Submitted by काड्यासारू आगलावे on 1 July, 2022 - 08:03
मागे मला एका क्रेडीट कार्ड विकनार्या मुलीने सांगीतलं की क्रेडीट कार्ड फ्री आहे. मी विश्वास ठेऊन घेतलं नी १५०० रूपये पहीलं बील आलं जोईनींग फी म्हणून. त्या मुलीने नंतर फोन स्विकारणे बंद केलं, एसबीआय मधून मेल ला काहीही ऊत्तर आलं नाही. आता तीन महीन्याने ५००० रूपये मागतेय एसबीआय. मी देनार नाहीये. पण क्रेडीट स्कोर खराब केलाय त्या लोकांनी.
तुमच्या सोबत असा कधी कुठेतरी फ्राॅड झालाय का? मग त्यावेळी तुम्ही काय केले? पैसे, वस्तू परत मिळाली का?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तसेच एका विशिष्ठ धर्माचे लोक
तसेच एका विशिष्ठ धर्माचे लोक जास्त करून मागे लागतात असे वाटत आहे. ते लोकं लगेच कधी घरी येऊ असे विचारतात जे जरा ऑड वाटते.
विशिष्ठ धर्माचे लोक घरी नको असतील तर तसा घराबाहेर ठळक फलक लावावा. एकूण सध्या देशात एका विशिष्ठ समूहाला भडकावून बदनाम करण्याच्या योजनेला तुम्ही बळी पडला आहात.
Congratulations! You have already been conned.
विशिष्ठ धर्माचे लोक घरी नको
विशिष्ठ धर्माचे लोक घरी नको असतील तर तसा घराबाहेर ठळक फलक लावावा.
काहीही... पुढे नीट वाचले तर लक्षात येईल की मी अनोळखी हा शब्द बोल्ड मध्ये लिहीला आहे. बाकी असल्या योजनेला मी बळी पडलो की नाही याची काळजी करू नका. धन्यवाद.
गुन्हे त्या मध्ये असणारी लोकं
गुन्हे त्या मध्ये असणारी लोकं आणि त्यांची सरासरी काढली तर.
विरोध करायला पण भीती वाटेल.
ऑनलाईन fraud he uttar भारतीय लोक च करतात सिद्ध होईल.
Olex वर ठराविक धर्माचे लोक फसवतात हे सिद्ध होईल
Loan ॲप वर दक्षिण भारतीय च जास्त आहेत हे सिद्ध होईल.
गर्व आहे मराठी लोक ह्या लिस्ट मध्ये नाहित्म
गुन्हे त्या मध्ये असणारी लोकं
गुन्हे त्या मध्ये असणारी लोकं आणि त्यांची सरासरी काढली तर.
विरोध करायला पण भीती वाटेल.
ऑनलाईन fraud he uttar भारतीय लोक च करतात सिद्ध होईल.
Olex वर ठराविक धर्माचे लोक फसवतात हे सिद्ध होईल
Loan ॲप वर दक्षिण भारतीय च जास्त आहेत हे सिद्ध होईल.
गर्व आहे मराठी लोक ह्या लिस्ट मध्ये नाहित्म
वीज कापली जाईल अशी बिती
वीज कापली जाईल अशी भिती दाखवून माझ्या मेव्हण्याला गेल्या आठवड्यात Whatsapp वरून ₹५००० चा चुना लागला. नशीब फक्त ₹५००० गेले कारण पोलीस स्टेशनमध्ये गेला तेव्हा त्याच्यापुढे अजून ७ जण तशीच तक्रार करायला आले होते आणि काही काही जणांचे १ लाखापेक्षा जास्त नुकसान झाले होते.
बापरे. सावधान रहा लोकहो!
बापरे. सावधान रहा लोकहो!
IRS, FBI Debt Collection Fraud Call, student loan, expiring car warranty, Delivery package text msg/email असे बरेच कॅाल्स येत असतात. लवकरात लवकर पैसे भरा नाहीतर तुम्हाला अटक करायला घरी पोलीस येतील असे घाबरवणारे वाक्य त्यात असतेच. पण तसे काही होत नसते. तसे काही असेल तर आपल्याला आधी रितसर लीगल नोटीस ते पाठवतात. हे माहीत असल्यामुळे कॅाल कट करते किंवा अनोळखी नंबर घेतच नाही.
