तुमच्या सोबत कधी फ्राॅड झालाय का?

Submitted by काड्यासारू आगलावे on 1 July, 2022 - 08:03

मागे मला एका क्रेडीट कार्ड विकनार्या मुलीने सांगीतलं की क्रेडीट कार्ड फ्री आहे. मी विश्वास ठेऊन घेतलं नी १५०० रूपये पहीलं बील आलं जोईनींग फी म्हणून. त्या मुलीने नंतर फोन स्विकारणे बंद केलं, एसबीआय मधून मेल ला काहीही ऊत्तर आलं नाही. आता तीन महीन्याने ५००० रूपये मागतेय एसबीआय. मी देनार नाहीये. पण क्रेडीट स्कोर खराब केलाय त्या लोकांनी.
तुमच्या सोबत असा कधी कुठेतरी फ्राॅड झालाय का? मग त्यावेळी तुम्ही काय केले? पैसे, वस्तू परत मिळाली का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सकाळी सहज फिरायला गेलो होतो सायन सर्कल भोवती. साडे सातची वेळ.
रूपम थिएटर जवळ काफे आहे तिथे पाच दहा लोकांनी गराडा घातला मला अचानक.
"बस किधर है? पैसा वापस दो."
त्यातलाच एक जण म्हणाला
"अरे, ये वो नही है।"
मग बाकीच्यांनाही पटलं. सोडलं मला. नशीब कॉलर धरून शर्ट नाही फाडला.
त्यांना मी त्यांचा ट्रावेल एजंट वाटलेलो.

शॉपर्स स्टॉपमध्ये सिटी बँकेचं क्रेडिट कार्ड असंच घाईघाईत घ्यायला लावलं, फुकट आहे, तुम्हाला पॉईंट मिळतील, काहीच कागदपत्रे नकोत, फक्त एक सही करा असे म्हणून तो माणूस मागेच लागला होता. मीही घेऊन टाकलं. नंतर घरी आल्यावर साईट बघितली तर वर्षाला पस्तीस हजाराची खरेदी केली तर कार्ड फ्री आहे. आता काहीतरी हजार रुपये देणे आहे, जे मी कधीच भरले नाहीत. घरी त्यांची पत्रे येतात जी मी फाडून फेकून देते. सिबिल खराब झालाय हे मी लोन घेणार होते तेव्हा कळले. लोन तेव्हा घेतले नाही. ते कार्ड घेऊन आठ दहा वर्ष झाली असतील पण अजून बँकेची पत्रे येतात.

आम्ही पण ते घेतलं होतं.असंच फुकट फुकट सांगून गळ्यात मारून नंतर 175 रु इन्शुरन्स घेणार होते.मग सगळीकडे मेल लिहिली पुरावा म्हणून आणि त्याचे कात्रीने 4 तुकडे करून त्यांच्या चेक ड्रॉप बॉक्स मध्ये टाकून दिलं.अजूनही ते घ्या म्हणून सारखे गळ्यात लोक पडत असतातच.

असं कुणीतरी सांगितलं म्हणून कसं काय क्रेडिट कार्ड घेतात लोकं? मी स्वतः इनिशियट केलं नसेल, तर कुठलेच फायनांशियल ट्रान्सऍक्शन करत नाही.

छान विषय आहे.

क्रेडिट हिस्टरी तयारही व्हायला हवी (म्हणजे लोन घ्यायचे, हप्ते व्यावस्थित फेडायचे आणि पुन्हा नवे लोन घ्यायचे Happy ) आणि नेहेमीच चकचकीत ठेवायला हवी. पुढे कधी त्याचा त्रास होईल हे सांगता येत नाही विशेषत: लोन हवे असल्यास स्वत :च्या क्रेडिटला जपायला हवे.

<< असं कुणीतरी सांगितलं म्हणून कसं काय क्रेडिट कार्ड घेतात लोकं? >>
------ हो घेतात. आपण एका गरजूला मदत करत आहोत असेही काहींना वाटते. प्रत्येक कार्डचे त्या कार्ड विकणार्‍याला काही पैसे मिळतात, आणि घेणार्‍याचे काहीच नुकसान होत नाही जर कार्ड वापरलेच नाही तर (असे घेणार्‍या व्यक्तीला वाटते).

