Submitted by Adm on 29 July, 2009 - 19:23
महाराष्ट्राचा आजचा आवाज नंतर झी मराठी ने सा रे ग म प चं पुढचं पर्व जाहिर केलयं. हे पर्व नवोदित गायकांसाठी असणार आहे. परवाच ह्याची निवडचाचणी मुंबई ला पार पडली. ह्या पर्वाचे बाकीचे डिटेल्स जजेस वगैरे (बहूतेक) अजून जाहिर झालेले नाहियेते. ( Black and white कार्यक्रमाच्या काही भागांमधे गायलेली गायिका स्वरदा गोडबोले हीची ह्या पर्वासाठी निवड झाली आहे).
हे पान ह्या पर्वातल्या गाण्यांविषयी गप्पा मारण्यासाठी.....
http://www.youtube.com/view_play_list?p=96710707C1C304CA ह्या लिंकवर सगळी गाणी पहायला मिळतील..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बर अता ऐका एक हुश्शsss
बर अता ऐका एक हुश्शsss बातमी..
गेली एकदाची "ती" सर्वात ओव्हरहाइप्ड..जिच्या एलिमिनेशनची सगळे वाट पहात होते :).
चला , शेवटी काही करून टॉप ३ मधे चांगले स्पर्धक ठेवले झी मराठीनी, त्या साठी थोडी अनफेअर एलिमिनेशसन्स माफ झी ला :).
अता फक्त रिझल्ट चांगला लावा :).
हो हो , वाचलं . आत्ता कुठे
हो हो , वाचलं . आत्ता कुठे एखादा निकाल मनासारखा लागल्यासारखा वाटतोय .

बायदवे , पूर्वी प्रत्येक एपिसोडच्या शेवटी पल्लवी ही भलीमोठ्ठी बक्षिसांची लिस्ट वाचून दाखवत असे , स्पर्धेबाहेर पडणार्या शेवटच्या ४ स्पर्धकांना अमूक ढमूक . गेले ४ आठवडे ते बक्षिस कोणाला देताना दाखवले नाही , की माझे पाहण्याचे राहून गेलेय ? स्वरदाला ते बक्षिस मिळावे म्हणून एव्हढ्या लांबपर्यंत खेचून आणली का ?????
थोडक्यात दुबईतील समस नळाचे
थोडक्यात दुबईतील समस नळाचे पाणी गेले. मंदीची झळ बसलीये म्हणायच "भाई"करांन्ना
नो सरप्राइझेस! अंतिम विनर
नो सरप्राइझेस!
अंतिम विनर सुद्धा नो सरप्राइझेस! मराठीचा विजय होणार!
पुढील सारेगमप इच्छुकाना एक टीपः तुम्हाला जे चांगले म्हणता येते तेच/तशा तर्हेचे गाणे म्हणत रहायचे, सगळ्या तर्र्हेची गाणी गाता येणे हा निकष इथे लागु नाही. व्हर्साटिलीटी असणे आवश्यक नाही.
पब्लिकचा इंटरेस्ट पूर्णपणे
पब्लिकचा इंटरेस्ट पूर्णपणे संपला की काय सा रे ग म प मधला....
गेल्या आठवड्यातील भागांबद्दल एकही पोस्ट नाही ते.... का सगळ्यांच्या आवडीचे स्पर्धक जाऊन फक्त नावडते स्पर्धक राहिले आहेत स्पर्धेत....
आजचा भाग कदाचित प्रोमो वरुन तरी भारी दिसतो आहे.. अभिलाषा नाचताना वगैरे दाखवली आहे...
फायनल केव्हा आहे? २६
फायनल केव्हा आहे? २६ जानेवारीला का?
.
.
कालच्या भागात अलका याज्ञिक
कालच्या भागात अलका याज्ञिक परिक्षक होती.
