताच सण उत्सव साजरे केले जातात. पुढे हा उन्माद त्यातूनच निर्माण होतो.

म्हणून सर्व फसाद की जड असलेले जात धर्म मी माझ्यापुरते तरी मानत नाही. म्हणजे निव्वळ भेद मानत नाही असे नाही तर मुळातच मी अमुक तमुक जाती धर्माचा आहे असे मानत नाही.

लालसिंग चड्डामध्ये बहुधा डायलॉग आहे. मजहब मलेरीया है. कर्रेक्ट आहे.

फटाके मुळे प्रदूषण ची intensity अगदीच शुल्लक आहे>>
हेच एक्सयुज नदीत गणपती विसर्जन करताना, निर्माल्य टाकताना दिलं जातं
नदी आधीच प्रदूषित आहे वगैरे

लालसिंग चड्डामध्ये बहुधा डायलॉग आहे.>>>
बहुदा म्हणजे??? सगळ्यांना इतकं पिडून, वेगळा धागा काढून, इतकी लाल करून शेवटी सरांनी बघितलाच नाही का सिनेमा

धन्य ते सर् आणि धन्य त्यांचे भजनी मंडळ Happy

नव्या सोसायटीत घर घेताना पार्किंग आहे का पहिले बघतात. पण पोरांना खेळायला जागा आहे का नाही याचे कोणाला काही पडले नसते. >> बरोबर.
धन्य ते सर् आणि धन्य त्यांचे भजनी मंडळ >> बरोबर.

म्हणजे??? सगळ्यांना इतकं पिडून, वेगळा धागा काढून, इतकी लाल करून शेवटी सरांनी बघितलाच नाही का सिनेमा

धन्य ते सर् आणि धन्य त्यांचे भजनी मंडळ >>>>>>>>>
Happy
टोमणे मारण्यात तुम्ही उठाना देखील हरवाल!
आणि त्यांचे कितीही पाय खेचले तरी ते नवीन धागा काढल्या शिवाय राहणार नाही .

फटाक्यांच्या बेसुमार किमती हा देखील एक विचारात घेण्यासारखा विषय आहे. सर्वांनाच फटाके घेणे परवडत नाही, तरी देखील माझ्या पिढीच्या मुलांचे पालक खिशांना खिशाला चिमटा काढून फटाके विकत घेऊन देत असत. तेव्हा सुद्धा घरची परिस्थिती लक्षात घेऊन फटाके न उडवता दिवाळी साजरी करण्याची समज आम्हा भावंडांनी दाखवली होती. आता सुदैवाने लहान मुलेच शाळेतील शिकवणुकीमुळे फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचा निश्चय करताना दिसतात तेव्हा बरे वाटते. आमचा धर्म, आमचे सण, ते कसे साजरे करायचे हे आमचे आम्ही ठरवू आणि भरपूर फटाके उडवून, प्रदूषण वगैरेचा विचार न करता आमच्या सो कॉलड परंपरा शाबूत ठेवू असला बाणा असणारे शक्यतो मध्यमवयीन व्हाट्सअप युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी असतात ते वरचेवर अल्पसंख्यांक होत जातील अशी आशा नक्कीच आहे. दिवाळी हा दिव्यांचा, सर्वांनी एकत्र येण्याचा, खाण्यापिण्याचा, आनंदाचा सण; त्यातला फटाके हा भाग भविष्यात गौण होईल असे मला तरी वाटते. पर्यावरणाचे कमीत कमी नुकसान करणारे ध्वनी प्रदूषण न करणारे असे फटाके चलनात येतील अशी आशा.

पुंबा+१
बाबांसोबत बाजारात गेलो असताना फटाक्यांच्या ठेलावाल्याला मी आणखी फटाके हवेत , हेच हवं असं म्हणत नाहीये याचं नवल वाटलेले आठवत़ंय. फुलबाज्या, भुईचक्र, अनार यांच्या जोडीला एके वर्षी लवंगी फटाके घेतले. त्या माळा सोडवून एकेका लव़ंगीला उदबत्ती लावायची , ते करताना कुठून फटाका फुटल्याचा आवाज आला की आपसूक थांबायचं, मग लांब जाऊन बटाटा फुटायची वाट बघायची यांचा कंटाळा आला. हातात धरून पेटवून फेकायची, माळा लावायच्या, मग अॅटम बॉंब या पायऱ्या चढावाशा वाटल्याचे नाहीत. वय वाढलं तसं फुलबाज्या इ.ही बंद झाल्या.

