Submitted by काड्यासारू आगलावे on 1 July, 2022 - 08:03
मागे मला एका क्रेडीट कार्ड विकनार्या मुलीने सांगीतलं की क्रेडीट कार्ड फ्री आहे. मी विश्वास ठेऊन घेतलं नी १५०० रूपये पहीलं बील आलं जोईनींग फी म्हणून. त्या मुलीने नंतर फोन स्विकारणे बंद केलं, एसबीआय मधून मेल ला काहीही ऊत्तर आलं नाही. आता तीन महीन्याने ५००० रूपये मागतेय एसबीआय. मी देनार नाहीये. पण क्रेडीट स्कोर खराब केलाय त्या लोकांनी.
तुमच्या सोबत असा कधी कुठेतरी फ्राॅड झालाय का? मग त्यावेळी तुम्ही काय केले? पैसे, वस्तू परत मिळाली का?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझे ICICI Direct थ्री इन वन
माझे ICICI Direct थ्री इन वन खात्यात १२ वर्षांपूर्वी एक लाख जास्त दाखवत होते.मी रोजच्यारोज माझे ट्रेडिंग हिशोब ठेवत असल्याने एका दिवसात ना मला इतके प्रॉफिट झाले होते ना मी माझ्या खात्यातील शेअर इतक्या किमतीचे विकले होते. पुन्हा महिनाभरचे मागचे हिशोब बघितले तरीही हिशोब लागत नव्हता, शेवटी ICICI Direct च्या प्रतिनिधीला फोन केला त्याने काहीतरी चूक झाली हे कबूल केले. अजून महीनाभर जादा रक्कम दिसत होती, आणि एके दिवशी ती रक्कम माझ्या खात्यातून कमी झालेली दिसली. १२ वर्षांपूर्वी लेवरेज चांगले मिळायचे मी सहज ते ट्रेडिंगसाठी वापरू शकत होतो परंतु तो धोका पत्करला नाही.
असे खरोखर झाले होते का?
असे खरोखर झाले होते का? ज्याच्या खात्यातून ८१ लाख गेले तो गप्प बसला? आणि एवढी मोठी रक्कम स्लिपवर कशी काय पाठवू शकतात? चेक असेल ना? चेक वर तर आकडा व अक्षरे दोन्ही स्वरूपात लिहीले जाते ना? दिवसाचा हिशोब त्या त्या दिवशीच पुरा केला जातो. एस बी आय च्या कर्मचार्याने जर असा घोळ घातला असेल तर संध्याकाळीच त्यांना लक्षात आले असते. दुसर्या दिवशी कोणालातरी बॅकेत येऊन सांगायची गरज पडली नसती.
>>>>>>>>त्या बाईच्या अकाउंट वर ८१ लाख आल्या नंतर ती दुसऱ्याच दिवशी बँकेत आली , अर्धी स्लीप आपल्याला भेटते आणि चेक बँकेकडेच जातो .
ज्याच्या अकाउंट वरून गेले तो पण दुसऱ्या दिवशी आला असता .
फर्म चे पैसे असतील तर दोन चार दिवसांनी आला असता .
मुख्य म्हणजे माझी आणि एस बी आय ची दुष्मानी नाहीये
चेकचे पेमेंट एकाच
चेकचे पेमेंट एकाच कर्मचाऱ्याने हाणले असे होत नाही
दोघेतिघे असतात , मग शेवटचा माणूस एन्ट्री हाणतो, आणि तो नेहमी सिनियर असतो
रोजच्या रोज ताळेबंद
रोजच्या रोज ताळेबंद जुळल्याशिवाय घरी जाता येत नाही. चुकून कुणाला जास्तीचे पेमेंट झाले तर बॅंकेचे कर्मचारी संबंधितांना तुमच्या खात्यात चुकून रक्कम जमा झाली आहे ती परत करा असा फोन करतात. कारण त्या माणसाने पैसे परत केले नाहीत तर ते संबंधित कर्मचाऱ्यांकडून वसूल केले जातात.
मुद्दा हा आहे. 81 लाख जास्त पेमेंट झाले तर ताळेबंद कसा जुळेल?
