भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती २

Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47

https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा

==================================================================================

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो रेग्युलर देऊ नये, अधून मधून अगदी थोड्या प्रमाणात चालतं

चॉकलेट, द्राक्षे, मनुका, आवकडो, तळलेले पदार्थ, सुकामेवा, मिरची आणि दारू अजिबात देऊ नये
थोड्या प्रमाणात देखील नाही

आता मी खेळणी उचलून ठेवली की दहा मिनिटात ती सगळी बाहेर काढून परत परत करू हे म्हणून भुंकतो>>>smiley36.gif
अभ्यासही भारी, दादु त्याला म्हणतोय इकडे लक्ष दे तर त्याने पुस्तक चाटून घेतल

अवांतर लिहितोय: सुलेखा तळवलकर ह्या Youtube चॅनेल वर सुलेखाने 'टेलकथा (Tailkatha)' नावाचा नवीन सेगमेंट सुरू केलाय. ह्यात प्रामुख्याने प्राणीप्रेमी मंडळींच्या मुलाखती (वैयक्तिक नाही) असणार आहेत आणि जी त्यांच्याकडील पाळीव प्राण्यांच्या जडण-घडण, गंमती-जमती व किस्से ऐकवणार आहे. पहिल्या भागात सुलेखाने, राधिका हर्षे - विद्यासागर ची मुलाखत घेतली, ज्यात राधिकाने 'टेडी हर्षे विद्यासागर' नावाच्या तिच्या कडच्या तिबेटिअन ल्हासा ॲप्सो ह्या प्रजातीच्या कुत्र्याशी गाठ घालून दिली आणि त्याच्या जन्मापासूनचे किस्से व गंमती-जमती सांगितल्या. आणि आता पुढे राधिकाच हा सेगमेंट चालवणार आहे.

अरे वाह मस्त
घेतलं लगेच पहायला, साहिये तो टेडी
ल्हासा अस्पो हे शीप हर्डिंग डॉग वाचून गंमत वाटली
कसलं इतुकलं पिटकूल आहे ते Happy

आमच्या ओड्या ला पण घ्या की व्हिडीओ मध्ये Happy

बरेच दिवसात काही नविन पोस्ट नाही.>>>

गेल्या आठवड्यात बाहेरून कोणीतरी बाई ओड्या ला हाक मारत आहेत असं वाटलं
तो चटकन उठला आणि उत्साहात पळत पळत गेला कोण ते बघायला
आणि मीही बघायला गेलो, तर एक काकू होत्या त्या ओवी नावाच्या मुलीला हाक मारत होत्या Happy

पण त्यामुळे आपल्याला बोलावलं नाही याच आमच्या बाळाला इतकं दुःख झालं की पार चेहरा पाडून आत येऊन बसून राहिला

त्याला परत चांगल्या मूड मध्ये आणायला गाडीवरून एक चक्कर मारायला लागली मग Happy

गेल्या आठवड्यात बाहेरून कोणीतरी बाई ओड्या ला हाक मारत आहेत असं वाटलं
तो चटकन उठला आणि उत्साहात पळत पळत गेला कोण ते बघायला
आणि मीही बघायला गेलो, तर एक काकू होत्या त्या ओवी नावाच्या मुलीला हाक मारत होत्या

पण त्यामुळे आपल्याला बोलावलं नाही याच आमच्या बाळाला इतकं दुःख झालं की पार चेहरा पाडून आत येऊन बसून राहिला

त्याला परत चांगल्या मूड मध्ये आणायला गाडीवरून एक चक्कर मारायला लागली मग >>> आई गं!!!

आमच्या ओड्या ला पण घ्या की व्हिडीओ मध्ये >>> अगदी, अगदी! खरं तर सुलेखा तळवलकर ने एपिसोडच्या आदल्या दिवशी छोटीशी झलक दाखवली तेव्हा नेहमीप्रमाणेच काहीतरी असेल असे वाटले होते, पण मुलाखत बघतांना व टेडीचे किस्से ऐकतांना खूप मजा आली. आणि ओडिनचीही आठवण आली. सारखं वाटत होत कि तोही टेडीसारख्याच खोड्या करत असावा (अर्थातच मायबोलीवरची ओडिनची डायरी वाचून ते कळतंच आहे, पण प्रत्यक्ष बघण्यात आणखी मजा असते). मलाही ओडिनबद्दल सुलेखाला सुचवावे असे वाटले, पण तुमच्या सहमतीशिवाय ते शक्यच नव्हते. म्हणून मी काहीही करू शकलो नाही. पण तुम्ही सुलेखाला व राधिकाला लिहा, बऱ्याचदा सुलेखा लगेचच प्रतिसाद देते (राधिका पहिल्यांदाच आली असल्याने तसा तिचा अजून अनुभव नाही).

सहीये हे, विचार करायला हवा...

ओड्या आधी त्यांच्या इतक्या लाडात येईल की बाई पळूनच जातील पण....

आजकाल त्याचं लाडात येणं फार अंगावर येतं....

पण त्यामुळे आपल्याला बोलावलं नाही याच आमच्या बाळाला इतकं दुःख झालं की पार चेहरा पाडून आत येऊन बसून राहिला>> ओडू खूपच गोडू आहे.
प्रतिसाद जरी देत नसले तरी मी या धाग्यावर रोज फेरी मारतेच. आमच्याकडे ओडीन हिट आहे. त्याच्या नविन किस्से घरी जाऊन सांगावे लागतात.