फटाकेमुक्त दिवाळीच्या शुभेच्छा ! फटाकेमुक्त दिवाळीस अनुमोदन आहेच. पण मग हेच फॅड पुढे जाऊन पणतीमुक्त दिवाळी, गोडधोड पदार्थमुक्त दिवाळी, रोषणाई मुक्त दिवाळी असली थेरं येऊ नयेत म्हणजे मिळविली.
तेल जाळल्यामुळे किती प्रदुषण होते, याच तेलात किती स्वयंपाक करता आला असता ?
गोडधोड पदार्थांमुळे भारतात डायबिटीस चे रोगी किती वाढत चालले आहेत ? एवढ्या बाजारात किती गरीबांची पोटे भरण्यात आली असती ?
रोषणाईमु़ळे किती वीज वाया गेली ? विजेची टंचाई असताना एव्हढी वीज फुकणे भारता सारख्या गरीब देशाला परवडते काय ?

फटाकेमुक्त दिवाळी च्या यशाने खुश होऊन भविष्यात वरीलप्रमाणे चळवळी राबविणार्‍यांचा पुणेरी पद्धतीने शालजोडीतले देऊन आदर सन्मान केला जावा अशी अपेक्षा बाळगतो. Happy
जय हिंद ! जय महाराष्ट्र !! जय दिवाळी !!!

मध्यमवर्गातून उच्च मध्यमवर्गाला डे प्रवास करणाऱ्या शहरी मराठी कुटुंबांची तरी गोडधोड पदार्थ मुक्त दिवाळी कडे वाटचाल सुरू आहे.
फराळाचे चकल्या, चिवडा , लाडू हे पदार्थ बाराही महिने मिळतात.‌
फराळ करायला वेळ , हौस, मनुष्यबळ , कौशल्य नाही. विकत आणलेल्या खायला उत्साह नाही. ( आमच्याकडे कोणी खातच नाही)
म्हणून उपचारापुरता फराळ आणला / केला जातो. कुठे तेही नाही.
आधी नवीन कपड्यांची खरेदी करायला दिवाळीचं निमित्त लागे. आता तेही नाही. मनात आलं की नवे कपडे घेतले जातात.

ज्याला जे रुचेल त्याने ते करावं किंवा करू नये.इतरांना त्याचा त्रास होत नसेल तर प्रश्न नाही.

रोषणाईमु़ळे किती वीज वाया गेली ? विजेची टंचाई असताना एव्हढी वीज फुकणे भारता सारख्या गरीब देशाला परवडते काय ?
>>>>

हा मुद्दा अगदीच बरोबर आहे.
पण रोषणाईच नाही तर दिवाळीत उरले काय म्हणून मान्य होणे अवघड आहे Happy

एखाद्या प्रथेमुळे समाजातील काहीना किंवा अनेकांना त्रास वा हाल सहन करावे लागत असेल तर ती प्रथा बंद व्हायलाच पाहिजे. फटाके असोत नाहीतर अन्य काही. आणि एखाद्या गोष्टीचा अतिरेक म्हणजे प्रदूषण. कोणत्याही प्रदुषणाला कायद्याने बंदी आवश्यक. फटाक्यांचे अतिप्रमाण आणि प्रदूषण मागच्या चाळीस वर्षात झाले आहे. त्याआधी फार माफक फटाके वाजवले जात.

गाडीतून धूर अतिप्रमाणात निघत असेल तर ट्राफिक पोलीस अडवतो आणि पीयूसी विचारतो. तिथे कुणी त्याला उद्धट प्रश्न विचारत नाहीत. कि सिटी बस मधून सुद्धा धूर निघतो मग त्याला का पीयूसी विचारत नाही? कारखान्यातून धूर निघतो मग तो चालतो का? धूर सोडण्याची आमच्या कारची अनेक वर्षे जुनी संस्कृती आहे. आम्हाला ती प्प्रीय आहे. आम्हालाच का बंदी? विचारणाऱ्याच्या अकलेची लक्तरे दाखवणारे हे प्रश्न आहेत खरं म्हणजे. पण हे प्रश्न लोक विचारणार नाहीत असे प्रश्न ट्राफिक पोलीसला. त्यांना माहित आहे काय व कसे उत्तर मिळेल. इथे मात्र भामटेगिरी सुरु असते. अरे माठ्याहो दीपावली आहे ही. फटाकावली नाही. फटाक्यांचे अतिप्रमाण मागच्या चाळीस वर्षात झाले आहे. त्याला हजार वर्षाचा वगैरे इतिहास नाही. त्याआधी फार माफक फटाके वाजवले जात. मुख्यत्वे हा दिव्यांचा आणि रोषणाईचा सण आहे,