आम्हीपण हेच म्हणतोय ब्यांका
आम्हीपण हेच म्हणतोय ब्यांका बुडवणारे , काळे पैशेवाले , फरार लोक हे विशिष्ट राज्यातून येतात, त्या लोकांच्या हातात देश देणे मूर्खपणाचे आहे
प्रयत्न झालाय , पण मी अजुन
प्रयत्न झालाय , पण मी अजुन यश येउन दिले नाहि
बिचकुल्ले हा कोण आता ?
छान
१५ दिवसांपूर्वी वीज बिल न
१५ दिवसांपूर्वी वीज बिल न भरल्यास आज रात्री ९ वाजता वीज तोडण्याचा मेसेज माझ्या बायकोच्या व्हॉट्स ॲप वर आला होता , संपर्क साधायला नंबर दिला होता. मी बाहेरगावी होतो तिने घाबरून मला फोन केला. तिला म्हटले वीज बिल आपण भरलेले आहे आणि तुझ्या नावावर वीज कनेक्शन नसल्याने तुला मेसेज पाठवण्याची गरज नाही. फसवण्याचा धंदा आहे हा, वीज कनेक्शन तोडणार नाही असे तिला सांगितले. शक्यतो असे मेसेज स्त्रिया किंवा ज्येष्ठ नागरिकांना पाठवले जातात.
मलाही आला होता हा मेसेज. मी
मलाही आला होता हा मेसेज. मी दुर्लक्ष्य केलं.
Fraud करणारे बहुसंख्य हे
Fraud करणारे बहुसंख्य हे उत्तर भारतीय असतात.... +१११
जमताडी (जमतारी) असतात ते.
- अवांतर -
@Hemant 33, तुम्ही क्रेडीट कार्ड ATM मधून पैसे काढण्यासाठी वापरले म्हणून तुम्हाला अतिरिक्त चार्जेस लागले. ट्रायच करायचे होते तर इतर काहीतरी खर्च करून बघायला हवा होता. असो. मी स्वतः गेली ४-५ वर्षे क्रेडीट कार्ड वापरतो आहे, मला कधीही अतिरिक्त चार्जेस लागले नाहीत. (सुरवातीला फक्त एक वस्तू EMI वर घेतली होती तेव्हा त्याचे व्याज लागले तेवढेच). उलट मी जेवढा खर्च करतो तेवढे पूर्ण पैसे भरून टाकतो, त्यामुळे क्रेडीट कार्ड देणाऱ्या बँकेला माझ्याकडून काहीच आर्थिक फायदा होत नाही (कारण वर्षभरात ठराविक रकमेच्या वर खर्च केला की वार्षिक फी पण माफ होते, अशी scheme आहे) त्यामुळे बँक मला ठराविक काळाने 'क्रेडीट लिमिट' वाढवून पण देते! जेणेकरून मी जास्त खर्च करावा आणि मग पूर्ण बिल भरले नाही गेले की उर्वरित रकमेवर बँकेला व्याज आकारता येईल! पण मी क्रेडीट कार्ड हे डेबिट कार्डप्रमाणे वापरतो! (अंथरूण पाहून हात-पाय पसरतो!!!)
विज कापली जाण्याला लोक का
विज कापली जाण्याला लोक का घाबरतात कळत नाही. वायरमन तुमच्या घरी येउन विज तोडतो, mseb किंवा इतर कम्पनीच्या ऑफिसात बटन दाबुन विज तोडता येत नाही. वायरमन घरी येतो तेव्हाही ऑनलाइन पेमेंट करुन, त्याला ते दाखवुन तोडणी टाळता येते. माझ्या बाबतीत झालेले आहे असे काही वेळा. बेलापुरला असताना वायरमन मला फोन करुन सांगायचा, मॅडम, लगेच बिल भरा हो, नैतर मला तन्गडतोड करत यावे लागणार.. आणि तरीही मी बिल भरणी बिसरल्यावर तो तन्गडतोड करुन आल्यावर, शेजारी फोन करुन मला सांगायचे व मी बिल भरुन सगळ्यांनाच सन्कटातुन सोडवायचे
आता गावी mseb चे एसेमेस किंवा फोन येतात.
भारती अक्सा ची अमुक एक पोलिसि
भारती अक्सा ची अमुक एक पोलिसि तुम्ही घेतली व एक हप्ता भरुन विसरलात. आता अमुक हप्ते भरुन ती पोलिसि परत चालु करता येइल असाही एक फसवणुकीचा प्रकार सुरु आहे.
हे अमुक हप्ते म्हणजे नवी पोलिसी असते जी तुम्हाला नको असताही तुमच्या गळ्यात पडते आणि फोन करणार्या एजेंटला कमिशन म्हणुन भरघोस रक्कम मिळते.
