Submitted by रूपाली विशे - पाटील on 7 September, 2022 - 00:18
अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि ...
घरातून येणारा अंधुक उजेड पाहून तो चमकला. कानोसा घेत रघू घराच्या दिशेने निघाला.
" कुठे ठेवलीयेत सोन्याची बिस्कीटं ..?? "
कुजबूज कानावर पडताच रघू कडमडेच्या अंगातला गुप्तहेर जागा झाला. हे नक्कीच् तस्करीचं प्रकरण असणार... !
त्याने इन्स्पेक्टर मानतुकेंना फोन लावताच ते तिथे हजर झाले.
" दार उघडा..!"
दार हळूच उघडले.
" कुठे लपवलीयेत सोन्याची बिस्कीटं ..?? " मानतुकेंनी दरडावलं.
सगळ्यांकडे रागाने पहात आतून शेंबड पोरं कडेवर घेऊन येत, पार्ले-जीची बिस्कीटं सर्वांसमोर आदळत घरातली स्त्री
करवादली.
"हा आमचा सोन्या आणि ही त्याची बिस्कीटं, घ्या सोन्याची बिस्कीटं..!
ओशाळलेले इन्स्पेक्टर मानतुके रागाने रघुच्या दिशेने वळले खरे , पण ..
रघू झटक्यात पसार झाला होता.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
सोन्याचा करगोटा आठवला..
सोन्याचा करगोटा आठवला..
अरेच्चा ! मी माबोवर पुन्हा
अरेच्चा ! मी माबोवर पुन्हा यायच्या आधीपासूनच माझी ही फटफजिती इथे व्हायरल झाली होती..
और मेरेको खबरच नही !
पण हे सगळं मी अ त्यंत गुप्त ठेवलं होतं. हाऊ डू यू क्नो इट ?
कही आप सोन्या कि मम्मी तो नही ?
(No subject)
सहीच रूपाली
ऋन्मेष, लावण्या, बिपिनजी,
ऋन्मेष, लावण्या, बिपिनजी, निकू, मैत्रेयी, कृष्णा, मनस्वीता, अनिरुद्ध, नताशा, र. आ., छंदीफंदी, धनुडी... आपले सर्वांचे खूप आभार ...!
कही आप सोन्या कि मम्मी तो नही ?>> आप तो अंतर्ज्ञानी है आचार्यजी ..आपने बिल्कुल सही पहचाना है ...!
सहीच!
सहीच!
Pages