Alert -
तुमचा सर्व डेटा (नाव/ गाव/ पत्ता, email) कार्ड देणार्‍या कंपनीकडे/ व्यक्तीकडे दिला गेला आहे आणि ते त्या डेटाला वाट्टेल तसे वापरतील हे लक्षात ठेवायला हवे. बहुतेक प्रसंगी डेटा विकतातही.

हो बिझनेस करताना फ्रॉड होतातच. माझाच एक विश्वासू!!! हाताखालचा सेल्स मॅन वयस्क व एक हार्ट बायपास सर्जरी झालेला. मी महिन्याच्या खर्चाचे त्याला ७५००० देत असे. एकदा मी पैसे महिन्याच्या सुरुवातीस ट्रान्सफर केले व मुंबईला मीटिन्ग होती तिथे आले. तर ह्याचा मेसेज मी रिझाइन केले आहे म्हनून. म्हणजे माझे पैसे डुबले ना.

परत भेटला तर त्याच्या कानफटात लावुन उलटा टांगुन मिरचीची धुरी देइन.

नो लंचेस आर फ्री.आणि 'फुकट,अमका डिस्काउंट देणार,अमक्या डायनिंग ची कुपन,तमका हॉलिडे वर्षातून एकदा' अश्या मोहात हे हमखास विसरलं जातं.सांगून कार्ड घेण्याची गोष्ट 10-12 वर्षापूर्वी ची, जेव्हा इतका अवेअरनेस, बातम्या, व्हॉट्सअप पोस्ट नव्हत्या.
आताही अनेक फ्री क्रेडिट कार्ड वाले फोन येतात.सूर असा असतो की काय मूर्ख तुम्ही, इतकी चांगली ऑफर घेत नाही, फुकट तर आहे वगैरे Happy

मी हे धागे नेमाने वाचतो
कशाप्रकारे फसू शकतो याची खबरदारी घ्यावी तितकी थोडीच
इतकं करूनही आपण फसणार नाही याची खात्री नाही पण सावधगिरी बाळगलेली चांगली

झोमॅटो डिलिव्हरी माणूस पार्सल घेऊन आल्यावर म्हणतो, मॅडम थोडी टीप द्या ना. मी म्हटलं साईटवर देते टीप. साईटवर या लोकांना टीप देण्याचा पर्याय आहे पण ती टीप खरंच त्यांना मिळते का माहिती नाही. मी तक्रारही केली नाही झोमॅटोकडे. पाऊस सुरु होण्याच्या आधीची गोष्ट.

<< कशाप्रकारे फसू शकतो याची खबरदारी घ्यावी तितकी थोडीच
इतकं करूनही आपण फसणार नाही याची खात्री नाही पण सावधगिरी बाळगलेली चांगली >>

-------- एव्हढे करुनही फसविले गेलोच तर ?

आपण पुस्तक विकत घेण्यासाठी पैसे खर्च करतो, त्यातून काही शिकायला मिळते. तसेच या (फसवणूकीच्या वाईट ) अनुभवातून शिकायला मिळाले असे म्हणायचे, आणि शिकण्याची मोठी किंमत (वेळ आणि पैसा) मोजली असे म्हणायचे. कधी किंमत मोठी असते कधी छोटी...

अगदी आजचा म्हणजे तासभर पूर्वीचा अनुभव. आठ दिवसांपूर्वी घराचे जुने सेफ्टी गेट olx वर एक दिवसात विकले गेले व रोख पैसे मिळाले. आज दुपारी 1 वाजता मुलाच्या फॅटोम 21 गियर सायकलचे फोटो टाकले व 7000 रु अपेक्षा सांगितली.
अवघ्या 2 3 मिनिटात 2 3 मेसेज आहे, फोन no दिला व त्याने सायकल न बघताच ok आहे व पेमेंट ऑनलाईन करीन म्हणून सांगितले.

पाठोपाठ त्याचा फोन आला. आता मी व सायकल सांगलीत आणि तो अंधेरीला. मग मी असे कसे विचारले असता म्हणाला, हा माझा व्यवसाय आहे व सायकल तो 4 5 दिवसात माणसाकडून घेऊन जाईल.

