तुमच्या सोबत कधी फ्राॅड झालाय का?

Submitted by काड्यासारू आगलावे on 1 July, 2022 - 08:03

मागे मला एका क्रेडीट कार्ड विकनार्या मुलीने सांगीतलं की क्रेडीट कार्ड फ्री आहे. मी विश्वास ठेऊन घेतलं नी १५०० रूपये पहीलं बील आलं जोईनींग फी म्हणून. त्या मुलीने नंतर फोन स्विकारणे बंद केलं, एसबीआय मधून मेल ला काहीही ऊत्तर आलं नाही. आता तीन महीन्याने ५००० रूपये मागतेय एसबीआय. मी देनार नाहीये. पण क्रेडीट स्कोर खराब केलाय त्या लोकांनी.
तुमच्या सोबत असा कधी कुठेतरी फ्राॅड झालाय का? मग त्यावेळी तुम्ही काय केले? पैसे, वस्तू परत मिळाली का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमेरिकेत क्रेडिट कार्ड कंपनीकडून असा फोन्/मेसेज येणे खूप कॉमन आहे - एखाद्या ट्रॅण्झॅक्शन बद्दल त्यांना शंका आली तर. पण ते माहिती विचारत नाहीत - स्वतःच डीटेल्स देतात व आपल्याला कन्फर्म करायला सांगतात जर खरा चार्ज असेल तर. तो कॉल्/मेसेज शंकास्पद वाटला तर आपण स्वतंत्रपणे फोन करून विचारू शकतोच, ते ही त्या मेसेज मधला नंबर न वापरता आपल्याच कार्डवरचा नंबर वापरून.

नुसता येणारा फोन उचलल्याने आणखी फ्रॉड कसा होईल समजले नाही. aashu29 यांनी लिहीले आहे तसेच काहीतरी असावे.

पण यांचा नंबर व कूलर वगैरेचा संदर्भ त्या स्कॅमवाल्याला मिळाला कसा हे जास्त गूढ आहे. माझा अंदाज आहे की या बँका कितीही गलथान असल्या तरी त्यांच्या वेबसाइटचे सिक्युरिटी वाले अ‍ॅप्लिकेशन चांगल्या दर्जाचे असावे. कारण ते सहसा कॉर्पोरेट स्टॅण्डर्ड्स वर निवडले जाते, आणि सरकारी कंपन्यांचीही ती चांगली असतात. मग एखाद्या sophisticated हॅकरने जर ते हॅक केले तर त्यांना पैसे कमवायचे आणखी सोपे मार्ग उपलब्ध असतील बँकेतूनच. असे रॅण्डम ग्राहकांना टार्गेट करायची गरज पडणार नाही. अशा टाइपचे फ्रॉड सहसा सोशल इंजिनिअरिंग टाइपचे असतात - लोकांना बोलून गंडवणारे व माहिती काढून घेणारे.

बाकी एसबीआय ही आळशी आणि उर्मट लोकांनी भरलेली बँक आहे हा जवळपास कॉमन अनुभव आहे, विदेशात सुध्हा मुळीच सपोर्टींग सर्विसेस नाहीत. ह्यांना धडा नक्की मिळायला हवा. Sad Angry >>>>> स ह म त

काही फसवणूक आपल्या लक्षात येत नाहीत.आपण फसवले जातो ह्याची जाणीव होत च नाही.
टीव्ही ,फ्रिज ,किंवा कोणती ही वस्तू घेताना .
फायनान्स कंपन्या पैसे पुरवतात.
रोख कॅश दिल्यावर वस्तू ची किंमत आणि हफ्त्यावर घेताना वस्तू ची किंमत ही वेगळी असते
रोख पैसे देवून जी किंमत असते त्या मध्ये पण विक्री करणारा त्याचा योग्य फायदा घेत असतो.
हफ्त्या वर घेतला किँमत वाढते ती फायनान्स कंपनी लं मिळते.
परत काही टक्के व्याज घेतात ते वेगळे.

टेक्सास मध्ये एक प्रसिद्ध इन्टरनेट प्रोव्हाडर सर्व्हिस मला "चुकून" दोनदोनदा चार्ज करत होती. नशीब मी काकदृष्टीने बॅन्क अकाउंट पहात असे. मग त्यांना कळवलं. तर त्यांनी मग पैसे परत केले. पण असे दोनदा झालेले आहे. तेव्हा ... मनात शंकेची पाल चुकचुकतेच.

