Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47
https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा
==================================================================================
आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.
हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जरुर लिहा आशुचॅम्प! +१
जरुर लिहा आशुचॅम्प! +१
धन्यवाद सर्वाना
धन्यवाद सर्वाना
ओडिन ची एक मज्जा म्हणजे तो खूप मस्ती करत असेल आणि खेळ म्हणत असेल तर मला झोपल्याची acting करावी लागते आणि ती खरीखुरी वाटावी यासाठी अगदी पांघरून वगैरे घेऊन
त्यानेही भागत नाही, त्याला मी असा ऑड वेळेला कसा झोपतोय असा संशय असतो त्याला आणि थोड्या थोड्या वेळाने तो येऊन चेक करतो खरेच झोपलाय का नाही
त्यावेळी मी मोबाईल चेक करणे तर सोडाच, डोळे किलकिले केले तरी त्याला कळतं मग झालं, मग काय सोडत नाही तो
दे दणादण उड्या मारायला सुरुवात
पण त्याची खात्री पटली की मी झोपलोय मग तिथेच बेडपाशी पहुडतो
मग तो अगदी कुल डाऊन झालाय असं वाटलं की मग हळूच उठून जाता येतं
(No subject)
जबरदस्तीची झोप
जबरदस्तीची झोप
माउई पण अगदी डिट्टो! नॉटी
माउई पण अगदी डिट्टो! नॉटी असली तरी गुड बॉय असतात ती अशी. झोपलेल्या माणसाला उठवत नाहीत.
हायपर अॅक्टिव्ह पाल्याच्या
हायपर अॅक्टिव्ह पाल्याच्या पालकांच्या भावना पोहोचल्या...
असे मधेच झोपून कामे कधी पूर्ण करायची या विचारात पडलेली बाहुली..
नॉटी असली तरी गुड बॉय असतात
नॉटी असली तरी गुड बॉय असतात ती अशी. झोपलेल्या माणसाला उठवत नाहीत.>>>>
हो, त्याच गुड फेथचा मग असा गैरफायदा घ्यावा लागतो.
असे मधेच झोपून कामे कधी पूर्ण करायची या विचारात पडलेली बाहुली..
नाही झोपलो तर मग त्याच्यासोबत खेळत रहावं लागतं, बरं आमचं बाळ दमतच नाही, पळवून आणा, पोहून आणा
बरं नाही खेळलो काम करत बसलो तर येऊन अंगावर उड्या मारेल, लाडीकपणे अंग घुसळेल, नैतर मग भुंकत बसेल.
आणि खरे तर त्यालाही आलेली असते झोप पण झोपायचं नसतं, मग मी झोपून दाखवलं की तोही एक पॉवर नॅप घेतो.
अर्थात दर वेळी ही ट्रिक काम करत नाही, कारण मग मी झोपलो तर तो दादु किंवा आजीच्या मागे हिंडतो. मग खोलीत पडदे वगैरे ओढून अंधार करून, फॅन लावून माहोल तयार करावा लागतो. आणि त्यावेळी मलाच जाम झोप येते.
_/\_
_/\_
आणि त्यावेळी मलाच जाम झोप
आणि त्यावेळी मलाच जाम झोप येते
(No subject)
आई ग्ग!! मस्त.
आई ग्ग!! मस्त.
ऑड्या भारीच आहे
ऑड्या भारीच आहे
हॅरीचे अपडेट:
परवापासून हॅरीची तब्येत बिघडली आहे. मलूल वाटत होता म्हणून डॉक्टरकडे नेल तर तिथे त्याच्या प्लेटलेट कमी झाल्या अस निदान झालेय. त्यामूळे थकवा येऊन गप्प गप्प झालाय. नेहमी दंगा करणारा हॅरीला एकदम अस शांत झालेलं पाहून आम्हालाच कसेतरी होते. डॉक्टरनी औषध दिलेय आणि आठवड्यात बरा होईल अस सांगितले आहे . तो बरा होईपर्यंत घरच्या ज्येष्ठ मंडळीना देखील चुकल्यासारख वाटतेय.
लवकरात लवकर बर वाटू दे. ही बाळ गप्प झालेली बघवत नाहीत
ओह ओड्याला सेम हेच झालेले
ओह ओड्याला सेम हेच झालेले
टिक फिव्हर चा एक प्रकार आहे म्हणे
पण काळजी करू नका, लवकरच ते होतात रिकव्हर
खायची प्यायची जबरदस्ती करू नका
नई मी केली होती थोडी म्हणजे मला असं वाटत होतं की खाल्लं थोडं तर अंगात ताकद राहील म्हणून मी बाबापुता करून त्याला भरवत होतो
पण ते स्वतःच लंघन करतात पचवयाची ताकद येईपर्यंत
हे नुकतेच अनुभवलंय
बरं आमचं बाळ दमतच नाही << हो
बरं आमचं बाळ दमतच नाही << हो आमची पण खेळुन आगदी श्वास घ्यायलाही त्रास होत असतांनाही तिला खेळायचा थांबायचा नसतं. मग तिला डिस्ट्रॅक्ट केले तरी २ मिनीटात परत खेळणं घेऊन रेडी असते....
