महाराष्ट्रातला "एक" राजकीय भूकंप consipiracy थोरी

Submitted by हस्तर on 23 June, 2022 - 07:48

महाराष्ट्रातला "एक" राजकीय भूकंप consipiracy थोरी

उद्धव साहेब आणि एकनाथ साहेब ह्यांनी मिळून हि खेळी केली आहे असे मला वाटतंय कारण
१) आमदार तयार आहेत मग सत्ता स्थापने ला विलम्ब का ?
२) ह्याच वेळी कोशियारी ह्यांना करोना कसा
३) एवढ्या मोठ्या संख्येने आमदार लगोलग कसे फुटले ?
आणि सगळ्यात मुख्य
पवार साहेब संथ कसे ? सत्ता ते गमावणार तर नाहीत

मुळात राष्ट्रवादी कडून विकास निधी मिळत नाही
पवार साहेबांना निधीसाठी आपल्या बाजूने वळवायचे म्हणजे महा कठीण
मग पहाटे ५ वाजताच शपथ विधी आठवला असेल ,बरेच लोक बोलतात कि शरद पवार ह्यांनीच अजित ह्यांना पाठवले ते बघून उठा साहेबानी तीच कल्पना उचलली
एकनाथ शिंदे फुटल्यावर पण पवार साहेब २ दिवसाने आले ,खरे पाहता सगळ्यात जास्त खाती त्यांचीच आहे ,जास्त नुकसान तयांचेच आहे

मुळात फक्त bargaining पॉवर आणून विकास निधी वळवायचे दिसते आणि त्यातही भाजपाला बकरा बनवले आहे

कारण शिवसेना भाजप कधीही एक होणार नाही इतकी मनें कलुषित आहेत
एकनाथ शिंदे ह्यांनी प्रति शिवसेना स्थापन केली किंवा स्वतः ला शिवसेना घोषित केले तरी मतदार त्याच्याकडं पाठ फिरवणार हे उघड आहे

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

हे अजून एक
...

सेना भाजप युतीचे सरकार बननार. एकनाथ शिंदेंचा प्रस्ताव ऊध्दव ठाकरे स्विकारणार. हे सगळे नाटक चालू आहे. सगळे आधीच ठरले आहे.
१) एकनाथ शिंदे बंड करणे शक्य नाही.
२) बंड केलेच तर 35 आमदार जाणे हे शक्य नाही.
शिवसेनेला भाजप बरोबर जायचेच आहे. अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाची संपली आहे. तसे ही करुन खुर्ची खाली करायचीच होती. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री घेण्यापेक्षा फडणवीसांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री घेतलेले चांगले. याचे फायदे असे.
१) उपमुख्यमंत्री पद
२) वाढीव मंत्री पदे.
३) केंद्रात एखादे मंत्री पद
४) ईडी पासून‌ चौकशी बंद होईल.
आणि सगळ्यात महत्वाचे सेना भाजप एकत्र येण्याचे कारण
५) *मुंबई महानगरपालिका ताब्यात राहणार.*
हे सगळे पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ठरवून चालले आहे. पब्लिक येड्यासारखी टिव्ही समोर बसून आहे. सेनेला भाजपकडे जाण्यासाठी ठोस कारण पाहिजे. ते कारण म्हणजे
*एकनाथ शिंदे*

सगळे आधीच ठरले आहे.>>>>> इथे पण का? Lol
क्रिकेट झालं, आता राजकारण झालं, अजून कुठे कुठे काय काय आधीच ठरलेलं आहे भौ? Proud

अपक्षांची मतं गृहीत धरली जाणार नाही”
“विशिष्ट गट स्थापन करण्याचं जे पत्र माझ्याकडे आलं आहे त्यावर ३०-३२ आमदारांच्या सह्या आहेत त्यातही संशय आहे. आमदार नितीन देशमुख यांनी ते इंग्रजी स्वाक्षरी करतात आणि पत्रावर त्यांच्या नावासमोर मराठीत स्वाक्षरी आहे असं म्हटलं आहे. त्यामुळे त्यावर तपासणी करावी लागेल. त्यावर अपक्ष आमदारांच्या सह्या असतील तर त्यांना त्याबाबत अधिकार आहे का याचाही विचार करावा लागेल. शिवसेना पक्ष म्हणून अपक्षांची मतं त्यात गृहीत धरली जाणार नाही,”

https://www.loksatta.com/mumbai/narhari-zirwal-comment-on-independent-ml...

