स्त्रियांना नटायची आवड उपजत असते का?
बहुतांश बायकांना नटायची आवड जास्त असते. छानछान फॅशनेबल कपडे घालायची आणि दागदागिने घालायची आणि या सर्वांची खरेदी करायचीही आवड पुरुषांच्या तुलनेत जास्त असते.
अर्थात हे विधान ओवरऑल समाजाच्या निरीक्षणावरून केलेले आहे. त्यामुळे असे काही नाही, हल्ली पुरुषही नटतात. किंवा आमच्याशेजारी अमुक तमुक जोडपे राहते त्यात बाईपेक्षा जास्त पुरुषच नटतो. वगैरे विधाने करू नका. किंवा माझे वरील विधान खोटे आहे असेही म्हणू नका. ते खोटे बोलणे होईल.
स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत नटायची आवड जास्त असते हे आपल्या देशाबाबत तरी वैश्विक सत्य आहे. मी परदेशात फिरलो नाही त्यामुळे नो कॉमेंटस.
तर,
१) स्त्रियांना नटायची आवड उपजत आहे. निसर्गानेच त्यांना बहाल केली आहे. त्यांना स्वतःलाच छान छान नटायला आवडते असे आहे का?
कि
२) या मागे देखील आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीचा हात आहे. म्हणजे पुरुषप्रधान संस्कृतीनेच समाजात स्त्रियांना शोभेच्या बाहुलीचे स्थान दिले आहे, आणि त्या स्थानी आपले महत्व टिकवायला म्हणून स्त्रिया अधिकाअधिक आकर्षक दिसायचा प्रयत्न करतात?
सांज यांच्या श्रवण आणि पुरण येथील स्त्रियांना स्वयंपाकाची आवड कुठून आली की ती लादली गेली आहे या मुद्द्यावर विचार करताना हा मुद्दा डोक्यात आला. तिथला धागा भरकटू नये म्हणून सीमंतिनी यांनी सुचवल्याप्रमाणे ईथे स्वतंत्र धागा.
तुर्तास माझे याबाबत काही ठोस मत नाही. प्रतिसाद वाचून त्यानुसार आपले मत बनवायला आवडेल.
सीमंतिनी यांनी
सीमंतिनी यांनी सुचवल्याप्रमाणे ईथे स्वतंत्र धागा.>> सी, कुफेहेपा?
पीयर प्रेशरही असू शकते. कोणता
पीयर प्रेशरही असू शकते. कोणता स्वभाव नेचर आणि कोणता नर्चर अथवा परिस्थिती जन्य हे कळाणे फार अवघड आहे.
मात्र एक मला आठवते - माझ्या महीन्याच्या लेकीशी मी खेळताना, एकदा नवा मस्त कुर्ता का कायसे घातले होते. आणि या बाळाने मला चक्क एक अॅप्रिशिएटिव्ह स्मितहास्य दिले. वरपासून खाली न्याहाळत. म्हणजे खरच. तिला रंगाचे आकर्षण वाटले की काय नकळे. तसेच असावे.
श्रावण आहे ते. मला वाटते हे
श्रावण आहे ते. मला वाटते हे व्यक्तिगत पण असावे. मला नाहीये फारशी नटायची आवड , हो पण काही वेळा खास ऑकेजन असले तर आवडते छान तयारी करायला. एरवी नाही .
पीयर प्रेशरही असू शकते. कोणता स्वभाव नेचर आणि कोणता नर्चर अथवा परिस्थिती जन्य हे कळाणे फार अवघड आहे.>>> हम्म्.
उपजत असती तर मुली मेकअपसहीत
उपजत असती तर मुली मेकअपसहीत जन्माला आल्या असत्या, कवचकुंडलं थोडीच आहेत ती
श्रवण आणि पुरण >>> श्रवण आणि नदीम आहे ते.