माउई मी काम करत असताना मला
माउई मी काम करत असताना मला एकदम खेटून बसतो. मग थोड्या वेळाने चुळ्बूळ सुरु होते. मग मांडीवरच डोके ठेवून ते पपी आईज करून बघेल, मधेच पंजा हातावर ठेवेल. मग हळु हळू कीबोर्ड वर पंजा येतो , नंतर मग नाकाने कीबोर्डवरचा हात किंवा हातातला फोन बाजूला करतो, मग खाली उतरून एकदम दोन पायावर उभा राहून लक्ष वेधण्याचा प्रयत्न. नाहीतर खेळणे आणून पायाशी ठेवणे, तरी नाही अटेन्शन मिळाले तर भुंकायला सुरुवात किंवा झूमीज आल्या की डायरेक्ट अंगावर उड्या. आणि घर भर धाव पळ
हा आमच्या घरी येणारा बोका
हा आमच्या घरी येणारा बोका
हो चॅम्प, गेले दोन दिवस तो
हो चॅम्प, गेले दोन दिवस तो लंघन करतोय.
कालपासून खायला सुरुवात केलीय.
सर्व भुभु पालकांना
सर्व भुभु पालकांना आंतरराष्ट्रीय भुभु दिनाच्या शुभेच्छा
हॅपी डॉग्ज डे.
हॅपी डॉग्ज डे.
हॅपी डॉग्ज डे!!
हॅपी डॉग्ज डे!!
ओडिन ला गणपती बाप्पा मोरया
ओडिन ला गणपती बाप्पा मोरया म्हणजे काय वाटतंय कळत नाहीये
आमच्या दारावरून कोणी गेले असं म्हणत की दरवेळी बाहेर जाऊन बघून येतो, भुंकत नाही पण हे काय आहे याबद्दल त्याला अमर्याद कुतूहल आहे
म्हणून मग मी त्याला गच्चीत नेलं आणि गणपती आणणारे लोकं दाखवले पण ते काय कळलं असावं असं त्याच्या ब्लँक फेस कडे बघून वाटत नाही
गेल्या वर्षी काय केलं होतं त्याने आठवत नाही
अर्थात दोन वर्षांनी पहील्यांदा इतक्या धुमधमात आहेत गणपती
नशिबाने आमच्या घराजवळ कुठलं मंडळ नाहीये नैतर डोकं उठलं असतं
नेहेमीप्रमाणे क्यूट किस्से!
नेहेमीप्रमाणे क्यूट किस्से!
हाहा.. ओडिन ला उंदरात
हाहा.. ओडिन ला उंदरात इन्टरेस्ट असेल...
नशिबाने आमच्या घराजवळ कुठलं
नशिबाने
आमच्या घराजवळ कुठलं मंडळ नाहीयेसरांकडे कुत्रं नाहीये...बाकी गमतीजमती छान.
नशिबाने आमच्या घराजवळ कुठलं
नशिबाने आमच्या घराजवळ कुठलं मंडळ नाहीये सरांकडे कुत्रं नाहीये... << प्रचंड हसायला आले. सरांकडे कुत्रा असता तर ह्या धाग्याची केव्हाच वाट लागली असती...
उपाशी बोका
उपाशी बोका
पण काही सांगू नका, कोणत्या उंदराची शेपटी धरून ओडिनच्या शेपटीवर येतील सांगता येत नाही. पण गणरायाला साकडं एकतरी धागा मुक्त असू देत
(No subject)
आमच्या घराजवळ सार्वजनिक गणपती
आमच्या घराजवळ सार्वजनिक गणपती आहेत. काल गणपती आले तेव्हा सोसायटीतल्या उत्साही मुलांनी फटाके फोडले, गाणी लावलेली. मुलं खुश आहेत यावर्षी
तर हॅरीला या सगळ्याची सवय नव्हती. गणपती अनेपर्यत तो व्यवस्थीत होता. फटाके फोडल्यावर त्याने धूम ठोकली आणि जिन्यात जाऊन लपून बसला.
त्याला समजावून सांगता सांगता पुरेवाट झाली ..
रच्याकने : हॅरी हा हरीचा अप्रभंश आहे. साबानी त्याच नाव हरी ठेवलल . अजूनही त्याला तेच म्हणतात ..पण सोसायटीतल्या मुलांनी हॅरी करून टाकल. हा पण इतका शहाणा की हॅरी म्हंटल्यावर पटकन प्रतिसाद देतो. तेच हरी म्हणुन हाक मारली की जरा विचार करून ऐकतो..
ओडिन ने आज धमाल आणली
ओडिन ने आज धमाल आणली
आम्ही गेली काही वर्षे फायबर ची मूर्ती आणतो, विसर्जन न करता कपाटात ठेऊन देतो आणि गणपतीत परत बसवतो
तर दादू तीच मूर्ती घेऊन उभा होता सोबत ओड्या.
दादूच्या पायावर दूध - पाणी घातलं तर हा लपलप करत चाटून ते दूध प्यायला आणि पायाला गुदगुल्या होतात म्हणून दादू नाचायला लागला
कसातरी आत आणला सगळ्यांना
काहीतरी आहे घरी, सगळे वेगळे वागत आहेत, चांगले कपडे तर घातलेत पण बाहेर नाही चाललेत यामुळे जाम कँफुज झालाय हे काय चाललंय काय
नुसत्याच उड्या मारून आणि मग सगळ्यांकडून स्वतःला अटेन्शन मिळतंय याची खात्री करून घेतली आणि आता झोपलाय
आजीने त्याच्यासाठी म्हणून छोटा मोदक बनवून ठेवलाय
मी प्राण्यांची फॅन तर नाहीच
मी प्राण्यांची फॅन तर नाहीच पण जरा ही जवळ ही जात नाही. गावाला कुत्रा आहे आमच्या पण तिकडे ही मी गेले की लांब लांब च असते त्याच्या पासून. पण हा धागा मला आवडतो. नेहमी वाचत असते मी सगळ्या गमती जमती.
Pages