धन्यवाद शरद.
धन्यवाद शरद.
अजनबी थोडक्यात वाचलात. ह्या फ्रॉड्स च्या ठळक पॉईंट्स ची यादी बनवायला हवी.
जसे..धमकी वजा मेसेज पाठवणे-अमु़क केले नाही तर तमुक करू, अमुक नंबर वर कॉल करायला सांगणे, तमुक साईट ची लिंक देऊन त्यावर क्लिक करा असे सांगणे, ओटीपी मागणे, अमूक अॅप डाऊनलोड करा सांगणे, सिम कार्ड सिरियल नं. मागणे(हे एका सीरिज मधे पाहिले होते)
सिंगापूर मधे असा फ्रॉड होऊन मागच्या वर्षी अनेकशे लोकांचे पैसे बुडाले होते पण इथल्या लोकल बँकेने मास प्रकार झाल्यामुळे सगळ्यांचे पैसे फेडले. ह्यांना खर्च केल्या वर मोबाईल वर जो अपडेट येतो, (तशी सेटिंग ठेवली तर ऑफिशियल मेसेज येतो बँकेकडून अगदी १०$ खर्च्/एटीएम मधून काढले तरी) त्यात १ मॅलिशियस लिंक होती.. त्या द्वारे फसवणुक झाली होती ईव्हन बँक ची तंतोतंत सेम दिसणारी पण बारिकसा युआर एल मधे फरक असणारी तोतया नेटबँकींग साईट्स असतात. खूप लक्ष देऊन ट्रान्झॅक्शन करावे लागते
नुकताच मीही ऑनलाईन फ्रॉड
नुकताच मीही ऑनलाईन फ्रॉड पासून वाचलोय. मी एप्रिल च्या शेवटच्या आठवड्यात प्रचंड गरमीमुळे कूलर घ्यायचे ठरवले. आधी खारघर व बेलापूरातील कूलरची सगळी दुकाने पालथी घातली, पण हवा तसा मिळाला नाही. दरम्यान एके रात्री गरमीमुळे अजिबात झोप येत नव्हती. घामाघूम होऊन सारखी चिडचिड होत होती. मग तेव्हाच फ्लिपकार्ट व अमॅझोनवर कूलर शोधायला सुरुवात केली आणि शेवटी फ्लिपकार्ट वर हवा तसा मॉडेल भेटला. एसबीआय ऑनलाईन बँकिंगहून पैसे पाठवतांना मला एका अनोळखी नंबरहून सारखे कॉल्स यायला लागले. मला शंका आल्याने मी ते मुळीच उचलले नाहीत (असे चार कॉल्स आले, पुढे ट्रूकॉलर वर बघतले असतांना ते एसबीआय ऑनलाईन फ्रॉड व जयपूर हुन येत असल्याचे दाखवत होते).
तेवढ्यात मला एसबीआयहून माझा ऑनलाईन बँकिंग अकाऊंट डिऍक्टीवेट झाल्याचा मला मॅसेज आला. मी खूप घाबरलो, कारण त्या अकाऊंटमधली बरीच मोठी रक्कम एक तासाआधी दुसऱ्या बँकेतल्या खात्याला वळवली होती, पण दोन्ही बँकेहून कनफर्मेशन चा कोणताही मॅसेज आला नव्हता. मला वाटल, गेली, सगळी रक्कम गेली. काही सुचत नव्हते. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे ऑनलाईन बँकिंगहून फ्लिपकार्टलाही कूलरची रक्कम वळती झाली नव्हती. रात्रभर मुळीच झोप आली नाही. पण पहाटेला फ्लिपकार्टहून ऑर्डर कनफर्मेशनचा मॅसेज आला आणि जरा जीवात जीव आला.
दुसऱ्या दिवशी कॉलेज (ऑफिस) ला ही गेलो नाही, कारण खात्यात असलेल्या मोठ्या रक्कमेचे टेंशन होते. मला वाटले चोवीस तासांनी ऑनलाईन बँकिंग सुरू होईल, पण तसे झाले नाही. मी लॉग-ईन करायचा प्रयत्न केला असताना आपल्या शाखेला संपर्क करून अकाऊंट ऍक्टीवेट करा असा मॅसेज आला. मग मला आठवले की एटीएम कार्ड तर बंद नाही झाले, ते वापरुन निदान बॅलेन्स तर बघू शकतो. लगेच जवळच्या एटीएमला गेलो आणि बॅलेन्स बघितला. तर मी व्यवहार केल्याप्रमाणे माझ्या ह्या खात्यातील रक्कम दुसऱ्या बँकेतल्या खात्याला वळती झाली होती तथापि दोन्ही बँकेहून अजूनही कनफर्मेशन चा कोणताही मॅसेज आला नव्हता (एव्हाना व्यवहार करून जवळपास 36 तास झाले होते). शेवटी माझा जीव भांड्यात पडला, कोणतेही नुकसान झाले नव्हते.