स्लिप वर सुद्धा आकडे आणि
स्लिप वर सुद्धा आकडे आणि अक्षरे अशी रक्कम टाकावी लागते. त्या दोन्ही कॉलम मधे जर पाच हजार अक्षरी आणि अंकात रक्कम लिहिली असेल. तर तुमच्या मते जातपात सांगायची नाहीये, तरी ही रक्कम सोडून वरच्या कोपऱ्यात लिहिलेली तारीख रक्कम म्हणून कुणी विचारात घेईल का?
तुम्ही स्वतः स्लिप पाहिली होती का? नेमकी किती रक्कम ट्रान्स्फर झाली हे पाहिले होते का?
खरेच असे घडले असेल तरी मागचा विनोद म्हणून म्हणाला. असेल. ते कसे कळणार?
पण भारतात दुसऱ्याच कस्टमर
पण भारतात दुसऱ्याच कस्टमर च्या अकाउंट ला लाखो रुपये गेल्याची ही पहिलीच घटना नाही हो .
आणि बँकेचा रोजचा ताळेबंद मला वाटतंय फक्त कॅश चे असावे .

तुम्ही सगळेच असे बोलताय ,जसे की ते जास्तीचे पैसे मीच पाठवलेत ...
https://www.saamtv.com/national-international/960-crore-came-suddenly-in...
इथे तर ९६० कोटी पाठवल्याचे म्हणत आहेत .
वो बँक है , कूच्छ भी कर सकती है !
पैसे जर स्लिप भरून जमा केले
पैसे जर स्लिप भरून जमा केले तर टॅली करत नाहीत?
"बँकेचे स्टेटमेंट आणि दोन
"बँकेचे स्टेटमेंट आणि दोन जमीनदार हवेत " - आता जमीनदार कुठून शोधायचे? Wink Lol

Submitted by फेरफटका on 12 July, 2022 - 01:50
>>
कर्मचार्याने चुकून तारीख हीच
कर्मचार्याने चुकून तारीख हीच रक्कम समजून एन्ट्री केली तरी एवढी मोठी रक्कम सिनीयरने वॅलिडेट केल्याशिवाय ते ट्रॅन्झॅक्शन पूर्ण होत नाही. मेकर - चेकर ही पद्धत एका विशीष्ट रकमेच्या वर असतेच. ( आणि त्यातही एवढ्या मोठ्या रकमेचा व्यवहार वॅलिडेट करायची ऑथॉरीटी अजुन वरच्या व्यक्ति कडे असणार. तेव्हा जर चेकरच्याही नजरेतून हे सुटले असेल असे वाटत नाही कारण एवढी मोठा आकडा तीन तीन वेळा चेक केला जाईलच. आणि सुटले असेल तर कठीण आहे.
बाकी स्टेट बँकेत पी पी एफ असायला सेवींग अकाऊंटची गरज नाही. ऑनलाईन ट्रान्स्फर करता येते.
स्लिप वर सुद्धा आकडे आणि
स्लिप वर सुद्धा आकडे आणि अक्षरे अशी रक्कम टाकावी लागते. त्या दोन्ही कॉलम मधे जर पाच हजार अक्षरी आणि अंकात रक्कम लिहिली असेल. तर तुमच्या मते जातपात सांगायची नाहीये, तरी ही रक्कम सोडून वरच्या कोपऱ्यात लिहिलेली तारीख रक्कम म्हणून कुणी विचारात घेईल का?
तुम्ही स्वतः स्लिप पाहिली होती का? नेमकी किती रक्कम ट्रान्स्फर झाली हे पाहिले होते का?
>>>>>>>>
तो संवाद इतर ग्राहका समोरच चालला होता , त्यात मी ही होतो .
आता माझ्यावर एस बी आय तर्फे अब्रू नुकसानीची केस टाकू नका हो !
असे सहसा atm मध्ये घडते.पैसे
असे सहसा atm मध्ये घडते.पैसे काढले पण बाहेर आले च नाहीत आणि complaint दिली.तर जास्त पैसे account मध्ये येण्याची शक्यता असते .
अजून कोणाचं तसेच घडले असेल आणि complaint दिली गेली नाही तर .
