सा रे ग म प मराठी : पुढचे पर्व

Submitted by Adm on 29 July, 2009 - 19:23

महाराष्ट्राचा आजचा आवाज नंतर झी मराठी ने सा रे ग म प चं पुढचं पर्व जाहिर केलयं. हे पर्व नवोदित गायकांसाठी असणार आहे. परवाच ह्याची निवडचाचणी मुंबई ला पार पडली. ह्या पर्वाचे बाकीचे डिटेल्स जजेस वगैरे (बहूतेक) अजून जाहिर झालेले नाहियेते. ( Black and white कार्यक्रमाच्या काही भागांमधे गायलेली गायिका स्वरदा गोडबोले हीची ह्या पर्वासाठी निवड झाली आहे).

हे पान ह्या पर्वातल्या गाण्यांविषयी गप्पा मारण्यासाठी.....

http://www.youtube.com/view_play_list?p=96710707C1C304CA ह्या लिंकवर सगळी गाणी पहायला मिळतील..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋतुजा - अभिलाषा याच काय त्या चांगल्या गात आहेत सध्या.
<< केदार,
उद्याचा एपिसोड पाहून निराश होउ नकोस मग, कोणाचा नंबर लागला असेल ते ओळखशीलच् !

या स्पर्धेत ज्याची सर्वाधिक गाणी मला चांगली वाटली तो स्पर्धक म्हणजे राहुल सक्सेना. त्यानंतर ऋतुजा लाड.
(या दोघांची गाणी झाली की पुढे गाणी ऐकण्याचा संयम डळमळायला लागतो.)

पल्लवीची ही चूक (जी बोलण्यात एकाद्या वेळी होते) काटछाटीत टाळता आली असती. पण आपण निम्मे महाराष्ट्रात आणि निम्मे अमेरिकेत जन्माला आलो असं बोलणं प्रत्येक वाक्यात दिसून येतं त्याचं काय करणार?

मी तिला सलग तीनचार वाक्यं अचूक मराठीत बोलताना पाहिलेली नाहीत. या कार्यक्रमाला Singing Comp किंवा तत्सम नांव असल्यासारखे चालू असते.

Are you ready?
How do you feel?
Would you like to say something?
Wonderful गाणं म्हणालीस....

ओह, मी ऋतुजा वाचलं होतं.

परदेसाई,
इंग्रजी लाइन्स मधे टाकणं एक वेळ परवडलं पण चुकीचं मराठी सर्वात जास्त इरिटेट करतं !

सहज एक विचार डोकावला मनात.. Little Champs आणि अताचे फायनलिस्ट यात कमालीचे साम्य आहे..

कार्तिकी - उर्मिला ( तीच तीच टाईपकास्ट गाणी म्हणणे , याला उर्मिला कमी, आणि अवधूत-सलील जास्त जबाबदार आहेत Sad )
प्रथमेश - ऋतुजा ( अभिषेकी बुवांची गाणी आणि नाट्यसंगीताचा पगडा.. उत्तम आवाज)
आर्या - अभिलाषा (गाण्यात वैविध्य आहे.. आवाज पण छान )
रोहित - राहुल (नावात पण सारखे पणा आहे.. स्वतःची वेगळी स्टाइल आहे गाण्याची)
मुग्धा - स्वरदा (वास्तविक मुग्धा तिच्या वयाच्या मानाने खुप चांगले गाते.. पण लाडिक/बालिश आवाज हे थोडेसे साम्य आहे Proud )

...

कार्तिकि(उर्मिला)-प्रथमेश्(ऋतुजा)-आर्या (अभिलाषा)कंपॅरिझन पटली !
राहुल -रोहित वेगळ्या जॉनर चे वाटतात, राहुल क्लासिकल मधे जास्त तयार आहे आणि मुर्किया वाली गाणी जास्त घेतो, रोहित जास्त करून रॉकिंग गाणी घ्यायचा.
स्वरदा-मुग्धा माहित नाही, स्वरदाची गाणी ऐकावीशी वाटत नाहीत अजिबात (पण मागच्या आठवड्यात ती उर्मिला-मृन्मयी पेक्षा खूप चांगली गायली.)