उपजत असती तर मुली मेकअपसहीत
उपजत असती तर मुली मेकअपसहीत जन्माला आल्या असत्या, कवचकुंडलं थोडीच आहेत ती Wink
>>>
हे म्हणजे सचिन तेंडुलकर पॅड घालून आणि धोनी ग्लोव्हस घालून जन्माला आल्यासारखे झाले
मुलींना बाहुल्यांशी खेळायला आवडणे तसे मुलांना हातात बॅटबॉल घेऊन खेळायला आवडणे हे बरेचदा आढळते. यात बरेचदा आपण मुलगा आहोत की मुलगी हे कळलेले नसतानाही ती नैसर्गिक ओढ असते. त्यामुळे काही आवडीनिवडी तुम्ही स्त्री आहात की पुरुष यानुसार नैसर्गिक असतात असे बोलायला वाव आहे.
तसेच चित्रपट, संगीत, वाचन वगैरे आवडी लिंगनिरपेक्ष असतात. मुले मुली दोघांनाही आवडतात.
या नटण्याच्या आवडीबाबत मात्र कन्फ्यूजन आहे. म्हणून हा धागा आहे.
'तुमच्याबाबत एक मुलगी म्हणून कधी असे झाले आहे की तुम्हाला नटण्याची बिलकुल आवड नाही. पण मुलीच्या जातीने नीटनीटके राहावे, नटावे थटावे म्हणून तुमच्याकडून त्या अपेक्षा केल्या गेल्या?
मला आठवतेय की आमच्या दहावीच्या क्लासला एक दमदार आवाजाची मुलगी होती. एकदा सरांनी सहज तिच्या या आवाजाचे कौतुक केले. तसे ती एकदम भावनिक होत रडायला लागली. कारण तिला रोज घरी या आवाजासाठी टोमणे खावे लागायचे, मुलीच्या जातीला हा आवाज शोभत नाही म्हणून.. सर देखील मुद्दाम तिच्या आवाजाला मर्दानी आवाज म्हणून हिणवत आहेत असे तिला वाटले.
१) स्त्रियांना नटायची आवड
१) स्त्रियांना नटायची आवड उपजत आहे. निसर्गानेच त्यांना बहाल केली आहे. त्यांना स्वतःलाच छान छान नटायला आवडते असे आहे का?
कि
२) या मागे देखील आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीचा हात आहे. म्हणजे पुरुषप्रधान संस्कृतीनेच समाजात स्त्रियांना शोभेच्या बाहुलीचे स्थान दिले आहे, आणि त्या स्थानी आपले महत्व टिकवायला म्हणून स्त्रिया अधिकाअधिक आकर्षक दिसायचा प्रयत्न करतात?
>>
डार्विन बाबांनी आधीच याचं उत्तर देऊन ठेवलंय. बायोलॉजित याला सेक्शुअल/मेटींग प्रेफरेन्सस (sexual/mating preferences) असं टेक्निकल नाव आहे.
तर मूळ थेअरी अशी, की असा प्रत्येक जीव जो आपल्या पिल्लांना खूप मेहनत अन वेळ घेऊन वाढवतो (म्हणजेच जन्मल्याबरोबर पिल्लं वाऱ्यावर न सोडता त्याच्या संगोपनासाठी स्वतःचा वेळ, ऊर्जा खर्ची घालतो) अशा प्रत्येक जीवात आपल्या प्रजातीची स्वतःची अशी एक सुंदरतेची व्याख्या असते. येस, ब्युटी/ सौंदर्य वैगरे जे काही म्हणतात, याचा उगम जेनेटिक सिलेक्शनमध्ये आहे.
जो/ जी जास्त सुंदर ==> त्याची /तिची पुढची पिढी तितकीच अधिक सुधृढ किंवा जेनेटिकली मजबूत , असा हा परस्परसंबंध आहे.
आता तुम्ही म्हणाल, मुळात ही सौंदर्याची व्याख्या या सजीवात निर्माणच कशी झाली?