ह्या दरम्यान एसबीआय सबंध घटना मेलवर लिहून पाठवली आणि केवायसी संबंधीत सगळी कागद जोडून ऑनलाइन बँकिंग सुरू करायची विनंती केली. पण बँकेकडून अद्यापही उत्तर आले नाही. मी कितीतरी reminder मेल व कॉल्स ही केले, कॉल्स ही उचलल्या जात नव्हते. कस्टमर केअर नीही प्रतिसाद दिला नाही (खरतर घराजवळच्या एसबीआय शाखेनीच हा पर्याय सुचवला होता. एकीकडे एसबीआय Anywhere banking in India चे गोडवे गाते पण अकाऊंटसंबंधीत काहीही अडचण आल्यास आपल्याला आपले खाते असलेल्या शाखेतच जावे लागते). पुढे मी जून महिन्यात नागपूरला गेलो असताना खाते असलेल्या एसबीआय शाखेत जाऊन ऑनलाइन बँकिंग ऍक्टीवेट केले. त्यांना तुम्ही मेल वा फोनला उत्तर का देत नाहीत असे विचारले असतांना त्यांनी आम्हाला एवढे सगळे बघायला वेळ नसतो अशी उर्मट उत्तर दिली.
मला अजूनही समजत नाही की त्या अनोळखी व्यक्तीला मी फ्लिपकार्ट वर करत असलेल्या व्यवहाराबद्दल कसे कळले, आणि त्याने मला लगेच कसा कॉल केला? रच्याकने मला +91-1412822495 ह्या क्रमांकाहून कॉल्स आले होते, आणि एसबीआयच्या ट्वीटरपेजवर ह्या क्रमांकासंदर्भात लोकांच्या अनेक तक्रारी आहेत.
राहुल, हे जास्तच डेंजरस
राहुल, हे जास्तच डेंजरस वाटतंय. तुम्ही एसबीआय ऑनलाइन वापरून त्या क्षणी पेमंट करत आहात, हे त्या नंबरवाल्याला कळलं.
तुमची ऑनलाइन बँकिंगची सुविधा बंद झाली म्हणजे त्याने लॉग इन करायचे प्रयत्न केले होते का? म्हणजे त्याला अकाउंट नंंबरही कळला?
म्हणजे हा डेटा तो पाहू शकत होता? कुणीतरी आतलीच व्यक्ती?
ह्यात त्या फोनचा आणि ऑनलाइन
ह्यात त्या फोनचा आणि ऑनलाइन बँकिंग अकाउंट डिॲक्टिवेटचा काय संबंध ? जरा डिटेल्स मध्ये सांगा.
भरत >>> तेच तर. हे सगळे
भरत >>> तेच तर. हे सगळे व्यवहार मोबाईलवरच्या फ्लिपकार्ट ऍपहून केले होते आणि माझ्या मोबाईल मध्ये मी आवश्यक तेवढीच ऍप्स ठेवली आहेत.
आग्या1990 >>> त्या नंबरहून चारदा कॉल्स आले होते, चौथ्यांदाही कॉल न उचलल्यामुळे तो बंद होताच लगेच बँकेकडून मॅसेज आला होता.
https://twitter.com/vinod
https://twitter.com/vinod_2478/status/1159377393762492417
received call from +911412822495
stating calling from SBI to know transaction is initiated by you or not, and also told not to share any OTP/CVV/PIN etc.
is it genuine or not?
(स्टेट बँकेने काहीही न वाचता स्टँडर्ड उत्तर छापलंय. तो नंबर त्यांचा आहे की नाही, हे तरी सांगायचं)
हे ट्वीट वाचून प्रश्न पडला की तो कॉल जेन्युइन होता आणि तुम्ही फोन न उचलल्याने ऑनलाइन बँकिंग डिअॅक्टिव्हेट केलं की काय?
