Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05
आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
किल्ल्याच्या बांधकामातील
किल्ल्याच्या बांधकामातील खांबावर हिंदू शैली मधील मुर्त्या का दिसत आहेत ?
कोणी जाणकार प्रकाश पाडील का ?
दौंड तालुक्यात भीमा नदी तिरी बाहदुरगड नावाचा व्यवस्थित किल्ला आहे हो. जिथे तिथे सातबारे शोधणे बंद करा.
टॉप गन - मॅव्हरीक पाहिला.
टॉप गन - मॅव्हरीक पाहिला. जबरदस्त पिक्चर आहे. पहिला टॉप गन पाहिलेला नसतानाही हा खुप आवडला. विमानांमधील चित्रीकरण (व्हीएफएक्स न वापरता केलेले) फारच उत्कंठावर्धक आहे. आणि फास्ट ठेवलेला आहे पिक्चर. पहिल्या प्रसंगापासून तुम्ही त्या वातावरणात - कथेमध्ये सामावून जाता आणि शेवटी पिक्चर कधी संपतो ते पण कळत नाही.
मलाही टॉप गन पाहायचा आहे.
मलाही टॉप गन पाहायचा आहे.
मला ही पाहायचा आहे !
मला ही पाहायचा आहे !
पण मी घरी बघणार , ott वर आल्यावर .
मस्त पैकी होम थिएटर चा आवाज करून !
मला दुसरा आवडला,
मला दुसरा आवडला, पहिल्यापेक्षा. पहिल्यात डॉगफाइट भरपुर आहे, ती थोडि कंटाळवाणी होते. दुसर्यातल्या ड्रामाला पहिल्याची पार्श्वभुमी आहे, आणि सॉर्टॉफ क्लोजर फॉर मॅवरिक. पहिला नेफिवर आहे...
पण मी घरी बघणार , ott वर
पण मी घरी बघणार , ott वर आल्यावर >> जितक्या मोठ्या स्क्रीन वर पहाल तितका जास्ती आवडेल आणि जास्ती मजा येईल. काही पिक्चर्स हे तुम्ही थिएटर मध्ये जाऊन बघण्यासारखेच असतात.
उदा. हिरोपंती २
उदा. हिरोपंती २
काही पिक्चर्स हे तुम्ही थिएटर
काही पिक्चर्स हे तुम्ही थिएटर मध्ये जाऊन बघण्यासारखेच असतात. >>>>>>>>>
नक्कीच , पूर्वी थियेटर मध्येच भरपूर पाहिलेत .
कालच सरसेनापती हंबीरराव बघून / सहन करून आलो . महाराजांवरील प्रेमा पोटी आणि मुलाच्या हट्टासाठी ! ( वय १३ वर्ष )
त्याने मार्वल ची सगळी सिरीज पहिली , पण टॉम क्रुझ चा एक ही नाही . टॉप गन चा विषय काढला तर , म्हणतोय पुन्हा हंबीरराव बघायला जावू .
त्या पेक्षा टॉप गन ची ott वर येण्याची वाट पाहिलेली परवडेल .
Meppadian -मल्याळम सिनेमा
Meppadian -मल्याळम सिनेमा पाहिला प्राईमवर. फैमिली थ्रीलर..विषय प्रॉपर्टी खरेदी-विक्री..
परिस्थिती अशी ओढवतो कि, जमिनीची खरेदी करणारा कथानायक जयक्रिशनन कंगाल होतो ..शेवटचा ट्वीस्ट पण मस्त.
इमोशनल आणि थ्रीलर सिनेमा.
बघतो वीकएंड... इंग्लिश सब
बघतो वीकएंड... इंग्लिश सब आहेत का मृणाली?
आहेत सबटायटल्स..
आहेत सबटायटल्स..
