'छत्रपती शिवाजी महाराज' असे पूर्ण नाव घेणे ही जबरदस्ती आहे का?

Submitted by हरचंद पालव on 28 November, 2019 - 02:37

सर्वप्रथम हे मान्यच करायला पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व महाराष्ट्राचे दैवत आहे. त्यांचे चरित्र अतुलनीय आहे. इतिहासात एक द्रष्टा राजा, कुशल राज्यकर्ता, सेनापती, संघटक, शककर्ता, प्रजाहितदक्ष; इतकेच काय - सिंहासनाधीश्वर, प्रौढप्रतापपुरंधर, राजाधिराज - अशी कितीतरी विशेषणे लावली तरी ती कमीच पडतील. त्यांच्या विषयी लिहिताना रामदासस्वामीं पासून ते आजपर्यंत कित्येक इतिहासकार, कादंबरीकर, नाटककार, चित्रपटकथालेखक यांची लेखणी थकली तरी त्यांचे संपूर्ण वर्णन लिहायला ती अपुरीच पडेल इतके उत्तुंग व्यक्तिमत्त्व! त्यामुळे महाराजांबद्दल आदर आहे हे सांगायला लागायची किंवा त्यासाठी कुठला पुरावा देण्याची गरज निदान मराठी माणसास नसावी.

आता हे सर्व असताना नुकत्याच काही घडामोडींमुळे त्यांच्या नावाचे संबोधन चर्चेत आले आहे. अमिताभ बच्चन काम करत असलेल्या कौन बनेगा करोडपती कर्यक्रमात एकीकडे 'मुघल-सम्राट औरंगजेब' असा उल्लेख असताना त्याच खाली केवळ 'शिवाजी' हा उल्लेख करणं हे अपमानास्पद वाटते हे खरेच! त्याबद्दल त्यांचा निषेध. परंतु हे लक्षात घ्यायला हवे की इथे अपमान हा संबोधनाच्या तुलनेतून निर्माण झाला आहे. इतर ठिकाणी स्टँड-अलोन उल्लेख असेल तर 'शिवाजी' म्हणणं तुम्हाला चुकीचं वाटतं का? असेल तर पुढे काही प्रश्न निर्माण होतातः

१. भोंडल्यामध्ये 'शिवाजी अमुचा राजा..' ह्या गीतात बदल करावेत का? इथे गाणारे महाराजांना प्रेमाने 'शिवाजी' म्हणतात, त्या प्रेमाचे काय? प्रेमापेक्षा आदर कायम मोठाच असतो का? ते ठरवणे व्यक्तिसापेक्ष असायला हवे ना?
२. लहानपणी 'शिवाजी म्हणतो' हा खेळ खेळायचो, त्यात महाराजांचा उल्लेख एकेरी असला तरी कधी अनादर वाटला नाही, किंबहुना तसे कधी डोक्यातही आले नाही. त्याचे काय?
३. शिवाजी महाराजांचा आदर सर्वांनी ठेवावा - ही जबरदस्ती आहे का? एखाद्याला नसेल वाटत, तर आपण तो आदर त्या/तिच्यावर लादावा का?
४. वरचे उत्तर होय असेल तर मग एखादा म्हणेल की त्याच्या मते चंद्रगुप्त मौर्य सर्वश्रेष्ठ आहे. मग चंद्रगुप्ताचा 'सम्राट चंद्रगुप्त मौर्य महाराज' किंवा अशोकाचा उल्लेख 'सम्राट अशोक महाराज' आणि अशोकचक्राचे नाव 'सम्राट अशोक महाराज चक्र' असे करावे - ही सक्ती केली तर चालेल का? झाशीची राणी - असा एकेरी उल्लेख तरी मग का करायचा? झाशीच्या महाराणी लक्ष्मीबाई - असे संपूर्ण नाव घ्या.
५. अनेक इतिहासकार इतिहास लिहिताना प्रत्येक व्यक्तिबद्दल केवळ एक ऐतिहासिक व्यक्ति म्हणून भावनिक न होतासुद्धा लिहू शकतात. त्यामुळे सरदेसाई काय, किंवा गोविंद पानसरे काय - त्यांनी 'शिवाजी कोण होता' - असे एकेरी उल्लेख केले असले तरी फक्त त्या संबोधनावर न जाता त्यांनी उलट त्यांच्याबद्दल काय मोठे संशोधन समोर आणले आहे - ते योगदान जास्त महत्त्वाचे नाही काय?
६. मला आठवते की लहानपणी एका इतिहासप्रेमी (परंतु कर्माने केवळ गुंडगिरी करणार्‍या) माणसाने दटावले होते की 'महाराज आपल्या सर्वांच्या कित्येक पिढ्यांसाठी आदरस्थानी आहेत. त्यांना नुसते शिवाजी काय म्हणता? घरी वडिलांना पण अरे-तुरे करता का?' आता आम्ही कुणी अरे-तुरे करत नव्हतो हे खरे; पण आज-कालची मुले वडिलांना अरे-तुरे खरोखरच करतात, पण त्यामुळे कुठेही आदर कमी झाला आहे असे वाटत नाही. फक्त 'अहो जाहो' म्हटल्याने आदर दाखवला जातो आणि 'अरे-तुरे' केल्याने आदर राहत नाही - हे सरसकटीकरण नाही काय?