पहिली फेरी नॉन ऑर्केस्ट्राची होती.. अभिलाषाने 'घनरानी..' छान गायलं, पण त्याहीपेक्षा उर्मिलाची लावणी झकास झाली. अभिलाषाचा खूप श्वास ऐकू येत होता.. उर्मिलाचा आवाज इतका सही लागला होता, श्वास ऐकू आला नाही अजिबात आणि लावणी ढोलकी-तबल्याशिवायही झकास पेलली तिने.
दुसरी फेरी हिंदी गाण्यांची होती.. अभिलाषाचं पहिलंच गाणं छान झालं.. नंतर नंतर मात्र ढेपाळत गेली
राहुलच त्यातल्यात्यात कन्सिस्टंट. उर्मिलाच्या आवाजात 'मुझे रंग दे..' फारसं नाही आवडलं पण तिचं परिक्षकांनी चिकारच कौतुक केलं 
अगदी खरं सांगायचं तर शेवटचे तीन स्पर्धक ज्या चुरशीने गातील/ गायला हवेत तसा नाही झाला कालचा भाग.. निवांतपणे गात होते..
आणि सलील-अवधूतचं काय बळंच चाललं होतं- सरफरोश आला तेव्हा म्हणे हे (घोडे) कॉलेजात होते! किती खोटं बोलाल रे! हे काय संतूर वापरतात की काय की यांची वयं काय असतील समजणार नाही?!
अलका तिने गायलेल्या सर्व संगीतकारांबद्दल, गायकांबद्द्ल चांगलं बोलली. ती सर्वांशी चांगले कॉन्टॅक्ट्स ठेवून आहे वाटते.. इतकी वर्ष आहे ह्या क्षेत्रात- पण तिच्याबद्दल कधी गॉसिप नाही, की वाद नाहीत.. त्या निमित्ताने आम्ही आमच्या कॉलेजातली गाजलेली गाणी आठवली (आम्ही खरंच कॉलेजात होतो तेव्हा.. :))
>>>हे काय संतूर वापरतात की
>>>हे काय संतूर वापरतात की काय की यांची वयं काय असतील समजणार नाही?! >>>
हे हे हे ...मस्त..
सगळ्यात जबरी अवधूतचा कॉमेंट,
सगळ्यात जबरी अवधूतचा कॉमेंट, ऊर्मिलाचा आवाज आणि पेंढा भरलेला ओव्हरलोडेड ट्रक!

पळा.....
आजवर इतकं 'वाट्टेल ते' कुणीही कुठल्याही शो मध्ये बरळले नसेल!
पल्लवीने , या आधीच्या भागांची रिविजन करुन ठेवली होती वाटते. अवधूतच्या अ अ आणि अ (अशक्य) कमेंट्सही तोंडपाठ म्हणून दाखवत होती जशाच्या तशा ! एकदा लोकांनी झेललं ते कमी झालं म्हणून द्विरुक्ती!
आता घ्या फुलटॉस.
पल्लवी काल खरंच खूप छान दिसत होती. अभिलाषा आणि उर्मिला समोर तिच्याकडे पाहून संतूरचीच जाहिरात आठवली!
आशु.. तुझी आवडती गायिका
आशु.. तुझी आवडती गायिका स्पर्धेतून बाहेर गेल्यावर सुद्धा तू काहीच प्रतिक्रिया कशी काय दिली नाहिस बरे...
माझी? कोण आवडतं मला?
माझी? कोण आवडतं मला?

हुश्श्श! संपलं एकदाचं पर्व!
हुश्श्श! संपलं एकदाचं पर्व!
आता फायनलशी आपल्याला काही देणंघेणं नाही..(पर्वाशीही नव्हतंच्..पण) म्हणजे निकाल काहीही लागला तरी तो आवडणारा नसेलच याची खात्री आहे! इतके दिवस पर्व चालू असताना कधीतरी हव्या तशा गोष्टी घडतील अशी आशा होती तिला एकदाचा पूर्णविराम मिळाला. 
पेंढा भरलेला ट्रक>>>> आशू,
पेंढा भरलेला ट्रक>>>> आशू, अगदी अगदी.