सगळे पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ठरवून चालले आहे. पब्लिक येड्यासारखी टिव्ही समोर बसून आहे. >>+१११
आमदार मु्बैत येतो सांगुन फिरायला गेल्यासारखे आसामला रवाना होत आहेत. यातच सगळे काही आलं.

अजून कुठे कुठे काय काय आधीच ठरलेलं आहे भौ? Proud
नवीन Submitted by वैद्यबुवा on 23 June, 2022 - 18:19
>>>>

गेल्यावेळी बघितले ना अजित पवारांनी कसे बंडखोरीचे नाटक करून फडणवीसांचा गेम केला.
कि ते सुद्धा खरे वाटतेय तुम्हाला अजून?

काल पाहिले टीव्हीवर की मुख्यमंत्री वर्षा सोडून मातोश्रीवर निघाले आणि बघता बघता फुल्ल माहौल

मला तर बाहुबली आठवला जेव्हा त्याला राजघराण्यातून बेदखल करतात
कैसी है ये अनहोनी, हर आंख हुई है नम
छोड गया जो तू, कैसे जियेंगे हम..

सगळं वेल प्लान्ड वाटतेय...
फक्त साला प्लान कोण करतेय ते समजत नाही...
नसेना समजत.. च्यायला आपल्या डोक्याला शॉट कशाला.. आज तर सकाळपासून टीव्हीच लावला नाहीये मी

हे यांचे बुडणार्‍या वाघाचे ड्रामे बघण्यापेक्षा हा पोहणारा वाघ बघा...
https://www.youtube.com/watch?v=mPWPhpUR8NI

सेना च फुटेल असे कधी वाटले नव्हते.ती पण इतक्या मोठ्या प्रमाणात.

राजकारणी लोकांना किती किंमत द्यायची हे ह्या वर लोकांनी विचार करण्याची गरज आहे.
लोकांनी एकत्र येवून आपल्या विभागातील उमेदवार स्वतचं ठरवला पाहिजे.
सर्व राजकीय पक्षांना त्यांची जागा दाखवून देणे खूप गरजेचे आहे

थिअरी आवडली.

काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे बोललेल्या की राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ दे, पूर्ण पक्षाला देवीच्या दर्शनाला नेईल. तेव्हाच मनात पाल चुकचुकली की शाफुआ विचारांच्या ताई एकदम सामान्य हिंदू स्त्रीप्रमाणे देवीला नवस वगैरे वाट कशी काय चुकल्या.
त्यामुळे कदाचित हा गेम असावा. राष्ट्रवादीने मुख्यमंत्रीपद मागू नये म्हणून? असो. मुख्यमंत्री सेना किंवा राष्ट्रवादी कोणाचाही असला तरी चालेल. सरकारात हे दोन्ही पक्ष हवेत इतकंच वाटतं. शिंदेंकडे खरोखर two third आमदार असतील तर ते मुंबईत का येत नाहीत? त्यावरून आशा वाटते आहे की शिंदेंकडे संख्याबळ नसेल आणि हे सरकार टिकेल.
फडनविसची अवस्था अश्वत्थाम्यासारखी होणार की काय- तो तेल मागत फिरतो हे सत्ता मागत फिरणार.

काही लोक खूप खुश आहेत.
उद्योगपती,घोटाळे बाज,उच्च वर्णीय .
हे खूप खूष आहेत..
ह्या नालायक लोकांचाच पक्ष आहे bjp.
Kamboj यूपी चा इथे bjo नी तिकीट दिले .निवडणूक हरला तरी bjp च लाडका.
बँका बुडवून ते पैसे bjp वर उधळत आहे.

लोकांनी शांत राहून हे सर्व बंडखोर पुढल्या निवडणुकीत घरी बसवले पाहिजेत.
आणि bjp नी गरज संपली की ह्यांची योग्य ती जागा दाखवून दिली पाहिजे

गेल्यावेळी बघितले ना अजित पवारांनी कसे बंडखोरीचे नाटक करून फडणवीसांचा गेम केला.
कि ते सुद्धा खरे वाटतेय तुम्हाला अजून?
>>>>>>>>>>
मग ईडी सर्वात अगोदर अजित पवारांच्या मागे लागली असती . पण झाले उलटेच !
पवार सोडून बाकी चिल्लर पार्टी इडि धुवून काढत आहे ..