ते पैसे पण आपल्या account madhy bank transfer करू शकते.
मागे एकाच्या खात्यात १५ लाख
मागे एकाच्या खात्यात १५ लाख आले. त्याला वाटले मोदीजींनीच पाठवले.
https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&url=https://www.tv9mara...
शाळकरी मुलांच्या खात्यात पैसे
शाळकरी मुलांच्या खात्यात पैसे glitch in the computerised system मुळे दिसत होते. प्रत्यक्षात आले नव्हते.
त्याच बातमीत पुढे Earlier this week, Rs 5.5 lakh were deposited into the account of a Khagaria man and he had refused to return the money saying he spent all the amount thinking that PM Narendra Modi sent it to him as the first instalment out of Rs 15 lakh as promised by the PM. The bank had filed an FIR against him following which the man was arrested.
वरच्या लिंक मधे असेही म्हटले
वरच्या लिंक मधे असेही म्हटले आहे
चेक्स अॅड मेजर्स असतात. त्यामुळे जरी असे काही घडलेच तरी बॅक कारवाई करते.
बातमीत कुणाकडून घोळ झाला हे लिहिलेले नाही.
5.50 लाख ट्रान्स्फर होण्याची
5.50 लाख ट्रान्स्फर होण्याची चूक ही एकच अकाउंट नंबर दोन व्यक्तींना मिळाल्याने झाली होती. दोघेही ते पैसे खर्च करू शकत होते.
Times of India तले वृत्त
Times of India तले वृत्त

तारीख ही रक्कम समजून जमा केली
तारीख ही रक्कम समजून जमा केली जाते हे अविश्वसनीय आहे इतकेच.
एकच अकाउंट नंबर मिळाला ही पण चूक आहे. पण ती घडू शकते हे पटण्यासारखे आहे. कंप्युटर एरर पण पटण्यासारखे आहे. समर्थनीय नाही.
Dead accounts मधील पैसे
Dead accounts मधील पैसे वापरले जातात हे उघड सत्य आहे.
बँके नी कोणाला ही किती ही जास्त पैसे दिले चुकून तरी .
ऑडिट मध्ये ते कधीच दाखवत नाही
जे अकाउंट वापरत नाहीत ..ते पैसे सर्रास लुटले जातात.
आणि ही काम कर्मचारी लोक च करतात.
सरकारी बँका अनेक नियमात बांधल्या गेलेल्या असतात.
त्यांना हे उद्योग करणे अवघड जाते.
पण खासगी बँका सर्रास करतात.
हर्षद मेहता लं घोटाळा करण्यास बँकांनी च बेकायदेशीर वित्तं पुरवठा केला होता.
हा इतिहास आहे.
डेड अकाउंटच का? सगळ्याच
डेड अकाउंटच का? सगळ्याच खात्यांतले पैसे वापरले जातात. पैसे वापरले म्हणजे बँक ते इतरांना कर्ज देण्यासाठी वापरते किंवा गुंतवते. त्यातूनच आपल्याला व्याज मिळतं.
अकाउंट वापरत नाहीत, ते पैसे लुटले जातात म्हणजे काय?
समजा मी पाच वर्षांनी बँकेत गेलो तर माझा बॅलन्स मी काहीही न करता कमी होईल का? (मिनिमम बॅलन्सची पेनल्टी वगळता?)
---------
हा प्रकार शेअर ब्रोकर करत. तुमच्या खात्यातले पैसे वापरून स्वतः उलाढाली करतात. त्यांच्यासोबतच्या करारात (म्हणजे आपण जो फॉर्म भरून देतो त्यात) तशी पॉवर त्यांना आपणच लिहून दिलेली असते.
योग्य तारण न घेता खूप मोठ्या
योग्य तारण न घेता खूप मोठ्या रक्कम चे कर्ज ऑडिट मध्ये का उघड होत नाहीत?
Rbi पासून कोणालाच बँक पूर्ण बुडे पर्यंत ते माहीत पडत नाहीत
ही जादू नाही.
ठरवून केलेला घोटाळा आहे .
आणि rbi जी राखणदार आहे तिच्या सहभाग नी.
