Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05
आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धुरळा - झी ५
धुरळा - झी ५
पण अंकुश चौधरी, सिद्धार्थ
पण अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, प्रसाद ओक, सो कूल, आपला ट्टॉक अमेय वाघ आणि अगदी अलका कुबल या सगळ्यांच्या चाहत्यांनीही चित्रपट आवर्जून पाहावा
>>> अलका कुबल चाहता असा पण प्रकार असतो का?
अलका कुबल चाहता असा पण प्रकार
अलका कुबल चाहता असा पण प्रकार असतो का?
एसटीचा प्रवास झेपत नाही ह्या वयात. ह्या डायलॉगवर मी पण त्यांचा फॅन झालो.
तसेच प्लास्टिकच्या पिशवीतून आणलेली रम बघितल्यावर - हे काय आणलंय? ग्रेवी?
हायला!.. आता फोमो युन राहिला
हायला!.. आता फोमो युन राहिला ना!
झी५ नाही, बघतो त्या आयपी टीव्हीवर आला असेल तर.
अलका कुबलचा मध्ये इंटरव्हू बघितला कुठे आणि एकदम आवडल्या त्या. फार चाकोरीबद्ध भूमिका मिळाल्या त्यांना, पण एकदम प्रसन्न हजरजबाबी हुशार आहेत त्या.
अलका कुबल चाहता असा पण प्रकार
अलका कुबल चाहता असा पण प्रकार असतो का?
>>>
मी अलका कुबल लीड रोलमध्ये असलेला एकही पिक्चर पाहिला नाहीये. पाहिलाच असल्यास ती असलेला मल्टीस्टारर चित्रपट पाहिला असेल जसे की हा.. पण त्या चित्रपटात ईतर कलाकारांच्या भाऊगर्दीत ती कधी लक्षात राहिली नाही. यात ती लक्षात राहते. त्यामुळे अलका कुबल न आवडणाऱ्यांनी तर आवर्जून बघावा.
अमितव आयपी वर आहे...
अमितव आयपी वर आहे...
अलका कुबलचा मध्ये इंटरव्हू
अलका कुबलचा मध्ये इंटरव्हू बघितला कुठे आणि एकदम आवडल्या त्या. फार चाकोरीबद्ध भूमिका मिळाल्या त्यांना, पण एकदम प्रसन्न हजरजबाबी हुशार आहेत त्या.>>> +१ मलाही आवडल्या . त्यान्चे स्पिडने पण सफाइदार गाडी चालवण्याचे अनेक किस्से आहेत.
अलका कुबल बद्द्ल +१
अलका कुबल बद्द्ल +१
त्यांच्या मुलाखतीत बोलल्या होत्या मला रडक्या भूमिका मिळत गेल्या पण मला अन्याय सहन होत नाही, मी अजिबात तशी नाही आहे.
अलका कुबल चे माहेरची साडी
अलका कुबल चे माहेरची साडी टाईप्स आधी नॉर्मल रोमँटिक पिक्चर्स होते काहीकाही.
तिचा जीन्स टॉप घालून ड्राईव्ह करतानाचे बरेच फोटो, ड्राईव्ह करताना कशी डॅशिंग वगैरे इंटरव्ह्यू वाचला होता लहानपणी.
धुरळा फॅमिली सह बघण्यासारखा
धुरळा फॅमिली सह बघण्यासारखा आहे का?
अलका कुबल यांनी वेडींगचा
अलका कुबल यांनी वेडींगचा शिनेमामध्ये केलेलं कामही आवडलं होतं.
