इथुन पुढे पाच दिवस आमचा दिनक्रम साधारण ठरलेला होता. ५ वाजता कोरा चहा, ६ वाजता नाष्टा, ७ वाजता त्या दिवशीच्या ट्रेकला आरंभ. आमच्या बरोबर आमचे ट्रेक लिडर, गाइड असणार होते आणि बाकीचा कंपू म्हणजे कूक, मदतनिस आणि आमचं सामान वाहून नेणारी खेचरं.
आमच्या बरोबर आम्ही पाणी, रेनकोट, थोडा कोरडा खाऊ, सुकामेवा अशा गरजेच्या गोष्टी घेऊन जायचो. सकाळी एकेकाने तंबूतून सगळं आवरूनच बाहेर पडायचो. इतकं वाकून तंबूमधे ये जा करणं एक दोन दिवसांत नकोसं होतं. तिथल्या मायका नावाच्या दगडांवरून वहात येणारं पाणी पचायला जड असतं. त्यामुळे उठल्या उठल्या एकदा आणि त्या शिवाय एक दोन वेळा टॉयलेट टेंट ला भेट द्यावी लागायची. सूर्य मावळला की गारवा वाढत जातो. त्यामुळे संध्याकाळीदेखिल जेवण, गप्पा, टॉयलेट टेंट भेट सगळं उरकूनच तंबूत sleeping bag मधे शिरायचं ते थेट पहाटे बाहेर हे रुटीन आपोआप बसतं. रात्रीचं जेवण ७ वाजता असल्याने ८ किंवा जस्तित जास्त ९ पर्यंत झोपलो की सकळी ४:३० लाच जाग यायची आणि बाहेरही उजाडलेलं असायचं. त्या गारेगार पाण्याने एक दिवस दात घासणे कार्यक्रम केला पण मग राहिलेले दिवस नुसत्या चुळा भरल्या. आंघोळीचा तर विचारही केला नाही.
तर आज पहिल्या दिवस तसा सोपा होता. ५ किमी चा रस्ता होता. तोही गावातून जात असल्याने इकडे तिकडे बघत, रमत गमत पोचलो. गावातून आल्यामुळे घरं, शेतं बघत मजा करत करत आलो. ताज्या लसणीचा गावात सगळीकडे घमघमाट होता. ओडोरी नावाच्या या पहिल्या कॅम्प साइटला पोचलो. नदीच्या कुशीतली कॅम्प साइट बघून जीव सुखावला
सगळ्यांचं फोटोसेशन, बागडणं सुरु झालं
आजचा दिवस असाच संपला. उद्या याहून जरा मोठा पल्ला होता आणि उंची वाढत जाणार होती. अजुनही हिमालयाचं दुरुनच दर्शन होत होतं. आज बिच्छु काटा अशा विनोदी नाव असलेल्या वनस्पतीची ओळख झाली. तिच्या काट्यांनी काही जणांना प्रसाद दिला. पण मग जवळच उगवणारी पालकासारखी दिसणारी दुसरी वनस्पती यावरचा उतारा आहे अशी महिती मिळाली. ती पानं चुरगाळून त्याचा रस चोळला की दाह कमी होतो. ओक्सीमीटरने माझा ऑक्सिजन नेमका पहिल्याच दिवशी जरसा कमी दाखवल्याने थोडी अस्वस्थ झाले. पण नंतर सगळे दिवस आकडे अगदी व्यवस्ठित होते.
हे असेच काही फोटो
डोंगर
नदी
सुंदर फोटो! पण जरा मोठे भाग
सुंदर फोटो! पण जरा मोठे भाग टाक ना.
वाचतेय... कॅम्प साईट फार मस्त
वाचतेय... कॅम्प साईट फार मस्त आहे.
लेखातच सुरुवातीला आधीच्या भागांच्या लिंक्स टाकल्यास इतर भाग शोधावे लागणार नाहीत.
छान सुरुवात.
छान सुरुवात.
आम्ही २०१४ मधे हा ट्रेक केला होता. वाचून, फोटो बघून त्या आठवणी जाग्या झाल्या. तुझी हरकत नसेल, असं गृहीत धरून माझ्या ट्रेक वर्णनाची लिंक देते आहे.
https://www.maayboli.com/node/52024
जरा मोठे भाग टाक ना. >> हो ग.
जरा मोठे भाग टाक ना. >> हो ग...काल घाईत लिहिलं जरा..आता मोठे लिहायचा प्रयत्न करते.
अनया, वाचते ग तुझा वृत्तांत. धन्यवाद
वा मस्त साक्षी
वा मस्त साक्षी
लिही भरपूर, छान वाटतय वाचायला
खूप सुंदर फोटो
खूप सुंदर फोटो