आर्या - अभिलाषा >>>> कैतरीच... !! आर्या खूप जास्त चांगली आहे...
अभिलाषा आणि राहूल (आणि उर्मिला पण) हे गरज नसताना अती डोक्यावर चढवलेले आहेत... गाणी सिलेक्ट करण्यावरून पण "आत" बरच पॉलिटिक्स चालतं हे तुम्हाला माहित असेलच.. Happy
अभिलाषा आणि उर्मिलाला आत्ता पर्यंत मिळालेली गाणी बाकीच्या स्पर्धकांशी (ऋतुजा, स्वरदा, मृण्मयी आणि फायनल मधे न आलेली मुले) कंपेर करा.. मग समजेल.. हेच पॉलिटिक्स लिल चँप मधेही बरच झालं होतं असं ऐकलं होतं...

कालच्या भागात मृण्मयी पहिल्या तीनात ? काहीही... खुप आधी जायला हवी होती ती बाहेर
मला तर अभिलाषा ने गायलेले, मी रात टाकली.. गाणे खुप आवडले.. राहुल बरा गायला.. बाकीचे सो सो..

ती तमिल भाषिक आजिबातच वाटली नाही..

अडम तुम्ही म्हणता तसे असेलही.. पण चांगला गायक असेल तर कुठलीहे गाणे असूदे, व्यवस्थितच निभावुन नेइल...
Lil Champs शत-हजार पटीने चांगले आहेत.. मला फक्त थोडा सारखेपणा जाणवला,.. History Repeats काय म्हणतात ते वाटले..

हे पर्व नक्की अभिलाषा जिंकणार, अगु आणि सकु दिवसेंदिवस फालतू बडबडीचे उच्चांक करत आहेत, 'गाणं अजून चांगलं झालं असतं' असं वाटलं पाहिजेच हे उषाताईंनी ठणकाऊन सांगितल्यावर सकुचं विमान जरा खाली आलं. पल्लवीबायचे कपडे सुधारले यावेळी, बोलणं पुढच्यावेळी सुधारेल अशी आशा बाळगूयात. नायतर महागुरू किंवा आदेशभावजींना घ्या बोलवून!
राहुल सक्सेनाने प्रथमेशचे 'सांगा मुकुंद कुणी हा पाहिला' एकदा ऐकावे आणि 'चूल्लूभर पानी' शोधावे. ती पोरं लैच भारी होती राव, शेवटचे पाच तर सोडाच पण आधी गेलेल्या शाल्मली, अवंती पातूर पण नाय जात हे आत्ताचे लोक.

राहुल सक्सेनाने प्रथमेशचे 'सांगा मुकुंद कुणी हा पाहिला' एकदा ऐकावे आणि 'चूल्लूभर पानी' शोधावे.>>>>>>> अनुमोदन!

अभिलाषाच जिंकली पाहिजे (गुणवत्ते नुसार.)
बाकी लावणी स्पेशल राउंड कशी ठसक्यात झाली पाहिजे पण अगदीच मिळमिळीत झाली !
मृण्मयी बेस्ट परफॉर्मर ?? Uhoh
अजिबात नाही पटलं, तिच्या आवजाबद्दल दुमत नाही, सुरेख आवाज आहे पण किती श्वासाचा आवाज, कापणारा सूर आणि बिचकत गाणं , अजिबात आवडली नाहीत तिची दोन्ही गाणी!
उर्मिला निदान लावणी मधे हमखास मारून नेइल असं वाटलं होतं पण सॉरी आज तर तिनी स्वतःच्या होम पिच वरही झीरो रन परफॉर्मन्स दिला..अर्थात जजेसनी तोंड फाटे पर्यंत स्तुति केलीच !
अभिलाषाची गाणी इतरांपेक्षा खूप चांगली झाली, पण आज चॅनल नी दाखवून दिलं कि अगदी उषाताई जरी परिक्षक असल्या तरी निर्णयात injustice होतोच आणि परिक्षकांच्या रुपात चॅनल च बोलते!
अवधूत महराजांनी छपरीपणाचा कळस केला या एपिसोड ला!

