तुमच्या सोबत कधी फ्राॅड झालाय का?

Submitted by काड्यासारू आगलावे on 1 July, 2022 - 08:03

मागे मला एका क्रेडीट कार्ड विकनार्या मुलीने सांगीतलं की क्रेडीट कार्ड फ्री आहे. मी विश्वास ठेऊन घेतलं नी १५०० रूपये पहीलं बील आलं जोईनींग फी म्हणून. त्या मुलीने नंतर फोन स्विकारणे बंद केलं, एसबीआय मधून मेल ला काहीही ऊत्तर आलं नाही. आता तीन महीन्याने ५००० रूपये मागतेय एसबीआय. मी देनार नाहीये. पण क्रेडीट स्कोर खराब केलाय त्या लोकांनी.
तुमच्या सोबत असा कधी कुठेतरी फ्राॅड झालाय का? मग त्यावेळी तुम्ही काय केले? पैसे, वस्तू परत मिळाली का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्यासारखे १००० लोक मिळाले तरी कंपनीचा लाखाचा फायदा

अशा प्रकारची घटना अमेरिकेत काही वर्षांपूर्वी झाली होती असे आठवते.
बँक कर्मचारी ग्राहकांचे वरचे सुट्टे पैसे (म्हणजे पाच हजार पन्नास पैसे अशी रक्कम असेल तर पन्नास पैसे) स्वतःच्या अकाउंट मध्ये ट्रान्स्फर करायचा.
ग्राहक पण लक्ष देत नव्हते कारण रक्कम अत्यंत किरकोळ होती.
पण सुट्टे पैसे मिळून करोडो रुपये त्याच्या account मध्ये जमा झाले.

आताच झाला,10000 ची वस्तू 2000 ला मिळवायच्या लोभात Happy
2000 ला एक खूप अविश्वसनीय डिल होतं, 1 शीशम टीपॉय आणि त्याखाली सरकतील असे 4 स्टूल असं.8900 रिव्ह्यू पण होते.cod नव्हतं.
पैसे भरल्यावर जे मेल आलं त्यात ट्रॅक ऑर्डर मध्ये साईट डाऊन केलेली.http 404.फोन नंबर नाही.इमेल केल्यास कोणी उत्तर देत नाही.
फेसबुकवर जाहिरातीत ती साईट 5-6 वेगवेगळ्या नावाने दिसते.2 स्पेस,5हेवन असं काहीही.
गुगल पे ला रिपोर्ट वगैरे सर्व केलंय.

त्यामुळे माझ्या रिपोर्ट चं पुढे काय होतंय हे पाहिल्या शिवाय हा 2000 चा टीपॉय घेऊ नका.फेसबुकवर जाहिरात दिसल्यास साईट ला रिपोर्ट फ्रॉड करा.

आतापर्यंत बऱ्याच अनोळखी साईट वरून केलेली खरेदी खूप चांगली निघाली.एखादा झटका बसणं गरजेचं होतंच.

फेसबुकवर अशीच १०० रुपयांत वस्तू विकणारी एक साइट होती. ती काही दिवसांनी गायब व्हायची. लोक कॅश ऑन डिलिव्हरी आहे का विचारायचे. उत्तर मिळायचं नाही. मी एकदा १०० रु. घालवून धडा शिकलो. पुन्हा अशी साइट दिसली की तिथे फ्रॉड अ‍ॅलर्ट अशी कमेंट करतो.

म्हणजे काय?
Submitted by aashu29 on >> EMI Network Card Update!
Your EMI Card Annual fee of Rs. 117 is due on 10-Jul-22 available loan limit is Rs.200,000 Use Card and get waiver
असा मेसेज आला होता. आपण यांच्याकडुन घेतलेले कर्ज व्याजासहीत फेडले, आता कसली आली फी म्हणुन दुर्लक्ष केले तर खरोखर बँक खात्यातुन पैसे गेले.
आपण फ्रीज, वॉशिंग मशिन, टी.व्ही. सारख्या वस्तु खरेदीसाठी जातो तेव्हा डोक्यात तेच विचार असतात. अशा वेळी फायनान्स कंपनीच्या अटींकडे दुर्लक्ष होऊ शकते(जसे माझे झाले). मी कर्ज घेतले तेव्हा मला एक कार्ड (कागदोपत्री, प्रत्यक्षात नाही) देण्यात आले, ज्याचा वर्षात एकदा वापर करणे आवश्यक(म्हणजे गरज असो नसो वापराच नाहीतर वार्षिक फी द्या. थोडक्यात तुम्हाला कायमस्वरुपी ग्राहक बनवण्याची चलाखी. मला दिलेले कार्ड २०३० पर्यंत सुरु राहणार होते.)
जर तुम्हाला असे कर्ज घ्यायचेच असेल तर कर्ज फेडीसाठी चेक द्या. कर्जाचे हप्ते परस्पर बँक खात्यातुन वळते करुन घेण्याची परवानगी देऊ नका.

हो विरु.परस्पर पैसे जाण्याच्या स्टँडिंग इन्स्ट्रक्शन देणे जरा धोक्याचे ठरते.एखादे ऍप, एखादी साईट जिला जॉईन होणे अति सोपे, आणि सोडताना 50 कॉल सेंटर कॉल करून 100 सुंदऱ्या भावनिक ब्लॅकमेल करत असताना उत्तरे द्यावी लागतात.
'सोडणं' किती सोपं आहे याचा साईटशोध एखादी गोष्ट धरण्यापूर्वी केलेलं फायद्याचं.