सुरूवातीला पंधरा वीस मिनटं थोडा संथ वाटतो सिनेमा त्या नंतर जी पकड घेतो ती शेवटपर्यंत.. वेगळे विषय,वेगळी हाताळणी, जोडीला नेहमी हिरवा गार निसर्ग हे मला मल्याळम सिनेमातच पाहायला मिळतं..
हिरोपंती २ पाहिला. साऊथचे
हिरोपंती २ पाहिला. साऊथचे फाईट सीन्स इथे ओशाळले. हातबाँब (ग्रेणेड्स) हिरोच्या आजूबाजूला काढून ठेवलेले असतात. त्या आधी तिथे सिनेमातच पंधरा मिनिटे म्हणजे कथेत लाईफटाईम दोन तीन तास धुव्वांधार हाणामारी झाल्यानंतर हिरोला बांधून ठेवले जाते. इतक्या वेळात कुणीही हॅण्डग्रेणेडस तिथे ठेवत नाही कि फेकत नाही. नवाजुद्दीन सिद्दीकी (लैला) "इसको डर नही लगा, इसलिए मरना कँन्सल" असा डायलॉग मारून जाऊ लागतो. मधेच मागे फिरून हिरो कडे बॉंबच्या पिना टाकतो. हिरो त्या झेलतो त्या वेळी त्याच्या लक्षात येते की " अरेच्चा ! या तर हँडग्रेनेडसच्या पिना "
यातलं सायन्स असं आहे कि जर पिन आधीच काढून ठेवली तर बाँब फुटत नाही. पण ती पिन जर हवेत फेकली आणि आपटली, झेलली तर मग बाँबला रिमोटचा झटका लागतो आणि तो फुटतो. यात दोनदा अशी दृश्ये आहेत. म्हणजे याचे सायन्स आपल्याला समजून घेणे गरजेचे आहे. टीका करायला अक्कल लागत नाही. समोरचा काय सांगतोय हे समजून घेऊन त्याच्याशी तादात्म्य पावणे ही प्रेक्षककला आहे. ती ज्याच्याकडे आहे त्यानेच असे चित्रपट पहावेत.
३१ मार्चला भारतात सगळे इन्कमटॅक्स जमा करतात म्हणून सीक्रेट प्लान एक्झेक्युट होणार असतो आणि लैलाच्या अकाऊंट मधे कितीतरी अब्ज करोड एव्हढे रूपये येणार असतात. हा सीक्रेट प्लान इंटरव्हलनंतर समजतो. ते म्हणजे भारतातल्या प्रत्येक बँकेचे अकाऊंट हॅक करणे. हाच जर प्लान होता तर त्यासाठी ३१ मार्च ही तारीख निवडायची काय गरज होती ? त्या दिवशी तर लोक इन्कमटॅक्स डिपार्टमेंटला पैसे ट्रान्स्फर करत असतात. उलट पैसे कमी झालेले असतात. इन्कम टॅक्सचं बँक अकाऊंट हॅक केले असते तर गोष्ट वेगळी होती. हे जे अर्थशास्त्र इथे वापरलेले आहे ते न समजल्याने मोठ्या आनंदाला मुकलो हे कबूल केले पाहीजे.
तलवारीचे घाव चुकवताना हिरोचा शर्ट नेमक्या जागी फाटून मग चिंध्या फेकून उघड्या अंगाने मसल्स शो करत मारामारी करणे हा सलमानी शिरस्ता पुढे चालू ठेवल्याबद्दल टायगर श्रॉफचे मनापासून आभार. काय आहे, परंपरा, रूढी अशा एकदम फेकून द्यायच्या नसतात. त्या मागे लांबचा विचार असतो. काटकसर काय फक्त नायिकांनीच करावी का ? पुरूषांना वळण लागायला नको ?