यावरून आठवलं. एका फिटनेस अॅपच्या सबस्क्रिप्शनसाठी क्रेडिट कार्डाने पैसे भरले. बहुतेक पिरियॉडिकल सब्स्क्रिप्शनसाठी ऑटो पेमेंटचा पर्यायही निवडला. पुढच्या पेमेंटच्या वेळी बँके कडून फोन आला की तुम्ही असं काही ट्रान्झॅक्शन करताय कय? payee च्या नावावरून ते त्या अॅप्साठी आहे हे मला लक्षात आले नाही. तेव्हा त्यांनी सांगितले की तुमचं क्रेडिट कार्ड डिअॅक्टिव्हेट करतोय. दुसरं कार्ड येईल आणि आलं.
तेच विचारतोय, कॉल उचलला असता
तेच विचारतोय, कॉल उचलला असता तर बँक अकाउंट हॅक झाले असते का? किंवा कसे? माहिती असावी म्हणून विचारतोय?
M connect हे bob चे app मी
M connect हे bob चे app मी वापरत होतो.
आता दोनतीन महिन्या पूर्वी ते अचानक बंद .
परत लॉगिंग करायला गेलो तर लॉगिंग होत नव्हते.
OTP च येत नव्हता .पण OTP पाठवला असे instruction येत होते
शेवटी customer care मध्ये कॉल करून तक्रार केली त्यांनी परत लिंक पाठवली लॉगिंग झाले पण काही तासात परत ॲप बंद झाले..
Network खासगी नाही असा msg.
परत काही ते मी active केले नाही.
मला. शंका यायला लागली.
अकाउंट मध्ये काही गडबड अजून तरी झाली नाही.
Customer care नंबर जो कार्ड वरती आहे तोच नंबर मी माहिती घेण्यासाठी वापरतो
Google search karun customer care number शोधू नका असे इशारे अनेक वेळा मीडिया मध्ये दिले जातात
राहुल खतरनाक अनुभव!
राहुल खतरनाक अनुभव!
मला वाटते, राहुल नी फ्लिपकार्ट अका. वर लॉगीन केले असता जयपूर वाल्या भामट्याने हॅकींग करून राहुल यांचा अका. नं. पाहिला (पेमेंट च्या वेळी बँकेचा अका. नं. टाकतात तेंव्हा) . बाकी डीटेल्स ढापण्या साठी तो त्यांना कॉल करत राहिला, दरम्यान फोन न उचलल्या मुळे भामट्याच्या ३ पेक्षा जास्त पासवर्ड अटेम्प्ट करण्यामुळे राहुल चे अकाऊंट २४ तासांसाठी डिअॅक्टिवेट झाले असावे. असा कयास आहे.
बाकी एसबीआय ही आळशी आणि उर्मट लोकांनी भरलेली बँक आहे हा जवळपास कॉमन अनुभव आहे, विदेशात सुध्हा मुळीच सपोर्टींग सर्विसेस नाहीत. ह्यांना धडा नक्की मिळायला हवा.
(पेमेंट च्या वेळी बँकेचा अका.
(पेमेंट च्या वेळी बँकेचा अका. नं. टाकतात तेंव्हा) >> User ID टाकतात ना. अकाउंट नं. टाकलेला कधी आठवत नाही. माझा अनुभव ICICI, HDFC चा आहे. सिंगापुरात असताना POSB ने एक छोटे calculator टाईप मशीन दिले होते. while doing online transfer you need to click holding in front of your PC to get the OTP on it's display. हे भारी होते. २०१२/१३ साली आता आहे का माहित नाही.
१) अभासी विश्वातील कोणत्या ही
१) अभासी विश्वातील कोणत्या ही कंपनी शी व्यवहार करणे हे धोकादायक असते.
त्यांची regional offices नसतात.
समोर रा समोर तुम्ही तुमच्या समस्या मांडू शकतं नाही.
अमेझॉन इन जिथे आपण शॉपिंग करतो.ही आभासी कंपनी आहे .
पहिलेच पैसे paid केले आणि चुकीचे सामान आले तर त्यांच्या भरवश्यावर राहावे लागते refund साठी त्याची मुदत १५ दिवस आहे.
मुंबई मध्ये पण त्यांचे office नाही जिथे जावून तुम्ही भांडू शकतं.
नेट shopping madhye कोणालाच आगावू payment Karu naka.
२) क्रेडिट कार्ड विषयी तक्रारी ची जबाबदारी बँक घेत नाही.त्या पासून सावधान रहा.
Mf ची जबाबदारी पण बँक घेत नाही पण स्वतःचा ब्रँड वापरून व्यवसाय करतें
देशात wel connected कोणत्याच आर्थिक संस्था नाहीत.