स्टेट बँक च्या व्यवस्थापकीय संचालिका म्हणून ज्या महिला होत्या त्या निवृत्त झाल्यावर आता कुठल्या उद्योगात काम करतात हे पाहिले कि अव्वाच्या सव्वा दिलेली बुडीत कर्जे आणि त्याचा भार सर्वसामान्यांवर पडणे हे समजून येते.

Submitted by शांत प्राणी on 12 July, 2022 - 06:55

>>
आता Salesforce मधे आहे. नक्की काय म्हणायचे आहे आणि कसे समजून येते?

बँक अधिकारी,आयएएस अधिकारी ह्यांच्या कडे काही अधिकार असतात.
बँक अधिकारी
कर्ज मंजूर करणे हे ह्यांच्या हातात असते.
उद्योगपती ह्यांची शी संबंध वाढवतात.
त्यांना आमिष दाखवतात.
किरकोळ तारण ठेवून करोडो रुपयाचे कर्ज मंजूर करून घेतात.
त्या बदल्यात त्यांना फिक्स इन्कम ची हमी देतात.
असे काम केले की नोकरी जाणार च च .
पण असे पांढर पेशे अती प्रचंड दरोडेखोर. समाजात ताठ मानेने फिरत असतात आणि चंबळ मधील अती शुल्लक दरोडेखोर बदनाम होतात.
फक्त नोकरी जाते ह्या हरामखोर ना फाशी इथे होत नाहीं

नोकरी गेली की लाभार्थी त्यांना आपल्या इथे जास्त पगार देवून कामावर ठेवतात
पैसा लुटीचा.
आयएएस ऑफीसर पण असे deal करतात.
सरकारी ,देशाची संपत्ती कोणाला तरी किरकोळ किमतीत देतात.
त्याच्या बापाचे काही जात नाही.
नोकरी गेली की त्यांना पगार दिला जातो.
कोणताही आयएएस आज पर्यंत फासावर गेला नाही.
दरोडेखोर हे पांढर पैशे लोकच आहेत.
पण त्याला fraud म्हणतात दरोडा नाही.

ओळखीचा एजंट, मुलाबाळांच्या भविष्याची, शिक्षणाची सोय, आर्थिक निरक्षरता यामुळे अनेकजण घरातील लहानमोठे सगळ्यांचा विमा काढतात. यालाही फ्रॉड म्हणता येईल का?

खरे तर anti corruption खाते हीच मोठी फसवणूक आहे
दरोडा आणि चोरी ह्यांची व्याख्या बदलून.
पैश्याची अफरातफर.
लाच घेणें
अधिकाराचा गैर वापर करून देशाचे नुकसान करणे.
हे तिन्ही प्रकार चोरी आणि दरोडा ह्या कलामखली आले पाहिजेत
देश सुधारेल.
पण मांजराच्या गळ्यात राजकारणी घंटी बांधणार नाहीत.
आणि जनता इतकी mature नाही.

आपण यांच्याकडुन घेतलेले कर्ज व्याजासहीत फेडले, आता कसली आली फी
तुम्ही जे कर्ज घेतले होते ते ० टक्के व्याजाने घेतले होते का? कारण बजाज फायनान्सची तशी स्कीम आहे की तुम्ही इलेकंट्रोनिक वस्तू केंव्हाही शून्य टक्के व्याजाने घेऊ शकता आणि त्यासाठी त्यांच्याकडे एक खाते उघडावे लागते. ते खाते मेंटेन करण्यासाठी वार्षिक फी असते.
शून्य टक्के व्याजाने कोणी कर्ज का देईल असा प्रश्न मला पडल्यावर जास्त खोलात गेल्यावर हे समजले होते. ग्राहकांची खरेदी क्षमता वाढवण्यासाठी हे सगळं केले जाते.

कोणी शून्य टक्के व्याजाने कर्ज देत नाही.
ते एक आमिष आहे
कोणती ही वस्तू रोख रक्कम देवून घेणे आणि बजाज फायनान्स सारख्या आर्थिक मदत देणाऱ्या कंपनी कडून पैसे घेवून घेणे खूप फरक आहे.
१०००० ची रोख रक्कम देवून असणारी किंमत बजाज सारख्या फायनान्स कंपनी कडून पैसे घेवून घेतली की ती किंमत १३००० होते.
बाकी अनेक चार्ज वेगळे

यावरून एक जुना विनोद आठवला
एक पेपर विक्या पोरगा ओरडत असतो "बावीस जणांना फसवले, आजचा लोकसत्ता घ्या" एक माणून उत्स्सुकतेने तो पेपर घेतो तर पोरगा ओरडत पुढे जातो "तेवीस जणांना फसवले, आजचा लोकसत्ता घ्या"

विकुंना झब्बू.
एक वेडसर माणूस एका विहिरीजवळ उभा राहून विहिरीत बघत "बावीस..बावीस" असं म्हणत असतो. तिथून जात असलेला एक माणूस कुतुहलाने त्याच्याजवळ जाऊन विचारतो, "काय बावीस?" तर तो काहीच न बोलता विहिरीकडे बोट दाखवतो. हा माणूस विहिरीत वाकून बघायला लागतो. तेवढ्यात तो वेडसर माणूस त्याला आत ढकलून देतो.. आणि म्हणायला लागतो .."तेवीस.. तेवीस"

Pages