सा रे ग म प मराठी : पुढचे पर्व

Submitted by Adm on 29 July, 2009 - 19:23

महाराष्ट्राचा आजचा आवाज नंतर झी मराठी ने सा रे ग म प चं पुढचं पर्व जाहिर केलयं. हे पर्व नवोदित गायकांसाठी असणार आहे. परवाच ह्याची निवडचाचणी मुंबई ला पार पडली. ह्या पर्वाचे बाकीचे डिटेल्स जजेस वगैरे (बहूतेक) अजून जाहिर झालेले नाहियेते. ( Black and white कार्यक्रमाच्या काही भागांमधे गायलेली गायिका स्वरदा गोडबोले हीची ह्या पर्वासाठी निवड झाली आहे).

हे पान ह्या पर्वातल्या गाण्यांविषयी गप्पा मारण्यासाठी.....

http://www.youtube.com/view_play_list?p=96710707C1C304CA ह्या लिंकवर सगळी गाणी पहायला मिळतील..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संपदा, गाण्याची लय कमी केली आहे की गं. उर्मिलाचा आवाज छान लागलाय, पण काही शब्द फारच तीव्र वाटले कानाला. कोरसबद्दल न बोललेलंच चांगलं. Happy

आज पाहिली काही काही गाणी..
उर्मिलाचा आवाज कोंबडी पळाली ला एकदम सुट झाला पण गाणं ठिकठाकच...
अभिलाषाचं कांदेपोहे खूप वाईट.. कुठे ते अवंती पटेलने गायलेलं आणि कुठे हे..
आभिलाषाचं प्रभो शिवाजी राजा पण ठिक ठिकच... उच्चार खूप खटकले..
बाकी ग्रुप गाणी चांगली झाली.. जयोस्तुते, आनंदाचे डोही आनंद तरंग आणि टायटल साँग..

>>कुठे ते अवंती पटेलने गायलेलं आणि कुठे हे..
अनुमोदन ! कांदेपोहे हे माझ्यासाठी अवंतीचेच गाणे आहे. Happy

तुम्ही अवंति पटेल म्हणजे original singer म्हणताय का? कांदेपोहे म्हणजे तेच 'आयुष्य हे चुलीवरल्या ..' हेच गाणं ना? अवधूत गुप्तेचं आहे ना ते आणि सुनिधी चौहान ने म्हंटलंय ना?

हो पिक्चर मधे सुनिधी चौहानने म्हंटलय.. लिल चँप मधे अवंती पटेलने म्हंटलेलं.. आणि तेव्हाच मी पहिल्यांदा ऐकलं होतं...मला तरी ते सुनिधी पेक्षा अवंतीच्याच आवाजात जास्त आवडतं..
सुनिधीचा आवाज कर्कश्श वाटतो खूप..

नंद्या , गाण्याची लय कमी केलीये , पण अजयच्या लयीत आणि ते सुद्धा ओपन एअर मध्ये गाणं मला केवळ अशक्य वाटतं . त्याचा आवाज म्हणजे मोठी रेंज आणि मार्दव असं अजब मिश्रण आहे . त्यामुळे तो जेव्हा एखादं गाणं गातो , जे केवळ त्याच्यासाठी बनलेलं असतं तेव्हा त्यात वर उल्लेख केलेल्या गोष्टी जाणवतात . पण जेव्हा एखादी गायिका ते गाणं गाते , तेव्हा जर तिने आवाजाचा थ्रो कमी केला नाही तर तेच गाणे तीव्र होते . सायली पानसे जेव्हा " आई भवानी तुझ्या कृपेने " गायली होती , तेव्हा ते सुद्धा बरेच तीव्र वाटले होते . सांगण्याचा मतितार्थ असा की उर्मिला ज्या आत्मविश्वासाने गायली ते मला सॉलिड आवडले . ( हे माझे स्वतःचे प्रामाणिक मत . ) Happy

