Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47
https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा
==================================================================================
आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.
हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सिम्बा कसलं गोंडस बसलंय
सिम्बा कसलं गोंडस बसलंय
मलाही जर्मन शेफर्ड खूप आवडतात
दिसायला फक्त भयंकर वाटतात पण खूप मायाळू असतात (अपवाद वगळता)
आपल्या ग्रुपवरचा एलॉन पण तसाच आहे क्युट
मी भू भू द्वेष्टी नाही। पण
मी भू भू द्वेष्टी नाही। पण सेम असेच माझ्या लहान भावाला तो २/३ वर्षाचा असताना आमच्या चाळीतल्या काकांचा कुत्रा चावला होता। अगदी गालाचा लचकाच तोडला होता। तो खेळत होता व त्याचे खेळणे त्या बांधलेल्या कुत्र्याच्या पुढ्यात पडले ते उचलायला हा त्याच्या जवळ गेला होता. कुत्रा जेव्हा चावला तेव्हा एक काकी धावत जाऊन तिने त्या कुत्र्याला बाजूला ढकलून दिले व भावाला त्याच्या तावडीतून सोडवले . (कुत्रा पाळीव होता पण खूपच भुंकायचा। आमचा बोका (विट्या) त्याला चांगलाच धडा शिकवायचा) माझे वडील ड्युटीवर होते व चाळीत मोठे असे ते कुत्रामालकचं होते। पण त्यांनीहि अगदी माणूसघाणेपणा केला भाऊ रक्ताने माखला तरी त्यांना काहीच नाही. माझी आई अगदी रडकुंडीला आली आणि तिची शुद्ध हरपली तेव्हा घरी मी होते मग खूप लोक जमा झाली आणि आईला शुद्धीवर आणून भावाला डॉक्टरकडे नेण्यात आले नशीब समोरचे हवालदार काका तेव्हा नाईट ड्युटीवरून आले होते मग त्यांनीच आम्हाला मदत केली। डॉक्टरांनी माझ्या समोर भावाच्या गालावर टाके घातले। माझी आई पुन्हा शुद्ध हरपून तिथेच कोडमडली। लहानपणीची टाक्यांची जखम त्याच्या चेहऱ्यावर अजूनही दिसते कारण आम्ही नॉर्मल डिस्पेंसरीत गेलो होतो आणि जनरल प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांनी त्याच्यावर operate केले होते . इतके असूनही माझा भाऊ आता मोठेपणी भटक्या कुत्र्यांना खाऊ, पिऊ घालतो व आजारी किंवा जखमी कुत्र्यांना औषधपाणी करतो।
हे वाचून खरेच खूप वाईट वाटले.
हे वाचून खरेच खूप वाईट वाटले. आईला बसलेला धक्का समजू शकते. त्या कुत्रामालकाचा खूप राग आला.
बापरे फारच भयानक अनुभव
बापरे फारच भयानक अनुभव
भावाचे खरेच खूप कौतुक
सोप्पे नाहीये हे
बापरे अजनबी फारच डेंजर किस्सा
बापरे अजनबी फारच डेंजर किस्सा.
बापरे फारच मोठ्या मनाचा आहे
बापरे फारच मोठ्या मनाचा आहे तुमचा भाऊ.
मी नेहेमी ह्या धाग्यावर येऊन गमती वाचत असते आज थोडा धीर करून आमच्या मांजराची ओळख करून देते
हा आमचा बोका, गुंडू! तो आमच्याकडे ६ महिन्याचा असताना आला. त्याच्या आधी तो एका आजोबांकडे होता पण त्यांनी त्याला थोडे दिवस सांभाळून परत पाठवला होता रेस्क्यू कडे. आल्या क्षणापासून त्याने मला आई म्हणून ऍक्सेप्ट केला आणि आनंद ला(नवऱ्याला) भावंडं म्हणून. माझ्या कधी खोड्या काढत नाही पण आनंदच्या सतत खोड्या आणि भांडाभांडी करतो पण माझ्याशी कधीच खेळत नाही. ते सगळं आनंद सोबत. आनंद काही महिने भारतात अडकून पडला होता कोव्हीड काळात, तेंव्हा त्याची खूप पंचाईत झाली, खेळायला कोणी नाही! आता आनंद शी पण निट खेळात नाही, सवय मोडली त्याची आणि आनंद पण खूप बिझी आहे. गुंडू कंटाळतो हे दिसतं. हा सतत नवीन रुटीन तयार करण्यात पटाईत आहे. संध्याकाळी घरी पोचले की चाहुलीने दारात येऊन थांबतो.