त्याने सांगितले की ट्रायल म्हणून 2 रुपये पाठवलेत मिळाले का चेक करा. पाहिले तर 2 रुपये पाठवण्या ऐवजी 2 रुपये पाठवा अशी request आली होती. त्याला फोनवर झापले व त्याचा नंबर ब्लॉक करून टाकला.

सुदैवाने जाहिरात माझ्या फोनवरून, chat माझ्या फोनवर, प्रत्यक्ष बोलायला बायकोचा नंबर व पेमेंटसाठी मुलाचा नंबर असा द्रविडी प्राणायाम केला होता व मुलाच्या खात्यात फक्त हजारभर रुपये ठेवलेत, त्यामुळे न फसता होणारी संभाव्य फसवणूक टळली. शरद, सांगली

त्या olx अकाउंट ची नावेही साहिल कुमार व रवी कुमार, अशी काहीशी संशयास्पद होती व आत्ताच olx वर पाहिले तर दोन्ही खाती inactive असे दिसत आहे.

कृपया वस्तू विकून मिळणारे पैसे हे मुख्य व जास्त पैसे असलेल्या खात्यात मागवू नयेत कुणीही.

त्या olx अकाउंट ची नावेही साहिल कुमार व रवी कुमार, अशी काहीशी संशयास्पद होती व आत्ताच olx वर पाहिले तर दोन्ही खाती inactive असे दिसत आहे.

कृपया वस्तू विकून मिळणारे पैसे हे मुख्य व जास्त पैसे असलेल्या खात्यात मागवू नयेत कुणीही.

फेब्रुवारी महिन्यात मुलीला naturals ice cream मधून ice cream घेऊन बाहेर बाकड्यावर खात बसलो. एक आठ दहा वर्षांच्या मुलाने हाताने खुनवून ice cream मागितले. मला दया आली. कप द्या म्हणले तर मुलगा म्हणाला कोन पाहिजे.दिले. तर तो न खाता धूम ठोकून पळून गेला.. कोणालातरी द्यायला. मी counter वर त्या मुला बद्दल विचारले असता ते म्हणाले हा रोज खूप लोकांकडून घेतो.. मला काय बोलावे सुचले नाही.. माहिती नाही हि फसवणूक आहे?

Btw बरा झाला हा धागा काढलाय. एवढे दिवस हा प्रसंग कोणालाही सांगितले नाही, नवर्याला हा नाही. आता बर वाटतय.

अनेक कॉल्स येत असतात, मॅसेज येतात. माझा फोन नबर bsnl मधून पोर्ट केलेला आहे. वरकरणी नंबर bsnl सारखा दिसतो तर हे लोक bsnl navane मॅसेज करतात. आणि त्यात अमुक नंबरवर call करा असे लिहून.. मग काय net बंद करून call करायचा.. किमान 20 मिनिटांचा tp करून नंतर अशलाघ्य मराठी शिव्या घालून cut!

olx वर किंवा इतर कुठल्याही अश्या साईटवर जुन्या गोष्टी विकायला टाकू नये अश्या मताला मी पोचलो आहे. त्यापेक्षा फेकून द्याव्यात किंवा जवळपास कोणी घेत असेल तर फुकट द्याव्यात. होणारे फ्रॉड ही एक गोष्ट. तसेच एका विशिष्ठ धर्माचे लोक जास्त करून मागे लागतात असे वाटत आहे. ते लोकं लगेच कधी घरी येऊ असे विचारतात जे जरा ऑड वाटते. (कुठल्याही धर्मावर टिका करायचा उद्देश नाही पण नुकतेच देशातल्या दोन शहरात झालेल्या घटनांमुळे या धर्मातील अनोळखी लोकांपासून दोन हात दुरच बरे असे वाटत आहे).

थोडेसे मान्य, पण धर्मापेक्षा उत्तर प्रदेश, दिल्ली व बिहार या भागात हे ऑनलाईन कॉन आर्टिस्ट जास्त असतात असा अंदाज आहे.

आठ दिवसांपूर्वी माझ्या पत्नीच्या खात्यात गुगल पे द्वारे 5 मिनिटाच्या अंतरात एकदा 200 व एकदा 300 रुपये जमा झाले व पाठोपाठ फोन आला उत्तर प्रदेशातून की हे चुकून झालेत व परत द्या म्हणून.

