परीकथा - एफबी स्टेटस - ४.३ - ४.६ वर्षे

Submitted by तुमचा अभिषेक on 11 September, 2018 - 13:25

३० जून २०१८

she is very naughty..
She is most talkative..
And she is very loud.. उसे अपनी वॉईस कंट्रोल ही नही होती..
जब तक वो सोती रहती है तो क्लास शांत रहता है.. पर जब उठ जाती है तो.. जिस टेबल के पास वो जाती है वहा हल्लागुल्ला मच जाता है

पर उसको सिरीअसनेस नही है. उस दिन उसको पनिशमेंट दी. Pari stand there.. तो हसते हुए वहा जाके खडी हो गयी. और वहा पे भी मस्ती चालू.
फिर उसे क्लास के बाहर जाने को कहा, pari its punishment! Go and stand out of the class.. तो हसते हुए क्लास के बाहर निकल गयी ..

But she is Darling of the class.. Happy

She is one student like.. वो एक ऐसी लडकी है जो क्लास की रौनक है Happy

और हा, वो बॉसी है.. किसी ने कुछ गलती कि, या किसी और के साथ भी कुछ किया तो उसके पीछे पड जाती है.. सॉरी बोलो उसे.. सॉरी बोलो.. और जब तक वो सॉरी नही बोलता उसे छोडती नही है.. She is like teacher of the class ! Happy

..... पोरीचा न्यू स्कूल मधील पहिला तक्रार कम कौतुक सोहळा Happy

.
.

२ जुलै २०१८

कालच्या पॅरेंट टीचर मिटींगनंतर रात्री परीला विचारले, "परी तुला टीचर पनिशमेंट म्हणून क्लासच्या बाहेर काढतात आणि तू हसत हसत बाहेर जातेस?"

"हो !"

"अरे पण का..? तुला मजा येते का?"

"हो.. काय तर मी तिथे पाहिजे तेवढी मस्ती करू शकते आणि टीचर ओरडूही शकत नाही Proud

मॉरल ऑफ द स्टोरी - वाईटातून नेहमी चांगले शोधावे Happy

.
.

३ जुलै २०१८

परीच्या नवीन शाळेत एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. क्लासमधील काही मोजक्या मुलांना त्यांच्यातील कलागुण पाहता ठराविक दिवसांनी एक "बूकमार्क" दिला जाणार.
तसेच काही मुलांमधील स्किल पाहता त्यांच्यावर ठराविक काळासाठी एखादी जबाबदारी सोपवत त्याचा "बॅच" दिला जाणार.

परीला पहिल्याच वेळी बूकमार्क आणि बॅच दोन्ही मिळाले.

बूकमार्क मिळाला तो "पब्लिक स्पीकर"चा.. आणि यात काही आश्चर्य नाही. पोरगी आहेच बोलीबच्चन Happy

पण बॅच मिळालाय तो "लाईन मॉनिटर"चा.. क्लासमधील ईकडेतिकडे दंगा करणारया मुलांना कंट्रोल करायचा. मी तर ऐकूनच धन्य झालो.
वर्गातल्या सर्वात मस्तीखोर मुलाला मॉनिटर करायचा फंडा आजही हिट आहे Wink

.
.

११ जुलै २०१८

पोरगा आता त्या वयात पोहोचला आहे जेव्हा दूध पाजणारया आईपेक्षा ऊचलून घरभर फिरवणारा बाप जास्त महत्वाचा वाटतो.

आणि पोरगी तर अजूनही त्याच वयात आहे.

थोडक्यात एक कडेवर तर एक खांद्यावर...
दोन्ही एकाच वेळी माझ्या डोक्यावर ..
कुटुंब नियोजनाचे खर्रेखुरे महत्व आता कुठे समजू लागले आहे Happy

.
.

१३ जुलै २०१८

परीला आजीकडे सोडताना किंवा घेऊन येताना मी तिला काहीतरी छोटामोठा खाऊ घेऊन देतो. आणि त्यातली थोडी टेस्ट सुद्धा मागतो. तेवढेच आपली पोरगी काय खातेय हे समजते, पोरगी शेअरींगही शिकते, आणि पोरीचे खाण्यात एक मजाही असतेच. ती सुद्धा मूड चांगला असेल तर फारसे आढेवेढे न घेता टेस्ट देते. कधी तोंडातला उष्टा लॉलीपॉपही देते आणि मी उष्टा केल्यावर परतही खाते.

