सा रे ग म प मराठी : पुढचे पर्व

Submitted by Adm on 29 July, 2009 - 19:23

महाराष्ट्राचा आजचा आवाज नंतर झी मराठी ने सा रे ग म प चं पुढचं पर्व जाहिर केलयं. हे पर्व नवोदित गायकांसाठी असणार आहे. परवाच ह्याची निवडचाचणी मुंबई ला पार पडली. ह्या पर्वाचे बाकीचे डिटेल्स जजेस वगैरे (बहूतेक) अजून जाहिर झालेले नाहियेते. ( Black and white कार्यक्रमाच्या काही भागांमधे गायलेली गायिका स्वरदा गोडबोले हीची ह्या पर्वासाठी निवड झाली आहे).

हे पान ह्या पर्वातल्या गाण्यांविषयी गप्पा मारण्यासाठी.....

http://www.youtube.com/view_play_list?p=96710707C1C304CA ह्या लिंकवर सगळी गाणी पहायला मिळतील..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रुतुजा अप्रतीमच.. सलील पण एकदम इमोशनल झालासं वाटलं तिला प्रतिक्रिया देताना..
बाकी सगळे 'चालुद्यात' असेच..

आत्ताची गाणी आणि एकूण गुण देतानाचा " सावळा गोंधळ " ( कोणाला नी कोणाला वरचा सा ) बघता स्वरदा महागायिका होऊ शकते , असं मला वाटायला लागलंय..... Sad
नाहीईईईईईईई .... प्लीईईईईईईज . Proud

हो, मृण्मयी, ऋतुजा यांची गाणी अंतिम फेरीत आल्यानंतर एकदम सुधारली आहेत. काल ऋतुजाने खाल्लं सगळ्यांना Happy
स्वरदाताई आधी आहेत तशाच आणि अपूर्वाही.
अश्विनी अधे-मधे आहे.
अभिलाषा, उर्मिला, संहिता यांच्यावर मेकोव्हरचा वाईईट्ट परिणाम झालाय. गाणं रंगेनासं झालंय Sad
तरी राहुलचा आवाज मला आवडतो.. म्हणजे असामान्य वगैरे नाहीये, पण जे गातो, ते चांगलं गातो.

शुभा मुद्गल सही आहेत Happy
अवधूतला मोठ्या सुट्टीवर का नाही पाठवत? Uhoh यीअरएन्ड आलाच आहे Lol

जोरदार प्रतिक्रीया आहेत.. निदान त्यासाठी क्लिप्स बघायला हव्यात.. Happy
>अवधूतला मोठ्या सुट्टीवर का नाही पाठवत? यीअरएन्ड आलाच आहे
ते व्हावे म्हणूनच वाट्टेल तशा कॉमेंट्स देत असावा Happy

काल थोडेच बघायला मिळाले. 'प्रथम तुज पाहता' पासून पुढे. 'विकल मन आज' अगदीच सुमार झाले. गायिकेने म्हटले तसे त्यात खरेचच सुधारणेला भरपूर वाव होता. 'प्रथम तुज पाहता' चांगले गायले. बाकी कोणते गाणे खास लक्षात राहिले नाही.

(काल तथाकथित परिक्षकांच्या झोळीत फक्त 'ध' च होते वाटते. गाणे अगदी सुमार झाले म्हणतात आणि 'ध' देतात. गाणे खूप चांगले झाले म्हणतात आणि 'ध'च देतात. नक्की कशाचं मूल्यमापन करून 'ध' देतात? )

आजकल सा रे ग म बघायला होतंच नाहीये. इथे आलं म्हणजे थोडीफार कसर भरुन निघाल्यासारखं वाटतं Happy

:)....मी पण आधी इकडे वाचते आणि मग युट्युबवर बघतेय (बरीच मागे आहे मी अजून. ऑक्टोबर ६ झालं आत्ताशी)...मजा येते तुम्हा सर्वांची मतं वाचायला जी अगदी खरी, पूर्वग्रह नसलेली असतात. बाकी मला पल्लवी आवडते (ते टाळ्या प्रकरण सोडून हा Happy )