तर ज्या ज्या सजीवांना आपल्या पिल्लांना वाढवण्यासाठी वेळ द्यावा लागतो, कदाचित आपलं अख्ख आयुष्यसुद्धा, ते सजीव निश्चितच आपली मुलं ही मुळातच जेनेटिकली सक्षम म्हणून जन्माला यावी (जेणेकरून त्यांचे सर्वायवल चान्सेस जास्त असतील) म्हणून बरीच काळजी घेतात. एक मस्त उदाहरण देतो.
मोराचा लांबलचक अन रंगीबेरंगी पिसारा हा एका अर्थानं एक नैसर्गिक मेकअपचं आहे. एकेकाळी हा पिसारा मोरांना हवेत ग्लाइड करण्यासाठी म्हणून उत्क्रांत झाला होता, अन अर्थात शिकारी दिसताच जो मोर चटकन उड्डाण करेल त्याचे जगण्याचे चान्सेस जास्तीच असणार. शिवाय लांबलचक पिसारा बनवणं आणि तो फुलवणं यात मोराची बरीच शक्ती जाते. म्हणजेच जे मोर शारीरिकदृष्ट्या सशक्त आहेत, त्यांनाच असा पिसारा ठेवणं परवडणार. साहजिकच प्रजननक्षम लांडोर अशा लांबलचक पिसारा असणाऱ्या मोरालाच आपल्या पिल्लांचा बाप म्हणून निवडणार. कारण अशक्त मोर निवडणं म्हणजे आपल्या पिल्लांचे सर्वायवल चान्सेस कमी करणं हे लॉजिक वर्षानुवर्षाच्या उत्क्रांतीनं तिच्या जीन्समध्ये साठवून ठेवलेलं आहे [१]
.
.
[१] http://www.bbc.com/earth/story/20150511-why-are-animals-so-beautiful
नेमकं हेच माणसाच्या बाबतीत पण
नेमकं हेच माणसाच्या बाबतीत पण होतं. आता पुरुषांच्या सौंदर्य दृष्टीने पहा म्हणजे स्त्रिया मेकअप - नटणे मुरडणे का करतात हे लगेच क्लिक होईल. तर पुरुषांना आकर्षित करणारी सौंदर्यस्थानं कुठली?
१) सममितीय / सिमेट्रिक (symmetric) चेहरा - स्त्रीची वाढ सर्व अंगानी समसमान झालीय, म्हणजेच पुढील संतती सुधृढ निपजायची शक्यता अधिक.
२) उजळ चेहरा - जेव्हा स्त्रीच बीजांड पूर्ण विकसित होऊन गर्भधारणेसाठी तयार असतं, तेव्हा तिच्या शरीरात प्रोजेस्टेरॉन नावाचं हार्मोन तयार होत जे तिची त्वचा अधिक उजळ करतं. म्हणजेच उजळ चेहरा == प्रजननक्षम स्त्री
३) वय - तरुण स्त्री, कारण साधारण ४० - ५० वयानंतर स्त्रियांना रजोनिवृत्ती येते, म्हणजे मासिक पाळी थांबते त्यामुळे नवीन मुलं जन्माला येण्याची शक्यता शून्य
४) पोट आणि कंबरेचा रेशिओ (waist to hip ratio) - हा रेशो जितका कमी तितकी स्त्रीची कंबर गोलाकार, अन प्रसरणक्षम मानली जाते. कारण प्रसूतीवेळी मूल जन्माला येताना स्त्रीचं माकडहाड योग्यप्रकारे प्रसरण पावलं नाही तर मुलाचं डोकं बाहेर येताना अडचण येऊ शकते कदाचित ते दगावूही शकतं .
५) भरीव छाती - अधिक स्तनपान करण्याची क्षमता म्हणजेच जन्मानंतर मुलं कुपोषित राहण्याची शक्यता कमी.
ज्या स्त्रीकडे वरचे बरेच फीचर्स आहेत, साहजिकच पुरुषांचा ओढा तिच्याकडं जास्त असणार. आणि त्यातून सक्षम असा पुरुष निवडण्यासाठी तिच्याकडे पर्यायही अधिक असणार. its a win win situation ! जर नैसर्गिकरित्या हे नसेल, तर मेकअप करून ते गुण असल्याचा आभास करणं हे स्त्रियांसाठी निश्चितच फायद्याचं आहे. स्त्रियांच्या सर्वसाधारण मेकअपचे उपाय पहिले तरी हे चटकन लक्षात येईल.