अॅक्शन हिरोला अभिनय करवा लागत नाही. थंड चेहरा या नावाखाली अॅटीट्यूड दाखवणारा अभिनय आला तरी पुष्कळ असते. एकीकडे नवाजुद्दीन काय आपला क्लास सोडत नाही, दुसरीकडे त्याच्या अभिनयाच्या उधळपट्टीला टायगर आणि त्याहीपेक्षा त्याची हिरवीन हसत असतात. अरे असा अभिनय मुक्त हस्ते उधळतात का ? लोणच्यासारखा मुरला की पुरवून पुरवून चवीपुरता वापरतात अभिनय.
यावर वेगळाच धागा पाहीजे खरं तर. पण फारेण्डला तरी किती कामाला लावा म्हणून खाली बसतो.
शांत मा
शांत मा
जेम्स बॉडचा कॅसिनो रॉयल
जेम्स बॉडचा कॅसिनो रॉयल पाहिल्यावर नंतरचे सिनेमे पहायचे राहीले होते. आता परत कॅसिनो पाहून एक एक संपवतोय. कालच spectre पाहिला. आता शेवटचा म्हणजे "no time to die" राहिला आहे. यात बाँड मरतो असे ऐकले आहे त्यामुळे पहायचा का नाही ते ठरवावे लागेल.
डॅनियल क्रेग च्या सिरीज मधले सर्व चित्रपटांची कहाणी एकमेकात गुंतली आहे व त्यामुळे पहायला छान वाटते. पण काही फाईट सिन्स बॉलिवूड किंवा टॉलिवूडला लाजवतील असे आहेत. उदा. spectre मधील ट्रेनमध्ये मारामारीत बॉड इतका मार खातो, एकदम गलितगात्र होतो पण रक्ताचा एक टिपूस नाही. पण लगेचच नंतरच्या सिनमध्ये प्रणयद्रुश्य एकदम उत्साहात ... spectre मध्येच शेवटी दोनवेळा व्हीलन बॉडच्या डोक्यात दोन बारीक ड्रील मारतो पण तिथूनही रक्त वगैरे नाही. या सिननंतर बॉड स्वतःला सोडवून घेऊन एकदम फुल एनर्जीमध्ये नंतर गोळीबार करतो. डोक्यात दोन छिद्रे (जी कवटीत मारली आहेत) त्याचा मागमुसही नाही.
स्पेक्टर बघा. रोम चे रस्ते व
स्पेक्टर बघा. रोम चे रस्ते व मोनिका बलुची एकदम फर्स्ट क्लास ती हिरवीण पण जबरी फिगर. नो टाइम टु डाय जरुर बघा. हा डॅनिअल क्रेगने प्रोडु स केल्याने त्याचे व्हॅनिटी शॉट्स खूपच आहेत. एकदम ल फडेबाज निर्दय जबाब्दारी झट कणारी व्यक्ती एकदम बाप झाली की अगदी वर्ल्ड बेस्ट
बाप वगिअरे कशी काय. मग कसिनो रॉयल मध्ये ती एक सुरेख बाई पहिल्यांदा मारली तिला काय पोरे बाळे नसतील काय. ती तर अनाथच झाली त्यांचा बाप ह्यानेच मारला. पण पिकचर छान आहे. एकदम हिरॉइक पद्धतीने मरतो तो. ह्याfunction at() { [native code] }ही तीच हिरवीण आहे. व तिचा ओपनिन्ग मधला व्हाइट ड्रेस एकदम चोक्कस. मुख्य म्हणजे टायटल साँग ऐका छान शब्द आहेत.
शांमा अजून असे लिहीत जा हो. लापि. भूल भुलैया २ वर लिहा. लै भारी पोस्ट.
काय योगायोग.. मी स्कायफॉल
काय योगायोग.. मी स्कायफॉल बघतोय...
शांमा, लिहीत रहा
शांमा, लिहीत रहा
बॉंड्या च्या सिनेमात असेही
बॉंड्या च्या सिनेमात असेही लॉजिक रानोमाळ हरवलेलं असतं
हिरोपंती ची चिरफाड भारी
सम्राट पृथ्वीराज बघून आलो
सम्राट पृथ्वीराज बघून आलो आताच. चांगल्या कथेची माती केलीय शुद्ध.