दोघेही अगदी ताळतंत्र सोडून बडबड करत बसतात. ते मधले परीक्षक कसं काय सहन करतात त्यांना कोणास ठाऊक...... अर्थात, त्या मधल्या परीक्षकांना त्याचेच पैसे मिळतात त्यामुळे सहन तर करायलाच पाहिजे
युगुलगीत फेरीमध्ये कसली घासून गुळगुळीत झालेली गाणी म्हटली. ड्युएट राऊंड म्हटलं की 'धुंदी कळ्यांना' यायलाच पाहिजे का

मंजु, धुंदी कळ्यांना कुठे?
मंजु,
धुंदी कळ्यांना कुठे? "धुंद एकांत हा म्हणाले" ग ते.......
ही बघ कालच्या ड्युएट मधली गाणी:
१. धुंद एकांत हा - उर्मिला - राहुल
२. राजाच्या रंगम्हाली - उर्मिला - अभिलाशा
३. माजे राणी माजे मोगा - अभिलाशा - राहुल
उर्मिलाचा आवाज इतका सही लागला
उर्मिलाचा आवाज इतका सही लागला होता, श्वास ऐकू आला नाही अजिबात आणि लावणी ढोलकी-तबल्याशिवायही झकास पेलली तिने >> पूनम- उर्मीलेचा सूर उतरला होता लावणी म्हणता म्हणता- म्हणून.
आणि मुलींची गाणी नाहीचेत का?
आणि मुलींची गाणी नाहीचेत का? दरवेळी आपलं "आला आला वारा" आणि "राजाच्या रंगमहाली.." !
मधल्या काळात मराठी गाणीच झाली नाहीत का? अशी हलकीफुलकी, प्रसन्न गाणी गायली तर प्रेक्षकांच्या कानांना काही मुंग्या येणार नाहीत.. आणि परीक्षकांनाही नवीन काही बोलायला वाव मिळेल. 
बायकांची कितीतरी गाणी आहेत.. आज गोकुळात रंग, बनवाबनवी मधले चांदण्यात न्या गं हिला.. अशी कित्येक सुंदर गाणी एकदाही इथे गायली जात नाहीत.. उदा. तुझ्या गळा माझ्या गळा, आनंदी आनंद गडे, मुंबईचा फौजदारमध्येही किती छान गाणी आहेत! त्याहून , एकूणच रंजना वर चित्रीत झालेली गाणी, अगदी लक्ष्या आणि अशोक सराफ च्या विनोदी सिनेमातूनही सुंदर गाणी झालेली आहेत. ड्युएट मधे महेश कोठारेची गाणी नाहीतच? अस्मिता चित्र ची निर्मिती असलेल्या सिनेमातली..' तू तिथं मी 'मधलं 'साद कोकीळ घालतो...' आजवर एकाही कार्यक्रमात ऐकलं नाही..
राग नाही ,पण इथे एक ट्रेंड बनून गेलाय जवळपास बाबूजी आणि पंडितजींचीच गाणी म्हणायचा.. लावण्या कंपल्सरी आणि गेला बाजार अधेमधे गीतरामायण आणि गझल किंवा मग अगदी नवीन एकदम सलील, अवधूत ,अजय अतुलची. हे म्हणजे श्रीखंड आवडत म्हणून सलग सात दिवस श्रीखंडसप्ताह केल्यासारखं आहे.. त्याने श्रीखंडाची गोडी कमी होत नाही खाणार्याला अजीर्ण होतं.
मंजु, धुंदी कळ्यांना कुठे?
मंजु,
धुंदी कळ्यांना कुठे? "धुंद एकांत हा म्हणाले" ग ते....... >>>>.
ते सोमवारच्या भागात झालं गाणं... अभिलाषा आणि राहूलने म्हटलं.
काहीही लागला तरी तो आवडणारा
काहीही लागला तरी तो आवडणारा नसेलच याची खात्री आहे! >>> आशू मोदक..
