भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती २

Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47

https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा

==================================================================================

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल रात्री अचानक थंडी वाजून आली, कणकण वाटत होती
मग जास्तीचे पांघरून घेतले तरी बरे वाटेना
मग उठून लाईट लाऊन पायात मोजे घातले
झालं आमच्या बाळाने तेवढंच बघितलं, त्याचे डोके एकच दिशेने चालतं
मी मोजे घातले म्हणजे आता बूट घालणार आणि त्याला फिरायला नेणार
रात्रीचे 3 वाजलेत, बाहेर अंधार आहे, ही वेळ फिरायला जायची नसते असले काहीही विचार सुद्धा मनात येत नाहीत त्याच्या

आणि नाचून नाचून उच्छाद मांडला, मी पांघरूण घेऊन झोपलो तेव्हा कुठं शांत बसला

मॉनस्टर किस्सा हीलॅरियस आहे.
ओड्याच्या किस्स्यावरुन माझा भाच्चा लहान असताना त्याला कुणिही बाहेर निघाल की२ मिनिट का होइना बाहेर फिरुन आणायला लागायच ते आठवल.

रात्रीचे 3 वाजलेत, बाहेर अंधार आहे, ही वेळ फिरायला जायची नसते >>:हाहा: ओडिन. बिचार्‍याचं लॉजिक काही चूक नव्हतं Happy

मोज्यांच्या किस्स्यांवरून आठवले

आता आमच्या घरात कुणाला बाहेर जायचे असल्यास "चला" हा शब्द चुकूनही उच्चारायचा नाही कारण सिम्बा लगेच उठून तुमच्या पुढे दारात उभा असतो. त्यामुळे बाहेर जातांना दोन गोष्टी कराव्या लागतात एक म्हणजे "चला" हा शब्द टाळणे आणि दुसरे म्हणजे कारची किल्ली नकळत घेणे त्याला नुसता सुगावा जरी लागला तर हा दारात आडवा आलाच म्हणून समजा, नाहीतर कार उघडली कि हा आधी उडी मारून स्वार झालेला असतो मग ती ड्राइवर सीट का असेना

हो "चला " हा शब्द आमच्याकडे पण स्फोटक ठरतो Happy फार सांभाळून वापरावा लागतो! आणि फेवरीट माण्सांची किंवा फ्रेन्ड्स ची पण नावं मोठ्याने घेऊन चालत नाही. नाहीतर लगेच सगळ्या खिडक्या दरवाज्यांमधे जाऊन त्यांना शोधायला आणि भुंकायला सुरुवात!

किती गोड बाळं ही.
सकाळी माझ्या मुलीच्या खोलीत मंकी (बोका) बरोब्बर ६ वाजता जातो म्याव म्याव करायला लागतो. जणू काही लाईव्ह अलार्म. त्याच्या मेंदूत फिट बसलंय बहुतेक ती त्या वेळेला ऊठते ते. लबाडगिरी म्हणजे जे कोणी उठून खाली येत असेल त्याच्या पायात पायात करून गोंडा घोळत किचनच्या दाराशी जाऊन बसायचं. कधी ते दार उघडेल आणि आम्ही बाहेर धुम ठोकू Happy

कधी दार बंद असेल तर आशाळभुतासारखे दोघंही तिथेच बसून राहतात.

unnamed (3)_3.jpgunnamed (2).jpg (142.44 KB)

unnamed (6).jpg

मस्तं ..किती क्युट किस्से आणि फोटो सगळ्यांचे !
ऑस्कर च्या फ्रेंड्सची नावं घेतली तर बाळ डोळ्यात प्राण आणून वाकड्या माना करतं किंवा भुंकतो !
ऑस्कर अँड फ्रेंड्सचा भारीच गृप जमलाय, सगळे डुडल्स आहेत !
सगळ्यांचं अर्धं डोकं पुड्ल चं असल्यामुळे सगळे हाय एनर्जी , महावस्ताद टगे, वात्रट इ. आहेत, पण मस्तं खेळतात रोज !
ऑष्कुला मध्यरात्री खेळायची/बाहेर जायची इच्छा होते अधेमधे.
नाइट ड्युटी नवर्‍याची असते, ऑस्कर बेडवर नुसताच बसलेला असतो तेंव्हा त्याला झोपायचा कंटाळा आलेला असतो Biggrin
बाहेर चल म्हणून सांगतो नवर्‍याला, नॉट फॉर पॉटी ब्रेक, बॉल खेळायचा किंवा वॉकला जायचं असतं युअर मॅजेस्टींना मध्यरात्री Uhoh

बॉल खेळायचा किंवा वॉकला जायचं असतं युअर मॅजेस्टींना मध्यरात्री >>> देवा!! Happy ऑष्कुचे फोटो नाही आले इतक्यात इथे?

