कथाशंभरी - सही रे सही - स्वरुप

Submitted by स्वरुप on 3 September, 2022 - 03:22

बर्‍याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पूलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. अरे हे काय! मैत्रिणीच्या घरातल्या टीपॉयवर पडलेल्या वर्तमानपत्राने तिचे लक्ष वेधून घेतले. कुठलीही खाडाखोड न करता अतिशय सुवाच्य अक्षरात सोडवलेले शब्दकोडे आणि त्याखाली ठोकलेली लफ्फेदार सही!
सोडवलेल्या शब्दकोड्याखाली स्वताची सही करण्याची जगावेगळी सवय असणारा जगात अजुनही कुणीतरी आहे याचे आश्चर्य वाटून डोळ्यावरची चाळिशी सांभाळत ती उठली.
अतिशय कुतुहलाने तिने तो पेपर हातात घेतला आणि सही करण्याची नुसती सवयच नाही पण सही पण जेंव्हा मिळतीजुळती दिसली तेंव्हा न राहवून तिचे लक्ष मैत्रिणीच्या दरवाज्यावरच्या नेमप्लेट कडे गेले.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Pages