परवाची थोडी गाणी बघितली.. वाद्य नसलेल्या फेरीत शेवटी सुर थोड उतरला तरी उर्मिलाचच गाणं सगळ्यात चांगलं झालं.. नंतर इस दिवाने लडके को अभिलाषाने बर्यापैकी गंडवलं.. !! त्यात तर वाद्यव्रुंद पण चुकल्यासारखा वाटत होता... तुमसे मिलके दिलका सागर फडकेनी पण राहूलपेक्षा चांगलं म्हंटलं होतं.. रंग दे चा कोरस भयंकर होता.. आवाजला बर्यापैकी सुट होऊन पण उर्मिलाने मधे मधे गंडवलच ते.. कहर म्हणजे त्याच्यावरची कमेंट.. कोरी बिल्डींग की काहितरी.. !!!!!!
हिम्या.. आवडते स्पर्धक बाहेर पडल्याने इंटरेस्ट संपला नाही तर नावडते स्पर्धक फायनलला राहिले म्हणून इंटरेस्ट संपला...
>>राग नाही ,पण इथे एक ट्रेंड
>>राग नाही ,पण इथे एक ट्रेंड बनून गेलाय जवळपास बाबूजी आणि पंडितजींचीच गाणी म्हणायचा..
बरोबर बोललीस आशू. कितीतरी वेगळी गाणी असूनही तिच तिच गाणी होतात.
अभिलाषा आणि राहुल यांनी गायलेली बहुतेक गाणी आर्या आणि प्रथमेश यांनी देखील गायली होती
गुणी बाळ असा [अभिलाषा], सुरत पियाकी [राहुल] वगैरे.
मला तर सारेगमप ची गाणी
मला तर सारेगमप ची गाणी सिलेक्ट करणा-या लोकांचा भयंकर राग येतो. फक्त त्याच त्या ४-५ लोकांची गाणी घेतात. नवीन कितीतरी गुणी संगीतकार आहेत. त्यांची गाणी कधीच घेत नाहीत. तेच ते किती चघळत बसायचं. जरा नव्या लोकांना पण ऐका ना.....त्यांच्यातही टॅलेंट आहे.
मला वाटतं त्यांची ठराविक
मला वाटतं त्यांची ठराविक गाण्यांची यादी असते.. तीच दर पर्वात वापरतात.. थोडी कमी-अधिक गाणी, पण जवळपास तीच.. त्यामुळेच तर आता सारेगमपचा कंटाळा येऊ लागलाय- याच नाही, इतर चॅनेल्सवरचे मराठी गाण्यांचे कार्यक्रम, हिंदीतलेही गाण्याचे कार्यक्रम- तेचते ऐकून बोअर झालं. नाचाच्या कार्यक्रमातही आता त्याचत्या गाण्यांवर नाच असतात! त्यापेक्षा मूळ गाणी ऐकावीत असं मला वाटतं.
जया, नवीन संगीतकारांवर एका फेरीत मेहेरनजर झाली होती.. अंतिम चार स्पर्धक राहिले होते तेव्हा चक्क चार नव्या संगीतकारांची चार नवी गाणी ऐकवली!! आहेस कुठे!
त्यातच वैभवचे कमलेश भडकमकरने संगीत दिलेलेही एक गाणे झाले. पण कमाल म्हणजे 'नसतेस घरी तू जेव्हा..' हेही 'नवीन संगीतकारांच्या' यादीत!!
कमाल आहे झीची खरंच!
अजूनतरी पल्लवीने नवीन पर्वाची घोषणा केली नाहीये, सुटका होणार आपली असं दिसतंय!
मी माझी आवड पाठवली होती झी
मी माझी आवड पाठवली होती झी मराठी सा रे ग म प ला.... 'धुंद तेच चांदणे' ह्या गाण्याची. काय माहीत काय झालं त्याचं..
पूनम मी बघितली गं ती फेरी.
पूनम मी बघितली गं ती फेरी. पण त्यातही तेच ते संगीतकार. नशीब आपल्या वैभव नी कमलेश सोबत काम केलंय. त्यामुळे त्याचं नाव तरी बघायला मिळालं.