१) सममितीय / सिमेट्रिक (symmetric) चेहरा - भुवया पापण्या एकसमान करणे, मुरुमं हटवणे इत्यादी
२) उजळ चेहरा - वेगळं सांगायला नकोच, अख्खी बिलियन डॉलर इंडस्ट्री या एका गोष्टीवर उभी आहे
३) वय - कमी करण्याच्या, किमान तसं भासवण्याचा दावा करणाऱ्या शेकडो क्रीम्स आणि साबण
४) waist-to-hip रेशो - कॉर्सेट/corset (गूगल करावे, मला यापुढे खोलात जाता येणार नाही ) , प्लास्टिक सर्जरी
५) छाती - पॅडेड ब्रेसियर्स (पुन्हा गुगला), प्लास्टिक सर्जरी
जशा पुरुषांच्या सौंदर्याच्या व्याख्या आहेत, तितक्याच किंबहुना त्याहीपेक्षा काकणभर जास्तच स्त्रियांच्याही आहेत. Can you guess them ?
.
विलभ दोन्ही पोस्ट छान
विलभ दोन्ही पोस्ट छान
शेवटच्या वाक्याचे उत्तर मला माहीत आहे. पण मी ते सांगणार नाही.
जे मला समजलेय ते कश्याला आणखी दहा पुरुषांना सांगा
सेन्स ऑफ ह्युमर फॉर शुअर.
सेन्स ऑफ ह्युमर फॉर शुअर. बाकी शारीरीक काय आवडतं ते माहीत नाही. हां डोळे आणि नजर. नजर म्हणजे करारीपणा, जरब, आत्मविश्वास वगैरे वगैरे. डोळ्यांमधुन बरंच काही कळतं. विंडोज ऑफ सोल.
स्त्रिया च का पुरुषांना पण
स्त्रिया च का पुरुषांना पण नटण्याची हौस असते पण रीत वेगळी.
गोरा रंग असावा ही समान ईच्छा स्त्री आणि पुरुष दोघामध्ये असते.
त्या साठी मग विविध क्रीम पुरुष आणि स्त्रिया दोघे वापरतात.
स्किन स्मूथ असावी अशी स्त्री ची जास्त इच्छा असते पुरुष त्या बाबत जास्त सजक नसतात.
नाजूक दिसावे ,नाजूक आवाजात बोलावे,नाजूक पने चालावे ही स्त्री मध्ये दिसणारे गुण आहेत.
मग त्या नुसार नाजूक चप्पल, विविध रंगी ड्रेस,मुलायम केस होण्यासाठी प्रयत्न हे प्रयोग स्त्रिया करता त पुरुष ह्या बाबतीत बेफिकीर असतात
दंडा चे स्नायू दाखवण्याची पुरुषांना भारी हौस असते मग आखूड आणि घट्टा बह्यांचे शर्ट.
भरदार छाती दिसावी म्हणून फिट T shirts असले प्रयोग पुरुष करतातच.
ह्यात हार्मोन्स चा मोठा वाटा असतो हे मात्र नक्की.
विलभ, खरंच छान स्पष्टीकरण आहे
विलभ, खरंच छान स्पष्टीकरण आहे!
@विलभ
@विलभ
छान प्रतिसाद, पण तुम्ही यामुळे धाग्यातली हवाच काढून टाकली. मला वाटले होते की या धाग्यामुळे ऋन्मेऽऽषची अजून एक सेंच्युरी झाली असती, पण ती संधी तुम्ही चुकवलीत.
गोरा रंग असावा ही समान ईच्छा
गोरा रंग असावा ही समान ईच्छा स्त्री आणि पुरुष दोघामध्ये असते.
त्या साठी मग विविध क्रीम पुरुष आणि स्त्रिया दोघे वापरतात.