कोरस , पल्लवी , सलील अवधूत , इ. इ. अनुल्लेख करण्यायोग्य . Happy

अजय अतुलचा विषय निघालाय म्हणून अजून एक लिंक देतेय . सारेगमप मध्ये हे दोघे जज म्हणून आलेले असताना अजयने "अप्सरा आली "चा मुखडा गायला होता . झी मराठी जे एपिसोड्स अपलोड करते , त्यात हे गाणे नव्हते . म्हणून मी अनेक ठिकाणी चौकशी केली होती , तर एकाने हा व्हिडिओ मला मेल मधून पाठवला होता . अजयचे वर्जनसुद्धा सिनेमात वापरले असते तर ? ( मी अजून नटरंग पाहिला नाही . त्यामुळे मला या प्रश्नाचे उत्तर सापडलेले नाही . Happy मूळ अप्सरा आली गाणे मी कैकवेळा ऐकलेय ,पण हे वर्जन किंबहुना त्याहीपेक्षा अजून जास्त वेळा ऐकले . Happy )

http://www.youtube.com/watch?v=hZdrbWZIyzs

४.५० मिनिटांपासून गाणे सुरु होते .

मला उर्मिलाची गाणी विशेष आवडली नाहीत.. त्यातल्या त्यात 'माझिया प्रियाला' हे गाणे चांगले गायले...
'अर्ध्या राती'.. हे गाणे याच पर्वात आकांक्षा देशमुख मस्त गायली होती..

सगळ्यांचीच ड्युएट गाणी मस्त झाली.. पण सगळ्यात आवडलेला भाग म्हणजे विजय चव्हाण आणि मंडळीनी सादर केलेले डमरु आणि ढोलकी वादन... काय जबरदस्त वाजवलेय... दिल खुष एकदम.

अरे! हा निकाल तर काही महिन्यांपूर्वी या बाफच्या पहिल्या दुसर्‍या पानावरच लिहिला होता की लोकांनी इथे Happy

आशूडी केवळ आपणच नव्हे Sad तर सलिल, अवधूत, पल्लवी, आणि मलातर वाटतं स्वतः ऊर्मिलाही Sad होती काल. विठ्ठल उमप प्रमुख पाहूणे म्हटल्यावरच कळला होता निकाल. अर्थात मैत्रेयी म्हणते त्याप्रमाणे याच्याही कितीतरी आधीच कळला होता निक्काल!

लोकसत्ता मधली बातमी - "उर्मिलाने आपल्या खडय़ा आवाजात ‘खंडेरायाच्या लग्नाला’ गायले." मला खडा आवाज म्हणजे वेगळा वाटायचा आधी ('मोरया मोरया' मधला अजयचा वगैरे आहे तसा)

कार्तिकी हे गाण किती छान म्हणाली होती

आशू वाईट नको वाटून घेऊस... जे घडणार होते तेच घडले आहे.... हे सगळे आभिलाषाचे वडिल म्हणाले तसं ईश्वराच्या कृपेनेच घडलेले आहे...
झी वाले महाराष्ट्रातल्या... रादर मुंबईतल्या दोन अत्यंत प्रबळ राजकीय पक्षांविरोधात जाणे शक्य नाही.. त्यांना मुंबईतच राहून झी चे कार्यक्रम तयार करून सादर करायचे आहेत....
काल ते बिचारे आयडीयाचे प्रमुख आले होते त्यांना तर मराठीच बोलाच्या नावाखाली काही बोलूच दिले नाही.... तरी त्यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले होते की माझे मराठी चांगले नाही....

असो काल प्रत्यक्ष अंधेरीच्या क्रीडासंकुलात बसून हा कार्यक्रम बघायची संधी मिळाली.. अभिलाषाच्यामुळे.. ती पुण्यात होती तेव्हा ५ वर्षे माझ्या आजोबांकडे म्हणजेच मनाकु१९३० ह्यांच्याकडे गाणे शिकत होती.. त्यामुळे कालच्या कार्यक्रमाला उपस्थित राहता आले.. आजोबा दिसले असतीलच तुम्हाला टी.व्ही.वर.. तसेच मी पण दिसलो असेन अधून मधून... मागच्या पायर्‍यांवर बसलेला.. जिथे बर्‍याच वेळा नाचणार्‍या लोकांवर कॅमेरा येत होता तिथे...