पत्नीने संध्याकाळी देते म्हणून सांगितले पण त्या माणसाने सारखे हिंदीत फोन करून वात आणला. सुरवातीला हम गरीब है, गलती हो गयी अशी गयावया होती, नंतर संध्याकाळी धमकीच्या भाषेत बोलायला लागला. मग मी त्याचा नंबर ब्लॉक केला. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या फोनवरून त्याच्या बहिणीने सेम प्रकार चालू केला.

ते पैसे आमचे न्हवते व पचले सुद्धा नसते म्हणून मुलाच्या अकाउंट वरून परत पाठवून दिले. नावावरून तरी ही माणसे हिंदूच होती.

आयकियाच्या दुकानातून घेतलेल्या कपाटाच्या बिजागऱ्या वर्षभरात गंजून खल्लास झाल्या. त्यापेक्षा आमच्या सुकडू सुताराने बनवलेली कपाटं वर्षानुवर्षं टिकतात.

SBI चे क्रेडिट कार्ड खूप वर्ष पासून आहे .active पण केले नाही कधी.
वार्षिक फी मात्र भरत होतो.
काही दिवस पूर्वी card चालू करून वापरावे असे मनात आले.
त्यांची पद्धत काय आहे क्रेडिट देण्याची ही तरी माहिती होईल हा उध्येश.
एटीएम मधून पैसे निघतात हे बघण्या साठी 1000 रुपये काढले.
पैसे आले.
Sbi app pan इंस्टॉल करून ठेवले होते
त्या नंतर स्टेटमेंट बघितले तर
500 रुपये atm fees,igst 80 rupye .
एकूण देणे 1580 रुपये.
हा एक प्रकार च fraud ch आहे बँकांचा.
तो अनुभव घेतला.

SBI डेबिट / ATM कार्ड वापरून पैसे काढायचे असतात. क्रेडिट कार्ड ने काढले तर व्याज, प्रोसेसिंग फी, सर्विस चार्जेस लागतात. क्रेडिट कार्ड GE Capital तर्फै चालवले जाते, त्यामुळे एटीएम वापरण्यासाठी वार्षिक / लाईफ टाईम फी आकारली असेल. कस्टयर केअर ला फोन लावून माहिती घ्या. प्रत्येक वेळी आकारत असतील तर नक्की जास्त आहे.

हल्ली बॅंक डेबिट कार्ड ऐवजी मोबाईल App वापरून पैसे काढण्यासाठी आग्रह करते. ते सुरक्षित आहे.

एटीएम ची किंमत, जागेचे भाडे, चालवण्याचा खर्च बॅंकेने वाजवी दरात वसूल केला तर ती फसवणूक कशी काय होईल?

Olx वर खूप ठक आहेत.
त्यांची मुख्य स्ट्रॅटेजी आपण विकत असलेल्या वस्तूला किंमत महाग वाटली तरी पटकन ऍग्री करणे, qr कोड पाठवतो सांगून गुगल पे माहीत नसलेल्या लोकांना पैसे मिळतायत असं सांगून qr स्कॅन करवणे आणि पैसे घेणे असे नेहमी चे असतात.
मला अगदी विश्वासू सेलर असेल तरी qr स्कॅन करून पैसे भरायला आवडत नाहीत मोबाईल वरून.जी पे ला जाऊन फोन नंबर देऊन पे करणे बरे पडते.

मूळ मुद्दा असा की ऑनलाइन पेमेंट ची कामं शांत पणे करा. घाईत काहीतरी वेगळं करत असताना इकडे हे काम असं मल्टी टास्क नको.

एटीएम ची किंमत, जागेचे भाडे, चालवण्याचा खर्च बॅंकेने वाजवी दरात वसूल केला तर ती फसवणूक कशी काय होईल?

अजून त्यांनी 25 रुपये चार्ज लावला आहे अजून महिना पण पूर्ण झाला नाहीं

ठरवून काही महिने पैसे भरणार नाही.नक्की हे क्रेडिट कार्ड वाले किती लोकांना लुटतात ह्याचा मला अनुभव घायचा आहे.
18% व्याज त्यांच्या ॲप वर दिले आहे.
अजून काय काय चार्ज लावतात.
त्याचा अनुभव मिळेल.
क्रेडिट कार्ड म्हणजे खासगी सावकारी चे पण बाप असावेत असे मला वाटतं

खुलेआम लोकांची लूट.