>>>>>>
हे फारच धाडसी विधान आहे.
म्हणजे माझ्या पाहण्यात तरी असे बाप्ये मंडळी कमी आलीत.
गोर्या रंगाचा दुश्मन म्हणजे कडक उन्ह
पण मुले भर उन्हात बिनधास्त मैदानी खेळ खेळतात, कसलेही सपट लोशन न लावता.
तरी घरी असताना आयबापांच्या धाकाने किमान नीटनेटकेपणा जपावा लागतो.
पण हॉस्टेलला जाताच मुले आणि मुली यांच्यातील हा फरक आणखी गडद होत जातो.
म्हणजे मी हॉस्टेलवर राहणार्या मुलींनाही रोज आंघोळ वगैरे करून चक्क ईस्त्री वगैरे केलेले कपडे घालताना पाहिले आहे.
अर्थात ऑफिसमधील सोफेस्टीकेटेड वातावरणात जरा नीटनेटकेपणा राखावा लागतो. पण त्यातही नटनेथटने नसतेच.
म्हणजे आमच्याईथे मुले आले की आधी कँटीनमध्ये पळतात आणि नाश्त्यावर तुटून पडतात.
याऊलट मुली आधी वॉशरूम गाठतात आणि आधी प्रवासात अस्ताव्यस्त झालेले आपले देखणेपण ठिकठाक करून घेतात. आपल्याला कोणी बघावे तर छान अवस्थेतच बघावे हे मुलींमध्ये जास्त आढळते.
हॉस्टेल वा ऑफिसच का, साधे घरातही हे आढळते.
खालून पार्सल आणायचे असेल तर बहुतांश बाप्ये मंडळी आरश्यावर नजरही न टाकता टीशर्ट चढवून घराबाहेर पडतात. जे मुलींना शक्य होत नाही. छान तयारी करून बसल्या असतील तरी आरश्यात बघून खात्री करून मगच घराबाहेर पडतील.
विषय व्यापक आहे, पोस्टी संपणार नाहीत.
पण मुद्दा तोच. हि आवड आली कुठून?
हि नैसर्गिक आहे की याला आपली समाजरचना जबाबदार आहे..
माणसाच्या जन्माची
माणसाच्या जन्माची इतिकर्तव्यता पुनरूत्पादन आणि अपत्यसंगोपन एवढीच मानली तर डार्विनचे नियम चर्चा करण्यात हाशील आहे. पण सध्या वयात न आलेल्या मुली आणि रजोनिवृत्त महिलाही मोठ्या प्रमाणावर सौंदर्य प्रसाधने वापरताना दिसतात. तसेच पुरूषातही हेयर विव्हींग इ प्लास्टीक सर्जरी बोकाळल्या आहेत. एकूणात स्त्री असो की पुरूष, नैसर्गिक आवड थोडीफार आणि समाजातील सौंदर्याच्या अपेक्षा यांचा रेटा दिसतो. एक नूर आदमी, दस नूर कपडा और हजार नूर नखरा हे चित्र खरे दिसत आहे.
बाकीच्या चर्चेत भाग घेत नाही
बाकीच्या चर्चेत भाग घेत नाही परंतु ऋन्मेSSSषला "धागा काढायची आवड उपजत आहे का?" हा विचार मनात आला !!
विलभ यांचं विवेचन वाचल्यावर
विलभ यांचं विवेचन वाचल्यावर काही वेगळेच प्रश्न उभे राहिले.
तूर्तास आपण ही शरीरवैशिष्ट्ये सक्षम पुनरुत्पादनासाठी उपयोगी आहेत (वरच्या प्रतिसादानुसार) असे मानू. मग,
१. उजळ/गोर्या कातडीच्या व्यक्तीची निवड ही नैसर्गिकच म्हणायची का? उजळ चेहरा == प्रजननक्षम स्त्री असे असेल, तर फारसे उजळ चेहरे नसलेल्या देशात प्रचंड प्रमाणात प्रजनन कसे? की उजळ आणि गोरेपणा ह्या वेगळ्या गोष्टी आहेत?