अनन्या प्राईमवर आला आहे. कसा आहे, कुणी पाहिला का? हृता दुर्गुळे आवडते, तिचं एक नाट क पाहिलं होतं (नाव आठवत नाही)
धुरळा पाहिला. ओके आहे तसा, पण
धुरळा पाहिला. ओके आहे तसा, पण सरपंच निवडणूक, गावातलं राजकारण अशा सेट अप ला असे शुद्ध तुपातले बोलणारे, शहरी दिसणारे कास्टिंग सारखे खटकत होते मला तरी. सिद्धार्थ जाधव मात्र सूट झालाय. सई चे काम आवडले, हल्ली मला आवडते ती! प्रसाद ओक आणि त्याच्या बायकोचे सीन्स फनी होते
हिट - द फर्स्ट केस - पाहिला. सुरुवातीचा हाफ इंटरेस्टिंग होता. नंतरचा हाफ, आणि शेवटाला अगदी कै च्या कै.
आजकाल सरपंच मॉडर्न असतात
आजकाल सरपंच मॉडर्न असतात
शहरी दिसणारे कास्टिंग
शहरी दिसणारे कास्टिंग
म्हणजे नक्की कसे?
शहरी दिसणारे कास्टिंग
शहरी दिसणारे कास्टिंग
म्हणजे नक्की कसे?
>>>
यावर स्वतंत्र धागा आला तर त्याचा एक वेगळाच धुरळा उडेल
बाकी गावातले सरपंच निवडणूकीतले लोकं आजच्या तारखेला कसे दिसतात हे बघायला गावातच जायला हवे. गावागावात मोबाईल व्हॉटसप पोहोचले आहे. जग जवळ येतेय. गावच्या तरुणांनाही शहरी हवा लागली असावीच.
तरी अलका कुबल नक्कीच शहरी दिसणारी वाटत नसावी
तुलनेत सोनाली कुलकर्णी जी थोडीफार मॉडर्न दाखवलेली तिला मॉडर्न कपडे घालणारी एअर हॉस्टेस व्हायचे होते असाही काहीसा उल्लेख होता ना त्यात?
अंकुश चौधरी चुकीचं कास्टिंन्ग
अंकुश चौधरी चुकीचं कास्टिंन्ग वाटते... बाकी लोकानी बेयरिंग चांगले पकड्ले आहे...
हिट काहीच्या काहीच आहे.
हिट काहीच्या काहीच आहे. राजकुमार राव सोडून काहीच आवडलं नाही.
राजकुमार राव नाव वाचुन् हिट द
राजकुमार राव नाव वाचुन् हिट द फर्स्ट केस बघितला. रारा लौकिकास जागला तरी मुळात कथाच ग्रिपिन्ग वाटली नाही>>>>>>>>>>>>>>>
राज कुमार साठी पाहायला घेतला , पण दोन महिन्यांपूर्वीच फॉरेन्सिक का कोणता तरी साऊथ चा मूव्ही बघितला होता .
सेम स्टोरी आहे .
सूरवातीच्या अर्ध्या तासात लक्षात आले
मुळ तिकडचाच आहे, दोन्ही
मुळ तिकडचाच आहे, त्याचा सिक्वेल व हिन्दी रिमेक दोन्ही एकत्रच रिलीज झाले बहुतेक.
पण मुळ मुळ परदेशी असावे असा शक आहे. गुन्हेगार शोधताना डिएनए वर भर दिलेला बघुन असे वाटले.
आणि हिट = होमिसाइड
आणि हिट = होमिसाइड इन्टरवेन्शन टीम?इन्टरवेन्शन? इथेच ठेच लागते आहे (की मी चुकीचे वाचले?)
तसेच आहे ते...https://youtu
तसेच आहे ते...
https://youtu.be/wNvQoNSosWk
RRR पाहिला एकदाचा. मस्त
RRR पाहिला एकदाचा. मस्त सिनेमा आहे. थेटरात आणखी मजा आली असती. मार्व्हल सिनेमासारखाच- टोटल मसाला, पण मार्व्हल सिनेमे हल्ली पोकळ, आत्मा नसलेले वाटतात, हा एकदम फ्रेश वाटला.
अर्र !
अर्र !
असाच पुष्पा मी मिस केलेला .
