पाककृती स्पर्धा क्र १- सारे जहाँँ से अच्छा...तिरंगी सॅलड..मनीमोहोर

Submitted by मनीमोहोर on 9 September, 2022 - 03:11

तिरंगा थीम तशी खूप कठीण आहे. हल्ली नेटमुळे सगळं सगळ्याना
माहीत असत त्यामुळे कश्याच नावीन्य नाही राहिलं आहे. असो. तरी प्रयत्न केलाय.

पालक, गाजर ,टोमॅटो घालून तिरंगी भात किंवा असंच काहीतरी किंवा मग कृत्रिम रंग घालून काहीतरी करणे एवढंच सुचत होतं. तिरंगी मोदक करण्यासाठी रंग आणले ही विकत पण ते हिरव्या नारिंगी मोदकाना (उकडीचे नाही लिहिलं तर उकडीचेच कारण मोदक आम्ही फक्त उकडीचेच करतो , तळून मोदक फक्त करंज्या केल्या तर एखादा शास्त्रापुरताच Happy ) घरात माझ्यासकट कोणी हात ही लावणार नाही आणि कष्ट वाया जातील म्हणून ते रद्द केले.

खाली फोटो दाखवतेय, गाजर, मुळा , फरसबी आणि वाली च्या शेंगा वापरून सॅलड केलं आहे. तसं सोपं आहे , गाजराच्या मुळ्याच्या चकत्या काढून त्याना V शेप मध्ये कट देऊन फुलं केली आणि प्लेट मध्ये फुलदाणी सारखी रचली. नेहमीच्या सॅलड सारखं हे कोणत्या तरी डिप मध्ये बुडवून किंवा मीठ मिरपूड घालून किंवा नुसतं ही खाऊ शकता. हे मोडायचा धीर नाही झाला तर सजावट म्हणून टेबलावर मस्तच दिसेल.

20220909_100033~3_0.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सौंदर्यदृष्टी असली की माणूस काय नि किती आणि कशाचंही करू शकतो हे ममो च्या प्रत्येक कृतीमधून प्रत्ययास येते. सुंदर रचना.

वा! मस्त दिसतंय.
हातात कला आहे तुमच्या ! तुम्ही तुमच्या आत्याबाईंवर लेख लिहिलाय तसं तुमच्या पुढच्या पिढीतलं कोणीतरी तुमच्यावर लेख लिहिणार बघा!

<तिरंगा थीम तशी खूप कठीण आहे. हल्ली नेटमुळे सगळं सगळ्याना
माहीत असत त्यामुळे कश्याच नावीन्य नाही राहिलं आहे. > बरोबर. तिरंगी पुलाव, डोसा, ढोकळा , मोदक , चिरोटे, करंज्या हे कुठे ना कुठे पाहिलंय.

काय सुंदर दिसतंय!! खरंच हे मोडायची हिंमत नाही होणार.या कापाकापीत उरलेले तुकडे बाजूला एका ताटात घेऊन खाईन Happy

खूपच सुंदर..
कल्पना छान आहे..

छान दिसतेय

हे मोडायचा धीर नाही झाला तर सजावट म्हणून टेबलावर मस्तच दिसेल. >> कोणीही हेच करेल Happy

सुरेख!
भरतना अनुमोदन - कलाकार आहात खरंच!

हेमाताई तू खरी कलाकार!!! तुझ्या आधीच्या सगळ्या कार्व्हिंगच्या कलाकृती आठवल्या.
सहज पण सुंदर हे तुझ्या लिखाणातून पण नेहमीच झळकत असत.
हे खूपच भारी दिसतंय.

थॅंक्यु सगळ्याना.

सौंदर्यदृष्टी असली की माणूस काय नि किती आणि कशाचंही करू शकतो हे ममो च्या प्रत्येक कृतीमधून प्रत्ययास येते. सुंदर रचना. >> थॅंक्यु प्राचीन.

हेमाताई तू खरी कलाकार!!! तुझ्या आधीच्या सगळ्या कार्व्हिंगच्या कलाकृती आठवल्या.
सहज पण सुंदर हे तुझ्या लिखाणातून पण नेहमीच झळकत असत.
हे खूपच भारी दिसतंय. >> थँकू उजू.

हातात कला आहे तुमच्या ! तुम्ही तुमच्या आत्याबाईंवर लेख लिहिलाय तसं तुमच्या पुढच्या पिढीतलं कोणीतरी तुमच्यावर लेख लिहिणार बघा! >> भरत Happy .

किती ही खाऊ शकतो म्हटलं तरी हे मोडणं कठीण जात हे खरं आहे. मी केलेलं असतं त्यामुळे मीच वाढून टाकते दुसरं कोणी नाही धजावत.

कसलं गोड दिसतंय .. मुलांना दिलं तर आवडीने खातील >> होय मस्त आवडीने खातात मुलं. मुलीची मुलगी लहान असताना तिला लाल पिवळ्या फुगी मिरचीची मी फुलं करून देत असे. " मी फुलं खातेय " म्हणून खूप आवडीने खात असे ती .

वरच्या सगळ्यांना अनुमोदन. कलाकार आहेसच तू ममो. जे करशील ते सुरेख. ( मला गव्हले आठवले, तुझ्या इतके सुरेख गव्हले करणारी मी अजून दुसरी बघितली नाही).
हि डिश इतकी छान दिसतेय, ती प्लेन आहे हे लक्षातच येत नाही. ती बाजूची नक्षी प्लेटचीच छापिल वाटावी अशी दिसतेय.

Pages