सर्व सावळा गोंधळ आहे.
शहाजी पाटील ह्यांनी किती निधी नेला हे मंत्र्यांना माहीत नाही
सरकार ची ही अवस्था तर बाकी अर्थ विषयक संस्था काय लायकीच्या असतील ह्याचा अंदाज येईल.
प्रतेक व्यवहार करताना पूर्ण सावधान.
हा भारत आहे .
Fraud system aahe.
युजर आईडीच, अकाऊंट नंबर
युजर आईडीच, अकाऊंट नंबर नव्हेच.
मला वाटते, राहुल नी फ्लिपकार्ट अका. वर लॉगीन केले असता जयपूर वाल्या भामट्याने हॅकींग करून राहुल यांचा अका. नं. पाहिला (पेमेंट च्या वेळी बँकेचा अका. नं. टाकतात तेंव्हा) . बाकी डीटेल्स ढापण्या साठी तो त्यांना कॉल करत राहिला, दरम्यान फोन न उचलल्या मुळे भामट्याच्या ३ पेक्षा जास्त पासवर्ड अटेम्प्ट करण्यामुळे राहुल चे अकाऊंट २४ तासांसाठी डिअॅक्टिवेट झाले असावे. असा कयास आहे. >>>>>>>>>>>>>>> मलाही असेच वाटते. पण तरीही अकाऊंट 24 तासासाठी नव्हे तर मी बँकेत जाऊन केवायसी करेपर्यंत बंदच होते. खर तर 24 तासांनंतर लॉगईन करता यायला हवे होते.
मी मुद्दामच कॉल्स उचलले नाहीत, मला त्याक्षणी खूप संशयास्पद वाटत होत. कारण ऑनलाइन बँकिंग हून व्यवहार करतांना बँक कधीही कॉल्स करून ग्राहकांना सूचना देत नाही (निदान माझे खाते असलेल्या 4-5 बँकेचा मला तरी अनुभव नाही). त्यामुळे कॉल उचलून मला कोणतीही जोखीम घ्यायची नव्हती. कॉल्स न उचल्यानेच एवढ्या अडचणी आल्या (एसबीआय ऑनलाइन बँकिंग डीऍक्टिवेट होणे), उचलला असता तर आणखी काय घडले असते कुणास ठाऊक?
मला वाटतं, तो कॉल जेन्युइन
मला वाटतं, तो कॉल जेन्युइन होता. तुमच्या अकाउंटच्या सेफ्टी साठी.
माझ्या बॅंकेत चुकीचे पासवर्ड टाकत राहिलं तर अकाउंट २४ तासांसाठी लॉक होतो, deactivate नाही.
बँक अकाऊंट नं. नव्हे कार्ड नं
बँक अकाऊंट नं. नव्हे कार्ड नं. ...टाकताना असे म्हणायचे होते.
सिंगापुरात असताना POSB ने एक छोटे calculator टाईप मशीन दिले होते.>> ती सीस्टीम आता बंद झाली मला फार आवडायची. आता लॉगीन करताना बँक चे फोन वरील १ अॅप असते त्या वरून आधी लॉगीन अप्रूव्ह करून मग पुढचे ट्रांझॅक्शन होते..
भरत +१
भरत +१
आम्हालाही एकदा असा अनुभव आला आहे. क्रेडिट कार्डवरून एक मोठं पेमेंट करताना बँकेकडून फोन आला की तुम्ही खरोखरच पेमेंट करत आहात ना?
एच डी एफ सी मधून असा फोन
एच डी एफ सी मधून असा फोन नेहमी येतो मोठी खरेदी करताना. यावेळी नाही आला आयफोन घेतला तर....... कारण क्रेडिट लिमिट मजबूत वाढवली!!!
एकदा एक मेसेज आला आयसी आयसी आय बेंकेचे अकाउंट ब्लोक होईल जर ऑनलाइन के वाय सी दिले नाही तर. मग तिथे क्लिक केले तर कायतरी नंबर ला फोन करा असा मेसेज आला. पण मग मला शंका आली म्हणून गूगल सर्च केले तर ऑनलाइन बँकिन्ग चे पेज वेगळेच आहे हे वेगळे च होते. फ्रॉड लोकांचे पेज असावे.
दुसरे म्हणजे एनि डे स्क डाउन लोड करा व ओपन करा असा मेसेज आला तर फोन वरील पार्टीला बडवून काढा. फ्रॉडच आहे.
Pages