तर त्यादिवशी असेच तिला फ्रूटी घेऊन दिली. मगितल्यावर तिने मला थोडी टेस्टही करून दिली.

दुसरया दिवशीही तिला फ्रूटीच हवी झाली. मी घेऊन दिली आणि परत टेस्ट मागितली.. परी टेस्ट बघू.. तर बोलली, अरे पप्पा काल टेस्ट दिली होती ना.. सेमच आहे Proud

अजून करा हावरटपणा Proud

.
.

१६ जुलै २०१८

काल परीने मला काहीतरी खेळायला बोलावले. मी तिला म्हणालो आधी एक पा तर दे. आज सकाळपासून एकही दिली नाहीस..
तसे तिने येऊन मला नेहमीसारखी एक ओठांची पा दिली. आणि नेमके तेव्हाच तिला एक ढेकर आला..
मी तिला गंमतीने म्हणालो, काय परी माझी पा घेऊन पोट भरले का? Happy
तसे हसली आणि म्हणाली, अरे नाही. जे तू खाल्लेलेस ते सारे तुझ्या तोंडातून माझ्या तोंडात आले Proud

.
.

४ ऑगस्ट २०१८

आज साडेतीनला ईंडिया ईंग्लंड क्रिकेट मॅच होती. म्हणून परीला दुपारीच सी शोअरला फिरायला घेऊन गेलेलो. दुपार असली तरी उन्हाचा पत्ता नव्हता. हिरवळ पाणी आणि मस्त ढगाळ रोमांटीक वातावरण होते. त्याचा फायदा उचलत कॉलेजची मुले आणि लवबर्डसचाच तिथे संचार होता. गार्डन बंद असल्याने आम्हाला त्यांनाच डिस्टर्ब करत तिथेच खेळावे लागले. कितीही बागडले तरी तिचे मन काही भरत नाही. पण मॅचची वेळ झाली तसे मी तिला म्हणालो,
"परया चल आता घरी.."

"पप्पा एवढी काय घाई आहे?"

"परया बराच उशीर झालाय..."

"एवढे लोकं तर आहेत आजूबाजूला, ते तर नाही गेले अजून"

"परया ते आत्ता आलेत. आपण आधी आलो आहोत. आणि तुला एक तरी लहान बाबू दिसतोय का ईथे?"

तिने आजूबाजूला पाहिले.. एकही नव्हता..

"बघ नाहीये ना एकही.."

"अरे पप्पा होता आता ईथे एक.. तो गेला आता"

"चल गेला ना घरी, मग आपणही जाऊया.."

ऑं ...

"अरे तो ईकडेतिकडे राऊंड मारायला गेला..
तू पण ना पप्पा, माझं ऐकत नाही पुर्ण.."

मी पुन्हा निरुत्तर झालो Happy

.
.

१९ ऑगस्ट २०१८

काल परीसोबत सी शोअरच्या कट्ट्यावर भेल खात बसलेलो. छान पाऊस पडलेला. त्यामुळे मागच्या गार्डनमधील दोनेक उंदीर बागडायला बाहेर आले होते. परीची त्यांच्यावर नजर पडताच आनंदाने ओरडली... पप्पा ते बघ रॅट.. चुंदीर ..

चुंदीर..? बहुतेक तिचे चूहा आणि उंदीरचे सरमिसळ झाले असावे.

मी - अग्ग ए चुंदीर काय? एकतर हिंदीमधे चूहा तरी बोल नाही तर मराठी मध्ये उंदीर तरी बोल.

परी (लागलीच) - अरे पप्पाss, मी त्याचे नाव चुंदीर ठेवले आहे. तो चुंदीर आणि हा मुंदीर..
अरे ए चुंदीsर.. ए मुंदीsर.. ईकडे काय करत आहात तुम्ही? ..

पोरगी कधी स्वत:ची चूक कबूल करणार नाही Happy

.
.

