भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती २

Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47

https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा

==================================================================================

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पायावर दूध - पाणी घातलं तर हा लपलप करत चाटून ते दूध प्यायला >> Lol ओडिन! मनाने अजून पपीच आहे Happy
आम्ही माऊईला भटजीबुवा म्हणतो. "भटजीबुवांना वाढा आधी जेवायला", म्हणत मग नैवेद्याच्या ताटातला वरण भात तूप आणि लहानसा मोदकाचा तुकडा खायला दिला की महा खूष होतो. मग मस्त खाऊन ताणून देतो दुपारी : )

ओडीन चा किस्सा भारी, दुध पाणी चाटतोय इमॅजिन करुनच हसायला आलं... आशुचँप , तुम्ही लिहिलेले ओडिन चे किस्से वाचायला फार मजा येते. जमेल तिथे व्हिडिओ पण काढत जा आणी आम्हाला शेअर करत जा Happy

"भटजीबुवांना वाढा आधी जेवायला", म्हणत मग नैवेद्याच्या ताटातला वरण भात तूप आणि लहानसा मोदकाचा तुकडा खायला दिला की महा खूष होतो. मग मस्त खाऊन ताणून देतो दुपारी : ) >> हा हा हा...

सरांकडे कुत्रा असता तर ह्या धाग्याची केव्हाच वाट लागली असती...
नका ओ असल्या आयड्या देवु. उद्या सर " समजा माझ्याकडे कुत्रा असता तर" असा धागा काढायला चुकणार नाहीत. Uhoh

Lol
"मी, माझी गर्लफ्रेंड आणि माझा कुत्रा" असा विषय द्यायला हवा होता, यंदाच्या गणेशोत्सवात.

जाता जाता: Odin is a widely revered god in Germanic paganism. (विकीनुसार)

आम्ही माऊईला भटजीबुवा म्हणतो. "भटजीबुवांना वाढा आधी जेवायला", म्हणत मग नैवेद्याच्या ताटातला वरण भात तूप आणि लहानसा मोदकाचा तुकडा खायला दिला की महा खूष>>>>
कसलं क्युट Happy

ओडिन ची मोदक खाताना मज्जा आली, त्याला मी अक्खा मोदकच दिला, आधी चाटून पाहिलं गोड आहे म्हणल्यावर चिरंजीव खुश
मग एकदम आख्खाच खायला गेला तर तोंड भरलं, येडबांबू सारख now what? असा चेहरा करून बघायला लागला
म्हणलं ड्रॉप कर, ऐकलं नशिबाने
मग छोटे तुकडे करून दिले ते खाल्ले गपगप

आरत्या म्हणतानाही मज्जा, त्याला वाटतं त्याच्याशी बोलत आहेत मग सगळ्यांच्या समोर जाऊन त्यांच्या तोंडाकडे बघतो
सगळे एकच दिशेला तोंड करून काय बोलत असावेत हे त्याच्या आकलनाच्या पलीकडे आहे Happy

Odin is a widely revered god in Germanic paganism. (विकीनुसार)>>>
होय माहितीय
मी वायकिंग सिरीज बघत असतानाच ठरवलं होतं की भुभु चे नाव ओडिन ठेवायचं
जर फिमेल असती तर कॉफ़ी ठरलं होतं

ओडिन बच्चे कंपनीला माहिती आहे कारण तो थोर, लोकी आणि हेल्गा चा बाप
आणि थोर हा god of thunder म्हणून आमचा हा god of hunger Happy

माऊई भटजी Lol
आशुचँप ओडीनचे इन्स्टावरचे फोटो बघितले. बाप्पाकडे बघतानाच्या फोटोत नीटच कळतेय कन्फ्युज झालाय ते Lol तु कौन है भाई कहांसे आया टाईप्स Wink
सगळे एकच दिशेला तोंड करून काय बोलत असावेत हे त्याच्या आकलनाच्या पलीकडे आहे>>>>>>>>>>>> हा हा क्यूट .. आणि टाळ्या पण वाजवत आहेत Lol

मी जिथे बाप्पाचं डेकोरेशन केलंय तिथूनच सॅमी उड्या मारून जिन्यावरून पळत जाते. आता ती सगळी जागा बंद केलीये. काल तिला बहुतेक कळतंच नव्हतं कुठून जावं. बाप्पाच्या टेबलाखालीच बसून होती कितीवेळ. फनी दृश्य! फोटो काढायला हवा होता.

ओडिन च किस्से फार फनी आहेत! Happy
एकदम आख्खाच खायला गेला तर तोंड भरलं, येडबांबू सारख now what? असा चेहरा करून बघायला लागला >>
सगळे एकच दिशेला तोंड करून काय बोलत असावेत हे त्याच्या आकलनाच्या पलीकडे आहे >>>
Lol अगदी डोळ्यापुढे आला त्याचा चेहरा!!