याच्या उलटाही अनुभव आहे. जिम मध्ये हे लोक महीन्याला चार्जच करायचे विसरलेले. व मी जिम जॉइन करुनही जात नव्हते. माझ्याही लक्षात आले नाही की आपल्याला चार्ज लागत नाहीये कारण मी जॉइन करुन पार विसरलेले.
मग अचानक वर्षाने त्यांना आठवले की त्यांनी चार्ज केलेले नाहीये तेव्हा त्यांनी पेमेन्ट माफ केलेले.

<< बाकी एसबीआय ही आळशी आणि उर्मट लोकांनी भरलेली बँक आहे हा जवळपास कॉमन अनुभव आहे, विदेशात सुध्हा मुळीच सपोर्टींग सर्विसेस नाहीत. ह्यांना धडा नक्की मिळायला हवा. >>

सरळ सोपा उपाय आहे, बँक बदला. जगात बँकेचा तुटवडा आहे काय?

PPF अकांउट आहे म्हणून नाईलाजाने sbi ला सहन करावे लागतंय. फोन/ब्रांच/मेल/टोल फ्री/साईट कुठेच चांगली सर्व्हिस नाही.

सरळ सोपा उपाय आहे, बँक बदला. जगात बँकेचा तुटवडा आहे काय? >> आपले पैसे सुरक्षित रहातील अश्या बँकांचा तुटवडा आहेच भारतात.

बंगलोरच्या एका व्यक्तीने बायजूज विरोधात ग्राहक न्यायालयात तक्रार करून भरलेली रक्कम अधिक नुकसान भरपाई या पोटी ९९००० रुपये मिळवले..
दिलेले लॅपटॉप आणि स्टडी मटेरियल जितकी किंमत लावली, त्या दर्जाचे नव्हते.
गेल्या डिसेंबरम ध्ये पुणे ग्राहक न्यायालयाने बायजूजला ग्राहकाला ५०,००० रुपये द्यायला लावले. कोर्स असमाधानकारक वाटल्याने आधी दिलेले १५००० रुपये परत मागितल्यावर मिळाले नव्हते.

मला MTNL मधून फोन आला होता . KYC नाही केलं तर फोन बंद होईल. मी घरी रिकामीच बसलेले , 15 20 मि. उलट सुलट प्रश्न विचारून टाईमपास केला. त्याने वैतागून , 'फोन बंद होगया तो complain मत करना " असा दम देऊन फोन ठेवून दिला.

<< PPF अकांउट आहे म्हणून नाईलाजाने sbi ला सहन करावे लागतंय. फोन/ब्रांच/मेल/टोल फ्री/साईट कुठेच चांगली सर्व्हिस नाही. >>

----- SBI ला कस्टमरची अवशक्ता नाही आहे.
थोडे जास्त पैसे घ्या पण सर्विस चांगली द्या.

PPF अकांउट आहे म्हणून नाईलाजाने sbi ला सहन करावे लागतंय. फोन/ब्रांच/मेल/टोल फ्री/साईट कुठेच चांगली सर्व्हिस नाही. >>>>>> मोहीनी123, माझ्या माहितीप्रमाणे पीपीएफ खाते एका बँकेतून दुसर्या बँकेत किंवा पोस्टात वळवता येतो. शिवाय खाते क्रमांकही बदलत नाही.

माझे एसबीआयमध्ये बचत खाते असल्याने पीपीएफ खाते ही तिथेच उघडावे ह्या उद्देशाने सगळी आवश्यक कागद घेवून गेलो असतांना त्यांनी परत केवायसी करावे लागेल आणि त्याला 4 दिवस लागतील असे सांगितले. मग मी बचत खाते असलेल्या दुसर्या राष्ट्रीयकृत बँकेत गेलो आणि तिथे 12 तासापेक्षा कमी वेळात पीपीएफ खाते सुरू होऊन रक्कमेचा पहीला हिस्साही जमा झाला.

आजची सकाळ एका नोकरी साठी वणवण फिरणार्‍या युवकाला फसवणूकी पासून सावध करण्यात उपयोगी आली. नोकरीचे आमिष दाखवून भारतातील तरुण पिढीला टार्गेट केले जात आहे, त्यांच्या साठी सावधानतेचा इशारा.