२५ ऑगस्ट २०१८

आज सकाळी छान साखरझोपेत होतो. स्वप्नही अगदी छान झोपेत असल्याचीच पडत होती. अचानक कोणीतरी सटासट तोंडात मारायला, थोबडवायला सुरुवात केली. हळूहळू मार वाढतच गेला. झोपेत असूनही लागत होते, अपमानास्पदही वाटत होते. स्वप्न असेल तर तुटू दे एकदाचे म्हणून डोळे उघडले आणि समोर पाहिले. माझे डोळे उघडायची वाट बघत असलेला रुनू गोड हसला. आणि उगाचच.. दोन थोबाडात आणखी पडल्या..
आज पहिल्यांदाच रुनूच्या बाजूला झोपलो ते त्याने माझे स्वागत असे केले.
उठल्या उठल्या पोराचा गोड चेहरा नजरेस पडावा हे चांगलेच आहे.. पण पुढच्यावेळी दोन थोबाडात कमी पडल्या तर आणखी चांगले वाटेन Happy

.
.

४ सप्टेंबर २०१८

तिने हट्ट करणे आणि आम्ही तिच्यावर रागावत अबोला धरने हे अधनामधना चालूच राहते. या रविवारच्या सकाळी मात्र तिचा हट्ट आणि आमचा राग जरा जास्तच झाला. दोनेक तास उलटले कोणी माघार घ्यायला तयार नव्हते. हळूहळू मला बोअर होऊ लागले. रविवारची सुट्टी आणि तिच्याशी खेळायचे बोलायचे नाही म्हणजे काय. त्यात आमची फिरायला जायची आणि त्याआधी आंघोळीला जायची वेळ सुद्धा जवळ येत होती. पण आमची माघार म्हणजे तिच्या हट्टाला चालवून घेणे. म्हणून खोटा खोटा राग तोंडावर घेऊन बसलो होतो. पण अखेर तिनेच ही कोंडी फोडली.

तोडक्या मोडक्या ईंग्रजीत ईकडचा शब्द तिकडे असे काहीतरी एका कागदावर खरडवून आली. आणि आम्हाला ते वाचणे अवघड असल्याने मम्मासमोर तो कागद धरून तिनेच आम्हाला वाचून दाखवले..
I Promise you Mom.
I Dont Do Masti Happy

.
.

२६ ऑगस्ट २०१८

Colour colour which colour do you want..?
काल परी आणि तिची एक मावशी हा खेळ खेळत होत्या. मी गरीब बिचारया बापासारखा रुनूला डाळभात भरवत होतो. दोनचारदा त्यांचा कलर ओळखायचा खेळ करून झाल्यावर मला एक नवीन गेम सुचला.
Letter letter which letter do you want..?
म्हणजे ईंग्लिशचे एक अक्षर द्यायचे आणि त्यापासून स्पेलिंग सुरू होणारी वस्तू शोधायची. उदाहरणार्थ C म्हटले की chair ला हात लावायचा आणि F म्हटले की fan दाखवायचा ..

सुरुवात परीने केली,
Letter letter which letter do you want..?
पहिलेच अक्षर मावशीने दिले - B
बी म्हणजे ब ब ब.. असे म्हणत माझ्याकडे धावत आली आणि रुनूचा हात पकडत म्हणाली .. बेबी Baby Happy

.
.

९ सप्टेंबर २०१८

Letter Letter which Letter do you want? हा खेळ आमच्याकडे सध्या खूप चालतो.

त्या दिवशी असेच बेडरूममध्ये खेळत होतो. मी तिला लेटर "M" दिले.
म म.. करत ती My बोलली. मी लगेच फाऊल काढला, परी, माय असे काही असते का? काहीतरी वस्तू पाहिजे.
लगेच तिने जवळच पडलेली डॉल उचलली, आणि म्हणाली My Doll Happy
फाऊल काढायला काही शिल्लकच ठेवले नाही.

