Submitted by संयोजक on 3 September, 2022 - 00:28
उखाणा - नावातच सगळं आहे .
कविता, लावण्या, विडंबन करण्यात मायबोलीकर माहिर आहेतच. आता होऊदे जल्लोष गमतीदार उखाण्यांचा.
कुणी खावा पेरू, कुणी खावा डाळिंब
माबोवर मात्र सोलून द्यावं लागतं संत्र
डू आयडी हाताळायचं एकदा जमलं तंत्र
की मिळतो धागा भरकटवायचा मंत्र
कुणी म्हणा भारी पुण्याची मिसळ
कुणी म्हणा भारी मुंबईचा वडापाव
चला घ्या पटकन उखाणा, जास्त खाऊ नका भाव
नियमः
१) हा उपक्रम आहे, स्पर्धा नाही.
२) उखण्यात मायबोलीचे नाव येणे अपेक्षित आहे.
३) उखाणा मुख्यतः मराठी भाषेतच असावा... एखाददुसरा अमराठी शब्द चालू शकेल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पौर्णिमेचा चंद्र वाढतो हळू
पौर्णिमेचा चंद्र उगवतो हळू हळू
मायबोलीवर मात्र जिथे तिथे अळू....
गोपाला गोपाला म्हणा देवकीनंदन
गोपाला गोपाला म्हणा देवकीनंदन गोपाला
मायबोलीकरांना जमतो फक्त पनीरचा घोटाला.
लिपस्टीक बरी लाल नि काजळ
लिपस्टीक बरी लाल नि काजळ असावे काळे
मायबोलीवर हिट भुभू नि माऊ बाळे..
सिनेमासाठी मायबोली असते
मायबोली वर स्मार्ट कुणी तर कुणी शेखचिल्ली
आहे सर्वांची आवडती मात्र ४ नंबर खाऊगल्ली...
सिनेमासाठी मायबोली, असते कधी माध्यम प्रायोजक
धाग्यांचा फार पसारा करतात, गणेशोत्सवचे संयोजक. _/\_
शुभरात्री...
बार्सिलोना ,
बार्सिलोना ,
तुम्ही एकहाती चालवू शकता हा धागा .
तुम्ही एकहाती चालवू शकता हा
तुम्ही एकहाती चालवू शकता हा धागा . >> अगदी अगदी , सगळेच भारी जमलेत उखाणे सि चे.
पहील्या पानावरच फिरत बसला
पहील्या पानावरच फिरत बसला
आख्खी साईट अजुन पाहिली नाही
अन काल जन्मलेला आयडी म्हणतो
पूर्वीची मायबोली राहिली नाही
(No subject)
दोघेही
दोघेही
स्वरुप ज्जे बात!
स्वरुप ज्जे बात!
सि, मस्त उखाणे
सगळे उखाणे मस्तच जमलेत
सगळे उखाणे मस्तच जमलेत
येता जाता डोकावण्याची जागा
येता जाता डोकावण्याची जागा म्हणजे मायबोली
हिच्या प्रवाहाला वेग फार नि भलतीच बाई खोली
ग्यांगस्टरांत ग्यांगस्टर अबू
ग्यांगस्टरांत ग्यांगस्टर अबू सालेम
मायबोलीवर function at() { [native code] }त टंकताना होतो प्र्वाब्लेम!
नव्या नवरीला घेतलं लुगडं नवं
नव्या नवरीला घेतलं लुगडं नवं
मायबोलीवर प्रतिसादांना लाईक बटण हवं
असंबद्ध प्रतिसाद देण्याचा
असंबद्ध प्रतिसाद देण्याचा प्रघात मायबोलीवर आहे
म्हशीचं एक शिंग दुसर्या शिंगापेक्षा सव्वादोन इंच लांब आहे
वसंत ऋतूत कोकिळा देते (हे न
वसंत ऋतूत कोकिळा देते (हे न पटणार्यांनी 'कोकीळ देतो' असे वाचावे) कुहुकुहू साद
मायबोलीवर कवितांना मिळतात लेखांपेक्षा फारच कमी प्रतिसाद
सगळेच!
सगळेच!
(हे न पटणार्यांनी 'कोकीळ देतो' असे वाचावे >>
नरांचे गेले बळी, चिमणीने केली
सगळेच ह पा, function at() { [native code] }इ चा भारी आहे!!
नरांचे गेले बळी, चिमणीने केली सुसाईड
मायबोलीवर आणा कुणी PETA चे गाईड
अमेरिकन कंपन्यात आली देसी सी
अमेरिकन कंपन्यात आली देसी सी ई ओं ची लाट,
कोलॅबसाठी मागते मायबोलीवर पॉला वैनीची साथ
धागे काढून अमानवीय, गायब
धागे काढून अमानवीय, गायब झालेत बोकलत
मायबोलीवरची भुते आता बसली आहेत कोकलत.
मायबोलीवर आहे खूप जागा
मायबोलीवर आहे खूप जागा
म्हणून काढतो रोज एक धागा
मायबोलीकर सांगतात जिथे तिथे
मायबोलीकर सांगतात फार, व्याकरणातील चुका
चुलीत गेलं हो व्याकरण, घ्या हाडळीचा मुका
सि, हपा धम्माल!
सि, हपा धम्माल!
एका मागे एक बसवा माकडांची
एका मागे एक बसवा माकडांची रांग
"उ"खाणे हे काय माबोकरांचे काम?
(No subject)
माझ्या लहानपणी आमच्या शेजारी
माझ्या लहानपणी आमच्या शेजारी एक खानदेश किंवा जळगावकडील कुटुंब राहत होतं. मंगळागौरी ला वगैरे नाव घ्यायला सांगितले की त्या काकू मजेशीर पद्धतीने उखाणा घ्यायच्या. म्हणजे मला ते मजेशीर वाटायचं कारण आमच्याकडे कुणीही तसं नाव घेत नसत. तर आज त्या प्रकारे माबो उखाणा लिहिण्याचा प्रयत्न करतेय. चू. भू. द्या. घ्या..
आठ हात काकडी नऊ हात बी
बी लावलं वावरात
वावरात विहीर
विहिरीचा रहाट
रहाटाचा दोर
दोराची गाठ
गाठीभेटी कळशी
कळशीत थंडगार पाणी
पाण्याची निर्मळ गाणी
गाण्याच्या गोड गप्पा
गप्पांचा वाहता धागा
धाग्यांची गुंफण रंगभरली
रंगीत गुलमोहर, हितगुजाची छाया
छायेत रमतात आयडी
आयडींच्या कळा नाना
नाना उपक्रमांचा जल्लोष
जल्लोष माबो गणेशोत्सवाचा
गणेशोत्सवातील उपक्रम हा उखाण्याचा.
प्राचीन, झकास!!
प्राचीन, झकास!!
(आता इथेच सांगते- तुझे व्हिडीयोही मी बघते. आवडतात.)
“सी” चे का झाले बार्सिलोना
“सी” चे का झाले बार्सिलोना
मायबोलीवर सतरांदा आले तरी उत्तर मिळेना
छानच प्राचीन.
आधी होती सीमंतिनी, आता झाली
शशक लिहीण्यात आहेत, सारे मायबोलीकर पक्के
"गणपती: एक चिंतन" मात्र, इतके कसे कच्चे.
आपणच आपणाशी घालू जातो वाद
आपणच आपणाशी घालू जातो वाद
आपणच आपणाला देऊ जातो दाद
मायबोलीच्या देशा आहे किती मजा
कितवा अवतार पुन्हा पुन्हा मोजा
Pages