
बहिणीच्या नव्या जागेत गेलो तेव्हा भिंतीवर एक छान 'कक्कु क्लॉक' दिसले पण ते बंद होते. अधिक विचारणा केल्यावर ते बिघडल्याचे बहीण म्हणाली. ते चालत नाही आणि त्यामुळे त्यातली चिमणी ओरडत नाही तरीपण छान दिसतेय म्हणून ठेवलंय शो-पीस सारखे.
घड्याळ होतेच ते छान, नजर खेचून घेणारे. तिने जर्मनीतून 'ब्लॅक फॉरेस्ट' भागातून खास आणले होते. हे ठिकाण अशा घड्याळांसाठी प्रसिद्ध आहे. पण इथे दुरूस्त करायला द्यायला ती घाबरत होती. एकदा एका दुकानात दिले पण त्याने आणखीनच बिघडवून परत दिले. त्यामुळे ते आता शो-पीस म्हणून ठेवायचे असे बहिणीने ठरवून टाकले होते.
मी नेहमीची टोल्यांची / किल्लीची बरीच घड्याळे दुरुस्त केलेली होती पण हा प्रकार नवीन होता. मी प्रयत्न करून पाहू का विचारल्यावर बहिणीने लगेच पॅक करून ते माझ्याकडे सोपवले.
नवीन प्रकारचे घड्याळ असल्याने मला खूपच उत्सुकता होती. केव्हा एकदा उघडून पाहतोय असे झाले. लगेचच शनिवारी बैठक जमवली आणि कारागिरी चालू केली.
आत अतिशय सुबक पण नेमकी अशी रचना होती. चिमण्या डोलावण्यासाठी अगदी सोपी पण नाजूक अशी यंत्रणा होती. काही भाग सुटे केल्यावर त्याच्या साखळीला लटकवलेल्या वजनाने किल्ली कशी मिळते ते समजत गेले. दोन अडीच तास पाहणी केल्यावर एकूण प्रकार लक्षात आला. काय बिघडलंय तेही कळले. घड्याळाचे भाग अतिशय नाजूक असल्याने सावकाश सुटे केले. खुणेने मांडणी करून ठेवले. बिघडलेल्या भागांची नीट जोडणी केली आणि तेल पाणी केले. चिमण्यांची रचना आणि त्यांचे दरवाजे हे फारच कलात्मक पद्धतीने तरीही तांत्रिक दृष्ट्या एकदम फिट्ट असे होते. जोडणी करताना ठराविक कोनातून विशिष्ठ पद्धतीनेच फिरवून ती शक्य होत होती. कुठे जोर लावला असता तर मोडतोड झाली असती. इतक्या छोट्या जागेत केलेली रचना म्हणजे जर्मन लोकांची करामतच होती. या घड्याळांना अजून पंचवीस वर्षे तरी काही होणार नाही याची खात्री होत होती.
सावकाशीने सगळी जोडणी पूर्ण केली. चिमण्यांची छोटी फुफ्फुसे (हवेचे पंप!!) बसवली. वजने साखळीला टांगली. टिक टिक सुरात केले आणि घड्याळ उत्तम चालू झाले. चिमणी पण एकदम ठसक्यात दरवाजा उघडून बाहेर यायची. वाजले किती ते चिवचिव करून सांगायची आणि जणू काही "अजून खूप कामं पडली आहेत घरात, तुम्हाला काय बघत बसायला?" असे म्हणत घरात परत शिरताना तोऱ्यात दार लावून घ्यायची. नुसते पहायलाही खूप मजा येत होती, चिमणी पाहताना आपोआप हळूच हसू येत होते. फारच मोठे समाधान वाटले. माझ्या आजोबांनी साधी घड्याळे दुरुस्त करायला शिकवली होती. त्या अनुभवातूनच हे काम जमले. दोन तीन रात्री चिवचिवटाने सुखद झोपमोड करवून घेत होतो. बहिणीला सांगितल्यावर ती एकदम खुश होऊन आली आणि चिमणी घड्याळ घेऊन गेली. चिवचिवाट थांबल्याने थोडा अस्वस्थ झालो पण यातून एक नवीन प्रकारच्या घड्याळाची दुरुस्ती जमल्याचा आनंद मिळाला.