संहिता चांदोरकर जाईल बहुतेक. (काल तिचे ते घाईघाईत म्हटलेले प्रभु आजी ऐकल्यावर परत कुमारजींचे ऐकले तिच्या गाण्याचा इफेक्ट घालवायला Happy )

आजही बोअर..
संहिता आऊट.
मृण्मयी तिरोडकर आजचा आवाज ठरली.
स व अ च्या कमेंटस नेहमीप्रमाणे अ. अ. व र. (अचाट अतर्क्य व रटाळ Proud )
रिपोर्टींग झालेले आहे आता झोपते. Happy

उर्मिलाचं गाणं 'झाल्या तिन्हीसांजा' मला आवडलं. बाकी काही उल्लेखनीय नाही.

मी पण आता झोपते.

आज २६ नोव्हेंबर २००८ च्या दहशतवादी हल्ल्याला वर्ष झाल्याबद्दल मुंबई पोलिस विशेष भाग प्रसारित करत आहेत. मुंबई पोलिसांच्या तोंडून जे घडलं ते ऐकणं हा एक वेगळा, ह्रद्य अनुभव आहे ह्यात शंकाच नाही. पण नेहेमीचीच देशभक्तीपर गीतं गाण्याची खरच गरज होती का असं वाटलं. एक तर ही गाणी इतक्यांदा ऐकली गेली आहेत आणि काही खरोखरच पोटातून गाणारे गायक सोडले तर इतरांच्या तोंडातून घिसिपिटी वाटतात असं मला तरी वाटतं. त्यातून बरेचदा असे कार्यक्रम ( घटना घडल्यानंतर लगेच झालेल्यांचा अपवाद सोडून ) ओढूनताणून गंभीर वातावरण, प्रेक्षकांना रडायला आवाहन अशा पद्धतीने आखलेले वाटतात.
असे कार्यक्रम केले पाहिजेत पण ते करताना थोडा चाकोरीबाहेर जाऊन विचार केला तर ? ही नेहेमीची देशभक्तीपर गीते न गाता गंभीर प्रकॄतीची दुसरी वेगळी गाणी निवडता येतील. उदा. शिवकल्याण राजा मधील गाणी, गीतरामायणातील वीररसपूर्ण गाणी, शूरा मी वंदिले सारखी नाट्यगीते,इतर गंभीर आशयघन काव्य असलेली जीवनविषयक तत्वज्ञान सांगणारी गाणी. अशी गाणी कार्यक्रमाचे गांभीर्य तर घालवणार नाहीतच उलट कार्यक्रम वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतील. त्या गाण्यांच्या अनुषंगाने परीक्षक ही थोडं वेगळं बोलू शकतील. आणि मग दर गाण्यानंतर पोलिसांचा अनुभव ऐकणं प्रेरणादायी होईल.

आत्ताच सा रे ग म प बघत आहे. अगोच्या मताशी मी सहमत आहे. पोलिसांना त्यांच्या कामाच्या तणावातून जरा आराम मिळण्याच्या हेतुने असे कार्यक्रम केले जावेत अशी माझी ईछा आहे

बाकी आज राहुलच गाण अजिबात चांगल झाल नाही. उर्मिलाच गाण मस्त,
"सरणार कधी रण" सुंदर झाल. बाकीच उद्या पोस्टेन.

मराठी सारेगामा आय मस्ट से, एक चांगला इंग्रजी शो आहे. Lol

इथे निवेदक, परिक्षक, आणि स्पर्धक इतकं छान आणि सतत इंग्रजी बोलतात तरी लगेच संशय येतो की मराठीचा आणि या कार्यक्रमाचा काहीतरी संबंध आहे म्हणून... पुढच्या काही भागांमधे 'बा बा ब्लॅकशीप', (यमनकल्याण) किंवा 'बेबी आय लव्ह यू' (बागेश्री) ऐकायला मिळेल अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही...

