कथाशंभरी - सही रे सही - स्वरुप

Submitted by स्वरुप on 3 September, 2022 - 03:22

बर्‍याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पूलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. अरे हे काय! मैत्रिणीच्या घरातल्या टीपॉयवर पडलेल्या वर्तमानपत्राने तिचे लक्ष वेधून घेतले. कुठलीही खाडाखोड न करता अतिशय सुवाच्य अक्षरात सोडवलेले शब्दकोडे आणि त्याखाली ठोकलेली लफ्फेदार सही!
सोडवलेल्या शब्दकोड्याखाली स्वताची सही करण्याची जगावेगळी सवय असणारा जगात अजुनही कुणीतरी आहे याचे आश्चर्य वाटून डोळ्यावरची चाळिशी सांभाळत ती उठली.
अतिशय कुतुहलाने तिने तो पेपर हातात घेतला आणि सही करण्याची नुसती सवयच नाही पण सही पण जेंव्हा मिळतीजुळती दिसली तेंव्हा न राहवून तिचे लक्ष मैत्रिणीच्या दरवाज्यावरच्या नेमप्लेट कडे गेले.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Chan ahe

धन्यवाद लोकहो!

>>विबासं की विस्मरण?
विस्मरण हा ॲंगल नक्कीच नव्हता लिहताना डोक्यात

विस्मरण हा ॲंगल नक्कीच नव्हता लिहताना डोक्यात. >>> अच्छा. अल्झायमरमुळेही हे होऊ शकतं. तिनं घराच्या पाटीकडे पाहिलं तर त्यावर तिचंच नाव होतं. ते तिला कळलं की नाही माहित नाही. ती आपल्याच घरात बसली होती पण मैत्रीणीच्या घरात आहोत असं तिला वाटतं होतं. - हे असं मला वाटलं

आणि शिवाय नवर्‍याचा विबासं असणार ही शक्यताही वाटली. म्हणून विचारलं.

Happy hmm..
चांगलं आहे की, दोन शक्यता असल्या तर वाचकांना जास्त मज्जा

त्यांचा डिव्होर्स झाला असावा आणि नवर्‍याने योगायोगाने तिच्या मैत्रिणीशी पुनर्विवाह केला असावा. दोघी काही वर्षांनंतर भेटत असल्याने दोघींना ह्याचा पत्ता नसावा.

ओळखीची सही, दारावरची नेमप्लेट ह्यांनी संदर्भ जुळले.

विबासं पेक्षा विपूसं. ती कॉलेजात / तरूणवयात सही करणार्‍याच्या सहवासात होती. मग कालांतराने नोकरी इ जिंदगी की जद्दोजहद मध्ये एकमेकांशी संपर्क उरला नाही. आता ती मैत्रिणीकडे आली तर सहीवरून दरवाजाच्या नावावर लक्ष गेले.

आवडली कथा.

>>दोन शक्यता असल्या तर वाचकांना जास्त मज्जा
Happy

>>विबासं पेक्षा विपूसं.
ह्म्मम..... असेच काहीसे होते लिहताना डोक्यात..... म्हणजे खुप वर्षापूर्वी झालेला ब्रेकअप आणि नंतर तुम्ही म्हणता तसेच काहीसे जिंदगी की जद्दोजहद वगैरे वगैरे!!

आवडली कथा!

विबासं पेक्षा विपूसं. ती कॉलेजात / तरूणवयात सही करणार्‍याच्या सहवासात होती. मग कालांतराने नोकरी इ जिंदगी की जद्दोजहद मध्ये एकमेकांशी संपर्क उरला नाही. आता ती मैत्रिणीकडे आली तर सहीवरून दरवाजाच्या नावावर लक्ष गेले.
>>> मलाही असच वाटलेल

Pages