तुम्हाला काय वाटते ते नक्की सांगा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

मी टीव्ही चॅनेलवरची मुलाखत जी युट्युबवर आहे ती पाहिली. त्यापेक्षा जास्त माहिती माझ्याकडे नाही.
Honestly, मला या सर्व प्रकरणाविषयी माहिती कमीच आहे असं वाटतंय कारण पुस्तकावरील बंदी उठवण्यासाठी कोणी कोर्टात गेलं असेल तर ते स्वतः जेम्स लेन आणि त्याचा परदेशी प्रकाशक हेच असतील असंच मला वाटत होतं.
पटवर्धन-कुंदा प्रमिला-संघराज रुपवते यांनी कोर्टकेस केली आणि जिंकले ही माहिती मला कालच कळली.

Shivaji महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराची सून सन्मानाने परत पाठवली ह्याचे कौतुक केले जाते. सावरकरांनी हे चूक होते असे म्हटले आहे. त्यामुळे सावरकर हे अत्यंत अश्लाघ्य समजले जातात. पण खरोखर सावरकरांचे म्हणणे इतके तिरस्करणीय आहे का?
कुराणात असे स्पष्ट म्हटले आहे की काफिर लोकांशी युद्ध झाल्यावर शत्रुची संपत्ती, बायका, मुले ह्यांच्यावर तुमचा हक्क आहे. ती अमुक प्रकारे वाटून घ्यावीत. असा धर्माचा आदेश असेल तर काय केल्याने मुस्लिम आक्रमक हिंदूंच्या बायकांवर अत्याचार करायचे थांबतील? त्यांच्या बायका तावडीत सापडल्यास त्यांना सन्मानाने परत पाठवल्याने की त्यांच्यावर अत्याचार केल्याने?
कल्याणच्या सुभेदाराच्या सुने ला सन्मान देऊन महाराज इतिहासात अजरामर झाले असतील. पण ह्या वागण्याने अन्य मुस्लिम आक्रमकांच्या हिंदूंच्या बायकांवरील अत्याचारात घट झाली असेल काय? मला वाटतं नाही. आम्ही त्यांच्या पोरी बाळीना काहीही केले तरी ते आमच्या बायकांना हात लावणार नाहीत अशी खात्री असेल तर उलट परिणाम तर होणार नाही?
सावरकरांचे म्हणणे इतके त्याज्य आहे का? केवळ महाराजांनी केले म्हणून तेच बरोबर हे मानणे ठीक आहे का?

होय शिवाजी महाराजांनी केले तेच बरोबर आहे. युद्धात हाती लागलेल्या स्त्रिया व एकूणच "आपल्याशी थेट न लढणार्‍या" व्यक्तींबद्दल इतके सुस्पष्ट धोरण क्वचितच बघितले आहे, भारताबाहेरच्या इतिहासातही. शेतकर्‍याच्या पिकाला धक्का न लावणे वगैरेही आले त्यात.

सावरकरांबद्द्ल आदर आहे. पण त्यांचे प्रत्येक म्हणणे पटायला हवे असे नाही.