आणि जर कुणाला फराळ आणि गोड खाण्याची परंपरा बंद ची भीती वाटत असेल आणि त्यासाठी फटाकेबंदी ला विरोध केला जात असेल तर याचप्रमाणे असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो: सतीची प्रथा बंद झाली, डोक्यावरून मैला वाहून नेणे बंद झाले. आणि आता फटाके सुद्धा बंद होतील. धर्म/संस्कृती बुडण्याची ही लक्षणे आहेत. ती वाचवण्यासाठी फटाके तर अजून जोरात वाजवू, पण सती प्रथा आणि इतर बंद झालेल्या प्रथा सुद्धा सुरु करू.

फटाकेबंदीला विरोध करून खुश होऊन धर्म आणि संस्कृतीच्या नावाने भामटेगिरी करत भविष्यात वरीलप्रमाणे जुन्या प्रथा परत आणण्याची भामटेगिरी राबविणार्‍यांचा कोल्हापुरी पद्धतीने जोडे देऊन आदर सन्मान केला जावा अशी अपेक्षा बाळगतो.

तिथे कुणी त्याला उद्धट प्रश्न विचारत नाहीत. कि सिटी बस मधून सुद्धा धूर निघतो मग त्याला का पीयूसी विचारत नाही? कारखान्यातून धूर निघतो मग तो चालतो का?
>>>>>

एक्झॅक्टली.
कारण तो कायद्यानेच तसा नियम आहे. मान्य करावाच लागतो लोकांना.
फटाक्यांबाबत तसा कायद्याने नियम करणे गरजेचे आहे.

फटाके वाजवल्याशिवाय दिवाळी साजरी केल्याचा आनंद काही लोकांना मिळत नाही या मुद्द्याचे मानसशास्त्रीय विश्लेषण तितकेच महत्वाचे आहे.

तसे काय नाही हो. आणि हे त्यांना ही चांगले माहिती आहे कि फटाके शिवाय किंबहुना माफक फटाके वाजवून दिवाळी मस्त साजरी करता येते. पण ते कबूल करून भोंदू अजेंडे रेटणार कसे? फटाके हा मुद्दा नाहीच आहे त्यांचा. मुख्य अजेंडा भलताच असतो या लोकांचा.

माझ्या बालपणी, आईबाबा फटाके घे म्हणून मागे लागायचे आणि मला नको असायचे. का कोण जाणे अजूनही मला फटाके फोडण्याची कधीच ईच्छा होत नाही (ह्याद्वारे मी पर्यावरण संवर्धनाला कदाचित हातभार लावत असेलही, तरी हे पर्यावरण प्रेमातून वैगेरे आले नाही). याउलट वर्षातून दिवाळीचे दोन-तीन फटाके फोडण्यास हरकत नसावी असे माझे मत आहे.

फटाके वाजवल्याशिवाय दिवाळी साजरी केल्याचा आनंद काही लोकांना मिळत नाही या मुद्द्याचे मानसशास्त्रीय विश्लेषण
>>>>>

सवय होते, बाकी काही नाही.

आता नवरात्रीला नऊ दिवस नऊ रंगाचे फॅड ईतके झालेय की रोज तसे कपडे घालून फोटो काढल्याशिवाय त्या बायकांना नवरात्र साजरे केल्याचा आनंदा मिळत नसेल. हे पुढच्या पिढीत आणखी झिरपत जाईल. अर्थात त्या प्रकारात काही गैर नाही वा कोणाचे नुकसान नाही. फटाक्यांमुळे पर्यावरणाचे नुकसान आहे. लोकांना त्रास आहे.

विश्लेषण याचे झाले पाहिजे की फटाक्यांचा मोठा आवाज ऐकण्यात मानवी मनाला काय आनंद मिळतो.
पूर्वीच्या काळी लढाई जिंकल्याचा आनंदही तोफगोळे डागून व्यक्त केला जायचा तर आजही क्रिकेटचा सामना जिंकल्यावर फटाके फोडले जातात.
ठ्ठो करून मोठा आवाज ऐकून काय विजयश्री अंगात संचारते जे या प्रथा सुरू झाल्यात..

