"मेरे रश्क़-ए-कमर" या गझलेचा अर्थ हवा आहे

Submitted by chioo on 19 August, 2022 - 05:16

"मेरे रश्क़-ए-कमर" या मूळ गझलेचा अर्थ हवा आहे. 'बादशाहो' मधील गाण्याचा नव्हे.
ही रेख्तावरील गझलेची लिंक,
https://www.rekhta.org/ghazals/mere-rashk-e-qamar-tuu-ne-pahlii-nazar-ja...

इथे एक एक शब्द बघून अर्थ लावता येईल. पण असं वाटतं आहे की, एकत्रित अर्थ वेगळा आणि अजून सुरेख असेल.
Literal आणि philosophical (असला तर) असे दोन्ही अर्थ शोधते आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेरे रश्क-ए-क़मर (चंद्रमुखी नव्हे खरं तर चंद्रालाही असूया वाटेल अशी) तू ने पहली नज़र जब नज़र से मिलाई मज़ा आ गया
बर्क़ सी गिर गई काम ही कर गई आग ऐसी लगाई मज़ा आ गया

जाम में घोल कर हुस्न की मस्तियाँ चाँदनी मुस्कुराई मज़ा आ गया
चाँद के साए में ऐ मिरे साक़िया तू ने ऐसी पिलाई मज़ा आ गया

नश्शा शीशे में अंगड़ाई लेने लगा बज़्म-ए-रिंदाँ ( सारे जमलेले मद्यपी) में साग़र खनकने लगा
मय-कदे पे बरसने लगीं मस्तियाँ जब घटा घिर के आई मज़ा आ गया

बे-हिजाबाना वो सामने आ गए और जवानी जवानी से टकरा गई
आँख उन की लड़ी यूँ मिरी आँख से देख कर ये लड़ाई मज़ा आ गया

आँख में थी हया हर मुलाक़ात पर सुर्ख़ आरिज़ हुए वस्ल (मीलन) की बात पर
उस ने शर्मा के मेरे सवालात पे ऐसे गर्दन झुकाई मज़ा आ गया

शेख़-साहब का ईमान बिक ही गया देख कर हुस्न-ए-साक़ी पिघल ही गया
आज से पहले ये कितने मग़रूर थे लुट गई पारसाई (सज्जनपणा) मज़ा आ गया
......... कळस!!! कळस!!! सुभानल्ला!

मी प्रयत्न करते. शॉर्ट व्हर्जन.
चंद्राहुनही सुंदर अशी प्रियतमा ज्यावर हिरोची लाइन आहे ती अचानक पर्दा काढून समोर येते. तिच्या सौंदर्याने हिरो बेशुद्ध व्हायला आला आहे. प्रियतमा लाजत वर बघते ह्याने काही विचारल्यावर अजूनच लाजून मान खाली घालते पण नयन मिलन आधीच झाले आहे व त्याने हिरोला चटका बसायचा तो बसलेलाच आहे. दिलमें व्हायुलिन टाइप परिस्थिती.

हिच्या सौंदर्याच्या दर्शनाने हिरोच नव्हे तर पूर्ण बारच बेहोश व्हायला आला आहे व नशेचा सागर वाहात आहे. ही नशा तिच्या सौंदर्याची आहे जी कोणत्याही दारू पेक्षा लै भारी आहे.

आपले मीलन कधी व्हायचे हे धिटाइ ने विचारल्यावर तर तिचे गाल आरक्तच होतात व लाजे ने ती अशी चूर होते की हिरो वेडाच होतो. काय ती प्रेमाची अवर्णनीय मजा.

तिच्या सौंदर्याचा आविष्कार बघून शेख साहेबांचे तर इमानच विकले गेले आहे. हे सर्व आधी किती गर्विष्ठ होते( आपण कसे चांगले निष्पाप आहोत ह्या अर्थाने) पण त्यांचा सो कॉल्ड चांगुल पणा तिच्या सौंदर्याच्या प्रपातात वाहून गेला आहे वा वा मजा आली मजा आली.

मला हे कवितेत बसवता येत नाही गोषवारा लिहिला आहे फक्त.

एखादी वयात आलेली तरुण सुस्वरूप मुलगी कायम बुरख्यात असते त्यामुळे तिचे सुभग दर्शन अचानक झाले की जो विजेचा लखलखाट होतो त्या क्षणाचे वर्णन आहे. पण हे संदर्भाशि वाय अनुभवता येणार नाही. सर्व सांस्कृतिक संदर्भ समजून मग त्यात हे गाणे बसवा की सुरेख वाटेल.

>>>>>>>एखादी वयात आलेली तरुण सुस्वरूप मुलगी कायम बुरख्यात असते त्यामुळे तिचे सुभग दर्शन अचानक झाले की जो विजेचा लखलखाट होतो त्या क्षणाचे वर्णन आहे. पण हे संदर्भाशि वाय अनुभवता येणार नाही. सर्व सांस्कृतिक संदर्भ समजून मग त्यात हे गाणे बसवा की सुरेख वाटेल.

मार्मिक!!!

मस्त अर्थ सांगितला अमा.
आता या तरुणीच्या जागी कास्ट कोणाला करावे?
क्रीटी सेनॉन की इमा वॉटसन की निकोल किडमन की नोरा फतेही?
(माझ्या खरंच अशी अतुलनीय सुंदरी अजून डोळ्यासमोर येत नाहीये.)
शेख साहेब का इमान बिक गया म्हणजे काय?(शेख म्हणजे मौलवी आणि तेही इतके सदाचारी असून पण नितीमत्तेत ढळले असं आहे का?)
बादशाहो मधलं गाणं आवडतं.आता इतर व्हर्जन पण ऐकते.