मंजूडी...तू आवर्जून आमचं गाणं पाठवलंस धन्यु. पण खरं सांगु खुद्द वैशाली सामंत कार्यक्रमात असताना सुद्धा आमच्या अल्बमची गाणी तिला त्या कार्यक्रमात ऐकवता आली नाहीत की घेताही आली नाहीत. ते लोक त्यांच्याच ठराविक लोकांचीच गाणी घेतात असं कळलं. असो....!!
माझं म्हणणं आमचीच गाणी दाखवा असं अजिबात नाही....पण इतके नवे संगीतकार नवे अल्बम्स काढतात त्यातल्या काही चांगल्या गाण्यांना न्याय द्यायला काय हरकत आहे ?
आता त्या कार्यक्रमाचं नाव
आता त्या कार्यक्रमाचं नाव बदलून 'वरदहस्त' ठेवायला हवं...
कोण जिन्कल? कुणितरि अपडेट करा
कोण जिन्कल? कुणितरि अपडेट करा प्लिझ..
यू ट्यूबवर सोमवार आणि
यू ट्यूबवर सोमवार आणि मंगळवारचे एपिसोड्स आज अपलोड झाल्याने आत्ता ते पाहिले .
१. उर्मिला रॉक्स . " राती अर्ध्या राती " हे बेला शेंडेचे गाणे तिने स्वतःचेच असल्यासारखे सुपर्ब गायले . ओपन एअर स्टेजवर तिचा आवाज मस्त लागला होता . " कोंबडी पळाली " बाबतीत सुद्धा तेच . ( पण तरी मला अर्थातच वैशाली माडेचेच आवडते . ) उर्मिला आवाज अजिबात न चोरता सॉलिड गायली , तिच्या आवाजाची रेंज छान आहे . तिच्या रूपाने लावणी गाणारी एक जबरदस्त सिंगर मराठी चित्रपट सॄष्टीला मिळालीये , मात्र तशी गाणी बनली पाहिजेत .
उर्मिलाचे " राती अर्ध्या राती "
http://www.youtube.com/zeemarathi#p/u/4/ZiYqOkpEGZg
बेलाचे " राती अर्ध्या राती "
http://www.youtube.com/zeemarathi#p/c/75129FEE25F0F79E/1/smKudY9L_6w
२. अभिलाषाची मी " कांदे पोहे " आणि " हे हिंदू नृसिंहा " ऐकले . ओपन एअरमध्ये आवाज थोडा चोरटा करत गायली . गाणी म्हणावी तशी अहाहा झाली नाहीत .
३. राहुल मात्र प्रामाणिकपणे गातोय . सारेगमप चे टायटल साँग आणि " तू सुखकर्ता " छान गायला .
येत्या रविवारी कोण जिंकते ते बघू .
तळटीप :- या पर्वामुळे सलील कुलकर्णी आवडेनासा झाला . त्याने फार आत्मस्तुती केली . सोमवारच्या भागात सुद्धा किती ते " आम्ही निवडलेत हे सगळे गायक " ( जणू काही लता मंगेशकर , मोहम्मद रफीच्या तोडीचेच गायक निवडलेत .
) .
अजय अतुलचे लेटेस्ट हिट गाणं
अजय अतुलचे लेटेस्ट हिट गाणं म्हणजे " जोगवा " चित्रपटातील " लल्लाटी भंडार " , अजयने अफलातून गायलेय .
http://www.youtube.com/watch?v=hJdtGo8ZEtE
हेच गाणे उर्मिलाने खतरनाक अप्रतिम गायले :-
http://www.youtube.com/zeemarathi#p/c/2F043263D1AFE92C/3/XGEJEzP4s5A
पण शेवटी जिंकलं कोण??
पण शेवटी जिंकलं कोण??
फायनल येत्या रविवारी आहे .
फायनल येत्या रविवारी आहे .
Pages