सा रे ग म प मराठी : पुढचे पर्व

Submitted by Adm on 29 July, 2009 - 19:23

महाराष्ट्राचा आजचा आवाज नंतर झी मराठी ने सा रे ग म प चं पुढचं पर्व जाहिर केलयं. हे पर्व नवोदित गायकांसाठी असणार आहे. परवाच ह्याची निवडचाचणी मुंबई ला पार पडली. ह्या पर्वाचे बाकीचे डिटेल्स जजेस वगैरे (बहूतेक) अजून जाहिर झालेले नाहियेते. ( Black and white कार्यक्रमाच्या काही भागांमधे गायलेली गायिका स्वरदा गोडबोले हीची ह्या पर्वासाठी निवड झाली आहे).

हे पान ह्या पर्वातल्या गाण्यांविषयी गप्पा मारण्यासाठी.....

http://www.youtube.com/view_play_list?p=96710707C1C304CA ह्या लिंकवर सगळी गाणी पहायला मिळतील..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी काही कळत नसले तरी अधून मधून हा शो बघतो.>> का बघता? Happy

' तुम्ही स्थानबद्ध व्हा Proud

हे असले प्रकार एडिट करताना सुधारता आले असते>> ह्म्म्म.. गोयलच चॅनेल आहे ते.. Sad

आज कोणाची विकेट पडणार... रादर स्वरदा रहाणार की जाणार...

जर झीवाल्यांनी गेल्या वेळेसारखे केले तर शेवटचे तीन...
स्वरदा
राहुल
उर्मिला....
आणि कितीही चांगले गाऊन अभिलाषा आणि अपूर्वा बाहेर...

अपुर्वा,
ह्म्म, मला वाटलेच होते. ती लो रिस्क टारगेट होती.
पुढच्या वेळी स्वरदाला काढु शकले नाहीत (तिला इतरांपेक्षा चौपटीने एस एम एस येतात) तर राहुल किंवा अभिलाषा!

फायनल -
स्वरदा, उर्मिला, राहुल्/अभिलाषा

विनर्-उर्मिला

IMO स्वरदा जिंकणे हा सर्वात वाईट रिझल्ट असेल, उर्मिला निदान एका genre मधे तरी चांगली गाते/गायची.

आज अभिलाशा गायली जीव घेणा रुसवा की फसवा हा अबोला>>>हे गाणं वैभवच्या कमलेश भडकमकरनी केलेल्या नवी स्पर्शगंध या अल्बममधलं होतं मी शेवटी आजचा आवा मध्ये ऐकलं जबरीच गायलं वाटतं .

अपूर्वा जाणं म्हणजे अतिच झालं . स्वरदाच विनर होणार असं दिसतंय Sad ... ( मागे मी कुठेतरी असंच पोस्ट लिहिलं होतं .... Happy )
आज अजय अतुल होते का ? की उद्या आहेत ?

स्वरदा जिंकणे हा सर्वात वाईट रिझल्ट असेल >> खर आहे अगदी Sad
पण स्वरदाला सगळ्यात जास्त मतं मिळत आहेत.. त्यामुळेच ती टिकुन राहिलीय..

अभिलाषा काय अ प्र ति म गायली 'मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले कि बारा'.
राहुल चं खेळ मांडिला पण मस्तं.
नटरंग बघायची फार उत्सुकता लागलीये, अजय अतुल जबरदस्तं आहेत , हॅट्स ऑफ !!
अमृता खानविलकर च 'वाजले कि बारा'- सोनालीचं 'अप्सरा आली' बघतानाही सुरेख वाटलं..!

स्वरदा किंवा उर्मिला ह्या पैकी कुणिही जिंकल तरी तो वाईट रिझल्ट असेल. अभिलाषा च जिंकली पाहिजे !! (IMO)

स्वरदाच विनर होणार असं दिसतंय ... ( मागे मी कुठेतरी असंच पोस्ट लिहिलं होतं .... )>>>>
संपदा, आज्-काल ज्या पद्धतीने अवधुत स्वरदा च कोतुक करत असतो तेव्हाच मला तु इथे लिहिलेल पोस्ट आठवलं Happy आणि तुला डोक्याला हात लावुन बसलेलं imagin केल.