राहुल सक्सेनाने प्रथमेशचे 'सांगा मुकुंद कुणी हा पाहिला' एकदा ऐकावे आणि 'चूल्लूभर पानी' शोधावे. ती पोरं लैच भारी होती राव, शेवटचे पाच तर सोडाच पण आधी गेलेल्या शाल्मली, अवंती पातूर पण नाय जात हे आत्ताचे लोक. >> तुला २१ मोदकांची २१ ताटे.

काल उर्मिला असं काय गायली की तिला वन्स मोर मिळावा? आणि निव्वळ हसून गायली म्हणून मृण्मयीला बादलीभर गुण? इतके दिवस हे पर्व नव्हतो बघत तेच चांगले होते असे वाटले कालचा भाग बघून.

'सांगा मुकुंद कुणी हा पाहिला' एकदा ऐकावे आणि 'चूल्लूभर पानी' शोधावे >>>
प्रचंड अनूमोदन Happy , पण राहुल पेक्षा अभिलाषा आणि ऋतुजा सोडुन बाकिच्यांची गाणी टाकाउ झाली एकदमच !! ...

उषा मंगेशकरांना कुठुन आलो इथे असे झाले असेल.

अभिलाषाचं समईच्या शुभ्र कळ्या अतिशय अ‍ॅव्हरेज झालं.. ! तरी सलिलने ध दिला... आर्या फार सही गायली होती ते गाणं... मृण्मयी तिरोडकरची लावणी पण किती थकेली होती.. !!!!! अजिबात जानच नव्हती काही.. आणि तिला वरचा सा ! सलिलने बळच स्टेजवर वगैरे जायची नाटकं केली... स्वरदाच्या "शोधू मी कशी" मधे पण एनर्जी फारच कमी पडली तरी पण सगळे जज थ्रो चांगला होता आणि सुर कमी पडले का म्हणाले काय माहित.. ! स्वरदाचं "घायाळ मी हरीणी" मस्त झालं.. (आता वैशाली माडेच्या घायाळ मी हरीणी बद्दल डिजेने १७६२ व्यांदा लिहायच्या आधी मीच लिहितो.. :P) स्वरदाचं हे गाणं वैशालीपेक्षा बरच चांगलं झालं.. वैशालीच्या गाण्यात ऑर्केस्ट्रा नसला तरी स्वरदाचा आवाज जास्त चांगला लागला होता..

बाकीची गाणी घरी जाऊन पाहिन.. Happy

राहुल सक्सेनाने प्रथमेशचे 'सांगा मुकुंद कुणी हा पाहिला' एकदा ऐकावे आणि 'चूल्लूभर पानी' शोधावे. >>>> ह्याला अनुमोदन !!

आता वैशाली माडेच्या घायाळ मी हरीणी बद्दल डिजेने १७६२ व्यांदा लिहायच्या आधी मीच लिहितो.. स्वरदाचं हे गाणं वैशालीपेक्षा बरच चांगलं झालं..
वैशालीच्या गाण्यात ऑर्केस्ट्रा नसला तरी स्वरदाचा आवाज जास्त चांगला लागला होता..
<<<घ्या जे मी १७६१ वेळा लिहिलं ते तू नाहीच लिहिलस Biggrin
म्हणून १७६२ व्यांदा मलाच लिहु दे रे !
वैशालीचं गाणं इतकं flawless असून अवधूत गुप्तेला 'हरिणी' दिसली नाही वगैरे बहाणे करायचे होते Proud
(जो अवधूत अत्ता मृण्मयी-उर्मिला सारख्या अत्यंत सुमार गाण्यांना वरच्या पट्टीतले स्कोअर्स देतोय ).
बाकी स्वरदा आणि वैशालीची तुलनाच नाही, स्वरदाच्या चोरट्या आवाजातली गाणी आणि खरं तर तिचं फायनल मधे असणं यावर 'नो कमेंट्स' !

स्वरदा आणि अपूर्वा यांच्यात स्वरदाला ठेवून त्यांना दिलेल्या जबाबदारीची उघडउघड फसवणूक केल्याबद्दल अवधूत आणि सलीलला परीक्षक म्हणून ताबडतोब बडतर्फ केले पाहिजे!

स्वरदाची तुलना वैशालीशी???????????????????????????????????