एकूण कार्यक्रम ठीक झाला... आधी गायलेलीच गाणी परत गायला लावून नक्की काय होते हेच कळत नाही.. जी गाणी ह्यांनी म्हणली आहेत तीच परत परत का? हा खूप मोठ्ठा प्रश्न पडलाय मला.. नविन गाणी बसवायला वेळ नाही.. की कशाला आता नविन गाणी गायला सांगायची.. का लोकांना पुनःप्रत्ययाचा आनंद मिळावा अशी चॅनल वाल्यांची इच्छा असते...

जाता जाता.. उर्मिला आता हिंदी सारेगमप मध्ये डायरेक्ट जाणार... परत कार्तिकी नको व्हायला म्हणजे मिळवली... तसे होण्याचे चान्सेस खूप आहेत तरीपण उगाच आपली एक आशा...

सम्पल ना हे पर्व? कळ्ळ आम्हाला आजच्या वर्तमानपत्रातून कोण जिन्कल ते! Happy
श्श्या, फारच शिळ्या बातम्या छापतात बुवा! Proud
(आमच्या घरी सर्वानुमते सारेगमप पर्व ब्यान करण्यात आले होते!)

लिंब्या.. बातमी कालच्याच सकाळ मध्ये आली होते कोण जिंकले त्याची.... आता तुमच्या कडे सकाळच बॅन असेल तर काय करणार...

हो कोण जिंकणार हे माहितच होत!!! झी ने तो अंदाज शेवटी खरा केला.... वाटल होत ह्या वेळेस निकाल मना प्रमाणे लागेल असो..... anyway जसे आर्या, प्रथमेश ने मनात घर केल आहे तसेच आभिलाशा ने सगळ्याना जिंकुन घेतल आहे... तिचा पुढचा प्रवास छानच होइल.....

झी वाले महाराष्ट्रातल्या... रादर मुंबईतल्या दोन अत्यंत प्रबळ राजकीय पक्षांविरोधात जाणे शक्य नाही.. त्यांना मुंबईतच राहून झी चे कार्यक्रम तयार करून सादर करायचे आहेत....
>>>> अगदी अगदी...

>>>> आता तुमच्या कडे सकाळच बॅन असेल तर काय करणार...
आयला, तू कस ओळखलस? आमच्यात सकाळवर केव्हाच बहिष्कार टाकला आहे!

बायदिवे, मी कालचा न्युजपेपर वाचला सन्ध्याकाळी, वर लिहीताना चूकुन सवईने आजचा असा उल्लेख झाला
खर तर आजचा पेपर सध्याकाळी घरी गेल्यावर वेळ मिळाला अन पेपर सापडला तर वाचिन! Happy
(पोर लहान होती तेव्हा रोजच्या पेपरची तशी वाट लागायची, आता पोरे मोठी झालीत, दूसर्‍या तर्‍हेने काहोईना, वाट लावतातच! )
हल्ली सोनीवर गेले दोन आठवडे आजवरचे सर्व सीआयडी इश्युज दाखवतात, ते बघत अस्तो!

कोणते ते मुम्बैतले प्रबळ(????) राजकिय पक्ष?

आत्ता पुढचे पर्व कशाचे असणार आहे? लिटील चँप झाले, आजचा आवाज झाला, ६० वयोवर्षे असलेल्यंसाठी चे पर्व झाले. आत्ता गृहिणी स्पेशल (याला "भावोजी" पाहिजेत सूत्रसंचालक म्हणून) करतील. किंवा मग राजकारणात साइड्लाइन झालेले (राजकीय वनवासात असलेल्या उपेक्षितांचे जसे की दादा, भाउ, आण्णा, तात्या इ.इ. ) भव्यदिव्य पर्व Uhoh

का सलिल्-अवधूत नंतर आता नृत्यविशारद "महागुरुंची" मुक्ताफळे ऐकायची Sad

Pages