'Would you like to sing a song,' says Pallavi.
'O sure, I would love to,' replies Sanhita चान्डॉअकअ I think.

कालचा भग खरंच अविस्मरणीय झाला.. तो म्हणजे मुंबई पोलीसांनी वर्णन केलेल्या २६ नोव्हे. च्या हल्ल्यामुळे. एक अशी मस्त स्ट्राँग अ‍ॅन्ड स्टाऊट फौजच समोर ठाकली आहे असं वाटलं शेवटच्या सीनमध्ये! त्या प्रत्येकाने सांगितलेल्या शौर्यगाथेबद्दल त्यांना त्रिवार सलाम!
पल्लवी आज थोडं भान ठेवून बोलली याबद्दल स्क्रिप्ट रायटर व तिचे कौतुक .
सलीलला योग्य वेळी समर्पक कविता सुचतात , या त्याच्या उत्स्फूर्ततेला दाद! त्याने म्हटलेल्या "रक्त ज्यांचे तप्त आहे फक्त त्यांनाच हक्क आहे श्वास येथे .." आणि कुसुमाग्रजांच्या 'संगमरवरी मरण' वरील कवितेबद्दल त्याला आजवर केलेले सगळे 'अति' पणे माफ! Happy
अवधूतबद्दल काय बोलावे! भापो म्हणजे झालं! Proud

फक्त एकच वाटलं, की आज तसेही मार्क नव्हते मग परीक्षकांच्या प्रत्येकाला "छान छान! ","काळजाला भिडलं" असल्या कमेंट्सचा फार्स कशाला ठेवला? ती गाणी आणि प्रसंगच असा होता की त्यांच्या चुका सांगता येणार नव्हत्याच. उगाच त्यांना आपलं प्रत्येकासाठी नवे शब्द शोधून काढावे लागत होते! त्याऐवजी पोलीसांनाच जास्त वेळ बोलता नसतं का आलं? त्यांच्या कमेंट्स शिवायही प्रेक्षकांनी आपली मतं दिली असती नक्कीच.
राहुल सक्सेनाला जणू १००% खात्रीच आहे की आपण फायनल ३ मध्ये असणार अशाच थाटात येतो तो स्टेजवर. त्याच्या अशा मुजोरपणामुळे आऊट झालेल्या मराठी मुलांची आठवण झाल्याशिवाय राहवत नाही. Sad

काल सोमवारच्या भागाचं शुटींग होतं.. त्याला मी गेलो होतो स्वरदाबरोबर.. त्यामुळे सोमवारी मला टिव्हीवर नक्की बघा बर्का.. Happy मी स्वरदाच्या नवर्‍याच्या बरोबर मागे बसलो होतो.. सोमवारचा भाग छान झालाय.. अवधूतच्या मते खूप मॅच्युअर्ड भाग झालाय.. डेंजर झोन आणि निकाल बर्‍यापैकी अनपेक्षित आहे.. !
आधी बाहेर थांबलेलो असताना राहूल एका मुलीबरोबर बाहेर आला आणि तिथे जमलेल्या काही काकू-मावश्यांना अगदी टिपीकल नॉर्थी स्टाईल "पायलागू" करत होता.. मग सगळ्या मुली मेकअप करून बाहेर आल्या.. त्यांना सगळ्यांनाच उंच उंच चपला दिलेल्या असल्याने चालताना त्यांची फुल वाट लागत होती.. Happy अभिलाषा एकदा पडतच होती !! पल्लवी ताई स्टेजवर आल्या तर कोणाची काही प्रतिक्रियाच नाही.. मग तिनेच प्रेक्षकांना नमस्कार केला मग काही लोकांनी टाळ्या वाजवल्या.. मग कार्यक्रमात टाळ्या कश्या वाजवायच्या ह्याची प्रॅक्टीस झाली... ! एकूण स्टुडीओ आपल्याला टिव्हीवर दिसतो त्यापेक्षा बराच छोटा वाटत होता... आणि तिथे ते जोरात म्युझिक नसल्याने एकदम शांत शांत वाटत होतं... गाण्यांपैकी ऋतुजा, स्वरदा आणि अश्विनी ची गाणी बेस्ट झाली.. मृण्मयीचं जरा गंडलं.. मग तिची थोडी रडारड झाली.. उर्मिला, राहूलचं चांगलं झालं.. उर्मिलाने परत एकदा आपल्याच स्टाईलचं गाण गायलं.. काहीही बदल नाही.. (रच्याकने पल्लवी चक्क एकदाही "तू माझ्या अत्यंत आवडीचं गाणं म्हणालीस" असं म्हणाली नाही .. Wink आणि अवधूत ने शुटींगच्या दरम्यान २ कप कॉफी आणि एक अख्खा बॉरबॉन चा पुडा संपवला.. !! ) अपूर्वा, अभिलाषा ह्यांची गाणी खूपच सर्वसाधारण दर्जाची होऊनही त्यांचं बळच फार कौतूक केलं...
सगळेच जण प्रत्यक्षात बरेच बारीक आहेत.. टिव्हिवर खूप जाड दिसतात.. !!!!
एकूण छान अनुभव होता... आम्ही मंगळवारच्या भागाच्या शुटींग ला थांबलो नाही.. ते लगेचच होतं.. मंगळवारी एक हिंदी आणि एक मराठी अशी दोन गाणी होती...