किती घासून घासून गोड गुळगुळीत छापील बोलायचं त्याला काही मर्यादा ? ... स्वरदा आणि अपूर्वाची टाय ब्रेक गाणी झाल्यावर ही आजची सगळ्यात बेस्ट गाणी म्हणून सांगितलं ....??? :जांभया येणारी बाहुली:
इथे येऊन लिहायचा हल्ली अजिबात उत्साह वाटत नाही.खुद्द कार्यक्रमातील आणि त्या नंतर इथे लिहिलेलंही बरेचसे पटत पण नाही.
स्वरदाने 'या डोळ्यांची दोन पाखरे' फारच सुंदर म्हटले होते पण खरोखर स्वरदा आणि वैशालीची तुलना ? ( आणि तेही घायाळ मी हरिणीसाठी ? ) की वाद सुरु व्हावा म्हणून असं मत नोंदवलंस अडम ?
ह्या पर्वात कुणीच खणखणीत बिनचूक गात नाही हे खरं. पण अभिलाषा वेगळी अशा साठी वाटते की तिचा आवाज पार्श्वगायनाला अतिशय सुरेख आणि प्रत्येक गाण्यात तिची individuality जपते. वैशाली माडेचं ही तेच नव्हतं का ? कुठलंही गाणं ऐकलं तिच्या आवाजात की आधीचं मूळ गाणं पुसलं जाऊन तिच्या आवाजात ते लक्षात राहायचं. फार मोठी ताकद आहे ही.
पण अभिलाषा फार पटकन घसरते सुराला. वाईट वाटतं हे बघून.
वैशाली माडे सुद्धा हिंदी सारेगमप मध्ये बरेचदाच बेसूर होते. पण तरीही मराठी सारेगमपला सापडलेला हिरा आहे तो. ह्या पर्वातल्या कुणालाच तिची सर नाही येऊ शकणार !

अगो,
वैशाली बाबतीत आणि अभिलाषाच्या बाबतीतही अगदी अनुमोदन !
पण कधी १९-२० होत असले तरी वैशाली बेसूर नाही होत ग कधीच.. मराठी मधे आणि हिंदी मधेही कधीच नाही, In fact she's getting better and better.
श्रेया-सुनिधी नंतर वैशाली एकटीच खरोखर डिझर्विंग विनर आहे रिअ‍ॅलिटी शो ची , अगदी अशा ताईं पासून सगळ्या जजेस नी एकमतानी ठरवलेली!
'चम चम करता है ये नशीला बदन' वैशाली माडे आणि वैशाली सामन्त च्या दोघींच्या आवाजात लाइव्ह ऐकलय, वैशाली माडे सामन्त पेक्षा खूप छान गायली :).
कुलवधु चं टायटल साँग 'माझी डोली चालली गं' आज कालच्या कुठल्याही प्रोफेशनल गायिके इतकं (किंवा जास्त चांगलं) गायलीये.(हे तर नॉन मराठी friends ना पण प्रचंड आवडलं, खरच तेंव्हा त्यांचा विश्वास बसला नाही ही प्रोफेशनल गायिका नसून चॅलेंज २००९ ची फक्त एक स्पर्धक आहे यावर).
वैशालीला क्लासिकल मधे तयार नसल्यानी तिच्या मराठी पर्वात बर्‍या पैकी क्रिटिसिझम ऐकाव लागलं पण अता ती क्लासिकल मधेही जबरदस्तं तयार झालीये (तिच्या क्लासिकल ला पं. हरिप्रसाद चौरासीया, जगजीत सिंग, कविता क्रुष्ण्मूर्ति यांनी दिलेली दाद ऐकण्या सारखी आहे), विश्वास बसणार नाही कि ती क्लासिकल अत्ता अत्ता शिकायला लागलीये !
मराठी सारेगमप पेक्षा किती तरी तगडी काँपिटिशन हिंदी मधे तिला होती , अत्ता मेगा चॅलेंजमधेही आहे तरीही वैशालीने सगळ्या जजेस कडून बेटर असल्याची शाबासकी मिळवली.
ती जिंकण्या मागे मराठी-हिंदी मधे पॉलिटिक्स असेलही (जर असेल तर पहिल्यांदाच पॉलिटिक्स्मुळे खरोखर डिझर्विंग गायिला जिंकली:))पण वैशालीच्या जिंकण्या बद्दल कुठे बोलायलाच जागा नाही कि अजुन कोणी जास्तं डिझर्विंग होतं Happy
मराठी सारेगमप ची सायली वैशाली पुढे फार तर नं ५ आणि हिंदी मधली याशिता फार तर नं ८ होती !( हे मत अर्थात् काही लोकांना बायस्ड वाटु शकतं)
ज्यांनी पाहिले नाहीत त्यांनी मेगा चॅलेन्ज बीबी वर व्हिडिओ लिंक दिलेले तिचे परफॉरमन्सेस जरुर पहा.