लेटेस्ट किस्सा घ्या
दोन आहेत खरं तर
आमचं बाळ जितकं निरागस आहे तितकंच दंबिस आहे

पहिला निरागस पणाचा किस्सा
आईने मला सांगितले की शेजारी चाललीय, दूध आहे गॅस वर लक्ष ठेऊन बंद कर, मी हो हो म्हणालो आणि नेहमीप्रमाणे विसरलो Happy
आठवलं तेव्हा ओह शीट करत पळत किचन मध्ये गेलो
ओड्या झोपला होता मस्त पण पटकन उठून तिरासारखा माझ्या पाठोपाठ आला
तोवर दूध मस्तपैकी गॅस आणि ओट्यावर मुक्तपणे उतू चाललं होतं
अरे यार शीट आता आई ओरडणारे जाम मी वैतागून ओरडलो

या सगळ्या प्रकरणात माझं ओड्याकडे दुर्लक्ष
थोड्या वेळाने बघतोय तर हा कुठल्याही दिशेला तोंड करून भुंकतोय
आणि नाचतोय
बिचारा, त्याला वाटलं काहीतरी संकट आलं किंवा कुणीतरी घरात घुसले, आत आल्यावर दिसत तर कोणी नाही आणि बाबा जाम आरडाओरडा करतोय म्हणजे नक्कीच काहीतरी आहे आणि मग आपलं कर्तव्य केलं पाहिजे म्हणून हे जे काही अदृष्य संकट आहे त्याला हाकलून लावण्यासाठी बिचारा कसोशीने प्रयत्न करत होता

मला हसूच आलं म्हणलं ओड्या तू कोणावर भुंकतोय?
म्हणल्यावर एकदम गप्प झाला, ओट्यावर पंजे ठेऊन पाहिलं कोणी नाही, माझा वास घेऊन खात्री केली कीं मला काही झालं नाही

मग काय हा माणूस उगाच झोपमोड करतो असा चेहरा करत परत झोपायला गेला Happy

ओडिन Lol
बिचारा, त्याला वाटलं काहीतरी संकट आलं
किंवा कुणीतरी घरात घुसले,<<<< ओह, आम्हा नभूभूधारकांना कळलच नसतं हे.
मला वाटलं तो आजीला हाका मारतोय की काय, बघ बाबाने काय केलं Wink
निल्सन सारखच, मी ही एखादी चक्कर टाकतेच इथे. खरं तर जे प्राणी चार फुट लांब न रहाता जवळ येतात त्यांना घाबरते. पण इथले किस्से वाचताना मजा येते.
सिंबा रॉयल दिसतोय एकदम.

रा.बा, टेलकथेबाबत धन्यवाद! टेडीला पाहून माऊई , ऑस्करची आठवण झाली.
सिम्बा काय स्टाईलमध्ये बसलाय.भारी आहे.
ओडीन, टेलकथेत येऊ द्या.

ओडी इज द ग्रेटेस्ट.

टीव्हीत किंवा जाहिरातीत बेल वाजली तरी भुंकणे. खरी बेल वाजली तर अगदी न्युक्लीअर अ‍ॅटेक झाल्यासारखे अंगात येउन भुंकणे. मी इथे शिफ्ट झाले तर पहिल्याच दिवशी शेजारची मुलगी वाभरट पणे लिफ्ट पाशी नाचत होती तर ही पळत तिच्या पाशी जाउन उभी व शेपटी जोरात अ‍ॅक्टिव्ह. त्यामुळे ती मुलगी किंकाळ्या फोडती झाली. मग तिचा बाप उखडला. हे पहिल्याच दिवशी. त्यामुळे तो दिसला तरी आम्ही कुठेतरी लपतो. एकदा ही त्याचा पंचा ओढेल की काय अशी मलाच भीती वाट्ते. शेजार्‍यांशी न संबंध हे मुंबईतील धोर ण लगेचच फाटले.

अरे वा, 15 नवीन पोस्ट बघून लाॅटरी लागल्याचा आनंद झाला..
काय ते फोटो, काय ते किस्से, काय ते पालक..
एकदम ok मधे आहे सगळेच..

आमच्या फुंतरुला एक फोड झाला होता. तो आज आपोआप फुटला, त्यामुळे त्याला खूप  रक्तस्त्राव झाला. (ते फोटो येथे दाखवू शकत नाही) पूर्ण घरभर नुसता रक्ताचा सडा पडला होता.घरात पाय ठेवायलाही जागा नव्हती.सगळ्या चादरी,उशा,पांघरायचे,सोफा सगळेच खराब झाले. त्याला डॉ.कडे नेऊन आणले. ते म्हणाले urgent मध्ये ऑपरेशन करावे लागेल. ते सगळे सोपस्कार करून तो फोड/गाठ काढून टाकली आणि castration सुद्धा केले परवा. त्यांना शंका आहे ती गाठ कॅन्सर ची आहे. तपासणी करता पाठवण्यात आली आहे अजून रिपोर्ट यायचे आहेत. लेकरू अगदी मलूल झालं आहे. सगळे रिपोर्ट्स नॉर्मल येऊ दे रे देवा. I KNOW HE IS A FIGHTER... funti hospital.jpeg

अरे यार Sad
बिचारा फुंतरु
किती त्रास होत असेल आणि त्याला असे बघताना तुम्हालाही Sad

आमच्या सर्वांच्या प्रार्थना आणि शुभेच्छा
बाळाला लवकर बरं वाटू दे आणि छान हिंडता फिरता होऊ दे

Pages

Back to top