लहानपणापासून अंगुल अष्ट प्रमाण काहीतरी ऐकत आलेलो, यात सुलतान स्वतः जमिनीवर उतरून फालतुगिरी करतोय. घोड्यासकट शत्रूला कापणारे पृथ्वीराज ऐकून होतो, हे 50-55 किलोच मर्तुकडं शोभत नाही त्या भूमिकेत. काय ती नकली मिशी, किडुक मिडुक शरीर... कुणीतरी मजबूत अंगकाठीचा पाहिजे होता. त्यात काहीही बोलायचं तरी सम्राट पृथ्वीराज न वाटता राउडी राठोड बघतोय वाटत होतं. संजय दत्तने ऐतिहासिक भूमिका कधीच करू नये. कुठेतरी वाचलेल की बाजीप्रभू देशपांडेंची भूमिका साकारणार संजू बाबा.. देव करो आणि तो दिवस नको उजाडो!
९ वेळा घोरीला सोडलं होतं असं सगळीकडे वाचून ऐकून माहिती, (राजपूत इतिहास वाचलेला नाही) इथे एकदाच दाखवलेलं आहे.
शिवाय चित्रपटाच्या शेवटी पृथ्वीराज चौहाण शेवटचा हिंदू राजा असं म्हंटले आहे. No disrespect meant, पण बापाजाद्यापासून असलेलं राज्य सांभाळणारे पृथ्वीराज चौहाण यांच्यानंतर स्वतःच्या हिमतीवर राज्य उभे करणारे शिवछत्रपती राजे नव्हते असं म्हणायचं आहे का या फालतू लोकांना? अक्षयकुमारसुद्धा असं काहीतरी म्हटल्याचं Twitter वर पाहिलं..
असो. या निमित्ताने omg वेळी एबीपी माझावर आलेल्या ak चा व्हिडिओ आणि सोबत अभिषेक करणारा ak अशी पोस्ट व्हायरल होतेय.
, हे 50-55 किलोच मर्तुकडं
, हे 50-55 किलोच मर्तुकडं शोभत नाही त्या भूमिकेत. काय ती नकली मिशी, किडुक मिडुक शरीर...
>>>
कोण आहे? अक्षयकुमार झालाय का पृथ्बीराज ?
मी ट्रेलरही पाहिला नाही बहुतेक. वा पाहिलाही असेन.. हे सगळे पिक्चर मला एकाच छापाचे वाटतात.
काय रूनम्या...
काय रूनम्या...
प्रतिसाद एडिट केलास तरी प्रश्न का ठेवलास तसाच?
५०-५५ मरतुकडे वाचून कन्फ्यूज
५०-५५ मरतुकडे वाचून कन्फ्यूज झालेलो आणि तो प्रश्न मनात उठला.
पुढे अक्षयकुमार वाचले आणि कन्फ्यूज झालो. मीच ६४ किलोचा आहे आणि ५ फूट ७ ईण्च आहे तर अक्षय कुमार जास्तच वजनाचा असेल असे वाटले. अर्थात ती ऊपमा आहे अक्षयकुमार पृथ्वीराज यांच्या भुमिकेला साजेसा नाही हे मान्य.
तरी मग कुतुहलाने गूगल केली त्याचे मापे..
Akshay Kumar Height, Age, Wife, Family, Children, Biography & More · 185 cm · 1.85 m · 80 kg · 176 lbs · 54 Years.
शां.मा >> तुम्हीच लिहा. मस्त
शां.मा >> तुम्हीच लिहा. मस्त लिहीले आहे.