असो.. वैशालीच्या फॅन्स साठी खुषखबरः
वैशाली स्वतःचा मराठी गाण्यांचा अल्बम लवकरच रिलिझ करतेय ( फेब्रुवारी-मार्च च्या आसपास).
संगीत निलेश मोहरिर चे आहे.(कुलवधु टायटल साँग चा संगीतकार).
शिवाय इतर मराठी -हिंदी चित्रपटां मधून प्ले बॅकही दिलाय.
आगामी केदार शिन्देच्या चित्रपटासाठीही गायली आहे.

स्वरदा आणि अपूर्वा यांच्यात स्वरदाला ठेवून त्यांना दिलेल्या जबाबदारीची उघडउघड फसवणूक केल्याबद्दल अवधूत आणि सलीलला परीक्षक म्हणून ताबडतोब बडतर्फ केले पाहिजे!
<<<< अगदी !!
अवधूत ला तर बर्‍याच कारणांसाठी कधीच बडतर्फ करायला हवं होतं पण looks like अवधूतचेही फॅन्स आहेत ! Sad

पुन्हा थोडेसे विषयांतर...

>>>>
पण आपण निम्मे महाराष्ट्रात आणि निम्मे अमेरिकेत जन्माला आलो असं बोलणं प्रत्येक वाक्यात दिसून येतं त्याचं काय करणार?
मी तिला सलग तीनचार वाक्यं अचूक मराठीत बोलताना पाहिलेली नाहीत. या कार्यक्रमाला Singing Comp किंवा तत्सम नांव असल्यासारखे चालू असते.
<<<<

विनय, मी तुमचे हे पोस्ट वाचल्यावर मुद्दाम पल्लवीचे बोलणे नीट ऐकले आणि मला कळले तुम्ही काय म्हणताय ते. पण गंमत म्हणजे नंतर मी सलील आणि अवधूतचे बोलणे पण त्याच मापाने ऐकले आणि कळले की गोष्ट अजिबातच वेगळी नाही! जवळजवळ प्रत्येक मराठी वाक्यात २-३ इंग्रजी शब्दांची पेरणी केलेलीच आहे. उदा. सलीलची ही वाक्ये पहा: "किती शांतपणे एकेक note गायलेली आहे. अप्रतीम composition आहे अण्णा जोशींचं... त्याच expressionचं हे गाणं आहे. तुझ्याकडे जे advantage आहे - तुझं age तुझा innocence तो सगळा याला उपयोगाला आला. जसा माणूस मोठमोठा होत जातो तसा तो innocence हरवत जातो आणि मग ही गाणी गायला फार जास्त concentration करायला लागतं.... Very good." आणि अशीच अनेक इतर वाक्ये!

सलील आणि अवधूत गाण्यांनंतर जे ३-४ मिनिटं बोलतात त्यात त्यांनी वापरलेले हे काही इंग्रजी शब्द. मी २-३ गाण्यांनंतर नाद सोडला पण यावरून अंदाज यावा.

सलील : attempt, background, arrangement, suspense element, judicially, expression, music director, compulsory, all the best, jerky, throw, start to end, specific, maybe, excitement, energy, mood, feel, almost, follow........

अवधूत : composition, overall, hold-notes, vibrato, fantastic, form, batsman, over, run, I can understand, या stageला, concentration, improve, participants, balance, level, final, confidence, minor, including, energetic, rock style, sound, full, hit......

आता बोला!

