शब्दखेळ उखाण्यांचा

Submitted by संयोजक on 3 September, 2022 - 00:28

उखाणा - नावातच सगळं आहे .
कविता, लावण्या, विडंबन करण्यात मायबोलीकर माहिर आहेतच. आता होऊदे जल्लोष गमतीदार उखाण्यांचा.

कुणी खावा पेरू, कुणी खावा डाळिंब
माबोवर मात्र सोलून द्यावं लागतं संत्र
डू आयडी हाताळायचं एकदा जमलं तंत्र
की मिळतो धागा भरकटवायचा मंत्र

कुणी म्हणा भारी पुण्याची मिसळ
कुणी म्हणा भारी मुंबईचा वडापाव
चला घ्या पटकन उखाणा, जास्त खाऊ नका भाव

नियमः

१) हा उपक्रम आहे, स्पर्धा नाही.
२) उखण्यात मायबोलीचे नाव येणे अपेक्षित आहे.
३) उखाणा मुख्यतः मराठी भाषेतच असावा... एखाददुसरा अमराठी शब्द चालू शकेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्राचीनच्या उखाण्याने प्रेरीत होऊन माझाही एक :

हंड्यावर हंडे सात
त्यावर ठेवली परात
परातीत वाटी
वाटीत ठेवला चांदीचा चमचा
चमचा वाटीच्या मापाने लिहिली पाककृती
पाककृती बरोबरच आले नवीन धागे
धाग्याधाग्याने चर्चा इथे रंगे
मायबोलीचे आयडी खेळती एकमेकासंगे
उपक्रम आणि खेळांशिवाय
नाही गणेशोत्सवाला गोडी
उत्सव साजरा करायला मायबोलीच हवी

पृथ्वीवर आहेत सात खंड
खंडात खंड आशिया खंड
आशिया खंडात अनेक देश
देशात देश भारत एक देश
देशात आहे अनेक राज्य
राज्यात राज्य महाराष्ट्र राज्य
राज्यात आहे अनेक जिल्हे
जिल्ह्यात जिल्हा .... जिल्हा
जिल्ह्यात आहेत अनेक तालुके
तालुक्यात आहे माझं गाव
गावात आहे देवीचे देऊळ
देवीच्या कमरेवर आहे घागर
घागरीत आहे पाणी
आंतरजालावरची आहे
मायबोली राणी

निमित्त आहे माबो गणेशोत्सवाचे, जुने स्फुट काढते वर,
विहीत कर्म घडावे हातून, बाकी भार विश्वंभरावर.

निमित्त आहे माबो गणेशोत्सवाचे, जुनीच पाककृती काढते वर,
जॅकचा स्टॉक गेला गगनाला, तुमच्या बीन्सचे मोड कुठवर??

मायबोली गणेशोत्सव संयोजकात वर्णिता झाली फिक्स
त्यामुळे तिचे नैवेद्याचे ताट आम्ही करतो मिस

मायबोली गणेशोत्सव संयोजकात गोल्डफिश झाले फिक्स Light 1
पोस्टी टाकत नाहीत फार, तर कसे करावे मिस

मायबोली गणेशोत्सव संयोजकात किशोर मुंढे झाले फिक्स Light 1
त्यामुळी नीलम गेममध्ये त्यांना आम्ही करतो मिस

मायबोली गणेशोत्सव संयोजकात तेजो झाली फिक्स
यमक काय जुळवू तेजो, कर बाई काहीतरी मिस

मायबोली गणेशोत्सव संयोजकात बार्सिलोना नाही झाली फिक्स Light 1
यमक सुद्धा जुळतेय या धाग्यावर मारतेय सिक्स वर सिक्स.

कथाशंभरीचे धागे झडती भराभर
त्या दोघी आणि रघू रुपे पालटतात झरझर
लेखन, हस्तलेख, हस्तकला, चित्रकला
मायबोली गणेशोत्सवाचा सगळीकडे बोलबाला

मायबोलीचे धागे अनंत, धाग्यांवरचे विषय अनंत
आहार, विहार, भाषा आणि शास्त्र
कला संगीत, कथा- कविता असे बरेच साहित्य
कुठे कोतबो, कुठे माकाचु
मायबोलीचे आयडी राजकारणावर खेळती हुतूतू

Pages