सध्याचं लेटेस्ट खूळ म्हणजे हा माझ्या मांडीत बसलेला असतांना, मी शिट्टी वाजवायची नाही. मी शिट्टी वाजवली कि शेजारी बसलेल्या आनंदला जाऊन चावतो आणि जर आनंद नसेल तर शेपट फुलवून माझ्यावर अट्याक करतो. फुल चक्रम आहे!
वाजवली कि शेजारी बसलेल्या
वाजवली कि शेजारी बसलेल्या आनंदला जाऊन चावतो ......... मजेदार प्रकरण आहे.
मध्यतंरी आम्ही धोम धरणाच्या
मध्यतंरी आम्ही धोम धरणाच्या जवळ राहायला गेलो होतो तेंव्हा एलोन ला पण घेऊन गेलो होतो ... बोट ride पण एन्जॉय केली आम्ही
खूप देखणे आहेत सर्व कुत्रे.
खूप देखणे आहेत सर्व कुत्रे.
गुंडू फारच गोड आहे!
गुंडू फारच गोड आहे!
एलोन देखणा भुभू आहे एकदम.
गुंडू फारच गोड आहे! + १
गुंडू फारच गोड आहे! + १
चार्ली 777 फारच टचिंग घेतलाय
चार्ली 777 फारच टचिंग घेतलाय
मला नंतर बघवलाच नाही रडूच यायला लागलं
पण त्याच्या मोटरसायकल ला तो साईड कार बसवतो ते भारी वाटलं
लगेच मी इंटरनेट वर माझ्या बाईक साठी बघायला लागलो
बरंच महागडं प्रकरण आहे पण बघतोय सेकंड हँड कुठं मिळाली तर
मजा येईल मला आणि ओड्याला गावभर फिरायला
म्हणजे शोले मधल्या सारखी?
म्हणजे शोले मधल्या सारखी?
ही बघा.
https://www.vijayshaktisidecar.com/motorcycle-sidecars.html
अजनबींचा किस्सा भीतीदायक आहे!
अजनबींचा किस्सा भीतीदायक आहे! इतकं सोसूनही त्यांच्या भावाच्या मनात भू भूंबद्दल अढी नाही! हे खरंच कौतुकास्पद आहे.
गुंडूला शिटीच्या आवाजाचं वावडं दिसतंय
फक्त माहिती करीता.
फक्त माहिती करीता.
https://www.dnaindia.com/india/report-stray-dogs-menace-supreme-court-if...
हे पण पहाhttps://punemirror
हे पण पहा
https://punemirror.com/news/india/FakeNewsAlert-Stray-feeders-not-to-be-...
मांजर पालक, तुम्ही तुमच्या
मांजर पालक, तुम्ही तुमच्या माऊला panleukopenia चे vaccine दिलेय का ? माझ्या एका ओळखीच्या घरी 3 माऊंना हे झालेय. म्हणून आज मी आमच्या vet बरोबर बोलले तर त्या म्हणाल्या की पुण्यात हे viral infection खूप वाढलेय, रोज 5-6 केसेस येत आहेत. आमच्या माऊला दिले आज हे.
I don't want to scare you but please talk to your vets. This infection could be fatal.. so take care of your little ones..
कॅमेरा असायला हवा होता असे
कॅमेरा असायला हवा होता असे पुन्हा एकदा वाटलं आज....
भन्नाट किस्सा झालाय...आम्ही नेहमीच्या वाटेने फिरत होतो. ओड्या नेहमीप्रमाणे हसत खेळत बागडत हिंडत होता. मी लांबवर पहिले तर एक भटके भूभू दिसले. त्याने आम्हाला बघताच बाजच्या गवतात उडी मारली. मला वाटलं ते पळून गेलं. मी पुढे गेल्यावर मला लक्षात आलं की ते पळून नाही गेलं लपून बसलं आहे. त्याला बहुदा आम्ही गेल्यावर आपल्या रस्त्यावरचे मार्गक्रमण सुरु ठेवायचे होते. आणि ते लपलंही असलं भन्नाट की सगळे अंग आणि डोके गवतात फक्त नाकाचा शेंडा बाहेर आला होता. म्हणलं ओड्या काय करतोय बघू. तोवर तो वास घेत इकडे तिकडे बघत आलाच. त्याला काय ते भूभू दिसलं नाही पण दोन पावले पुढे जाताच त्याला वास आला. आणि पटकन मागे वळला. अजून खोलवर श्वास घेऊन हा वास कशाचा याचे तो पृथक्करण करण्याच्या बेतात असतानाच त्याला ते भूभूचे नाक दिसलं.
