कथाशंभरी २-रखवालदार-प्राचीन

Submitted by प्राचीन on 5 September, 2022 - 04:51

अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि .....
स्वतःशीच मान हलवली. बिलालला निरोप द्यायला हवा आता.
RDX. इथून काढण्यासाठी खास माणसं घेऊन रसूल एक -
दोन दिवसात येणार आहे. पण त्या भोचक भिकूपासून सांभाळून रहायला हवं. तसाही तो 'बंद घरात भूत असतं' , वगैरे मानत नाही. त्यातून त्याची बहुतेक पोलिसात ओळख. उगीच लफडं नको. कोण तो मुंबईला सूर्यवंशी कि कुणीतरी पोलिसवाला आहे त्याला जरा जरी वास लागला तर.. तसे रसूलने अर्धे पैसे दिलेत रखवालीचे. पण खर्च काय कमी असतात..इथल्या लोकांमध्ये रघू बनून इतके महिने राहायलाच मला किती खटपटी करायला लागल्या. उसका थोडा मेहनताना तो बनताइच है.|"

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही! Happy