विश्लेषण याचे झाले पाहिजे की फटाक्यांचा मोठा आवाज ऐकण्यात मानवी मनाला काय आनंद मिळतो.>>>>> नुसता रेकॉर्ड करुन फटाक्यांचा आवाज ऐकवला तर आनंद मिळेल का? ढोलाचा मोठा आवाज रेकॉर्ड केला तर आनंद मिळेल का? हे मुद्दे देखील विचारात घेतले पाहिजे. ढोलाच्या आवाजातील लयबद्धता कदाचित आनंद देत असेल.

ढोल, फटाके वगैरे गोष्टींच्या आवाजात असलेली ध्वनीकंपनसंख्या ही खूप कमी असते (सेकंदाला १०० पेक्षा कमी असावी). त्यामुळे लयबद्ध असला तरी ढोलाचा आवाज चमचे आणि थाळीच्या तितक्याच लयबद्ध आवाजाने बदलता येणार नाही, कारण धातूंतून निघणारी जास्त कंपनसंख्येची ध्वनीस्पंदने (> १०० हर्ट्झ) तितका आनंद देऊ शकत नाहीत. ढोलादि वस्तूंची कंपनसंख्या मानवी शरीराच्या / हृदयाच्या ठोक्यांच्या वगैरे कंपनसंख्येशी (ठोक्यांच्या वारंवारितेशी नव्हे, त्याच्या आवाजाच्या कंपनसंख्येशी) जवळीक साधत असणार.

संगीतात वापरले जाणारे सूर जरी २००-४०० हर्ट्झ मधील असले तरी ते 'कानाला' चांगले वाटतात हे लक्षात घ्यावे. त्या उलट ढोल हा कानाला चांगला वाटण्यापेक्षा 'छातीत' धाड्धाड आवाज करतो म्हणून अनेकांना उत्तेजित करतो. दोन्हीच्या आनंदात फरक आहे. तबला १०० ते ३०० हर्ट्झ मधल्या कुठल्या तरी एका सुरावर जुळवला असला तरी डग्गा हा बर्‍याच कमी कंपनसंख्येचा (<१००) आवाज निर्माण करतो. डग्ग्याशिवाय नुसत्या तबल्यात मजा नाही.

रेकॉर्ड करून फटाके ऐकले तरी ध्वनीप्रदूषण तर होईलच ना? की इयरफोन्स घालून ऐकणार? तसं असेल तर हा बेस्ट उपाय आहे! Lol

त्यांचा मुद्दा असा की केवळ आवाजाने भागत नाही.
किंवा शेजाऱ्याने खूप फटाके फोडले ते ऐकले/पाहिले की झाले असेही होत नाही? स्वतः पेटवून तो आवाज काढायचा असतो प्रत्येकाला.

दिवाळीच्या अनेक गोष्टींचे अप्रूप संपले आहे हीही बाब तितकीच खरी

वर्षभर चिवडा चकली लाडू असतातच
नवीन कपडे खरेदी पण केव्हाही होते
नातेवाईकांना भेटी गाठी करण्यापेक्षा कुठंतरी औटिंग करण्याकडे कल वाढतो आहे
त्यामुळे फटकेच काय ते उरले आहेत त्यामुले दिवाळी केल्यासारखे वाटत असावे लोकांना

फटाके उडवण्यातला आनंद हा केवळ त्यातल्या आवाजावर अवलंबून नाही. तो आवाज किती आणि केव्हा होणार यातली अनिश्चितता, अनपेक्षित परिणाम, त्याचा वास, धूर, प्रकाश, तो फटाका हाताळण्यातलं थ्रिल ह्या सर्वांचं ते मिश्रण आहे. मी हे सांगतोय ह्याचा अर्थ मी फटाकेसमर्थक आहे असा अजिबात नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही फटाकेप्रेमींना फटाक्यांना पर्याय म्हणून नुसता आवाज देऊ कराल तर त्याचा काही उपयोग होणार नाही. ह्या वरच्या सर्वांगीण अनुभवाचं काय करायचं? त्यापेक्षा फटाके नकोच हे त्यांना जाणवणं हेच काय ते उपयुक्त ठरू शकेल.

Pages