आजचा विषय आहे - घन घन माला नभी दाटल्या ...
घन घन माला नवी दाटल्या कोसळती धारा ।
केकारव करी मोर काननी उभवून उंच पिसारा ।।
पहिला पाऊस पडताच या गदिमांच्या ओळी आपोआप गुणगुणल्या जातात. आषाढात मुसळधार कोसळणारा पाऊस श्रावणात ऊन पावसाचा खेळ खेळताना दिसतो. निसर्ग नवचैतन्याने बहरलेला असतो. मग आता आपण काय करायचं तर हे नजरेने टिपलेलं पावसाळी दृश्य कॅमेऱ्यात पकडायचं. कोणतही पावसाळी दृश्य जसं - दऱ्याखोऱ्यातून बेधुंद कोसळणारे धबधबे, पावसाने ओलेचिंब झालेले डोंगर, आकाशाला भिडलेल्या उत्तुंग कड्यांवर कोसळणारा मुसळधार पाऊस, हिरव्यागार डोंगरावरून हळुवार रांगणारे दाट ढग, नदीला आलेला पूर, पावसात ठप्प झालेली वाहतूक ....
या प्रकाशचित्रांच्या खेळातून पावसाची मजा लुटुया.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे (https://www.maayboli.com/node/47635) पाहा.
(No subject)
(No subject)
अमित तुला वॉटकिन्सला झब्बू
अमित तुला वॉटकिन्सला झब्बू
पल्लवी छान फोटोज.
कोसळत्या धारा
कोसळत्या धारा

साल्हेर मुल्हेर जवळील शेत.
साल्हेर मुल्हेर जवळील शेत.
किल्ले सुधागड
किल्ले सुधागड

एकदम फ्रेश फोटो आज मेघ गर्जना
एकदम फ्रेश फोटो आज मेघ गर्जना आणि विजांच्या कडकडाटा सकट खूप जोरात पाऊस पडला अर्धा एक तास ठाण्यात.
एवढया पावसात ही एक कबुतर कुठे जात होतं कोण जाणे.
एकदम फ्रेश फोटो आज मेघ गर्जना
एकदम फ्रेश फोटो आज मेघ गर्जना आणि विजांच्या कडकडाटा सकट खूप जोरात पाऊस पडला अर्धा एक तास नवी मुंबईत
खूप वर्षांनी माबोवर आलेय आणि
खूप वर्षांनी माबोवर आलेय आणि झब्बू बघून राहवलं नाही. कसले मस्त फोटोज आलेत सगळ्याच झब्बू धाग्यांवर.
हा माझ्याकडुन एक पावसाळी सुर्यास्ताचा एक फोटो
उजु मस्त
उजु मस्त
नभांनी जणु सुर्याला गिळायचं
नभांनी जणु सुर्याला गिळायचं ठरवलेलं

(No subject)
झब्बू रखरखीत वाळवंटातील धरण.
झब्बू
रखरखीत वाळवंटातील धरण आणि पूल.
एकेक फोटो जबरदस्त.
एकेक फोटो जबरदस्त.
(No subject)
(No subject)
(No subject)
हा आमच्या फार्महाऊस मधून
हा आमच्या फार्महाऊस मधून दिसणारा तोरणा. आणी त्या मागून डोकावणारे ढग
(No subject)
हा आमच्या वावरातला!
Pages