आर आर ची खरी मजा थियेटर मध्येच होती .
९९ टक्के काल्पनिक स्टोरी , पण उत्तम सादरीकरण !
महत्वाचे म्हणजे दोन्ही हिरो चे ओरिजिनल आवाज .
त्या धुरळात सगळेच बोलताना
त्या धुरळात सगळेच बोलताना सरपंच मधल्या च चा उच्चार चंद्र मधल्या च सारखा करतात. ते फार खटकते. गावाकडे दंततालव्यच उच्चारला जातो हा च.
मला धुरळा मधले उच्चार खटकले
मला धुरळा मधले उच्चार खटकले नाहीत. माझी माहिती सगळी पश्चिम महाराष्ट्रातील अनुभवांवर आहे, पण ते कुटुंब बर्यापैकी अस्सल वाटले. गावातील सरपंच/पाटील किंवा अगदी आमदारांची कुटुंबे अशीच पाहिली आहेत. एखादा मुलगा शाळेनंतर पुण्या/मुंबईत किंवा परदेशात शिकून आलेला, "प्रमाण भाषेतील" उच्चार आणि जनरल शहरी वागणे असलेला. तर बाकी भावंडे अस्सल ग्रामीण. सोनाली कुलकर्णी सुद्धा मला तेथील वाटली. सई वाटत नाही पण त्यात संवाद आहेच की त्यांचे आंतरजातीय लग्न आहे, त्यामुळे ती बहुधा शहरी असावी. प्रसाद ओकचा आख्खा ट्रॅक भारी आहे. त्याचे ग्रामीण उच्चार खटकले नाहीत.
सई प्रचाराला उतरते तो सीन आणि प्रसाद ओक व त्याच्या बायकोचे भांडण - दोन्ही भन्नाट आहेत
एखादा स्ट्राँग शहरी फीमेल लीड असलेला सामाजिक/राजकीय पिक्चर मधला रोल सई मस्त करेल. प्रिया तेंडुलकर ("रजनी") टाइप.
आर फॅमिली सोबत बघता येईल का
आर फॅमिली सोबत बघता येईल का हे सांगा की कोणीतरी
धुरळा नक्कीच फॅमिली सोबत बघता
धुरळा नक्कीच फॅमिली सोबत बघता येईल. एकही वलगर सीन नाही. एक कीस आहे पण विषयाला सोडून नाही.
ओकक्के धन्यवाद
ओकक्के धन्यवाद
हिट - द फर्स्ट केस - पाहिला.
हिट - द फर्स्ट केस - पाहिला. सुरुवातीचा हाफ इंटरेस्टिंग होता. नंतरचा हाफ, आणि शेवटाला अगदी कै च्या कै. >>> टोटली. एकदम ग्रिपिंग आहे बराच वेळ, आणि मग उलगडा होत जातो तो भाग अगदी लेटडाउन आहे.
मिलिंद गुणाजीच्या कॅरेक्टरचे नक्की काय करायचे ते शेवटपर्यंत ठरले नाही बहुधा बाय द वे, गॉट आणि ब्रेबॅ आणि इव्हन मिर्झापूरच्या जमान्यात या पिक्चर मधे ७०ज प्रमाणे अजून कानाला पिस्तूल लावून वेळ काढण्याचे तंत्र का वापरतात माहीत नाही. त्यात एका पोलिसाला लांबून डायरेक्ट उडवल्यावर दुसर्याच्या कानाला पिस्तुल लावून कोणी वेळ घालवेल असे वाटत नाही. मला वाटलं आता राजकुमार रावला तो बांधून बिंधून ठेवतो की काय
हो ना, मिलिंद गुणाजीला जरा
हो ना, मिलिंद गुणाजीला जरा वाव द्यायचा होता अजून. दुसर्या दोन तुपकट इन्स्पे. पेक्षा त्याची पर्सनॅलिटी आणि अभिनय दोन्ही बेटर आहे.
Pages