कालच्या एपिसोडच्या सुरुवातीचे " सप्तसूर झंकारित बोले " आत्ताच पाहिले . गाणे सुरू झाल्यापासून स्वरदाचे डोळे आणि लक्ष फक्त आणि फक्त गाण्याचे शब्द असणार्‍या समोर ठेवलेल्या वहीवर होते . अभिलाषाने सुद्धा तिच्या पावलावर पाऊल ठेवत वहीत वाचतच गाणे म्हंटले . अपूर्वाने मोजून ३ - ४ वेळा वहीकडे बघितले , राहुल सुद्धा अधून मधून बघत होताच , तो वहीच्या समोरच उभा असल्याने नक्की कधी वहीत बघतोय हे ( मला ) कळत नव्हते . Proud उर्मिलाने मात्र केवळ एकदा त्या वहीत पाहिले , जे मला नक्कीच कौतुकास्पद वाटले . Happy

उर्मिलाचे " कैवल्याच्या चांदण्याला " मला आवडले , नेहमीची उर्मिला मला त्यात ऐकू आली नाही . तिचा थ्रो , आवाजातली फिरत मस्त होती . गाण्यात भडिमार शब्द आहे बहुतेक , जो ती बडिमार म्हणत असल्यासारखे मला वाटले .

राहुलचे " देवाघरचे ज्ञात कुणाला " प्रामाणिकपणे आणि मनापासून गायलेले वाटले . त्याचेही ज्ञात च्या ऐवजी न्यात असे मला ऐकू येत होते .

स्वरदाचे " नवल वर्तले गे " हॉरिबल झाले . मध्येच चोरटा आवाज ,मध्येच लहान मुलीसारखा आवाज , अजूनही तिला तिच्या आवाजाच्या मर्यादा लक्षात कशा येत नाहीत , जमत नसेल तर अशी गाणी गाऊ नयेत ..... सलीलने अ‍पेक्षेप्रमाणे तिला सांभाळून घेतलेच .

भडिमार नव्हे गं - बडीवार. अर्थ वृथा अभिमान.
नको ऐहिकाचा नाथा, व्यर्थ बडीवार

असा तो चरण आहे.

बाकी वहीत बघायचं म्हणशील तर, अभिलाषा जेव्हा तिचे १०० नंबरी 'मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले कि बारा' गाणे गात होती तेव्हा उर्मिला एकटीच हातावर कोरसचा भाग वाचून गात होती.

अपूर्वा Sad

संपदा, मलाही आवडले उर्मिलाचे "कैवल्याच्या चांदण्याला". बाकी स्वरदाच्या गाण्याबद्दल आणि परिक्षकांच्या मखलाशीबद्दल बोलून त्रागा करून न घेणे हेच उत्तम. Lol

दुर्दैवाने गुणवत्ते खेरीज इतर बरेच निकष/गणिते लावलेल्या या स्पर्धेत निकाल पाहुन उगाच मनस्ताप करुन घेण्यात अर्थ नाही. जिंकणार कोण हे अगदी स्पष्ट झालेले आहे.

या स्पर्धेतुन मिळालेले रत्न मी म्हणेन की अभिलाषा... जिंको किंवा हरो तिचे भविष्य उज्ज्वल आहे.

या स्पर्धेच्या विजेत्याने हिंदी सारेगामा मधे मिळालेली संधी फुकट घालवु नये एवढीच अपेक्षा..

अभिलाषा जिंकली तर नक्कीच हिन्दी सारेगमप मधे फिनाले पर्यंत पोचणारच( कदाचित राहुल सुध्दा), बाकी चाफा म्हणतो तसं इतर दोघीं बद्दल बोलण्यत काही अर्थ नाही Happy
बाकी झी चं पॉलिटिक्स दिसत असूनही उगीचच आशा आहे या वेळी अभिलाषा जिंकेल म्हणून (गेल्या वर्ष भरात कधी नव्हे ते माझे आवडते स्पर्धक जिंकले म्हणून.. गेल्या सिझन मधे वैशाली,नंतर हिंदी मधे पण वैशालीच, lil champ मधे हेमन्त ब्रिजवासी, DID मधे सलमान, Mega challenge मधे महाराष्ट्र टिम ).
पण विनर झी ने कधीच ठरवली/ला असणार हे खरच !