या युवकाने मे महिन्यात नोकरीसाठी email माध्यमाने resume पाठवला होता. पुढे काही दिवसांनी अजून माहिती मागितली, तशी सविस्तर माहिती त्याने भरुन कळवली. बस एव्हढाच काय तो संवाद. काही दिवसनंतर हे ऑफर लेटर त्याला मिळाले. काही पैसे सुरवातीला भरावे लागतील, पण ते भरलेले पैसे नोकरीवर रुजू झाल्यावर परत मिळणार आहेत.

महिन्याला $ ९००० (म्हणजे वर्षाला $ ११०,०००) असा छान जॉब आणि कुठलाही phone /video interview नाही हा मोट्ठा रेड फ्लॅग आहे. फसवणार्‍याने कंपनीचा वेब ID, फोन नंबर हे खरे वापरले आहे. लोगो पण खरा वाटतो. ऑफर लेटर मधे बारिक खाचा खळगा आहेत. सावध करण्याच्या उद्देशाने ( युवकाचे नाव खोडून) फोटो इथे देत आहे.
FakeOffer_ScreenShot2022-07-10_Page1.pngFakeOffer_ScreenShot2022-07-10_Page2.png

हो.अशीच पत्रे कॅनडा च्या एक्सोनमोबिल कंपनी ची पण येतात.अगदी फेक लोक रीतसर लिंकडइन वर संपर्क करून एक ऑडिओ कॉल होऊन वगैरे.(शेंडी लागता लागता राहिली.)

फसले गेलेले कोणी सांगत नाही.पावला pavuli तुम्हाला कोण्ही तरी फसवत असतो.
सतर्क रहा.
६००० चा मोबाईल मी ३००० घेतला होता सरळ गोडाऊन मधून.
रोज तुम्हाला कोणी तरी फसवत असते
फक्त आपण त्याचा विचार करत नाही.

बाकी एसबीआय ही आळशी आणि उर्मट लोकांनी भरलेली बँक आहे हा जवळपास कॉमन अनुभव आहे, विदेशात सुध्हा मुळीच सपोर्टींग सर्विसेस नाहीत. ह्यांना धडा नक्की मिळायला हवा. Sad Angry

Submitted by aashu29 on 8 July, 2022 - 03:27
>>>>>>>>>>>>>>>>>
याला फ्रॉड म्हणता येणार नाही पण
माझ्या समोर एस बी आय च्या कर्मचाऱ्याच्या भोंगळ कारभाराचा घडलेला किस्सा म्हणून सांगतो !
आणि जात पात चा वाद वाढवायचे नाहीत म्हणून आडनावाचा उल्लेख टाळतो .
ढोले पाटील रस्ता , पुणे येथील ब्रांचवाल्यांनी नाशिक मधील महिलेस ८११२०१४ रुपये ट्रान्स्फर केले होते .
दुसऱ्याच दिवशी ती स्री नाशिक वरून पुण्यातील ढोले पाटील ब्रांचं मध्ये हजर !
आणि डेस्क ऑफिसर ला स्लीप दाखवून सांगत होती , मला पाच हजार च येणार होते !
मग इतके ८११२०१४ कसे आले ?
तरी त्या ऑफिसर च्या डोक्यात प्रकाश पडत नव्हता .
आणि वर बरोबरच आहे की
चा धोशा चालू !
पाठीमागे बसलेल्या एकाने ती स्लीप बघितल्यावर त्याला सांगितले तू तारीख वाचून ०८/११/२०१४ तीच रक्कम ट्रान्स्फर हाणलीस !
मग तो डेस्क सोडून बाहेर येवून त्या स्रीच्या पाया पडायला लागला !

का ?
होऊ शकत नाही ?
माझ्या समोरच झालेला घटना आहे .
बाकी माझे ही अकाउंट एस बी आय ला होते !
दोन वेळा १०० रुपये भरून अक्टिव ही केले पण तेथील वातावरण ,गर्दी , उर्मट उत्तरे हे सगळे पाहता जायची ईच्छाच होत नसे .
आता पाच सहा वर्ष झाली असतील अकाउंट पुन्हा डी ॲक्टीव्ह होऊन ...

SBI सरकारी बँक आहे.तिथे तुमचे पैसे सुरशित आहेत.
Pvt बँका आता चांगल्या सुविधा देत असल्या तर त्याला मायाजाल समजावे.
चैरमन पासून सर्व संचालक मंडळ सर्वांचे पैसे घेवून मल्ल्या सारखे कधी देश सोडून जातील भारत सरकार ची मदत घेवून ह्याचा काही भरवसा नाही.
भारत सरकार आताचे उद्योग पती चे मित्र आहे.