२. जर मेक अप करून स्त्रिया (आणि पुरुष ही) जर त्यांच्यात उणे असलेली शरीरवैशिष्ट्ये झाकत असतील, तर मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेला ना? म्हणजे, उजळ चेहरा नसताना तो मेकअपने उजळ केला म्हणून काही प्रजननक्षमता वाढेल असं नाही ना?
नाही पण समोरचा आकर्षित होतो
नाही पण समोरचा आकर्षित होतो फसून...
मुद्दा तो आहे..
@ हरचंद पालव,
@ हरचंद पालव,
उजळ गोरेपणा वगैरे आपल्याकडे सौंदर्याचे निकष समजले जाते म्हणून लोकं तसे व्हायला बघतात काही वेगळे निकष असते तर तसे बनायचा प्रयत्न केला असता.
विलभ यांच्या पोस्टचा मतितार्थ असा की भिन्नलिंगी व्यक्तीला आकर्षित करायला हे असते.
फिगर वा फिजिक वगैरेंबद्दल जे आपल्याला आकर्षण असते ते निसर्गानेच यासाठी निर्माण केले आहे की त्यानुसार नरमादी एकमेकांकडे आकर्षले जावेत आणि त्यांचे मीलन होत प्रजनन व्हावे. जर हे आकर्षणच नसते आणि संभोग करणे हे एक बोअरींग काम असते तर पोरे मित्रांसोबत आणि पोरी मैत्रीणींसोबतच आयुष्यभर राहून मनुष्यजात न वाढता केव्हाच नष्ट झाली असती.
पण तरीही नटणेथटणे याचे प्रमाण पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त आढळते. आणि ती सतत छानच आणि नीटनेटकेच दिसायची अतिरीक्त आवड कुठून येते हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.
तरीही नटणेथटणे याचे प्रमाण
तरीही नटणेथटणे याचे प्रमाण पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त आढळते. आणि ती सतत छानच आणि नीटनेटकेच दिसायची अतिरीक्त आवड कुठून येते हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.
>>> पियर प्रेशर...आणि जेलसी....
ज्वलंत प्रश्न. सरांचा मी
ज्वलंत प्रश्न. सरांचा मी जबरा फॅन का आहे याचे उत्तर या धाग्यात आहे.
अशा प्रश्नांची उत्तरे कुठल्याही विद्यापीठात दिली जात नाहीत. निरीक्षण फसवे असू शकते. त्यामुळे असे प्रश्न हे सोसल मीडीयातच विचारले पाहीजेत.
असे म्हणजे स्त्रीविषयक कुतूहल असलेले प्रश्न.
आपल्याविषयी नेमके काय जाणून घ्यायचे आहे म्हणून एका पक्षाला उत्सुकता निर्माण होते तर दुसरा पक्ष वैज्ञानिक म्हणून ताबडतोड माहिती पुरवतो. एखादे वेळी त्याला कुणी तरी आक्षेप घेऊ शकतो. मग रणकंदन. एक दोन आयडी शहीद. मग शांतता !
लगे रहो सर !
स्त्री आणि पुरूषात निसर्गाने काय फरक केला आहे - हा धागा अद्याप निघालेला नाही.
स्त्री आणि पुरूषात निसर्गाने
स्त्री आणि पुरूषात निसर्गाने काय फरक केला आहे - हा धागा अद्याप निघालेला नाही.>>>>> काढा ना राव! कुणीतरी. निरंजन घाटे यांच्या सेक्सायन पुस्तकात तो दिलेला आहे. शांत माणसा तू शांत बसण्याऐवजी का नाही काढत असा धागा!
1) लिपस्टिक ,eye लायनर,अशा
1) लिपस्टिक ,eye लायनर,अशा प्रकारच्या सौंदर्य प्रसाधन चा वापर करणे ह्याला नटने असे म्हणतात .
स्त्री जेव्हा बाहेर जायचे असते तेव्हाच त्याचा वापर करते .घरात वापर करणर्या स्त्रिया दुर्मिळ.
