गुगल सर्विसेस (ड्राईव्ह/डॉक्युमेंटस इत्यादी) वापरून मराठी लेख लिहिणे

Submitted by अतुल. on 21 April, 2022 - 13:22

मराठी लिहिण्यासाठी विविध पद्धती आहेत. पूर्वी बरहा म्हणून एडिटर होता. बराच लोकप्रिय झाला होता. सवयीमुळे अजूनही अनेक लोक तो वापरत असतील.

एका गप्पांच्या धाग्यात याबाबत एका प्रश्नाला उत्तर देता देता हे सगळे लिहिले गेले. याचा इतरानाही उपयोग होईल असे वाटल्याने हा धागा. या छोट्याश्या लेखात गुगलच्या सर्विसेस द्वारे मराठी कसे लिहिता येईल हे मांडत आहे. गेली अनेक वर्षे मी स्वत: या सर्विसेसचा वापर करत असल्याने व मला त्या फारच उपयुक्त वाटल्याने त्याबाबत इथे लिहित आहे. मायक्रोसॉफ्ट, ऍपल व इतर कंपन्यांच्या सुद्धा अशा सेवा असतील. पण मला त्याबाबत फार कल्पना नाही.

१. मी विंडोज लॅपटॉपवर मराठी टायपिंग साठी अनेक वर्षे Google Input Tools वापरतो. त्याच्या सहाय्याने नोटपॅडमध्ये किंवा तुमच्या सोयीच्या कोणत्याही एडिटरमध्ये मराठी टाईप करून सेव्ह करता येते. पण समस्या एकच आहे कि Google Input Tools चे अधिकृत डाऊनलोड व्हर्शन अलीकडे गुगल ने काढून टाकले आहे. (का काढून टाकले आहे त्याचे कारण खालचा दुसरा मुद्दा वाचा). पण तरीही काही थर्ड पार्टी साईटवर ते उपलब्ध आहे. Google input Marathi setup हे शब्द गुगलवर शोधल्यास केल्यास ते मिळून जाईल. पण हे जुने व्हर्शन आहे म्हणून हा अधिकृत मार्ग म्हणता येणार नाही. केवळ नोटपॅडमध्ये किंवा तुमच्या सोयीच्या कोणत्याही एडिटरमध्ये मराठी टाईप करायचे असेल तरच हे ठीक आहे. जुने असल्याने काही शब्द (जसे कि अँगल, लॅपटॉप इत्यादी) मात्र अजूनही त्यात उमटत नाहीत. अशा ठराविक शब्दांसाठी गुगलची हि साईट वापरा: https://www.google.com/inputtools/try/

२. दुसरा सगळ्यात बेस्ट मार्ग म्हणजे गुगलच्या ऑनलाईन डॉक्युमेंटस मध्येच टाईप करणे. गुगलने वर्ड एडिटर वगैरे सर्व काही ऑनलाईन दिले आहे. ब्राउजर मधून वापरू शकता. तिथे मराठी टाईप करणे खूप सोपे आहे. त्याचा दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे तुम्ही गुगल डॉक्युमेंट मध्ये मोठा लेख जरी लिहायला घेतला तरी तो आपसूकच तुमच्या अकौंटच्या गुगल ड्राईव्हवर सेव्ह होत राहतो. तुम्हाला काळजीचे कारण नाही. ऑनलाईन असल्यामुळे कुठूनही (दुसऱ्या लॅपटॉपवरून ते डॉक्युमेंट सहज अक्सेस करता येते). हा दीड मिनिटाचा गुगलचा अधिकृत व्हिडीओ पहा.

https://www.youtube.com/watch?v=pARKdhmY1zA

त्यात रशियन भाषा कशी वापरायची हे उदाहरण दिले आहे. मराठी साठी तीच पद्धत आहे. मला वाटते तुम्हाला हि पद्धती जास्त सोयीची होईल.

हे लिखाण आपल्यासाठी उपयुक्त ठरेल हि अपेक्षा.

Happy editing Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Google Input Tools ची अद्ययावत माहिती दिल्याबद्दल आभार !

उपयुक्त आहे.
क्रोमबुक घेतल्यास काहीच समस्या नाही म्हणतात.
तरीही एक आहेच. हे ओनलाईन लाईव. ओफलाईन नाही म्हणे.

हे लिखाण आपल्यासाठी उपयुक्त ठरेल हि अपेक्षा. >>> उत्तम माहिती. चांगला लेख आहे.
इथे जास्तीत जास्त प्रतिसाद देतो. ते ऑनलाईनच देतो.
मोठा लेख कधी लिहीला नाही. पण मभादि उपक्रमाच्या वेळी एक लेख लिहावा लागला. त्या वेळी जी तारांबळ उडाली ती अजून लक्षात आहे. नशीब थोर कि लिहीताना वीज गेली नाही, नेट वारले नाही. नाहीतर पुन्हा पहिल्यापासून कल्पनाच करवत नाही. अशा वेळी ही गरज आहे.

अतुल सर, या माहितीबद्दल मनापासून धन्यवाद. खूप छान माहिती दिली आहे.
हपा - माझ्याकडे बरहा ९.० आहे. चांगले आहे. पण काही जोडाक्षरे टाईप करताना, अर्धचंद्र देताना तारांबळ उडते.