कपिवर बलशाली मारुती ब्रह्मचारी
रघुविर स्मरताची घेत राही भरारी
स्मरण तरी जयाचे सोडवी सर्वदुःखा
भय तरी बहु ज्याचे कंपविते कृतांता
लखलख तरी रोमी उज्वले सर्वकाळी
झडकरि रवीलाही फेकिले अंतराळी
कनक किरिटधारी पुच्छ ते मुर्डियेले
तळपत अति कांती अग्निने वेढलेले
कठिण तनु जयाची वज्र का लाजविते
विहरत गगनासी सूक्ष्मता लोपविते
अतुल अति बळी हा मारुती निर्विकारी
दहन सकळ लंका रावणा होत भारी
मरुतसुत मनाने रामपायी स्थिरावे
जपत तरि मुखाने नाम ते सर्वभावे
..............................................
कपींमधे श्रेष्ठ, अतिशय बलवान अशा मारुतीला श्रीरामांनी केवळ आठवायचा अवकाश, लगेच भरारी घेत तो श्रीरामांपुढे उपस्थित रहातो.
अशा या हनुमंताचे केवळ स्मरण करताच सर्व दुःखे नष्ट होतात. हनुमंत हा चिरंजीव असल्याने प्रत्यक्ष
यमराजालाही याचे भय वाटते.
हनुमंत म्हणजे मूर्तिमंत शक्ती. त्यामुळे याच्या रोमरोमी तेजस्वीपणा आहे.
हनुमंताचा जन्म होताक्षणी त्याने अवकाशात झेप घेऊन उगवत्या सूर्याला फळ समजून मुठीत घ्यायचा प्रयत्न केला व ते फळ नाही असे पाहून त्याला अंतराळात भिरकाऊन दिले होते.
सुवर्ण मुकुट मस्तकावर धारण केलेल्या हनुमंतांचे शेपूट त्या मुकुटाच्याहीवर वळून आलेले आहे. हनुमंत हा शक्तीरुप असल्याने त्याची कांतीही अग्निप्रमाणे दिव्य, उज्वल अशी आहे.
हनुमंताचे शरीर वज्राप्रमाणे कठीण आहेच, पण गगनात विहार करताना तो अतिसूक्ष्मरुपही धारण करु शकतो.
अतिबलशाली हनुमंत हा वृत्तीने अतिशय निर्विकार असा आहे. सीतामाईचा शोध घेताना जेव्हा हनुमंत लंकेत पोहोचला तेव्हा सर्व लंकेचे दहन करत रावणालाही त्याने आपल्या सामर्थ्याची चुणूक दाखवली होती.
असा हा अतिचपळ, अतिबलवान व अतिबुद्धीमान हनुमंत मनाने सतत श्रीरामचरणीच स्थिरावलेला दिसतो. हनुमंताला रामनाम हे प्राणापलिकडे प्रिय असल्याने त्याच्या ह्रदयात हे रामनाम स्थिरावलेले असतानाही मुखानेही सर्वकाळ नामस्मरण चालूच असते.
............................................
हनुमंत म्हणजे मूर्तिमंत शक्ती. त्यामुळे याला कोणी कोणी कुंडलिनी शक्तीही मानतात. अशी ही शक्ती देहात जागृत झाल्यावर सतत वर वर जात असते (उर्ध्वगामी होते ) म्हणून "झेपावे उत्तरेकडे" असे याचे वर्णन प्रत्यक्ष श्रीसमर्थ रामदासस्वामीनींही केलेले आहे. त्यामुळे अनेकजण "भीमरुपी स्तोत्र" हे कुंडलिनीचे वर्णन म्हणूनही समजतात.
सर्पाकार भासणारी, पुच्छयुक्त व अग्निसारखी लखलखती अशा कुंडलिनीशक्तीचे वर्णन श्री ज्ञानेश्वर महाराजांनी सहाव्या अध्यायात अतिशय विस्तृतपणे केलेले आहे. हे सगळे वर्णन हनुमंताच्या ठिकाणीही नेमके आढळते.
तसेच मरुत/प्राण स्वरुपाने ही शक्ती चिदाकाशात म्हणजेच मस्तक आकाशातही प्रवेश करण्या इतकी सूक्ष्म असते असे सोऽहं साधना करणारे मानतात.
अशा सर्व कारणाने हनुमंतांना परमार्थ साधनेत असाधारण महत्व आहे.
__/\__
__/\__
मारुतीरायाला अन कवितेला वंदन
मारुतीरायाला अन कवितेला वंदन
मारुतीरायाला अन कवितेला वंदन
मारुतीरायाला अन कवितेला वंदन >>> +1
कविता तर आवडलीच पण त्याखालचे
कविता तर आवडलीच पण त्याखालचे विवेचन तर फारच लखलखित!!
अप्रतिम ! प्रभंजनास _/\_
अप्रतिम !
प्रभंजनास _/\_
वृत्त कोणते ?
छान
वृत्त कोणते ?
घोरकष्टोद्धरण स्तोत्राच्या चालीत बसते
मालिनी वृत्त. 'ननमयय गणांनी
मालिनी वृत्त. 'ननमयय गणांनी मालिनी वृत्त होते'
धन्यवाद
धन्यवाद
वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे
अतिशय सुंदर रचना..
अतिशय सुंदर रचना..
या रचनेने तीन चार शतकं मागे नेलंत, ते ही लीलया..
अप्रतिम !
अप्रतिम !