वैशाली माडे अभिलाषाइतकी नक्कीच बेसूर होत नाही. पण तिची स्पर्धा स्वतःशीच आहे. मराठी सारेगमप मध्ये तिचे सूर जितके खणखणीत लागत होते तितके हिंदीत सुरुवातीला तरी लागत नव्हते ( सध्या तिची फार गाणी नाही ऐकली ) पण ती ज्या जिद्दीने आणि कष्टांनी स्वतःचं स्थान निर्माण करायला बघतेय त्याला तोड नाही. ह्या बाकीच्या स्पर्धकांना बक्षिसाची रक्कम मिळो ना मिळो, राहो अथवा जावो फारसा फरक नाही पडत. वैशालीसाठी तो उपजिविकेचा प्रश्न होता.
वैशाली सामंत म्हणजे दैवाने साथ दिलेली व्यक्ती कुठल्याकुठे पोहचू शकते ह्याचे उत्तम उदाहरण आहे ! तिची गाणी तिला न मिळता दुसर्‍या चांगल्या गायिकेला मिळाली तर सोनं करेल त्याचं असं जवळजवळ प्रत्येक गाण्याला वाटतं.
वैशाली माडेला खूप चांगली गाणी गायला मिळो आणि तिच्या गुणांची योग्य कदर होवो अशी तीव्र इच्छा आहेच Happy

चाफ्या(पुन्हा एकदा विषयांतर, वि.पू. डिसेबल केलीयेस म्हणून)
अशा ताईंची वाट पहात होतास ना, ग्रँड फिनाले ला (सारेगमप चा १००० वा भाग)१२ डिसेंबर ला आशा ताई असणार आहेत परीक्षक (इतर अनेक मान्यवर परिक्षकां बरोबर.)
बाकी मेगा चॅलेंज चे स्पॉयलर तिथेच पहा, खूप विषयांतर इथे नको :).

वैशाली स्वतःचा मराठी गाण्यांचा अल्बम लवकरच रिलिझ करतेय >>
सह्ही... आवडेल ऐकायला तिची गाणी Happy

रच्याकने, पल्लवी ताइ परवा 'ने मजसी ने' हे गाण, अवधूत आणि सलील पेक्षा हजारो पटीन चांगल गायली आहे Proud
ह्या पर्वात कुणीच खणखणीत बिनचूक गात नाही हे खरं. >> प्रचंड अनूमोदन

स्वरदाच्या चोरट्या आवाजातली गाणी आणि खरं तर तिचं फायनल मधे असणं यावर 'नो कमेंट्स' !
>> दीपांजली अगदी माझ्या मनातल... माझी पण या वर 'नो कमेंट्स' Proud

की वाद सुरु व्हावा म्हणून असं मत नोंदवलंस अडम ? >>>> काय संबंध ?????????? वर उर्मिला आणि अगदी पल्लवीचे चहाते सुद्धा आहेत... मला स्वरदानी गायलेलं एखादं गाणं वैशाली पेक्षा जास्त आवडलं हा सर्वस्वी माझ्या आवडीचा प्रश्ण आहे.. तुला किंवा इतरांना ते पटत नसेल तर तसं सांगा (जे डिजे, चाफा आणि केदार ने लिहिलेलच आहे) किंवा गप्प बसा.. वाद घालायला कोण सांगतय ?? आणि वैशालीच्या त्या एपिसोड मधे (ऑर्केस्ट्रा नसलेल्या) पण मला तिच्यापेक्षा सायली पानसेचं गाणं जास्त आवडलं होतं हे मी ह्याच बीबी वर आधी लिहिलेलं आहे....ते शोधून वाचू शकतेस हवं तर.. असो.. !

त्या इलिमिनेशन बद्दल म्हणाल तर उत्तम मार्क्स मिळून अपूर्वा डेंजर झोन मधे येणं आणि सुमार मार्क्स असून मृण्मयी पहिल्या तिनात येणं हेच मुळात हास्यास्पद होतं...

>हेच मुळात हास्यास्पद होतं...
थोडक्यात काय तर सर्वच हास्यास्पद आहे. Happy
गेल्या काही महिन्यातली ईथली चर्चा पल्लवीच्या पोटावरून आता ओठांवर (शब्दांवर) घसरली (?) आहे तर.. चालू द्या... Happy

Pages