सर्वात महत्वाची गोष्ट ! खासगी किंवा सरकारी बँक असू द्या .
बँकेत पैसे जास्त न ठेवता कर्जे घ्यायची असतात.
हफ्ते व्यवस्थित भरले तर सिबिल ही चांगला होतो .
मला कार लोन घ्यायचे होते , टाटा शोरुम मधील फायनसर म्हणाले वर्षाचे बँकेचे स्टेटमेंट आणि दोन जमीनदार हवेत .
Hdfc ला विचारले तर झिरो डॉक्युमेंट आणि ज्या शोरुम ची तुमच्या नावाने रिक्वेस्ट येईल त्यांना दोन मिनिटात पाठऊ !
शो रूम वाल्याला स्टोरी सांगितली तर त्याने माझा hdfc चा कस्टमर आय डी मागितला , आणि चेक करून सांगितले आता कोणत्याही कागदपत्रांची गरज नाही १०० टक्के लोन amount देवू !
प्लस त्याला मी कडे प्रोसेसिंग फी (पाच हजार) कॅन्सल करायला लावली .
आणि सांगितले , नाहीतर घेतो माझ्या बँकेकडून कर्ज !
त्यानेही hdfc चेच लोन दिले .
तुमच्याकडे वेळ असेल तर इंटरेस्ट रेट सुद्धा कमी करता येतो .
हा सगळा सिबील स्कोर् चांगला असल्याचा परिणाम पण एकाच छताखाली झाल्यामुळे माझी धावपळ वाचली . त्यात कार ना वेटींग प्रकार ( चीप शोर्टेज मुळे ) वाढत चालला आहे .

पाठीमागे बसलेल्या एकाने ती स्लीप बघितल्यावर त्याला सांगितले तू तारीख वाचून ०८/११/२०१४ तीच रक्कम ट्रान्स्फर हाणलीस >>> अशक्य वाटतंय. असा काही प्रकार बँकेला कळवला तर चौकशी होऊन त्याची नोकरी जाऊ शकते. साधारणपणे सरकारी / निमसरकारी बँकांत अकाउंटॅबिलिटी हा प्रकार असतो (कायमस्वरूपी कर्मचार्‍यात). चुकीसाठी त्याला जबाबदार धरता येते. कॉण्ट्रॅक्ट बेसिस वर किंवा तात्पुरत्या नेमणुकीवर असलेल्यांची जबाबदारी निश्चित करता येत नाही. शिवाय नोकरी जाईल ही भीती नसते. ती जाणारच असते. फ्रॉड होऊ नयेत म्हणून हजारो नियम आहेत. शिवाय पेन्शन आणि इतर अनेक कामे एकाच काउंटरवरच्या कर्मचार्‍याकडे असतात. सरकारी योजना राष्ट्रीयीकृत बँका, शेड्युल्ड बँकांना सक्तीने राबवाव्या लागतात. त्यामुळे गर्दी होते.

एका कर्मचार्‍यामागे किती ग्राहक हे प्रमाण प्रगत देशात नक्कीच कमी असावे. जर हे प्रमाण मेन्टेन करायचे असेल तर स्टाफ वाढवावा लागेल, तसे केले तर बँकेचे चार्जेस वाढत जातील, ज्याला ग्राहकांची तयारी अजिबात नसेल. कमी कर्मचारी ठेवून, उच्चप्रतीच्या सेवा द्या अशा अपेक्षा भारतीय ग्राहक खासगीपासून सरकारी पर्यंत सर्वत्र ठेवून असतो. कमीत कमी स्टाफ मधे चालवायचे झाल्यास गर्दी होणार यात आश्चर्य काय आहे ?
खालील लिंक वर खासगी बँकांमधले कर्मचारी आणि ग्राहक हे गुणोत्तर दिलेले आहे. स्टेट बँकेत एका कर्मचार्‍याकडे १६८० ग्राहक तेच आय सी आय सी आय बँकेत ३८० ग्राहक आहेत.
https://www.cenfa.org/are-the-employees-of-public-sector-banks-overexplo....

