महाराष्ट्रातला "एक" राजकीय भूकंप consipiracy थोरी

Submitted by हस्तर on 23 June, 2022 - 07:48

महाराष्ट्रातला "एक" राजकीय भूकंप consipiracy थोरी

उद्धव साहेब आणि एकनाथ साहेब ह्यांनी मिळून हि खेळी केली आहे असे मला वाटतंय कारण
१) आमदार तयार आहेत मग सत्ता स्थापने ला विलम्ब का ?
२) ह्याच वेळी कोशियारी ह्यांना करोना कसा
३) एवढ्या मोठ्या संख्येने आमदार लगोलग कसे फुटले ?
आणि सगळ्यात मुख्य
पवार साहेब संथ कसे ? सत्ता ते गमावणार तर नाहीत

मुळात राष्ट्रवादी कडून विकास निधी मिळत नाही
पवार साहेबांना निधीसाठी आपल्या बाजूने वळवायचे म्हणजे महा कठीण
मग पहाटे ५ वाजताच शपथ विधी आठवला असेल ,बरेच लोक बोलतात कि शरद पवार ह्यांनीच अजित ह्यांना पाठवले ते बघून उठा साहेबानी तीच कल्पना उचलली
एकनाथ शिंदे फुटल्यावर पण पवार साहेब २ दिवसाने आले ,खरे पाहता सगळ्यात जास्त खाती त्यांचीच आहे ,जास्त नुकसान तयांचेच आहे

मुळात फक्त bargaining पॉवर आणून विकास निधी वळवायचे दिसते आणि त्यातही भाजपाला बकरा बनवले आहे

कारण शिवसेना भाजप कधीही एक होणार नाही इतकी मनें कलुषित आहेत
एकनाथ शिंदे ह्यांनी प्रति शिवसेना स्थापन केली किंवा स्वतः ला शिवसेना घोषित केले तरी मतदार त्याच्याकडं पाठ फिरवणार हे उघड आहे

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

हिंदुत्ववादी राज्यकर्ते हाच धंदा करतात.

दशरथाच्या गादीवर त्याचेच घराणे बसले
मुले होत नसतील तर यज्ञ , साधू , नियोग , दत्तक मार्गाने स्वतःचीच मुले बसवली

नवरा , पोर मेले म्हणून कुठली राणी सेनापतीला नव्हती बोलली , अरे वा छान झाले , आता तुझे पोर बसव खुर्चीत

पुस्तकांची नावे रघुवंश , हरिवंश , मराठा घराणे

आणो ह्याच लोकांनी जनतेला त्याग करणे शिकवले , जहागिरी नाकारली

आणि तरी लोक गांधी नेहरूंच्या नावाने बोंबलतात आणि हिंदुत्ववादी नेते घराणेशाही पाळत नाहीत म्हणून विश्वास ठेवतात.

काँग्रेसने सामान्य मनुष्याला घराणेशाही बनवण्यास वातावरण घडवले , सरकारी क्षेत्रात कायम नोकर्या निर्माण केल्या, पेंशनी दिल्या , लोकांना केंद्रीय नोकरी , राज्य नोकरी असे विविध पर्याय उत्पन्न करून दिले,

इबीसी सवलत दिली , मुले शिकून वेगळ्या क्षेत्रात निघून गेली , त्यांनी तिकडे करियर घडवले.

मुलींना , मागासाना आरक्षण दिले , संपत्तीचे विकेंद्रीकरण केले,

हे हिंदुत्वाच्या अगदी विरोधात आहे , हिंदुत्ववाद्यानी पुस्तकात छापले आहे म्हणे की हिंदुत्व टिकायचे असेल तर सामान्य जनतेस इतके गरीब करावे की ते जगण्यालाच फार मोठे बक्षीस मानू लागतील

ह्या ओळींचे लेखक , पुस्तक संदर्भ मिळू शकेल का ?

Proud

तेही तसलेच होते

त्यांना कुणी स्तोत्र म्हणून आरती थोडेच करतो !!