<<<काल सोमवारच्या भागाचं शुटींग होतं.. त्याला मी गेलो होतो स्वरदाबरोबर.. त्यामुळे सोमवारी मला टिव्हीवर नक्की बघा बर्का.. मी स्वरदाच्या नवर्‍याच्या बरोबर मागे बसलो होतो.. >>>>
आता तूच हे लिहिलेस म्हणजे सोमवारचा भाग बघायलाच हवा ना Wink ; स्वरदाचे गाणे ऐकणे Sad मात्र अशक्य वाटतेय Proud , मी तेव्हढेच गाणे म्यूट करून बघेन . Happy

काल सोमवारच्या भागाचं शुटींग होतं.. त्याला मी गेलो होतो स्वरदाबरोबर>>>आम्ही मंगळवारच्या भागाच्या शुटींग ला थांबलो नाही.. ते लगेचच होतं >>> सूज्ञ वाचकांनी ह्यावरुन काय ते समजून घ्या बघू Happy

अगो , तसं असेल तर देवच पावला म्हणायचा . Wink पण मला वाटते , एलिमिनेशन होणार नाही . मागच्या मंगळवारी मार्क दिले नव्हते ना ? Happy

मार्क दिले होते फक्त गेल्या भागाचं गांभीर्य ओळखून ते जाहीर केले नव्हते. हे कार्यक्रम सुरु व्ह्यायच्या आधीच स्पष्ट करण्यात आलं होतं Happy

>>> गाण्यांपैकी ऋतुजा, स्वरदा आणि अश्विनी ची गाणी बेस्ट झाली
<<< स्वरदाचं गाणं बेस्ट? Proud (असं सलील म्हणाला म्हणून म्हणतोयस का? :P)

सूज्ञ वाचकांनी ह्यावरुन काय ते समजून घ्या बघू >>>> अगो, आम्हाला वेळ नव्हता म्हणून थांबलो नव्हतो.. संध्याकाळी निघून पुण्याला पोचायचं होतं रात्री पर्यंत नाहितर मला थांबायला नक्कीच आवडलं असतं...

स्वरदाचं गाणं बेस्ट? (असं सलील म्हणाला म्हणून म्हणतोयस का? ) >>>>> प्रणव.. हे मीच म्हणतोय.. सलिलने हे शब्द वापरले नव्हते.. !

मामी.. हो पार्ल्यात हजेरी लावलेली मधे... तुम्ही वगैरे म्हणू नका आणि... Happy

Pages