त्वचेची निगा राखणे,केसांची निगा राखणे ह्याला natne म्हणता येणार नाही त्याला स्वतःची स्वच्छता राखणे असे म्हणता येईल.
३) कपडे तर सर्व च वापरतात .
पण सुंदर वाटावे म्हणून विशिष्ट desine केलेले कपडे वापरणे ह्याला नटने म्हणता येईल .
जो अंगचाच सुंदर आहे त्याला साधी कपडे वापरली तरी सुंदर दिसतात ह्याचा अर्थ ती नटली आहे असा होत नाही
सिनेमातील अभिनेत्री, फॅशन जगतातील स्त्रिया ज्यांना आदर्श वाटतात जे त्यांचे fan असतात त्या स्त्रिया त्यांचे अनुकरण करतात.
पण त्या त्यांचे करिअर म्हणून फॅशन करत असतात आणि follower त्यांचे अनुकरण करणे ग्रेट समजतात.
त्यांना पैसे मिळतात
ह्यांचे पैसे जातात.
स्त्री आणि पुरुष यात काय फरक
स्त्री आणि पुरुष यात काय फरक आहे या प्रश्नाचे मिस युनिव्हर्स मध्ये छान उत्तर दिले गेले आहे...
मी मराठी मीडीयमच्या शाळेत
मी मराठी मीडीयमच्या शाळेत शिकलो. आमच्या वर्गात मुली नव्हत्या. बहीणही नव्हती. वयात येईपर्यंत काही अडले नाही. पण वयात आल्यानंतर मुलींबाबत अचानक जिज्ञासा निर्माण झाली. त्यांच्या बद्दल आकर्षण वाढले. त्यातून अनेक गोष्टींचे कुतूहल निर्माण झाले. पण मुलींशी बोलण्याची सवय नाही, कसे बोलायचे माहिती नाही, घरात कुणाला विचारायचे याबद्दल सगळा आनंदी आनंद. अशातच नोकरी लागली. मुलगी पटवायची, तिला फिरवायचे, फिल्मी लाईफ जगायचे राहून गेले. लग्न झाल्यावर ते संपेलच. उद्या बायको आली तर ती पण माझ्यासारख्याच परिवारातली असल्याने तिच्याशी काही या गप्पा मारता येणार नाही.
दरम्यान हे आकर्षण वाढत राहिले. मॉडर्न, सुंदर स्त्रिया, मुली यांच्याबद्दलची जिज्ञासा वाढतच चालली, त्यांचे गप्पांचे विषय काय असतील ? त्या कशा विचार करतात ? त्यांना कसल्या पद्धतीचे पुरूष आवडतात हे कुतूहल काही शमण्याचे थांबेना. मग मी सोशल मीडीयात (मायबोली नाही) हे कुतूहल शमवण्यासाठी थ्रेडस काढू लागलो. पण थ्रेड चालू करताना त्याला जास्तीत जास्त वैश्विक रूप द्यायची काळजी घ्यावी लागते. ती जमू लागली. मग स्त्रियांच्या कपड्यांविषयी, हेअर स्टाईलविषयी, हजबण्ड मटेरिअल म्हणजे काय, हॅण्डसम हंक कुणाला म्हणतात, स्त्रियांना कसे पुरूष आवडतात, कसल्या गप्पा आवडतात असे धागे काढू लागलो. माझ्ये ध्येय निश्चित असल्याने कितीही टीका झाली तरी मी साफ दुर्लक्ष करत होतो. न जाणो पुढे कधी ही माहिती उपयोगी आली तर ?
आज माझ्या या सवयीमुळेच मी एकूणच स्त्री विषयक समस्यांचा जाणकार आहे असा समज होऊन काही स्त्रिया माझ्याशी चर्चा करतात. मला सल्ले मागू लागल्या आहेत. मी ही गुगल करून वाचून त्यांना सल्ले देतो. हळू हळू माझी वाटचाल तज्ञाकडे चालू आहे. फक्त समोरासमोर सल्ले देणे शक्य नसल्याने अजून काही काळ ही सेवा सुरू करता येत नाही. तसदीबद्दल क्षमस्व !