मला फोटो काढायचा मोह नाही. कधीच नव्हता.
कसलीच अपेक्षा नाही मला.
त्या निसर्गाने, वाघाने, हरणाने, ढगांनी, झाडांनी, पक्ष्यांनी माझ्या समोर येऊन मला सांगावे की नको करू आमची फोटोग्राफी.

तात्काळ सोडेन मी हा हातातील कॅमेरा.
फक्त त्यांनी समोरा समोर येऊन हे सांगावे.

- एक हवालदिल फोटोग्राफर !!!!!!!!

औरंगाबाद चे आमदार शिरसाट यांनी लिहलेले पत्र !

" पत्र लिहिण्यास कारण की...काल वर्षा बंगल्याची दारं खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी उघडली. बंगल्यावर झालेली गर्दी पाहून आनंद झाला. ही दारं गेली अडीच वर्षं शिवसेनेचे आमदार म्हणून आमच्यासाठी बंद होती.

"आमदार म्हणून बंगल्यात प्रवेश करण्यासाठी आम्हाला तुमच्या आजूबाजूला असलेल्या लोकांमधून, निवडून न येणाऱ्या विधानपरिषद आणि राज्यसभेत आमच्या जीवावर जाणाऱ्या बडव्यांची मनधरणी करायला लागत होती. हेच so called (चाणक्य कारकून) बडवे आम्हाला डावलून राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीची रणनीती ठरवत होते.

त्याचा निकाल काय लागला हे अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना स्वपक्षीय आमदार म्हणून वर्षा बंगल्यावर आम्हाला कधीही थेट प्रवेश मिळाला नाही. मंत्रालयाच्या सहाव्या माळ्यावर मुख्यमंत्री सर्वांना भेटतात पण आमच्यासाठी तर सहाव्या माळ्याचाही प्रश्न आला नाही, कारण तुम्ही मंत्रालयात कधी गेलाच नाहीत.
मतदारसंघातील कामांसाठी इतर प्रश्नांसाठी, वैयक्तिक अडचणींसाठी सीएम साहेबांना भेटायचे आहे अशी अनेक वेळा विनवणी केल्यानंतर वर्षा बंगल्यावर तुम्हाला बोलावलं आहे, असा निरोप बडव्यांकडून यायचा. पण तासनतास बंगल्याच्या गेटवर उभं केलं जायचं. बडव्यांना अनेक वेळा फोन केला तर बडवे फोन रिसीव्ह करत नसायचे. शेवटी कंटाळून आम्ही निघून जायचो.

"तीन ते चार लाख मतदारांमधून निवडून येणाऱ्या आम्हा स्वपक्षीय आमदारांना अशी अपमानास्पद वागणूक का हा आमचा सवाल आहे. हीच सर्व हाल अपेक्षा आम्ही सर्व आमदारांनी सहन केली. आमची व्यथा आपल्या आजूबाजूच्या बडव्यांनी ऐकून घेण्याची ही कधी तसदीही घेतली नाही. "
असे जर झाले असेल तर सेनेचे अवघडच दिसतंय !

कायच्या काय अपेक्षा

गेट किपर , वोचमन हे कमी शिकलेलेच असतात , पण ते कुणालाही अडवू शकतात

शिवाजी महाराज , चौकीदार , रात्र, मी नाही गेट उघडत जा !

गोष्ट विसरले का ?

राउत poised वाटत आहेत.
कुंटे-शिंदे चर्चा चलू आहे.
शिव्सेना म्हणे महासागर आहे. लाटा येतील- जातील. -राउत

शिवसेना HACK झाली बहुतेक
भाजपा सोडलं तेव्हापासून शिवसेनेची स्प्लिट पर्सनेलिटी झाली

खरा वैताग त्यानेच आणला आहे !
प्रत्येक पक्षात चांगले वाईट पुढारी असतात ,पण याचे कोणते कौशल्य पाहिले की याला प्रवक्तेपद आणि राज्यसभेची उमेदवारी द्यावी ?
ते ही जनतेतून कधीच निवडून आलेला नाही तरी ही ?
का काँग्रेस आणि राष्ट्रवादी मध्ये उत्कृष्ट मांडवली करून मुख्यमंत्रीपद मिळवून दिले म्हणून ?

