कथाशंभरी- पुलाखालून वाहून गेलेले पाणी - बोबो निलेश

Submitted by बोबो निलेश on 7 September, 2022 - 00:03

पुलाखालून वाहून गेलेले पाणी

बर्‍याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पूलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. अरे हे काय .......
अचानक पुन्हा पाण्याचा प्रवाह वाढायला सुरुवात झाली. ढगफुटी झाली की काय? की पाऊस जास्त झाल्याने धरणाचे दरवाजे उघडले? कारण काहीही असेल पण प्रवाहाचा आवेग वाढू लागला.
एकीने पुलाच्या पलीकडच्या बाजूला असलेल्या आपल्या मैत्रिणीकडे- दुसरीकडे पाहिले. दुसरीसुद्धा हताशपणे पहिलीकडेच पाहत होती. आता काही क्षणांमध्ये पूल पुन्हा पाण्याखाली जाणार. पहिली आणि दुसरीची भेट पुन्हा लांबणार.
निराश होऊन पहिली आणि दुसरी - दोघीही- पुन्हा कधी पुलावरून आणि पुलाखालून बरेच पाणी वाहून जाईल याची वाट पाहू लागल्या

Group content visibility: 
Use group defaults

.