आपल्याकडची हवा मानवत नाही की
आपल्याकडची हवा मानवत नाही की काय या घड्याळांना?
भारतात अशी घड्याळे तयार होत
भारतात अशी घड्याळे तयार होत नाहीत का ?
आपल्याकडची हवा मानवत नाही की
आपल्याकडची हवा मानवत नाही की काय या घड्याळांना? >>> आपल्याकडची धूळ-माती हे अशी घड्याळं बिघडण्याचं एक मोठं कारण असावं असं मला वाटतं.
या घड्याळाना लाम्बच लाम्ब
या घड्याळाना लाम्बच लाम्ब सा़खळ्या असतात अगदी जमिनीपर्यन्त पोचणा-या. २४ तासात त्या हळुहळू पुर्ण घडाळ्यात व परत पुर्ण बाहेर अशा वर खाली होत राहतात. त्याना येताजाता धक्का लागत राहिला तर कालांतराने घड्याळ बिघडते असे मला वाटते.
आमच्याकडे सुद्धा होते. चिमणी
आमच्याकडे सुद्धा होते. चिमणी धापकन दार उघडून ओरडून जायची. मस्त वाटायचे. मीच बिघडवून ठेवले. उत्सुक्ता. दुसरं काय?
एखादी आठवण, ललित लेख असेल
एखादी आठवण, ललित लेख असेल म्हणून उघडला नव्हता। पण रिपेरिंगचा आहे. चांगली केलीय दुरुस्ती. छंद चांगला आहे .
मलाही या घड्याळ रिपेरिंगचा छंद होता. '८० ते '९५ केला. नंतर डिजिटल युगाने बंद पडला.
या चिमणी घड्याळाचे जर्मन मॉडेल एका बहिणीकडे (१९७०) होते. नंतर दुसऱ्या बहिणीने तसेच दिसणारे जपानी मॉडेल आणले. त्यात साखळ्या ओढून चावी देण्याची गरज नव्हती. दिखाऊ होत्या. स्प्रिंग ऐवजी एक सेल आणि मोटर लावली होती. बाकी चिमणी, हवेचा कागदी पंप तसेच काम करणारे यांत्रिक होते.
टोले देणारी यांत्रिक घड्याळे रिपेर केली आहेत. पण आता फोटो नाहीत.
माझ्याकडची यांत्रिक घड्याळांची रिपेरची आयुधे पडून आहेत. वाया गेली.
ललिता-प्रीति, <<खुणेने मांडून
ललिता-प्रीति, <<खुणेने मांडून ठेवलेल्या पार्ट्सचा फोटो आहे का?>> नाही. हे लक्षात नाही आले. पण कल्पना छान आहे. पुढच्या दुरुस्तीच्या वेळी नक्की.
छान
छान
छान लेख. आमच्याकडे दादर वरून
छान लेख. आमच्याकडे दादर वरून सासर्यांनी आणलेलं कुक्कु चे घड्याळ आहे, made in India च आहे. चांगलं चालले आहे अजून.
लेकीला खूप आवडते .
छान. अशी दुरुस्ती
छान. अशी घरात दुरुस्ती करणाऱ्यांबद्दल कौतुक वाटतं.
छान.
छान.
माझ्याकडे मेड इन इंडिया,
माझ्याकडे मेड इन इंडिया, अजंता कंपनीचे कुक्कु क्लॉक आहे. सध्या बंद आहे.
विडीओ बहुतेक युट्युब वर अपलोड
विडीओ बहुतेक युट्युब वर अपलोड करून टाकावा लागेल. इथे अपलोड करायला साईझ जास्ती होईल.
अॅडमीन तुम्ही सांगू शकता अधिक.
असेच लेखन नियमित करावे म्हणजे
असेच लेखन नियमित करावे म्हणजे मायबोलीचे पहिले पान अर्थपूर्ण राहील.
छान..
छान..
किती मस्त वाटले असेल घड्याळ दुरुस्त झाल्यावर..
मस्त! लेख वर काढल्याबद्दल
मस्त! लेख वर काढल्याबद्दल धन्यवाद!
छान.
छान.
Pages