शेणक्या संपादक सध्या फुल्ल फॉर्मात असल्याचा आव आणतोय , तेही येत्या महिन्याभरात चहातून माशी काढल्या सारखा त्याला बाहेर फेकला जाईल याची पूर्ण कल्पना असताना !
सेनेने धक्के भरपूर सहन केलेत पण पूर्ण आयुष्यात पक्षाची इतकी मानहानी झालेली नव्हती , अस्तित्वच संपते की काय अशा अवस्थेत पोहोचली आहे .....

चंद्रकांत पाटील बडं प्रस्थ आहे का? ते म्हणतायत की वेळोवेळी भाकीत केले की राऊतच, शिवसेना संपवतील.
राऊत तर निष्ठावान वाटतायत. बोलण्यातही संयत आहेत की.

असो. वेट & वॅाच

पुरे करते. माबोवर इतना सन्नाटा क्यों भाई?

बोलण्यातही संयत आहेत की.>>>>>>
Lol
कसला मोठ्ठा विनोद !
एखाद्याला हरामखोर , #त्या
म्हणणे संयतपणाचे की सटकूपणाचे लक्षण वाटते ?

मी आज पहील्यांदा रादर दुसर्‍यांदा, राजकारण फॉलो करतेय. गेल्या वेळेस एकदा जबरी कोलांट्या उड्या झालेल्या तेव्हा फक्त केलेले. नेहमी माबोवरच काहीबाही वाचते. पण सध्या घरात सगळेजण टिव्हीपुढे चिकटल्याने, मीही बघते आहे.
त्यामुळे आता गप्प बसते आहे. कळत नाही त्यात बोलू नये Happy
————
अजितदादा अनरीचेबल झाले तर खरी धमाल येइल Lol

मला वाटते शिंदे-ठाकरे समेट होइल.
बाय द वे हे वार्ताहार परतपरत हिंदीत कशाला रीपीट करायला लावतात? मुंबईत मराठी येत नाही यांना?
————
ठाकरे स्वतः का नाही जात गुवाहाटीला?

मला दोन - तीन दिवसांपासून पिंजरा सिनेमाची आठवण येतेय, व्ही. शांताराम यांनी पिंजरा' ही एका तत्वनिष्ठ, ब्रह्मचारी आणि आदर्शवादी शिक्षकाची केवळ एका तमाशातील बाईच्या नादी लागून व मोहाच्या पिंजऱ्यात अडकून झालेल्या त्याच्या नैतिक, आत्मिक आणि सामाजिक अध:पतनाची कथा चांगली रंगवलीय. ती पाहताना प्रेक्षकांचे मन हेलावते.

गुरुजी सुरुवातीला स्वतःला आदर्शवादी मास्तर समजत असतात, अशातच गावात तमाशा आल्यानंतर रागाने तमाशाचा तंबू पाडला जातो, त्यावेळी तमाशातील बाई मास्तरला शाप देते की,
"मास्तर, एक दिवस बोर्डावर तुणतुणं घेऊन नाय उभा केलं तर नावाची चंद्रकला नव्हं"

मग नंतर नंतर हे आदर्शवादी मास्तर त्या तमाशातील बाईच्या नादाला लागतात, प्रेमात पडतात, वाहत जातात आणि तमाशाच्या तंबूतच मुक्काम ठोकतात. आणि एक दिवस खरंच हातात तुणतुणं घ्यावं लागतं !

उठाजी इकडे राज्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर वर्षानुवर्षे टोकाची जहरी टीका करायचे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा त्यांना दर्प यायचा मात्र एक दिवस त्यांच्याच मांडीवर बसत सत्ता स्थापन केली, त्या मावा आघाडीच्या प्रेमात इतके वाहत गेले की आता हातात आपल्याच पक्षाच्या 55 आमदारां पैकी केवळ 4 - 5 आमदारांचे तुणतुणे राहिले आहे!

परवा रात्री वर्षावरून मुक्काम हलवत असताना "नका सोडून जाऊ रंगमहाल...." या पिंजरामधल्याच लावणीची मला प्रकर्षानं आठवण येत होती ! Happy

माझ्यासाठी एकेकाळचे "आदर्शवादी मास्तर आणि आदर्शवादी उठा " दोन्ही सारखेच

# forwarded

Pages