मायबोलीवर तुमची डाळ शिजेल असे
.
आज माझ्या या सवयीमुळेच मी
आज माझ्या या सवयीमुळेच मी एकूणच स्त्री विषयक समस्यांचा जाणकार आहे असा समज होऊन काही स्त्रिया माझ्याशी चर्चा करतात. मला सल्ले मागू लागल्या आहेत. >> किरणू, इथे अशांत प्राणी आयडी वापरायचा होता की रे
सर, अगदी अपेक्षित कमेण्ट आली
सर, अगदी अपेक्षित कमेण्ट आली. ते ठेवणीतले आयडी उडाल्याने फिल्मी या आयडीचा वापर वाढलाय बरं का तुमचा
राजकीय धाग्यावर फिल्मीवरची कमेण्ट आवडली नाही बहुतेक.
फक्त फिल्मी? मायबोलीचा अभ्यास
फक्त फिल्मी? मायबोलीचा अभ्यास वाढवा जरा.
ते ब्लॅक रॉबिन, एक्स मॅन, स्ट्रेंजर बद्दल सांगायची गरज नाही. बऱ्याच जणांना माहित आहे.
अर्चना सरकार, भन्नाट भास्कर, संशोधक हे याच बाळाचे आयडी आहेत हे श्री या आयडीने उघड केलं होतं. पराग अॅडमिन म्हणून काम बघत होते तेव्हाची गोष्ट आहे. त्यावेळी श्री ने ही गुप्त माहिती गुप्त पानांवर पण उघड केली होती आणि यालाही जाहीर सुनावले होते.
शशिराम, शक्तीराम, खान 99 ही सिरीज पण होती. ती खूप घाणेरडी होती.
Filmy या एक आयडीला काय घेऊन बसलात?
याची सगळ्यात मोठी करामत म्हणजे याने खान 99 हा आयडी पुरोगाम्यांवर टीका करायला काढला होता. आणि त्याच्याशी भांडायला एक पूरोगामी आयडी काढला होता. दोन्ही आयड्यांची शिवीगाळ, खूनाच्या धमक्या करून झाल्यावर बिल मात्र परस्पर भलत्याच आयड्यांवर फाडले होते.
बाकीचे सगळे बच्चे आहेत.
ऑर्कुट वर तुमचा अभिषेक हाच आयडी तुफान बदनाम होता. अनेक कम्युनिटीजमधून हाकलून दिले होते. हा मग डीपी बदलायचा. एकदा सु सू करतानाचा डिपी लावला होता. पण तो आपोआप ब्लॉक केलेल्या कम्युनिटीजमधून याने काढलेल्या पहिल्या पानावरील शंभरेक धाग्यावर दिसायला लागला होता. त्या मॉडरेटर ताई हैराण झाल्या होत्या लोकांच्या तक्रारींना तोंड देता देता.
असे हे साहेब इथे इतके शिस्तीत कसै?
जित्याची खोड आहे.
निसर्ग चे काही नियम आहेत
निसर्ग चे काही नियम आहेत त्याला माणूस हा प्राणी अपवाद नाही भले तो स्वतः ल खूप हुशार स्वतचं समजत असेल.
निसर्ग पुढे माणूस अती फालतू च आहे.
प्रण्यान मध्ये मादी ही नराला attract करते विविध मार्ग वापरून.
त्या मुळे स्त्री ला natayachi आवड आहे हे नैसर्गिक आहे.
ह्या वर चर्चा करण्यात काही अर्थ नाही.
माणसाच्या बुद्धी चे गुणगान गाण्यात,समानता,बरोबरी ह्या विषयात पण काही अर्थ नाही.
माणूस हा प्राणी आहे ह्याचे भान ठेवणे खूप गरजेचे आहे.
माणूस हा प्राणी आहे ह्याचे
माणूस हा प्राणी आहे ह्याचे भान ठेवणे >> माझा आयडी पहा.
Pages