या कोष्टकात पाहिले तर खासगी बँकेत गर्दी, गोंधळ कमी आहे. मग सेवा सेवा म्हणून ओरडणारे ग्राहक तिकडे का जात नाहीत ? कारण त्यांचे चार्जेस सुलतानी आहेत. खूप वर्षांपूर्वी मी याच कारणाने आय सी आय सी आय बँकेत खाते काढले होते. पण तिथे बॅलन्स मेन्टेन केला नाही तर पैसे सरळ डिडक्ट होतात. माझे उत्पन्न खूपच कमी होते. ५००० रू त्या वेळी खूप होते. पैसे डिडक्ट होऊन ७८० रू राहिल्यानंतर ते खाते बंदच करून टाकले. स्टेट बँकेत गर्दी असते. पण पैसे काढायला एटीमचा वापर करतो. ई सेवा शक्यतो वापरतो. बँकेचा संबंध फारसा येत नाही. ई सेवांमधे एसबीआय सुरक्षित वाटते.

सरकारी बँकात गर्दी असण्याचे आणखी एक कारण म्हणजे सिक्युरिटी. बँक बुडण्याची भीती नगण्य असायची. शिवाय बुडालीच तर ठेवी सुरक्षित समजल्या जात. गेल्या काही वर्षात खासगी, नॉन शेड्युल्ड बँका बुडाल्यानंतर काय होते हे आपण उघड्या डोळ्यांनी पाहिलेले आहे. त्यामुळे देखील अशा बँकात खाते उघडण्यास भारतीय ग्राहक सहजी राजी नसतो. हे सर्व लाभ तर हवेत पण भारतासारख्या अफाट लोकसंख्येच्या देशात गर्दी नको, झाली तरी कर्मचार्‍याने सतत आनंदी, उत्साही आणि तत्पर रहावे या आपल्या अपेक्षा आहेत.

पूर्वी मला भारतभर फिरावे लागायचे. इतर कोणत्याही बँकेचे एटीम हे दिल्लीसारख्या शहरात सुद्धा एक किंवा दोनच असत. पण एसबीआय चे एटीम हे सर्वत्र होते. अगदी शिमला, कुलू पासून ते भारताच्या शेवटच्या गावातही एस बी आय आणि एटीम होती. सर्वात पहिली कोअर बँकींग सेवा ( ते ही नि:शुल्क) सुरू करणारी एसबीआय पहिली बँक आहे. त्यामुळे मला पैसे संपल्यास घरच्यांना सांगून तिथे पैसे भरून इथे काढता आले. या सेवा पूर्वी नि:शुल्क होत्या. नंतर किरकोळ चार्जेस लागले. मल्ल्या आणि इतरांच्या घोटाळ्यानंतर तसेच अनेक उद्योगांची कर्जे माफ झाल्याने त्याची वसुली करण्यासाठी सध्या चार्जेस मधे अचानक वाढ झालेली आहे.

स्टेट बँक च्या व्यवस्थापकीय संचालिका म्हणून ज्या महिला होत्या त्या निवृत्त झाल्यावर आता कुठल्या उद्योगात काम करतात हे पाहिले कि अव्वाच्या सव्वा दिलेली बुडीत कर्जे आणि त्याचा भार सर्वसामान्यांवर पडणे हे समजून येते.

ज्याच्या खात्यातून पाच हजार जायचे होते, त्याच्या खात्यात किमान ८ लाख ८१ लाख होते आणि ते गेले तरी तो बँकेत धावला नाही. अगदी पटण्यासारखं आहे.

पुणे येथील ब्रांचवाल्यांनी नाशिक मधील महिलेस ८११२०१४ रुपये ट्रान्स्फर केले होते .
असे खरोखर झाले होते का? ज्याच्या खात्यातून ८१ लाख गेले तो गप्प बसला? आणि एवढी मोठी रक्कम स्लिपवर कशी काय पाठवू शकतात? चेक असेल ना? चेक वर तर आकडा व अक्षरे दोन्ही स्वरूपात लिहीले जाते ना? दिवसाचा हिशोब त्या त्या दिवशीच पुरा केला जातो. एस बी आय च्या कर्मचार्‍याने जर असा घोळ घातला असेल तर संध्याकाळीच त्यांना लक्षात आले असते. दुसर्‍या दिवशी कोणालातरी बॅकेत येऊन सांगायची गरज पडली नसती.

योगी 900 >> +1
81 लाख होतेय ही रक्कम. 2014 सालच्या आधीपासून स्टेट बँकेत व्यवहार होताना समस येतो. ताबडतोब फोन केला तर व्यवहार रिव्ह्यू साठी जातो. प्रसंगी रद्द होतो.

Pages