मलाही नुसरत फतेह अलींचं आवडतं.

ह्या गाण्यात स्रग्विणी वृत्त आहे. गालगा गालगा गालगा गालगा. अधिक माहितीसाठी माबोकर अर्निकेचा हा व्हिडिओ बघा.

(काही ठिकाणी गुरू अक्षर लघुप्रमाणे वापरलं आहे. उदा. मेरे मधला 'रे'. त्याला ऊर्दुत 'हर्फ गिराना' असं म्हणतात - असं मिपावर कुठेतरी वाचल्याचं आठवतं आहे.)

सूफी तत्त्वज्ञान सहज समजेल. अंजा वर भरपूर माहिती मिळेल.
माझी विकी (W_hat I_ _Know I_s) जेव्हा सर्व शक्तिमान परमेशाचा साक्षात्कार झाला तेव्हा कवीच्या मनात काय भावना आल्या असाव्यात त्याचे चित्रदर्शी वर्णन ह्या गाण्यात आहे.
अजूनही अर्थ निघू शकतात.

>>>>>>>>>>>>जेव्हा सर्व शक्तिमान परमेशाचा साक्षात्कार झाला तेव्हा कवीच्या मनात काय भावना आल्या

बे-हिजाबाना वो सामने आ गए और जवानी जवानी से टकरा गई - असल्या भावना आल्या? रिअली?
आजकाल कुठलाही अर्थ ओढून ताणून कसातरी उदात्त करण्याची प्रथा पडलेली आहे. केशवकुल आपल्याला उद्देश्युन नाही हे वाक्य.

बे-हिजाबाना वो सामने आ गए और जवानी जवानी से टकरा गई - असल्या भावना आल्या? रिअली?>>>
हिजाब म्हणजे माया. मायेचा भ्रम दूर झाला म्हणजे
दिव्यत्वाची जेथ प्रचीती तेथे कर माझे जुळती.
आखिरमे माझ्या गुरुजींनी सांगितले आहे.
"बेटा जैसि जिसकी सोच."

ओके. धन्यवाद. सूफी धर्मात माया ही कन्सेप्ट आहे का?

... सूफी धर्मात माया ही कन्सेप्ट आहे का?...

लय वेळा आहे.

माया कन्सेप्ट साठी 'घूंघट' आणि 'परदा' हे मेटाफोर अगदीच रेगुलर आहेत

उदा. घूंघट ओले ना लुक सजणा, मै मुश्ताक दीदार दी हां

अस पहा, बडे सयाने कह के गये है आपण त्याचा अर्थ लावायचा. म्हणजे श्री कृष्ण महाराजांनी अर्जुनाला गीतोपदेष केला. अर्जुन जे काय समजायचे ते समजला. त्यानंतर अनेक विद्वानांनी गीतेवर भाष्य केले.
अगदी ज्ञानेश्वरांपासून विनोबा भावेंंपर्यंत. कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग इत्यादी.
आता आपण श्री कृष्ण महाराजांना जाऊन विचारायचे का ? "बाबा रे, ....."

निकले वो फूल बन के तिरे गुल्सिताँ (बगीचा) से हम
महका दिया फ़ज़ाओं (वातावरण) को गुज़रे जहाँ से हम
- फ़ना बुलंदशहरी

त्यांचाच हा वरील शेरही किती सुरेख आहे. जर ईश्वराशी नाते दाखविणाराच आहे.

अरे हे साधे प्रेमात् पडायचे गुलगुलीत गीत आहे. आधी मनमुराद जगूद्या मग आपसू क अध्यात्म येतंय. हे मा वै म.
ओ सनम हे लकी अलीचे गीत बघितले तर त्यातही बुरख्यातून दिसणारे प्रेमिकेचे डोळे व तिचे मेंदी लावलेले हात इतकेच दिसते. त्यातही साधारण अशीच भावना आहे.

वाह. माझीही फेवरेट गझल. केव्हाही ऐकलं कोणतंही वर्जन की मूड लगेच बदलतो. बादशाहो चं आणि सोनम Hritik वालं पण आवडतं. आता वरील लिंक्स पण ऐकते.

आधी मनमुराद जगूद्या मग आपसू क अध्यात्म येतंय. >>> येस् अमा, मलाही तसंच वाटतं. आणि होऊदेत या भावनांची सरमिसळ,, काय हरकत आहे. कृष्ण पण तर हेच सांगून गेला सगळ्यात मोठा धर्म प्रेम, प्रेमयोग. प्रेम आणि भक्ती फार वेगळे नाहीत. आपल्या आपल्या नजरीयाची बात शेवटी.

असंच अजून एक गाणं आहे आंखे तेरी,,, कितनी हसीन, त्यात पण देवाला आठवूनच तिची स्तुती केली आहे, तेही आवडतं गाणं आहे.

अमा Lol

रश्क़

हा शब्द ख्वाजा मेरे ख्वाजा मध्येही आहे

मेरे पीर का सदका
मेरे पीर का सदका...
है मेरे पीर का सदका
तेरा दामन है थामा
ख्वाजा जी
टली हर बला हमारी
छाया है खुमार तेरा
जितना भी रश्क करे बेशक
तो कम है, ऐ मेरे ख्वाजा
तेरे क़दमों को मेरे रहनुमा नहीं
छोड़ना गंवारा

Pages