मागे एकदा तिच्याबरोबर फिरायला जात होतो. टॅक्सीत आम्ही दोघेच होतो. मध्येच तिला हा खेळ खेळायची हुक्की आली. टॅक्सीत फार काही करण्यासारखे नाही तर बोअर झाली असेल. ते ठिक आहे, पण टॅक्सीत बसल्याबसल्या हा खेळ कसा आणि किती खेळणार होतो..
पण ऐकेल ती परी कसली म्हणून खेळायचे ठरवले. टॅक्सीतल्या टॅक्सीत आणखी काय शोधणार म्हणून पहिले लेटर टॅक्सीचाच "T" दिला.
आता तिची "टी फॉर ट्यूब" पेटून ती "टी फॉर टॅक्सी" हे उत्तर कधी देतेय याची मी वाट बघू लागलो. पण तिने टॅक्सीच्या बाहेर ईथे तिथे पाहिले आणि ट ट करत मला रस्त्याकडेचे "T for Tree" दाखवले. आणि आपण टॅक्सीत बसलो असतो तेव्हा आपले जग टॅक्सीपुरतेच मर्यादीत नसते याचा मला साक्षात्कार झाला.

काल असाच घरी खेळ चालू होता.
मी तिला Letter "W" दिले होते.
तिने उत्तर दिले, व व व.. Winter ..
मी पुन्हा फाऊल काढला, परी विंटर कुठे आहे ईथे, दाखव?
"अरे पप्पा एसी तर चालू आहे, मला थंडी वाजत आहे, म्हणून विंटर :):)

त्यानंतर मग उलटा डब्ल्यू Letter "M" दिला.
म म मिरर आधी बोलून झालेले, त्यामुळे ते पुन्हा अलाऊड नव्हते. म्हणून मग ती म म मेटल म्हणाली.
मी विचारले, ईथे कुठे आहे मेटल? दाखव.. तर तिला मेटलचा अर्थ माहीत नव्हता.
मी फाऊल काढणार ईतक्यात म्हणाली, अरे पप्पा मी मेटल नाही मेन्टल म्हणाले.
आता कुठे आहे मेंटल विचारायचा प्रश्नच नव्हता. याआधीही मला बरेचदा मेंटल बनवून झालेय तिचे आणि आताही तिचे बोट माझ्यावरच रोखले होते Happy

.
.

१० सप्टेंबर २०१८

Letter letter which letter खेळता खेळता पोरीला मध्येच एक नवीन गेम सुचला..
पप्पा आपण number number which number खेळूया?
आता हा कसा खेळायचा? मला काही समजले नाही म्हणून तिलाच विचारले.
अरे म्हणजे वन फॅन, टू ट्यूबलाईटस.. असा खेळायचा..
माझी ट्यूबलाईट अजूनही पेटली नाही. तरी मी तिला गेम स्टार्ट करायला 3 नंबर दिला. तसे तिने ईथे तिथे पाहिले आणि थ्री लोडस म्हणत तीन लोड जमा केले. मला गेम समजला.
मी फोर नंबर दिला तसे तिने चार पिलो (उश्या) जमा केल्या. मी फाईव्ह नंबर देताच तिने अजून एक उशी आणली. मी लगेच गेममध्ये एक रूल टाकला. एकदा काऊंट झालेली वस्तू पुन्हा मोजायची नाही.
पुढे सात नंबर दिला तसे तिने सात टोप्या आणल्या. दहा नंबरसाठी तिच्या पर्सवरच्या डिजाईनमधील दहा सर्कल मोजले.
बारा नंबरसाठी तिच्या नेकलेसमधील फक्त पिंक मणी काउंट केले. आणि ते बरोब्बर बाराच भरले.
पुढे मी १५ नंबर दिला तसे माझे कपडे मोजायला घेतले. दरवाज्याला लटकवलेले सात आठ मोजून झाल्यावर पुढचे मोजायला कपाटात शिरली.
२० नंबर तर खूपच सिंपल होता. पटापट हातापायांची वीस बोटे मोजली.
२५ नंबरसाठी मण्यांची मोठी माळ घेऊन आली.
फायनली बाहेरच्या रूममधून ३० प्लेईंग कार्डस मोजून आणले आणि पहिल्याच दिवशी शंभर नंबर पर्यंत मोजामोज नको म्हणून अखेर आम्ही थांबलो Happy

क्रमश: Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कित्येक दिवसांनी धागा वर आला म्हणून उत्सुकतेने पाहिले तर इथेही तेच दळण .. ऍडमिन लक्ष द्या... एका सुंदर धाग्याचे ट्रोलिंग चालू आहे...

Pages