शिवाजी महाराजांनी केले ते सर्व योग्यच असेल हे गृहीत न धरता तटस्थपणे विचार करून मत मांडले पाहिजे हे योग्यच आहे. परंतु सावरकरांचे वरचे मत (आणि आणखी काही मते) चुकीचे वाटते. जशास तसे वागले तरच ह्या प्रकारांना आळा बसेल ह्या विचारातून त्यांनी ते लिहिले आहे, पण परिस्थिती नेमकी उलट आहे. शिवाजी महाराज तसे वागले असते तर आपण त्यांची बाजू ही न्यायाची बाजू म्हणून उचलून धरली नसती. दोन्हीकडून ते प्रकार वाढतच गेले असते. काळाच्या कसोटीवर आदरास पात्र ठरणारे विचार हे सावरकरांना चुकीचे वाटावेत ह्याचे मला आश्चर्य वाटले.

शेंडेनक्षत्र, तुमचे विचार योग्य वाटले नाहीत.
मुस्लिम स्त्रीच्या नवऱ्याने किंवा तिच्या कम्युनिटीतील कोणीतरी काही गुन्हा केला तर त्याची शिक्षा तिला देणे हा reverse discrimination चाच प्रकार वाटतो. तुझा पणजोबा racist/जातीयवादी होता म्हणून आता तुझ्यावर अन्याय झाला तरी तू तो सहन केलाच पाहिजे याच धर्तीवर तुझ्या धर्माच्या पुरुषांच्या गुन्ह्याचा त्रास तू भोगला पाहिजे- it's just not right.
छत्रपती क्षत्रिय होते आणि हिंदू क्षत्रियांचे तर पूर्वापार चालत आलेले युद्धाचे खूपच कडक नियम होते ज्यामध्ये स्त्रियांना harm न करणे (unless she was a demon killing innocent victims!) हे पाळलं जायचं. भीष्मांनी शिखंडीवर शस्त्र चालवलं नाही ही कथा माहितीच असेल. रेप वगैरे तर दूरच पण शत्रूच्या स्त्रियांनाही प्रोटेक्शन देणे, सन्मानाने वागवणे हा क्षत्रियधर्मच आहे.

भीष्मांनी शिखंडीवर शस्त्र चालवलं नाही >> हा फालतूपणा आहे. युद्धात समोर स्त्री सैन्य आलं तर काय करणार हे लोक? नियम असावेत, पण बिंडोकपणा नसावा.

देवा! नंतर नियोगाच्या नावाखाली झाला तो रेप नव्हता? हं . बरोबर. एक प्रकारचा मॅरिटल रेप. त्याला रेप नाही म्हणत.

त्या तिघींना त्यांच्या स्वयंवरातून त्यांच्या पित्याच्या इच्छेविरुद्ध पळवून आणलं होतं. त्यांना विचारलंही नव्हतं. एकदा एका पुरुषाने हात धरला की ती स्त्री दुसर्‍या पुरुषांसाठी त्याज्य. म्हणून तर पुढे शिखंडी कथा आली.
स्त्रियांशी लढणार नाही हेही त्यांना तुच्छ लेखण्यातूनच आलं. नि:शस्त्र व्यक्तीवर वार करणार नाही, मागून वार करणार नाही, हे नियम ठीक. पण स्त्री शत्रसज्ज आहे, स्वतः लढू इच्छिते, तर तिच्याशी लढणार नाही, कारण लढणे हे तिच्या धर्मात बसत नाही. तिने कायम पुरुषाच्या छत्रछायेखाली राहायचं.

सावरकर किंवा, इतर कोणीही असो, त्याने हिंदूंच्या रक्षणासाठी काय करायला पाहिजे ह्याचे सल्ले, ऑफ ऑल पीपल, शिवाजी महाराजांना देणे खूप विनोदी आहे खरं.

तेंव्हा राजे महाराजे कायदे बनवत होते व सैनिक फॉलो करत होते, राजाचे चूक असे म्हणायचा अधिकार जनतेला नव्हता

आता इंडियन पिंनल कोड नुसार वागावे .

आता इंडियन पिंनल कोड नुसार वागावे .
Submitted by BLACKCAT on 17 April, 2022 - 11:34

Exactly!!! अगदी मनातले बोललात!!!
फक्त माहितीसाठी म्हणून सांगतो, इंडियन पिनल कोडमध्ये 'शरियत' येत नाही.

