भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती २

Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47

https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा

==================================================================================

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कसला क्युट आहे सिम्बा
Happy

फोटो काढा त्याचा असा लपलेला असताना आणि इथं टाका

मी असाच एक फोटो पहिला होता, एक वेडबांबू भुभु कपाटाच्या मागे लपलेलं असतं पण आरश्यात दिसत असतं आणि ते त्याला कळतच नाही

वेट ला बोलावले आणि चेकअप करून घेतले <<< गेल्या वर्षी वेट येवुन गेल्या नंतर माझ्या ५-६ गाईंना आजार झाला होता, वेट अनेक गोठ्यांमधुन फिरत असतात त्यामुळे या वेळेस वेट ला बोलवण्यचे टाळात आहे. कामगारालाही इतर कोणत्याही गोठ्या जवळ न जाण्यास सांगीतले आहे तसेच बाहेर जाऊन आल्यास चेंज करून स्वच्छ होऊन गोठ्यात जा,

मायबोली चालू केली की पहीला हा धागा न चुकता चेक करतो. दिवसाची सुरवात मस्त होते.

धनश्री, आमचे माऊ पण घरात असते, बाहेर जात नाही. तरी व्हेट म्हणाल्या की vaccine दिलेले बरे कारण हा वायरस पटकन पसरतो आणि एकदा infection झाले की उपाय नाही. म्हणून मी दिले हे vaccine.
तुम्ही तुमच्या veterinar ना विचारून बघा. <<>>>>> ओके. नेऊन विचारुन बघते. थॅन्क्स.

भूभूंच्या लपाछपीचे किस्से मस्त !
@ स_सा , लम्पीच्या प्रादुर्भावाविषयीच्या बातम्या वाचनात आल्या. तुम्ही शक्य ती काळजी घेत आहातच. तुम्हाला शुभेच्छा !
अंग मुडपून बसलेला सिम्बा एकदम गोड दिसतोय ! मोठा झाल्यावर मावत नसेल त्या फळीवर.
बरेचदा भूभूंच्या बसण्याच्या आवडत्या जागा मोक्याच्या ठिकाणी असतात, म्हणजे जिथून त्यांना घरातल्या सगळ्यांवर एकाच वेळी नजर ठेवता येतील अशा. आम्ही घरात असलो तर स्नो एकटाच एखाद्या खोलीत आहे असं कधीच होत नाही.

सिम्बाचे वाचून हा फोटो आठवला

ओड्या असा लपून वगैरे नाही बसत कधी. उलट आम्हालाच त्याच्यापासून लपून बसायची वेळ येते कधी कधी. त्याला झोप आली की तो मनात येईल तिथे झोपतो. मग दारात, बाथरुमच्या पॅसेजमध्ये, डायनिंग टेबल खाली आणि एक कान खुर्चीपाशी म्हणजे चुकून न बघता कुणी सरकावली तर ठणाणा पण त्याला त्याचं काही नाही. बिनघोर झोपलेला असतो.

रात्री तर इतक्यांदा जागा बदलतो की मला तर उठून बाथरुमला जायचं असेल तर आधी बेडवरून उतरताना पायाने चाचपून बघतो. आम्हाला सगळ्यांनाच आता ती सवय झालीये की सोफ्यावरून, खुर्चीतून, बेडवरून उतरताना पायात ओड्या लोळतोय का बघणे.

हा असा लोळत असतो. आज्जी मग ओरडते, अरे ओड्या मी भाजी घेऊन येताना तुझ्यावर पडले तर बघ काय, जागीच पापड होशील. तरी काही नाही ढिम्म हलत. त्याला अक्षरश उठवून बुड हलवून वेगळीकडे शिफ्ट करावं लागतं

<<आज्जी मग ओरडते, अरे ओड्या मी भाजी घेऊन येताना तुझ्यावर पडले तर बघ काय, जागीच पापड होशील.>>
सो स्वीट ऑफ आज्जी..
दुसर्‍या एखाद्या आज्जीला तिची हाडं मोडतील अशी भिती वाटली असती.

