कथा शंभरी - गुप्तहेर रघू - रूपाली विशे - पाटील

Submitted by रूपाली विशे - पाटील on 7 September, 2022 - 00:18

अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि ...

घरातून येणारा अंधुक उजेड पाहून तो चमकला. कानोसा घेत रघू घराच्या दिशेने निघाला.

" कुठे ठेवलीयेत सोन्याची बिस्कीटं ..?? "

कुजबूज कानावर पडताच रघू कडमडेच्या अंगातला गुप्तहेर जागा झाला. हे नक्कीच् तस्करीचं प्रकरण असणार... !

त्याने इन्स्पेक्टर मानतुकेंना फोन लावताच ते तिथे हजर झाले.

" दार उघडा..!"

दार हळूच उघडले.

" कुठे लपवलीयेत सोन्याची बिस्कीटं ..?? " मानतुकेंनी दरडावलं.

सगळ्यांकडे रागाने पहात आतून शेंबड पोरं कडेवर घेऊन येत, पार्ले-जीची बिस्कीटं सर्वांसमोर आदळत घरातली स्त्री
करवादली.

"हा आमचा सोन्या आणि ही त्याची बिस्कीटं, घ्या सोन्याची बिस्कीटं..!

ओशाळलेले इन्स्पेक्टर मानतुके रागाने रघुच्या दिशेने वळले खरे , पण ..

रघू झटक्यात पसार झाला होता.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol लैच भारी. धमाल!

बिचार्‍या रघूला काय काय सोंगं वठवायला लावलीयेत माबोकरांनी. Biggrin

lol

छान.
करवादली ..अशी दुरुस्ती कराल ना?

Lol

मोहिनी, मामी, हर्पा, च्रप्स, , अश्विनी, मनमोहन, भरत, पल्लवी, अमितव, धनवन्ती, अनिरुद्ध, प्राचिन, वावे, देवकी, आबा, मानवजी, मेघना, वीरूजी, रायगड, अजनबी, कविन, मंजूताई..!!

सर्वांना धन्यवाद..!!

देवकी, चूक निर्दशनास आणून दिल्याबद्दल खूप आभार..
तुम्ही सांगितल्याप्रमाणे बदल केलाय्..!

Pages