हे जे अर्थशास्त्र इथे वापरलेले आहे ते न समजल्याने मोठ्या आनंदाला मुकलो हे कबूल केले पाहीजे. >>> हा पॅरा सर्वात भारी आणि त्यातही बहुतांश किमान नोकरवर्गाचे फक्त "रिटर्न्स" तेव्हा जमा होतात ना? टॅक्सेस तर दर महिना ऑलरेडी कापलेले असतात
तो हॅकर मूळचा सीए वगैरे असावा. बॅंकेतून पोस्ट-टॅक्स पैसे चोरतोय. उद्या पकडला गेला तर किमान टॅक्स व फाइन भरावा लागणार नाही.
KGF chapter-2 पाहिला प्राईमवर
KGF chapter-2 पाहिला प्राईमवर.
मस्त सिनेमा.. काय एकेक ऐक्शन सीन्स आहेत..आवडला.
शामा , हसून हसून वाट
शामा , हसून हसून वाट
अर्थशास्त्र आणि तादात्म्य , भारी!
मी पंधरा मिनिटे बघितला, रोबोटच्या 'नैना मिले' गाण्यासारखं गाणं करायचा अपयशी प्रयत्न बघून बंद केला, तारा सुतारिया किती भंगार आहे. काय हसते काय नखरे करते, मधेच हा तिचा बबलू काय होतो, दुसरा किती लकी हे दाखवण्यासाठी एकमेकांना पप्पी काय देतात, देशोदेशींच्या गुंडांचं गेट टुगेदर काय दाखवतात, गेटटुगेदर मधे नवाज जादू दाखवून हिंदी बोलत पुढचा plan सांगतो आणि त्यांना सगळं समजतं...कैच्याकै आहे.
ट्रेलर पाहिला हिरोपंती टु चा
ट्रेलर पाहिला हिरोपंती टु चा.साऊथच्या एक दोन सिनेमांचं मिश्रण आहे..तो टायगर श्रॉफ चा भाल्यानं शर्ट फाडायचा सीन प्रभासच्या रेबल सिनेमातून उचललाय.
पियू, अमा, फेफ,, चॅंप,
पियू, अमा, फेफ,, चॅंप, फारएण्ड, अस्मिता आभार मानतो सर्वांचे.
शामा रिव्ह्यु भारी!
शामा रिव्ह्यु भारी!
हे 50-55 किलोच मर्तुकडं शोभत नाही त्या भूमिकेत. काय ती नकली मिशी, किडुक मिडुक शरीर... कुणीतरी मजबूत अंगकाठीचा पाहिजे होता. >>> ह्याला अगदिच असहमत, अक्षयकुमार त्याच्या समकालिन हिरोमधे सगळ्यात फिट आहे, तुम्ही केलेल वर्णन माबोवर जळीस्थळी काष्ठीपाषाणि ज्याचा विट येइल इतका उदोउदो चालतो त्या ह्रिरोला सुट होइल
पृथ्वीराज शेवटचा हिंदू राजा
पृथ्वीराज शेवटचा हिंदू राजा हे कदाचित अशा अर्थाने म्हटलं असेल की मुस्लिम राजवटीआधीचा शेवटचा हिंदू राजा.
पृथ्वीराज च्या निधनानंतर दिल्ली सल्तनत सुरू झाली .
आणि ती ब्रिटिशांनी बहाद्दरशहा झफरला हाकलेपर्यंत या ना त्या प्रकारे चालूच होती.
आपल्याकडे भारतात दिल्लीला सीट ऑफ पॉवर म्हटलं जातं. आजही आपली राजधानी दिल्लीच आहे. पंतप्रधान राष्ट्रपती सगळे तिथूनच देश चालवतात. तर या दिल्लीचा शेवटचा हिंदू राजा पृथ्वीराज होता. त्यानंतर तिथे कधीही हिंदू राजा बसला नाही.
विकिपीडिया नुसार घोरीला
विकिपीडिया नुसार घोरीला पृथ्वीराजने मारले नाही. घोरीने पुढे अनेक वर्षे सत्ता गाजवली.
Pages