Submitted by स्वरुप on 3 September, 2022 - 03:22
बर्याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पूलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. अरे हे काय! मैत्रिणीच्या घरातल्या टीपॉयवर पडलेल्या वर्तमानपत्राने तिचे लक्ष वेधून घेतले. कुठलीही खाडाखोड न करता अतिशय सुवाच्य अक्षरात सोडवलेले शब्दकोडे आणि त्याखाली ठोकलेली लफ्फेदार सही!
सोडवलेल्या शब्दकोड्याखाली स्वताची सही करण्याची जगावेगळी सवय असणारा जगात अजुनही कुणीतरी आहे याचे आश्चर्य वाटून डोळ्यावरची चाळिशी सांभाळत ती उठली.
अतिशय कुतुहलाने तिने तो पेपर हातात घेतला आणि सही करण्याची नुसती सवयच नाही पण सही पण जेंव्हा मिळतीजुळती दिसली तेंव्हा न राहवून तिचे लक्ष मैत्रिणीच्या दरवाज्यावरच्या नेमप्लेट कडे गेले.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आयला, कहानी में ट्विस्ट! सहीच
आयला, कहानी में ट्विस्ट! सहीच जमलीये.
मस्तच, शेवटचा धक्का भारी.
मस्तच, शेवटचा धक्का भारी.
ट्विस्ट! मस्तच!
ट्विस्ट! मस्तच!
छान आहे. आवडली.
छान आहे. आवडली.
Chan ahe
Chan ahe
मस्त!
मस्त!
धन्यवाद! शशकचा हा पहिलाच
धन्यवाद! शशकचा हा पहिलाच प्रयत्न
हाहा .. मस्त आहे ही..
हाहा .. मस्त आहे ही..
आवडली.
आवडली.
मस्त जमलीय.
मस्त जमलीय.
जमेश खन्ना
जमेश खन्ना
छान
छान
खतरा! आवडलीच स्वरुप
खतरा! आवडलीच स्वरुप
मस्त मस्त.
मस्त मस्त.
सहीच!!
सहीच!!
आईग्गं, विबासं की विस्मरण?
आईग्गं, विबासं की विस्मरण?
मस्त
मस्त
हाहा धमाल जमली आहे.
हाहा धमाल जमली आहे.
छान!
छान!
धन्यवाद लोकहो!
धन्यवाद लोकहो!
>>विबासं की विस्मरण?
विस्मरण हा ॲंगल नक्कीच नव्हता लिहताना डोक्यात
मला विस्मरणच वाटलेलं.
मला विस्मरणच वाटलेलं.
आता नीट कळली.
जमलीय
जमलीय
विस्मरण हा ॲंगल नक्कीच नव्हता
विस्मरण हा ॲंगल नक्कीच नव्हता लिहताना डोक्यात. >>> अच्छा. अल्झायमरमुळेही हे होऊ शकतं. तिनं घराच्या पाटीकडे पाहिलं तर त्यावर तिचंच नाव होतं. ते तिला कळलं की नाही माहित नाही. ती आपल्याच घरात बसली होती पण मैत्रीणीच्या घरात आहोत असं तिला वाटतं होतं. - हे असं मला वाटलं
आणि शिवाय नवर्याचा विबासं असणार ही शक्यताही वाटली. म्हणून विचारलं.
छान आहे. मलाही विस्मरणच वाटलं
छान आहे. मलाही विस्मरणच वाटलं होतं. आता लक्षात आले.
hmm..
hmm..
चांगलं आहे की, दोन शक्यता असल्या तर वाचकांना जास्त मज्जा
त्यांचा डिव्होर्स झाला असावा
त्यांचा डिव्होर्स झाला असावा आणि नवर्याने योगायोगाने तिच्या मैत्रिणीशी पुनर्विवाह केला असावा. दोघी काही वर्षांनंतर भेटत असल्याने दोघींना ह्याचा पत्ता नसावा.
ओळखीची सही, दारावरची नेमप्लेट ह्यांनी संदर्भ जुळले.
विबासं पेक्षा विपूसं. ती
विबासं पेक्षा विपूसं. ती कॉलेजात / तरूणवयात सही करणार्याच्या सहवासात होती. मग कालांतराने नोकरी इ जिंदगी की जद्दोजहद मध्ये एकमेकांशी संपर्क उरला नाही. आता ती मैत्रिणीकडे आली तर सहीवरून दरवाजाच्या नावावर लक्ष गेले.
आवडली कथा.
>>दोन शक्यता असल्या तर
>>दोन शक्यता असल्या तर वाचकांना जास्त मज्जा
>>विबासं पेक्षा विपूसं.
ह्म्मम..... असेच काहीसे होते लिहताना डोक्यात..... म्हणजे खुप वर्षापूर्वी झालेला ब्रेकअप आणि नंतर तुम्ही म्हणता तसेच काहीसे जिंदगी की जद्दोजहद वगैरे वगैरे!!
जमल्ये ! आवडली!
जमल्ये ! आवडली!
आवडली कथा!
आवडली कथा!
विबासं पेक्षा विपूसं. ती कॉलेजात / तरूणवयात सही करणार्याच्या सहवासात होती. मग कालांतराने नोकरी इ जिंदगी की जद्दोजहद मध्ये एकमेकांशी संपर्क उरला नाही. आता ती मैत्रिणीकडे आली तर सहीवरून दरवाजाच्या नावावर लक्ष गेले.
>>> मलाही असच वाटलेल
Pages