सावरकर किंवा, इतर कोणीही असो, त्याने हिंदूंच्या रक्षणासाठी काय करायला पाहिजे ह्याचे सल्ले, ऑफ ऑल पीपल, शिवाजी महाराजांना देणे खूप विनोदी आहे खरं.>>>>>
+1000

कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला एक मोलकरीण म्हणून कुठल्या गडावर धुणीभांडी करण्याकरता ठेवले असते तर? किंवा त्याहू़न भयंकर अत्याचार, तिला हिंदू केले असते तर? निव्वळ भोगदासी म्हणून वापरणे हाच एक पर्याय नव्हता.
पराभूत काफिरांच्या बायका आणि मालमत्ता ह्या धर्मवीर योद्धांनी वाटून घ्याव्यात असा जर धर्माचाच आदेश असेल तर दुसरी बाजू किती उदात्त वागते ह्यावर हे धर्मांध योद्धे आपले वागणे बदलताना दिसले असते का?
स्वतःची इमेज काय होते ह्यापेक्षा आपल्या समकालीन मुस्लिम आक्रमकांच्या तावडीत सापडलेल्या हिंदू बायकांना अत्याचारापासून वाचवणे महत्त्वाचे नाही का?
>>सावरकर किंवा, इतर कोणीही असो, त्याने हिंदूंच्या रक्षणासाठी काय करायला पाहिजे ह्याचे सल्ले, ऑफ ऑल पीपल, शिवाजी महाराजांना देणे खूप विनोदी आहे खरं.
<<
आपली शिवाजी भक्ती कशी अपार आहे हे दाखवण्याचा एक दयनीय प्रयत्न. इतिहासातील घटनांकडे डोळसपणे बघून त्याचा नीरक्षीर विवेक करणे हे विनोदी? दुसरी बाजू काय? शिवाजी महाराजांनी केले म्हणून सगळे आदरणीय, शिरोधार्य मानणे? कुठलेही मूल्यमापन त्याज्य समजणे ही?

होय, शेंडेनक्षत्र. कबूल आहे, माझा तो प्रतिसाद गंडला आहे. तुमचे म्हणणे, म्हणजे, इतिहासातील घटनांकडे डोळसपणे बघण्याचे - योग्य आहे.

हल्ली राजकीय किंवा अन्य वादांतही आपला एखादा मुद्दा चुकला असं कुणी प्रांजळपणे मान्य करण्याची शक्यता जवळपास शून्य झाली आहे. अशा वातावरणात कॉमी ह्यांचा वरचा प्रतिसाद त्यांचा केवळ भावनांच्या आहारी न जाता सारासारविवेक जागृत असल्याचं दर्शवतो.

मला सावरकरांचा मुद्दा पटला नाही. पण ते फक्त शिवाजी महाराजांची चूक काढली म्हणून नाही. मुळात मला सावरकरांचा युक्तिवादच पटला नाही. युद्धात फक्त योध्यांनाच इजा करावी, त्यात भाग न घेणार्‍यांना नाही - हे धोरण जास्त पटण्यासारखे आहे, निदान त्यावेळची परिस्थिती पाहता. कदाचित भाग न घेणार्‍यांना वेठीस धरून तत्क्षणी काहीतरी शॉर्ट-टर्म राजकीय फायदा होऊ शकला असता, पण तेच राज्य जेव्हा शिवरायांच्या हाताखाली आलं असतं तेव्हा त्यांना अश्या त्रास झालेल्या लोकांकडून मोठा अंतर्गत विरोध आणि विद्रोह सहन करावा लागला असता. लहानातल्या लहान व्यक्तीकडूनही शिवरायांना मान्यता मिळणं हे त्यांचं बलस्थान होतं आणि त्या जोरावरच संख्येनं नगण्य असूनही ते ३-४ शाह्यांशी टक्कर देऊ शकले. त्यामुळे गनिमांच्या स्त्रियांनाच काय, इतर अ-योद्ध्या लोकांना त्रास देणं हे भविष्याच्या विस्ताराच्या दृष्टीने स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं होतं.

भरत, हे भावनिक विधान झालं. त्यांनी वेगळेपण दाखवण्यासाठी ते केलं नाही. ते इतरांपेक्षा वेगळे नसते, तरी त्यांनी जनकल्याणासाठी जे केलं त्यासाठी त्यांना तितकाच आदर मिळाला असता. प्रश्न स्ट्रॅटेजिक आहे. त्यांनी जी स्ट्रॅतेजी वापरली त्यामुळे त्यांना लोकानुनय मिळाला आणि दीर्घकालीन फायदा झाला. पण त्यांच्याही काही चुका झाल्याच असतील ना? ते गेल्यावर पुढे मराठी राज्याची झपाझप पडझड झाली किंवा अंतर्गत दुही झाली ह्याचा अर्थ 'त्यांच्यात आणि इतर राजांत फरक' जो होता, तो काही सगळाच्या सगळा योग्यच होता असं नाही.