अक्षरश: धक्क्याने तो मागे कोलमडला. लिटरली तो पटकन मागे व्हायला गेला आणि बॅलन्स गेला आणि पडला. निमिषार्धात उठून त्याने भुंकत पळवून लावले पण मला जो काही हसण्याचा अॅटॅक आला की बापरे उचक्यांवर उचक्या.
अजूनही डोळ्यासमोर धक्क्याने कोलमडलेला ओड्या येतोय.
जबरी किस्सा आहे. मी तर
जबरी किस्सा आहे. मी तर गवतातून त्या भुभ्याचं बाहेर आलेलं नाक कसं दिसत असेल हे सुद्धा इमॅजिन करून हसतेय.
हे हे मस्त. ह्याचा व्हिडीओ
हे हे मस्त. ह्याचा व्हिडीओ नक्की हवा होता.
पुण्यात हे viral infection
पुण्यात हे viral infection खूप वाढलेय, रोज 5-6 केसेस येत आहेत. <<<<>>>>>> माऊ घरातच असेल, बाहेर जात नसेल तरी होतं का हे इन्फेक्शन ?
धन्यवाद घाटपांडे आहेस.
धन्यवाद घाटपांडे आहेस.
<<माऊ घरातच असेल, बाहेर जात
<<माऊ घरातच असेल, बाहेर जात नसेल तरी होतं का हे इन्फेक्शन ?>>
धनश्री, आमचे माऊ पण घरात असते, बाहेर जात नाही. तरी व्हेट म्हणाल्या की vaccine दिलेले बरे कारण हा वायरस पटकन पसरतो आणि एकदा infection झाले की उपाय नाही. म्हणून मी दिले हे vaccine.
तुम्ही तुमच्या veterinar ना विचारून बघा.
ओडिन चा किस्सा वाचला आणि
ओडिन चा किस्सा वाचला आणि त्याच वेळी इन्स्टा वर हा व्हिडीओ पाहिला. ओडिन चा व्हिडिओ काढला असता तर काहीसा असाच असता
https://www.instagram.com/reel/Ciay1RDAlzl/?utm_source=ig_web_copy_link
मस्त व्हिडियो आहे.
मस्त व्हिडियो आहे.
अय्यो गुंडू किती गोंड्स आहे..
अय्यो गुंडू किती गोंड्स आहे... चक्रम मांजरं खरंच फनी असतात. काय चालू असतं डोक्यात कोण जाणे?
इंस्टा विडीओ पण किती विनोदी आहे. भुभू माऊला कळतं का आपण किती मजेशीर वागतो ते.
ओडीन तुझा इन्स्टावरचा फिरायला जाऊ पण किती क्यूट विडीओ आहे. जाम आवडला..
भूभू किंवा माऊ नाही, पण
भूभू किंवा माऊ नाही, पण bovine कुळातल्या प्राण्यांना (गाई - म्हशी ) लंम्पि (lumpy) व्हायरसचा बराच त्रास चालू आहे . मी एक इंस्टाग्राम हॅन्डल follow करतो - cowsblike , त्यांच्या एका गाईचा ह्यामुळे मृत्यू झाला . मध्यप्रदेश , राजस्थान मध्ये बरेच मृत्यू झाले असे ऐकून आहे . आमच्या गावी सगळ्यांनी मिळून तालुक्याहून वेट ला बोलावले आणि चेकअप करून घेतले.
ओडिनचा किस्सा वाचून आठवले,
ओडिनचा किस्सा वाचून आठवले, सिम्बा आता लपाछपी खेळतो आणि लपतांना त्याला जर आपण दिसलो नाही तर त्याला वाटते कि आपणपण त्याला पाहू शकत नाही परंतु आकार मोठा असल्याने त्याची एकतर शेपूट तरी बाहेर आलेली असते किंवा मग वरून कान तरी दिसत असतात आणि त्याला वाटते कि काय छान लपलोय आपण
किती क्यूट!
किती क्यूट!
काय छान लपलोय आपण>>>> क्यूट
काय छान लपलोय आपण>>>> क्यूट
Pages