धन्यवाद नंद्या , मला हा शब्द खरंच माहित नव्हता . Happy
बाकी उर्मिलाचा हातावरचा कोरसचा भाग वाचण्याचा व्हिडिओ मी पाहिला आत्ता . Proud

स्वरदा जिंकली तरी सलील आणि अवधूत शिवाय तिला कुणी गायची संधी देईल अस वाटत नाही उलट न जिंकताच अभिलाषा जास्त प्रसिद्ध होइल कारण ती खरंच गुणी आहे...कारण झी चं politics झी पुरतंच !!
professional life मध्ये स्वतःचं नुकसान कोण करून घेईल्?त्यामुळे निकालाचा फारसा विचार न करणंच उत्तम!!

>>अभिलाषा जिंकली तर नक्कीच हिन्दी सारेगमप मधे फिनाले पर्यंत पोचणारच
डीजे, तेरे मुंह मे घी शक्कर !

स्वरदा जिंकली तरी सलील आणि अवधूत शिवाय तिला कुणी गायची संधी देईल अस वाटत नाही>>
ते पण नाय देणार,या कार्यक्रमाच्या बाहेर असली ब्याद कोण घेईल? अर्थात 'आयुष्यावर बोलू काही' टाईप एकसुरी गाणि गाईल ती कदाचित.

स्वरदा फक्त जुनीच गाणी गात राहिल.. नविन गाणी तिला मिळतील असे काही वाटत नाहीये मला... तिच्या साठी ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईटच बरा शो आहे...

डीजे.. तू म्हणती आहेस तसे झाले तर खरच बेष्ट... पण अभिलाषाचे आधीच स्टार बरोबर असलेले कंत्राट किती आहे ते पण बघावे लागेल झी वाल्यांना.. तरच तीची वर्णी शेवटच्या तिघांत लागू शकेल..

मला पडलेला सर्वात महत्त्वाचा प्रश्न.. स्वरदा दिवसेंदिवस वाईट गाऊनही तिला लोकं एवढी मतं कशी काय देतात... एक तर ती भयानक नाकात गाते.. दुसरं म्हणजे बर्‍याच वेळेस स्वरांना घसरते तरी किंवा स्वर चढे तरी लागतात... कायम वर आभाळात बघूनच गाते.. तरीही तिला कशी काय सगळ्यांत जास्त मतं मिळतात...

>तरीही तिला कशी काय सगळ्यांत जास्त मतं मिळतात...
भैसने ला मिळाली तशीच Happy

>दुसरं म्हणजे बर्‍याच वेळेस स्वरांना घसरते तरी किंवा स्वर चढे तरी लागतात...
तीचे नाव स्वरजा असायला हवे Proud

मला पण त्या स्वरदाचा आवाज अज्जिबात नाहि आवड्त. काहि चढ - उतार आला तर चक्क घाबरल्यासारखि वाट्ते. नेहमि काहितरि भरपुर ओझ असल्या सारखि गाते.

अभिलाषाच आधिच्या एपिसोड मधल 'आता वाजले कि बारा' गाण जास्त आवडल. ति खरोखर फार छान गाते. सगळ्या गाण्यांना योग्य न्याय देते.

उरमिला पण छान गाते. पण तिला फार लिमिटेशन्स आहेत. मालातरि आत्तापर्यंत तिच्या फक्त ठुमर्री आणि लावण्या आवडल्या आहेत.

सगळ्यात अभिलाषा इज बेस्ट. होप ति जिंकेल.

राहुल च 'देवा तुझ्या दारी आलो' इतक नाही आवडलं..
रोहित जबरी गायला होता ...
उर्मिला आणि स्वरदा बद्दल न बोलणेच योग्य...
अभिलाषा उत्तमच!!!

राहुल च 'देवा तुझ्या दारी आलो' इतक नाही आवडलं..
-------------------------------------------
बरोबर! आणि कोरस अगदीच बेसुर होता या गाण्याला..

Pages