>>> ठरवून काही महिने पैसे भरणार नाही.नक्की हे क्रेडिट कार्ड वाले किती लोकांना लुटतात ह्याचा मला अनुभव घायचा आहे.
कशाला स्वत:हून क्रेडिट स्कोअर खराब करून घेताय? बिल भरा, विषय मिटवा आणि कार्ड बंद करून टाका.

नुकताच मला आलेला अनुभव ;- whatsapp वर मेसेज आला की तुमचे इलेक्ट्रिसिटी चे बिल न भरले गेल्याने आज रात्री ९ वाजता वीज कापली जाईल व ते न व्हावे तर खाली दिलेल्या नंबर वर कॉल करा। काही कारणाने माझे वीजबिल थकीत आहे म्हणून मी मेसेज वाचताच घाबरले व रात्री वीज गेली तर त्रास होईल म्हणून त्या नंबर वर कॉल केला। तर तो नंबर बंगाली मध्ये बिझी होता असे कळले। मी लगेच gpay ने पेमेंट करू लागले अदानी ला पण नेट स्लो होता म्हणून प्रोसेस होऊ नाही शकले। मग मी विचार करू लागले तर त्या नंबर वरून मला समोरून कॉल आला। आणि मी डेस्परेट होते तर स्वतःहून "आप इलेक्ट्रिसिटी के ऑफिस से बात कर रहे हो ना"असे समोरून विचारले तर त्याने सांगितले कि ," हां, मैं इलेक्ट्रिसिटी ऑफिस से बोल रहा हूँ आपकी असुविधा ना हो इसलिये एक ऍप्लिकेशन Bill update quick support गूगल प्ले स्टोर से डाऊनलोड किजीये, फिर आगे कि प्रोसेस बताता हूँ। मी लगेच ते एप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी गूगल प्ले स्टोर उघडले आणि त्या ऍप्लिकेशन ची माहिती वाचू लागले। तर ते ऍप्लिकेशन एक मोबाईल मिररिंग करणारे होते मी लगेच त्या माणसाला म्हणाले कि " ये एप्लिकेशन तो गलत है और उसमे कुछ डिटेल्स डालने भी है तो मैं अदानी के ऑफिस में जाकर दे दूंगी " माणूस लगेच मला म्हणाला ठीक है मैं फोन रखता हूँ। मी लगेच अदानी च्या कस्टमर केअर ला कॉल लावून तक्रार केली कि असे fraud कॉल्स येत आहेत तुम्ही यावर ऍक्शन घ्या। तर कस्टमर केअर म्हणाले कि अश्या कॉल्सची आधीच कंप्लेंट्स झाल्या आहेत तुम्ही सावधान आणि सतर्क रहा।

अधिकृत website सर्व कंपन्यांचे आहेत.mseb पण योग्य माहिती online देते.
समोरून तुमची वीज कापणार आहे असे कोणतीच कंपनी सांगत नाही
त्यांच्या नियमात तुमची कृती नसेल तर ते वीज कापतात. न सांगता

हे लक्षात ठेवावे

अजून एका बाबतीत सर्वांनी सावध राहावे.
टीव्ही वर प्रतिष्ठित चॅनेल वर शॉपिंग च कार्यक्रम असतो.
चॅनेल हवी ती काळजी घेत नाहीत.
एका प्रसिद्ध चॅनेल वर तो शॉपिंग च कार्य क्रम चालू होता .
सहज त्यांनी दिलेल्या नंबर बर कॉल केला आणि योग्य वाटले नाही म्हणून कट केला.
त्या नंतर continue समोरून कॉल येत होते सर्व उत्तर भारतीय.
शिव्या देवून प्रतेक नंबर ब्लॉक केला पण विविध number वरून कॉल येत च होते .
शेवटी माझा च तो number airoplane मोड वर टाकला.
Fraud करणारे बहुसंख्य हे उत्तर भारतीय असतात..हिंदी कोणी बोलला ला की सरळ ब्लॉक करा.
कर्ज देणारी जी ॲप आहेत त्या धंद्यात सर्व दक्षिण भारतीय आहेत .नाव बघून संपर्क करा.

Pages