सत्तेची हाव असणारेच म्हणतात " मी पुन्हा येईन "
आणि जनतेचे खरे सेवक म्हणतात " मला सत्तेची हाव नाही "
दोन्ही काँग्रेसमध्ये त्या वेळी मुख्यमंत्रीपदावरून भांडण होऊ नये म्हणून यांनी तो काटेरी मुकुट स्वतःच्या डोक्यावर घेतला विशेष म्हणजे हे आश्चर्य आज पर्यंत कोणालाच माहीत नव्हते Happy
त्यामुळे खरे आदर्श राजकारणी फक्त उठाच !!!!
Happy

एखाद्या वेब सिरीजचे पहिले ३-४ एपिसोडस एकदम उत्कंठावर्धक झाल्यामुळे लोकांनी कामधाम सोडून बसावं आणि नंतर पुढचे एपिसोडस ढेपाळावे असं झालं आहे. काहीच घडेना. ते शिंदे किती दिवस असे लपून बसणार आहेत? तरी पवारसाहेबांनी दमदार एन्ट्री घेतल्यामुळे जरा excitement वाढली असावी. पण टीआरपी कमी होईल असाच वेळ काढत राहिले तर.
शिंदेंचं बंड थंड व्हावं हीच आशा आहे. हे सरकार आहे तसंच टिकावं. यांची धोरणं चांगली आहेत. उद्धवजींच्या लाईव्ह टेलिकास्टमध्ये तर ओळखीचे कोणी काका घरी गप्पा मारत बसले आहेत असा घरगुती फील आला. उद्धवजी तुम्ही सत्ता सोडू नका, पूर्ण राज्य तुमच्यासोबत आहे.
या ड्रॅम्यामुळे ते अग्निपथची controversy मागे पडली. मविआच्या तीन पक्षांनी मिळून परिषदेला त्या बिचाऱ्या दलित उमेदवाराना पहिली पसंती डिक्लेअर करूनही पाडून टाकलं तो वादही मागे पडला.
आता काहीतरी मजेमजेचं दाखवा. किती वेळा सोनाई पशुखाद्य खाणारी हट्टी लक्ष्मी बघणार प्रेक्षक.

Ed fakt महाराष्ट्रात,पंजाब,बंगाल मध्येच विरोधी पक्षातील नेत्यांवर कारवाई करत आहे.
आज पर्यंत एका bjp नेता किंवा त्यांचा मित्र यांच्या वर ed नी कारवाई केली नाही
Bjp चे सर्व नेते राजा हरिश्चंद्र ची ऑलाद आहेत काय.
केंद्र सरकार केंद्रीय एजन्सी चा वापर राजकीय फायद्या साठी सर्रास bjp करत आहे.

Ed fakt महाराष्ट्रात,पंजाब,बंगाल मध्येच विरोधी पक्षातील नेत्यांवर कारवाई करत आहे.
आज पर्यंत एका bjp नेता किंवा त्यांचा मित्र यांच्या वर ed नी कारवाई केली नाही
Bjp चे सर्व नेते राजा हरिश्चंद्र ची ऑलाद आहेत काय.
केंद्र सरकार केंद्रीय एजन्सी चा वापर राजकीय फायद्या साठी सर्रास bjp करत आहे.

Ed fakt महाराष्ट्रात,पंजाब,बंगाल मध्येच विरोधी पक्षातील नेत्यांवर कारवाई करत आहे.
आज पर्यंत एका bjp नेता किंवा त्यांचा मित्र यांच्या वर ed नी कारवाई केली नाही
Bjp चे सर्व नेते राजा हरिश्चंद्र ची ऑलाद आहेत काय.
केंद्र सरकार केंद्रीय एजन्सी चा वापर राजकीय फायद्या साठी सर्रास bjp करत आहे.
आज जे महाराष्ट्र मध्ये घडतं आहे ते पण केंद्र सरकार केंद्रीय एजन्सी चा वापर राजकीय फायद्या साठी करत आहे .
त्या मुळे लोकांच्या डोक्यात bjp जात आहे

ऑलाद >>>>>>
तीन वेळा पोस्टी टाकताय म्हणजे तुम्हाला ओलांदो , फ्रेंच शब्द म्हणायचे असावे Happy

बाकी सगळे जाउ द्या
शिन्दे हिन्दुत्वा मुळे गेलेत
तर अब्दुल सत्तार गुवहाटी ला कसे?