ओडिन मस्त मौला आहे! कसला निवांत झोपलाय, आपण लोकांच्या वाटेत आहोत याची काहीही चिंता नाही Lol

आमच्या बॅकयार्ड मधे एके ठिकाणी एक वॅगन पालथी ठेवलेली आहे. माउईला एकदा त्याच्या खाली चिपमंक्स गेलेले दिसले. झाले, तेव्हापासून रोज सकाळ संध्याकाळ तिथे चेक करतो ते आहेत का. ती वॅगन काही त्याला उलटवता येत नाही, पण ती कशी हलवता येईल हे त्याच्या डोक्यात असते बहुतेक सतत. आपले लक्ष नसेल तर त्या वॅगन च्या आजू बाजूने कुठेतरी दे दणादण खणत बसतो तावातावाने! जसे काही भुयार खणून जाणार आहे Lol
हा बघा आज पार तोंड काळे करून घेऊन आला होता! उपद्व्यापी प्राणी! चेहर्‍यावर मात्र नो रिग्रेट्स! प्राउड फेस! Uhoh
naughty_0.jpg

हाहाहा, माव्या जन्मजात मिश्किल चेहरा घेऊन आलाय....
त्यामुळे कितीही डांबिसपणा केला तरी गोडच वाटतो....

कसले आनंदी भाव आहे. मोठी कामगिरी करुन आल्याचे

@आशुचँप ओड्या फारच बिनधास्त दिसतोय, बहुदा त्याला वाटतंय कि तुम्ही सगळे त्याच्या घरात राहताय आणि तो मालक आहे Lol Lol Lol

@maitreyee - खूपच गोड भाव आहेत माउईचे

बहुदा त्याला वाटतंय कि तुम्ही सगळे त्याच्या घरात राहताय आणि तो मालक आहे>>>>

त्यालाच असे नाही अनेकांना वाटतं हे
एक मुलगा आमच्या घरसमोरून जाताना आईला सांगत होता की आई हे बघ ओडिन चे घर
आई म्हणे असलं कसलं नाव
म्हणे थोर चा बाबा असतो तो
यावर आईला काहीही कळलं नाही, तेवढ्यात मी दिसल्यावर पोराने मला विचारलं काका ओडिन आहे का घरी?
मी आपलं घरगड्याच्या अदबीने आहे ना, बोलावतो हा असं म्हणलं
तोवर साहेब आपलं नाव ऐकून भेट द्यायला आलेच बाहेर Happy

त्याला नंतर म्हणलं घरभाडे देत नाहीस, एक काम करत नाहीस घरातले, तरी उद्यापासून रात्री बाहेर थांबून राखण करायची घराची Happy

Lol

इथल्या स्गळ्या गोड बाळांना मिठ्याच मिठ्या.. गोड पापे

मैत्रेयी भारी लिहिलायस किस्सा.. डोळ्यासमोरच आला दे दणादण खणणारा माऊई..
तोंड काळं.. लिटरल मिनिंग Lol

ओडीन साहेब सेलेब्रिटी आहेत एकदम !

माऊईचा आणि ओडींचा चेहराच हसरा आहे.त्याच ब्रीड मध्ये देखील असे हसरे चेहरे कमी आढळतील.मूळचा आनंदी स्वभाव आणि घरचा कंफर्ट,प्रेम या गोष्टी कारणीभूत असाव्यात.

माऊईची तर पप्पी घ्यावीशी वाटते इतका गोडू आहे तो..

ओडिनचा किस्सा भारीच एकदम..

आपण खरंच घरगडी होऊन जातो. पण आपले मालक फार प्रेम करतात आपल्यावर, म्हणून बिनपगारी पण काम करतो आहोत..

धमाल किस्से.
फोटो तर एकदम रापचिक.
ओडिन तर मालकच झालाय घराचा. Lol

घरगड्याच्या अदबीने >>> Lol
ओड्या कसला ढाराढूर झोपलाय खरंच. काहीही पडलं नाहीये त्याला!

माऊई कसला क्यूटी आहे! तोंड काळं करून पण गोडच दिसतोय ढमाल्या!!

आज आमच्या घरी एक हेल्मेट नावाचे मोनस्टर आल्या मुळे आमचे खूप काम वाढले. सगळयांना वाचवण्याची जबाबदारी अचानक अंगावर आली. मग त्या मॉन्स्टर वर लक्ष ठेवण्यात आले. खूप बारीक...... डोळ्यात तेल घालून पहारा वगैरे दिला.... मग मात्र थकव्या मुळे आणि अति कष्ट झाल्या मुळे झोप लागली. देवाच्या कृपेने कोणतीही जीवित हानि झाली नाही. तसा मी सुद्धा शूरवीर आहेच म्हणाFuntru-Helmet.jpegFuntru-Sleep.jpeg

Pages