Dead accounts अनेक वर्ष वापरत नाहीत
आणि खूप वेळा कोणी दावा पण करत नाही
ते पैसे जातात कुठे?.
आणि ही रक्कम खूप मोठी आहे
ह्या साडे पाच लाख मिळणाऱ्या
ह्या साडे पाच लाख मिळणाऱ्या अकाउंट धारकाने काही फसवी स्किम सांगून पैसे ढापलेले नाहीये की अजुन कसला कॉल करून स्कॅम नाही केलाय.
चुकीने २ऱ्या अकाउंट मधून स्वतःच्या अकाउंटमध्ये आलेली रक्कम जर रितसर खर्च केली तर गुन्हा कसा हे नाही समजले.
समजा मी पाच वर्षांनी बँकेत
समजा मी पाच वर्षांनी बँकेत गेलो तर माझा बॅलन्स मी काहीही न करता कमी होईल का? (मिनिमम बॅलन्सची पेनल्टी वगळता?) >> नक्कीच कमी होतील. खाते वापरले नाही म्हणून प्रत्येक ३ महिन्याला १०० + टॅक्स असे चार्जेस लागतील. जर बॅलन्स बराच असेल तर ठीक नाहीतर, पाच वर्षात मिनिमम बॅलन्स च्या पण खाली जाईल.
नाही.https://indianexpress
नाही.
https://indianexpress.com/article/business/banking-and-finance/no-penalt...
The RBI directed banks in 2012 not to charge customers for non-operation or activation of basic savings bank deposit accounts.
बाकी स्टेट बँकेत पी पी एफ
बाकी स्टेट बँकेत पी पी एफ असायला सेवींग अकाऊंटची गरज नाही. ऑनलाईन ट्रान्स्फर करता येते. >>>>>>>> धनश्री, अगदी बरोबर आहे. केवळ सोयीसाठी बचत खाते असलेल्या बँकेतच पीपीएफ खाते उघडायचे होते.
नाही epf साठी सरकारी बँक च
नाही epf साठी सरकारी बँक च लागते. हा नियम आहे
इपीएफ आणि पीपीएफ मध्ये फरक
Hemant 33 >>> इपीएफ आणि पीपीएफ मध्ये फरक आहे. जरा शोध घ्या म्हणजे सविस्तर माहिती भेटेल. आधीच मला मेडिकल व नॉनमेडिकल विद्यार्थ्यांना 'रिसर्च मेथोडॉलॉजी व बायोस्टॅटिस्टिकस' शिकवतांना घाम गाळावा लागतो, त्यात परत तुम्हाला इपीएफ आणि पीपीएफ मधला फरक मला समजावून सांगण्यात रस नाही.
तुम्ही सगळेच असे बोलताय ,जसे
तुम्ही सगळेच असे बोलताय ,जसे की ते जास्तीचे पैसे मीच पाठवलेत ... >>
दोन वर्षापुर्वी बजाज फायनान्स
दोन वर्षापुर्वी बजाज फायनान्स कडुन गृहपयोगी वस्तु खरेदीसाठी कर्ज घेतले होते. ते वेळेवर फेडलेही. कालपरवा कंपनीचा मेसेज इएमआय नेटवर्क कार्डचे ११७ रु. बँक खात्यातुन वजा होणार आहेत म्हणुन. आणि पैसे गेलेसुध्दा. बँकेत विचारले तर त्यांनी हात वर केले. कंपनीच्या नंबरवर कार्ड ब्लॉक करणेबाबत विनंती पाठवली तर नंतर प्रयत्न करा हे उत्तर मिळाले. शेवटी कसेबसे कार्ड ब्लॉक झाले. पैसे गेलेच. माझ्यासारखे १००० लोक मिळाले तरी कंपनीचा लाखाचा फायदा.
इएमआय नेटवर्क कार्डचे ११७ रु.
इएमआय नेटवर्क कार्डचे ११७ रु. बँक खात्यातुन वजा होणार आहेत म्हणुन>> म्हणजे काय?
इएमआय नेटवर्क कार्डचे ११७ रु.
नवीन प्रकार समजला.
Pages