स्वतःची इमेज काय होते ह्यापेक्षा आपल्या समकालीन मुस्लिम आक्रमकांच्या तावडीत सापडलेल्या हिंदू बायकांना अत्याचारापासून वाचवणे महत्त्वाचे नाही का?///

हिंदू स्त्रीपुरुषांना छत्रपतींनीच वाचवलं ना. दुसरं कोण होतं??
काशी की कला जाती, मथुरा मस्जिद होती | सिवाजी न होते तो , सुन्नत होती सबकी ||.

पण कोणत्याही परिस्थितीत निरपराध व्यक्तींना त्रास देणं हे क्षत्रिय धर्माच्या विरुद्धच आहे.
त्यातून समजा त्या मुस्लिम स्त्रियांना सुरक्षित ठेवून फक्त खोटी आवई उठवून दिली असती की त्यांच्यावर अत्याचार होत आहेत तरीही समोरच्या बाजूला काही फरक पडला असता असं वाटत नाही. समोरची बाजू क्षत्रिय किंवा युरोपियन असती तर तसं tactic वर्क झालं असतंही.

त्यांनी वेगळेपणा दाखवण्यासाठी केलं असं मी म्हणतच नाही. ते वेगळेच होते ; म्हणूनच त्यांना लोकोत्तर पुरुष मानले जाते.
त्या स्ट्रॅटेजीमु ळे लोकानुयय मिळाला असं म्हणणं हे त्या वेळच्या किंवा आताच्याही बहुसंख्य लोकांच्या नैतिकतेबद्दलचं विधान ठरतं. सुदैवाने बहुसंख्यांना ते तसं न करणंच योग्य वाटलं. किंवा हा माझा भाबडा गैरसमज असेल.
. आता कुणीतरी कुठेतरी कधीतरी केलेल्या बलात्कारांना बलात्कार हे उत्तर आहे असं सांगणार्‍यांच्या मागे लोक जातात. चालायचंच.

खरयं, श्रीराम आणी छत्रपती शिवाजी महाराज तसेच संभाजी महाराज देखील लोकोत्तर पुरुष होते.

मला सावरकरांचा मुद्दा पटला नाही. पण ते फक्त शिवाजी महाराजांची चूक काढली म्हणून नाही. मुळात मला सावरकरांचा युक्तिवादच पटला नाही. युद्धात फक्त योध्यांनाच इजा करावी, त्यात भाग न घेणार्‍यांना नाही - हे धोरण जास्त पटण्यासारखे आहे, निदान त्यावेळची परिस्थिती पाहता. कदाचित भाग न घेणार्‍यांना वेठीस धरून तत्क्षणी काहीतरी शॉर्ट-टर्म राजकीय फायदा होऊ शकला असता, पण तेच राज्य जेव्हा शिवरायांच्या हाताखाली आलं असतं तेव्हा त्यांना अश्या त्रास झालेल्या लोकांकडून मोठा अंतर्गत विरोध आणि विद्रोह सहन करावा लागला असता. लहानातल्या लहान व्यक्तीकडूनही शिवरायांना मान्यता मिळणं हे त्यांचं बलस्थान होतं आणि त्या जोरावरच संख्येनं नगण्य असूनही ते ३-४ शाह्यांशी टक्कर देऊ शकले. त्यामुळे गनिमांच्या स्त्रियांनाच काय, इतर अ-योद्ध्या लोकांना त्रास देणं हे भविष्याच्या विस्ताराच्या दृष्टीने स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं होतं.>>>>> पर्फेक्ट !!

मग! अब्दालीच्या भावांनी नाही का त्याला मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने पण वोईच किया जो हिंदु राजा करते थे. बाप बडा ना मैइया, द होल थिंग इज दॅट के भय्या सबसे बडा रुपय्या !

असं नाही. हिंदू , विशेषत: क्षत्रियांचं वर्तन अगदी आदर्शवत, नैतिकतेला धरून असतं. त्यांची तुलना म्लेंच्छांशी नको.

Pages