त्यांचा भाजप वर खूपच राग हो !
तसे पाहता ते पूर्वाश्रमीचे कट्टर हिंदू विचारवंत होते , पण हल्ली भाजप ने देशाची केलेली दुर्दशा पाहून त्यांचा भाजपवरील राग अनावर होतो Happy

बहुमत फक्त विधानसभेत सिद्ध होईल - इती काका !!!

१९७८ ला काँग्रेसचे ३८ आमदार फोडून वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून स्वतः मुख्यमंत्री बनण्याच्या अनुभवाचे बोल असावेत !!!!!
Happy

ते अजून एक गोष्ट नाही कळली ,
काका म्हणजे लै मोठे प्रोफेट आहेत का ?
न्हाही म्हणजे त्यांच्यावर टीका केली म्हणून १४ दिवस केतकी चितळे ला जेल मध्ये राहावे लागले !
ते ही दुसऱ्यांची पोस्ट फॉरवर्ड केली तरी ?

>>>>>>>न्हाही म्हणजे त्यांच्यावर टीका केली म्हणून १४ दिवस केतकी चितळे ला जेल मध्ये राहावे लागले !
ते ही दुसऱ्यांची पोस्ट फॉरवर्ड केली तरी ?
दुसर्‍यांची पोस्ट फॉर्वर्ड असो वा नसो ही तर शुद्ध दहशत झाली.
अर्थात मला याबद्दल माहीती शून्य आहे. फक्त तिला तुरुंगवास झाला एवढेच माहीत आहे . न्यायालयाने निर्णय दिला असेल तर माहीत नाही. न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च हे बाकी मान्य आहे.

तेच तर !
खरे म्हणजे त्या वेळी तिच्यावर पोलीस कारवाई न होवून देता मीडिया समोर फार तर तिला समज द्यायची होती , त्यामुळे काकाचा जनमानसातील आदर थोडाफार वाढला असता , पण गप्प बसून पोलीस कारवाईला एक प्रकारे समर्थनच दिले . शेवटी हाय कोर्टाने पोलिसांवर ताशेरे ओढून तिची मुक्तता केली आणि तिच्यावरील वेगवेगळ्या ठिकाणच्या केसेस बंद करायला सांगितल्या !
बरं यांचेच गुंड मंत्री सोमी वरील पोस्टसाठी कोणालाही बंगल्यावर नेऊन काळे निळे होई पर्यंत मारहाण करतात तेथे जाणता राजा चे विचार वेगळे असू शकतात ?

महा विकास आघाडी सरकार संकटात आले त्याचे वाईट वाटत नाही .
पण bjp केंद्रीय एजन्सी च वापर ज्या रीती ने करून देशात चुकीचा पायंडा पडतं आहे ते अतिशय धोकादायक आहे.
ह्या केंद्रीय agency's पण घरगडी असल्या सारखे का वागत आहेत.
केंद्रीय एजन्सी नी घरगडी होवू नये.नाही तर ed डायरेक्टर ल पण सत्ता धारी भांडी धूनी करायला लावतील घरात.

या केंद्रीय एजेंसी काँग्रेसच्या काळात बाहुल्या सारख्या वागत नव्हत्या असे तुमचे ठाम मत आहे का ?

>>>>>या केंद्रीय एजेंसी काँग्रेसच्या काळात बाहुल्या सारख्या वागत नव्हत्या असे तुमचे ठाम मत आहे का ?
पूर्वी घरगडी म्हणजे फॉरएव्हर घरगडी का??? का - का??? Wink

काँग्रेस च्या काळात म्हणजे इंदिराजी च्या काळात वागत असतील पण इतका अतिरेक तेव्हा पण त्यांनी केला नव्हता.
इंदिराजी म्हणजे तुफान लोकप्रियता .लोकांचा पूर्ण विश्वास त्यांच्या वर.
पण मोदी वर कुठे लोकांचा विश्वास आहे फक्त धार्मिक उन्माद निर्माण करून बहुमत आहे.