सध्या दादू त्याला दोन पायांवर बसून बाप्पाला नमस्कार करायला शिकवत आहे
अजून तरी काही प्रगती नाही
पण जमलं तर भारी मज्जा येईल त्याचा व्हिडीओ टाकतो

तु कौन है भाई कहांसे आया टाईप्स>>>> Happy
अगदी अगदी, हे काय नवीन आहे हे बराच विचार करून झालाय
Happy

Odin, माऊई dhamal किस्से!
सगळे एकच दिशेला तोंड करून काय बोलत असावेत.....:D

इथेपण फोटो शेयर करा की

आरत्या म्हणतानाही मज्जा, त्याला वाटतं त्याच्याशी बोलत आहेत मग सगळ्यांच्या समोर जाऊन त्यांच्या तोंडाकडे बघतो
सगळे एकच दिशेला तोंड करून काय बोलत असावेत हे त्याच्या आकलनाच्या पलीकडे आहे Happy

हे एक भारी प्रकरण दिसेल ओड्याचं. इमॅजिन करुन हसायला येतय.

2 BHK अपार्टमेंट साठी कोणतं भू भू योग्य आहे कृपया सांगा, मला दत्तक घ्याच आहे पण घराच्या पब्लिक ला ब्रीड डॉग हवं आहे. घरी दोन पर्शियन मांजरी आहेत बरं त्यानुसार सुचवा.

सिम्बाचे घराचे आणि घरच्या माणसांची काळजी करण्याचे नवीन नवीन प्रकार सुरु झालेत । आधी दार वाजले तर पळत जाऊन भुंकणे वैगरे गोष्टी होत्या पण आता जर कोणी घराबाहेरचा येऊन गेला कि हा पठ्या पूर्ण घर फिरून खात्री करतो कि आता घरात कोणी अनोळखी माणूस नाही ना याची अगदी वरती जाऊन प्रत्येक खोली पाहतो एव्हडेच काय तर मागचे दार उघडायला लावून फेन्सची दोन्ही गेट्स लावली आहेत ना हे पाहतो.

मी जोरात शिंकलो तरी लगेच जवळ येऊन पूर्ण अंग वास घेऊन खात्री करतो कि मला काहीही झालेले नाही आणि खात्री पटली कि मग पाय चाटणे सुरु करतो.

आता खरा जर्मन शेफर्डचा प्रोटेक्टिव्हपणा काय असतो याचा अनुभव घेतोय आम्ही सगळे .

सो स्वीट सिम्बा Happy जर्मन शेफर्ड ना ट्रेन करणेही सोपे नसणार. तुम्ही स्वतःच ट्रेन करता का ट्रेनर ची मदत घेता आहात?

दिपाली 2 bhk साठी small breed dog जास्त योग्य होतील जसे की shih Tzu, pug, beegal etc but घराच्या size बरोबरच बाकीचे फॅक्टर पण imp ahet jase ki घरी किती जन असतात (eg घरी 2 जनच असतील तर 2bhk असला तरी lab आणू शकता) young lok जास्त असतील तर high energy dog ok otherwise low energy dog, dog expenses (food, vet, shih Tzu asel tar grooming etc). थोडा research करा आणायच्या आधी म्हणजे नंतर problem होणार नाहीं.

सोसायटीच्या नियमांचे नीट वाचून बघा
नंतर कटकट होईल नैतर
आजच बातमी आहे गाझियाबाद ची
एका बाईचे पाळीव भुभु लिफ्टमध्ये मुलाला चावले
त्या पालकांनी पोलीस केस केलीय

बऱ्याच सोसायटी मध्ये लिफ्टमध्ये येऊ देत नाहीत
तसेच आवारात पण फिरू नको म्हणतात

@ maitreyee -- > घरी बेसिक ट्रेन केले पण आता ऍडव्हान्स ट्रैनिंग साठी ट्रेनर लावतोय. हि प्रजाती लवकर ट्रेन होते आणि पटापट शिकते पण त्यामुळे जरा सोपे झाले आहे असे वाटते . पाहू २-३ आठवड्यात कळेल

आजच बातमी आहे गाझियाबाद ची
एका बाईचे पाळीव भुभु लिफ्टमध्ये मुलाला चावले >>>>>तो व्हिडीओ पाहिला ती बाई इतकी नालायक कि तिने त्या भूभू ला कंट्रोल करायचे तर सोडा त्या मुलाला चावले आहे तो रडतोय तेही पहायची तिने साधी कर्टसी नाही घेतली। इतकी क्याजुली ती तिच्या फ्लोर वर निघून गेली। मी जर त्या मुलाची आई असते तर आधी त्या बाईला फटकावले असते .

एक शहाणं बाळ...... बाळ गोडच आहे.अगदी बाई लहानपणापासून त्याला देवाची गोडी (की पेढ्याची) आहे हो.

तो रडतोय तेही पहायची तिने साधी कर्टसी नाही घेतली>>>
हो ना ते बघूनच संताप झाला
इतकं बेपर्वा कसं कोणी असू शकतं?

तिच्यावर केस केलीये मुलाच्या आई वडिलांनी
या अशा लोकांमुळे भुभु पालक बदनाम होतात कारण मग भुभुद्वेष्ट्यानं संधीच मिळते

कालची अजून एक बातमी आहे
पुणे महानगरपालिका हद्दीत या वर्षभरात 17000 डॉग बाईट च्या केसेस झाल्या
त्यातल्या 10 हजार भटकी कुत्र्यांची आणि 7 हजार पाळीव

म्हणलं हा आकडा कैच्याकै आहे, ऑगस्ट पर्यंत म्हणजे महिन्याला 800 वगैरे
म्हणजे रोज 20 25 जणांना पाळीव कुत्री चावतात???
लोकं अशाने कायद्याने भुभु पाळायला बंदी आणतील अशाने

Pages

Back to top