अंजली, कसले क्यूट आहेत दोन्ही बोके! दोन्ही बोकेच आहेत ना? तो दारात बसलेला फोटो तर फारच मस्त आहे.

हे घ्या,
८ महिन्याचा झाला ओष्कु Happy
IMG_20220918_072717_379.jpg

मंकी आणि सॅमी चे फोटो मस्त! त्या जिन्यातल्या फोटोत तर कसले मस्त आरशात बघत असल्यासारखे वाटताहेत!
ऑष्कुला पोज द्यायचा फार कंटाळा आहे Happy

अरे ओश्कु केवढा मोठा दिसायला लागला बघता बघता
का फोटोत मोठा दिसतोय

चला हा खरोखरच स्फोटक शब्द आहे
कशाही संदर्भात म्हणता येत नाही घरात
परवाची जी match हरलो तेव्हा शेवटच्या ओव्हरला सडकून मार खाल्ल्यावर बाबा वैतागून म्हणाले
चला, घालवली यांनी match, बंद करा टीव्ही

त्यातला चला ऐकताच ओड्या दारापाशी जाऊन उभा
Happy
त्याला म्हणलं तुम्ही नई कुठं चला, तुम्ही बसा

गाडीचे तर विचारूच नका, त्याला वाटतं तो त्याचा हक्कच आहे
आणि एखादे वेळी त्याला नई नेलं तर अक्षरशः डोळ्यात प्राण आणून गेट कडे बघत बसतो परत येईपर्यंत
आणि आल्यावर अंगावर उड्या मारतो, असे कसे मला न घेता गेला

चला हा खरोखरच स्फोटक शब्द आहे आमच्याकडे पण
त्याला फिरायला नेताना मी जी बॅग नेते त्या बॅग ला हात लावायचा अवकाश कि हा आलाच.
काल तर वरच्या टेरेसवर गेला होता आणि मी ती बॅग गळ्यात घालेपर्यंत हा दोन मजले खाली आला.

ओडीन, माऊई, ऑस्कर, फुंतरू, समी , मंकी बाळांचे फोटो आणि किस्से मस्त. सगळीच बाळ क्यूट आहेत.

मोंस्तर नावाचे हेल्मेट>>> Biggrin

आमच्याकडे आता ५ वाजले की वाजले की साबांना ढुष्या देत बाहेर चला चा घोष चालू होतो हॅरीचा. ५ वाजता साबांचा हरिपाठ असतो. तो वाचून झाल्यावर घेऊन जातात त्या , पण ह्यालाच खात्री नसते
मग त्यांच्या अवती भवती गोंडा घोळवने, खाली नेईपरीत चिकटून राहणे असे प्रकार चालू होतात हॅरीसाहेबांचे. Lol Proud

IMG-20220914-WA0013.jpg

दोन्ही बोकेच आहेत ना? >>>> नाही पांढरा बोका आहे आणि आणि ब्राऊन माऊ गर्ल Happy

अगदी वॉलपेपर म्हणून ठेवावा असा>>> थँक्यू आशूचँप.. एक विडीओ आहे त्यात दोघं असेच बसलेत मी मागून हॅलो म्हणतेय तर अगदी सेम टाईमला माना वळवल्यात. इथे देता येत नाहीये.

सॅमीच्या गळ्यात कॉलर आहे त्याला मोठा घुंगरू आहे. एरवी पण गळ्यात अस्तो तिच्या सारखा छुमछुम आवाज होतो मग आम्ही तिला मोंजॉलिकाच म्हणतो. Proud

हॅरी किती गोंडस Happy
ऑश्कु चा रंग बदलल्यासारखा का वाटला एकदम?

हो अश्विनी,
थोडा लाइट होतो डुडल्सचा / बर्‍याच पपीजचा कलर मोठे होताना, कदाचित सनलाइट मधे अजुन वेगळी शेड दिसत असेल.
आशुचॅम्प,
हो, ग्रोथ्बिग बॉय दिसतो , फोटो पण मुद्दाम गुटगुटीत बाळ दिसावा असा काढ्ला आहे Wink
हा बसलेला फोटो :

87F72F06-1CBE-49F8-8FB3-247ECDB2ED6B.jpeg

जाई,
किती क्युट आहे हॅरीचा ढुशी मारताना फोटो Happy

आणि वॉक ला आज्जी बरोबर जातो हे पण किती क्यूट! मनात आणले तर आजीला ओढत नेऊ शकेल इतकी ताकद असणार त्याच्यात.

Pages

Back to top