इंदिराजी ची निवडणूक रद्द करण्याचे धाडस तेव्हा पण न्यायालय नी दाखवले होते..
इतक्या लोकप्रिय नेत्या आणि सर्व सत्ता स्थान हाती होती त्यांच्या .तरी सुद्धा.
आता पण न्यायालय नी देश वाचवा वा

पण bjp केंद्रीय एजन्सी च वापर ज्या रीती ने करून देशात चुकीचा पायंडा पडतं आहे ते अतिशय धोकादायक आहे.>>ते ईडी वापरतात, यांनी सीआयडी वापरावी. जनतेला भ्रष्टाचार बाहेर येण्याशी मतलब.

समोर चा नालायक असेल तर आपण नालायक होणे योग्य नाही...
नाही तर राज्य सरकार पण मोक्का ,tada, दरोडा,ह्यांच्या केसेस आरामात bjp नेत्यांवर टाकू शकले असते...

कोर्टात जावून सुटले तरी चालले असते .पण काही महिने तुरुंगात नक्कीच गेले असते.

पण शिवसेना, पक्षाची मालकी कोणाची राहील? शिंदेंची की उठांची?
कारण एकांकडे (शिंदे) संख्याबळ आहे तर उठांकडे अ‍ॅक्च्युअल ओनरशिप आहे.

ठाकरे कडे च.
मालकी हवी असेल ,चिन्ह हवं असेल तर निवडणुकीत काही टक्के मत मिळावी लागतात.
असे आयत्या बिळवर नागोबा नाही होता येत.

त्यांना (उठा) बिचार्‍यांना कोव्हिडमध्ये स्पीचेस वर स्पीचेस द्यावी लागतायत. ते म्हणतायत की शिवसेनेचं वर्क-कल्चर मोकळेपणाचं आहे, त्यात त्यांनी (उठा) कधीही लुड्बूड (मायक्रो मॅनेजमेन्ट) केलेली नाही असे ते म्हणतायत.
असो!!

कारण एकांकडे (शिंदे) संख्याबळ आहे>> ५६ आमदार म्हणजे संपूर्ण पक्ष नाही. खासदार, नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, संघटना इत्यादी बरीच मोठी यादी आहे.

भाजपच्या खेळाला राजकारण किंवा चाणक्य नीती म्हणणे अयोग्य होईल. भाजप अत्यंत विखारी, कुटील कारस्थान करीत आहे. शेम.

एकनाथ शिंदेंनी सध्या आसामचे आमदार फोडून तिकडे सरकार स्थापन करावे. मग मजल दरमजल करन महाराष्ट्राकडे कूच करताना वाटेत लागणारी राज्य सरकारे फोडत फोडत आपले मांडलिक बसवावेत. हा पराक्रम पाहून मोदीजी भयभीत झाल्याशिवाय राहणार नाहीत. अडवाणींचे तळतळाट कामाला येऊन २०० खासदार चालत शिंदेंच्या पायाशी येतील. ते पाहून एनडीएचे मित्र पक्षही पाठिंबा देतील.
लागलीच केंद्र सरकार सुद्धा बनवून टाकावे. पंतप्रधान काय कुणालाही बनवले तरी चालतेय आता.
आणि मगच महाराष्ट्रातले सरकार बनवावे म्हणजे ईडी आणि सीबीआय काही वाकडं करू शकणार नाहीत. पूर्वीच्या काळी ज्याप्रमाणे जानकोजी शिंदे , महादजी शिंदे आणि त्यांच्या परिवाराने भारतात पराक्रम गाजवला तसेच हे शिंदेही इतिहासात अजरामर होतील. पावसाळा आलाच आहे तर त्यांना माबोतर्फे एक छत्रीही पाठवता येईल.

Pages