युक्ती सुचवा युक्ती सांगा भाग - ६

Submitted by वत्सला on 23 August, 2020 - 09:32

युक्ती सुचवाच्या पाचव्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग सहावा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
युक्ती सांगा - ५:

Group content visibility: 
Use group defaults

VB, संज्योत कीरच्या दोन रेसिपीज आहेत त्याच्या FB पेजवर. गूगल केल्यास मिळतील. एक दाल मखनी https://fb.watch/fetjUYxCYB/ आणि दुसरी रेस्तराँ स्टाइल दाल मखनी Dal Makhani Recipe | दाल मख्नी होटल जैसी | Chef Sanjyot Keerhttps://www.youtube.com › watch. मला दुसऱ्या प्रकारची आवडते. त्यात साहित्य कमी लागतं पण वेळ आणि मेहनत अधिक. रोजच्या जेवणासाठी बनवायची असल्यास पहिली रेसिपी जास्त छान.

हेंप हार्ट ऑर्डर करण्याच्या ऐवजी चुकुन सीड्स ऑर्डर झाले.
त्यांचे कवच चांगलेच टणक आहे.
कसे dehull करायचे याचे काही व्हिडिओ पाहिले पण तसे केले तर बिया सकट कवचाचे तुकडे होतात आणि वेगळे करणे शक्य होत नाही.

कुणी घरी केले आहेत का हेंप सीड्स dehull?

अमितव Happy
ते क्या होता है भाई ? अज्ञान दूर करावे...

मानव जुना सुपारी फो डा यचा अडकित्ता असेल तर त्यात एक दोन सीड ट्राय करून बघा. मिक्सर मधे अगदी तीस सेकंद फिरवल्यास अर्धबोबडे होईल व मग चाळून पाखडून हकाड/ शेल्स काढून टाकता येतील. अकरोड फोडा यच्या अ ड कित्त्याने ही काम होईल पण मी काही तो कधी बघितला नाही. एक एक सीड खल बत्त्यात ठेवुन बत्त्याने मारल्यास काय होते बघा. माझ्याहातून सीड उडुनच जाते.

भिजू घातल्यास हल मौ पडेल का ते पण चेक करा एक दोन. वर्क अराउंडच करावे लागेल. वेगळा हेम्प सीड डीहलर मिळ तो म्हणे. इति गुगल बाबा.

अमितव :P, डि-हल करून मिळतील पण हाती फक्त हल्स शिल्लक राहतील ना. आणि "मी हेंप्स खाल्ले नाही मी हल्स उचलणार नाही" असे ही म्हणता येणार नाही मलाच साफ करावे लागेल

अमा धन्यवाद, एवढे छोटे बी अडकित्यात धरून तोडणे शक्य नाही.
मिक्सर मध्ये नंतर करून पाहीन, कारण त्यासाठी अर्धा कप तरी घ्यावे लागतील आणि नाही झाले तर वाया जातील म्हणून तो शेवटाला उपाय.
थोडे भिजवून / उकडून बघतो काही जमते का.

गावाला आम्ही चारोळीची बी एखाद्या छोटया हलक्या हातोडी ने फोडतो , पण ती चरोळीची बी बोटाच्या चिमटीत पकडून आपल्या हातावर मारून न घेता चारोळीवर correct प्रेशर चा घाव घालून आतली एकसंध चारोळी मिळवणे भरपूर स्किलच आणि खूप वेळखाऊ ही काम आहे. तीन चार तास बसलं फोडत तर जेमतेम अर्धी वाटी मिळते चारोळी.

असेल बारकी हातोडी तर ट्राय करून पहा पण हे चारोळी पेक्षा ही बारीक वाटतय.

मानवदादा,
किंचित भाजून लसूण, जिरे, तिखट, मीठ, थोडं तेल घालून मिक्सरमधे 'घुरकावून' जवसाच्या चटणी साऱखी चटणी करून बघा. सिड्स आहेत, जमेल कदाचित. हे सगळ्यात सोपं आहे. रूपाने कारळं व जवसाच्याच प्रकारातली वाटली.

त्याच्यावर टरफलं असतात. जशी शेंगदाण्याची टरफलं खाता नाही येत तशी याची पण खाता नाही येत. खावून पाहिले.

https://blog.thehempshop.co.uk/how-to-shell-hemp-seeds/
हार्ड सरफेसवर त्या बिया जवळ जवळ पसरा. त्यावर चॉपिंग बोर्ड ठेवा. आता चॉपिंग बोर्डवर बारक्या हातोड्याने मारा म्हणजे टरफलं मोकळी होतील असं इथे लिहिलंय. वर ममोंनी चारोळ्यांचं उदाहरण दिलंय तशीच सालं असावी असं वाटलं, जस्ट अ गेस.

नक्की माहिती नाही पण किमान जाती तरी तीच आहे.
पण भंग का रंग चकाचक जमा करायला त्याची पाने की फुले हवीत, बिया बिचाऱ्या प्रथिनांची गरज पूर्ण करायला.

मीपण काल अमेझॉन वर शोधलं
तर हेम्प सीड दिल्यावर भोपळा बिया, खरबूज बिया काय वाट्टेल ते आलं सर्च मध्ये
कोणी भारतात अमेझॉन वर घेतलं असेल तर लिंक द्या.

मी_अनु big basket वर एकदा बघा, कधी कधी असते त्यांच्याकडे.
मी इथुन मागवतो.
आणि मागवणार असाल तर लक्षात ठेवून hemp hearts च ऑर्डर करा. नाहीतर केवळ पैशांना तेवढा मोक्सा मिळेल.

हो, मी गेल्या आठवड्यात पेपरमध्ये वाचलं होतं हेंप सीड्सबद्दल. तेव्हाही 'हे नक्की काय आहे' हे कळायला वेळ लागला. मग कळलं की भांगेचं बी. Happy

यस
भांगेचं बी.एकंदर उजेड आहे, आणून पण कोणी खाईल असंही नाही.मागच्या वेळी आणलेलं जवस, सूर्यफूल बिया अर्ध्या संपवून बाकी कचऱ्यात गेल्या.त्यात खूप सॉलिड व्हेजिटेरियन प्रोटीन आहे अशी माहिती msn ने दिली Happy (स्वगत: झालं! आता ओटस, चिया सीडस नंतर भांग महाग होणार!!)
हे खाऊन पण माकड बनतं का माणसाचं, पिक्चर मध्ये भंग प्यायल्यावर दाखवतात तसं?

(534 रु पाव किलो?? चक्कर आलेली बाहुली)

सगळ्या उपाय सुचवणाऱ्यांचे आभार. सुचवलेले/सुचलेले विविध उपाय करून पाहिले.
कितीही नाजूकपणे करून पाहिले तरी टरफला सोबत बिया मोडतात त्यात अडकून राहतात, पाखडून/पाण्यात बुडवून ठेवून वगैरे कुठल्याही प्रकारे टरफल बिया वेगळे होत नाहीत.

गिव्हिंग अप.

Pages