आई कुठे काय करते!-२

Submitted by sonalisl on 18 March, 2022 - 12:00

आई कुठे काय करते…. https://www.maayboli.com/node/73150 या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे. पुढील चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्पा सापडले एकदाचे. मला पण वॅाचमनसारखी नोकरी करावी लागेल असे म्हणत होते. आता अशुने त्यांना सुद्धा कामाला लावावे(त्याच्याकडे सगळ्यांसाठी काम असते!)
अल्बम रिलिजच्या समारंभाला शानभाग कुटुंबाला बोलवायला विसरले ना अशू आणि अरू?
नित्याची बायको पण येणार होती पण ती आजारी पडली अन तिला दवाखान्यात ॲडमीट केले. तिला नक्की काय झाले हे नित्याला माहित नव्हते कारण त्याला कामाच्या व्यापामुळे घरी वेळ देता येत नाही.

हो. ते नितीनच्या बायकोचे आजारपण म्हणजे आशुला स्वतःहून का ही ही करता येत नाही, याचा पुरावाच. नक्की कसं कॅरॅक्टर डेव्हलप करताहेत?

ही मालिका बंगाली मालिका श्रीमोयीचा रिमेक आहे
त्यानुसार अरुंधती आशुतोषच लग्न होत आणि शेवटच्या एपिसोड मधे आशुतोषचा मृत्यू होतो आणि अरुंधती सगळं सोडून , आशुतोषची संपत्ती दान करून कायमची आश्रमात निघून जाते
जाता जाता अनघाला सगळ्यांची काळजी घे अस सांगते

अरुंधती सगळं सोडून , आशुतोषची संपत्ती दान करून कायमची आश्रमात निघून जाते >>> Happy त्यापेक्षा हिमालयात गेली तर बहुधा सर्व प्रेक्षकमंडळी तोपर्यंत तेथे भेटतील Happy

मी बघत नाही पण एका बंगाली मैत्रिणीकडून कळली स्टोरी , मराठी मधे शेवटचा भाग येईपर्यंत एक वर्ष जाईल बहुदा

अग तो छान आहे खरंतर, झी युवाच्या सिरीयलमधे मला कसला आवडला होता, स्मार्ट एकदम, खळ्याही खुलून दिसायच्या. इथे त्याच्या चष्म्याकडेच लक्ष जातं पहीलं, आणि बावळत वाटतो. >>>>>> रविवारी स्टार प्रवाह्च्या अ‍ॅवॉर्ड सोहळयात पण छान दिसत होता.

(त्याच्याकडे सगळ्यांसाठी काम असते!) >>>>>> सन्जना बरोबर म्हणत होती.

ही मालिका बंगाली मालिका श्रीमोयीचा रिमेक आहे
त्यानुसार अरुंधती आशुतोषच लग्न होत >>>>>> हे माहित होत. पण आशुतोष शेवटी मरतो हे पहिल्यान्दाच कळल. सम्पलीसुद्दा हि सिरियल?

सम्पलीसुद्दा हि सिरियल?>>> अजुन कुठे , भरपुर वेळ असेल त्याला, असा शेवट असेल तर आधि अनुपमा मधे कळेल मग इकडे येइल

मालिका बघत नसले तरी बंगाली शेवट जसा आहे तसा नको करायला असं वाटतं. अरुंधतीला अजून महान दाखवण्यासाठी आशुतोषला उगाच मारू नका.

सम्पलीसुद्दा हि सिरियल?> मी बन्गाली सिरियलबद्दल विचारत होते.

वरच्या फेबु पोस्टमध्ये लिहिलेला शेवट चान्गला आहे.

मराठीत जर आशुतोषचा मृत्यू दाखवायचा असेल तर अरुने आश्रमात निघून जाण्याचा शेवट पटला नाही. ती गायनाच्या क्षेत्रात यशस्वी होते, असा पॉझिटिव्ह शेवट असायला हवा. आशुतोषचे तेच स्व्पन असते ना की अरु ने गायिका म्हणून नाव कमवाव. तसच तिने शेवटी म्युझिक स्कुल साम्भाळावी.

बंगाली शेवट जसा आहे तसा नको करायला असं वाटतं. >>>>>>> अगदी अगदी.

मालिकांतल्या सद्गुणी सोज्वळ स्त्रियांना पुनर्विवाहाची परवानगी नसते. अवंतिका शेवटी काय निर्णय घेते ते दाखवलंच नव्हतं.

नाही. ती अनाथाश्रम की कुठल्या बालोद्यानात जाते आणि ते दोघे तिथे येतात असा शेवट आठवतोय. ती नक्की कोणाची निवड करते, करते का? हे दाखवलं नाही.

नाही अवंतिका चा लास्ट एपी होता त्यात ती रवींद्र मंकणी ला मिठी मारते आणि समोरून तिचा आधीचा नवरा येतो...
म्हणजे सुखी शेवट होता....

मग माझी स्मरणशक्ती मला दगा देत असेल.

हाच आहे ना शेवटचा एपिसोड
शेवट क्लीअर केलेला नाही. सौरभच्या डोळ्यांत पाणी आणि शशांकच्या चेहर्‍यावर हसू. पण अवंतिका त्याला लटकवत ठेवते आहे असे वाटते. कमेंट्समध्येही अनेकांना शेवट कळलेला नाही.

श्रेयनामावलीत मायबोलीकर भारती डिग्गीकर यांचं नाव आहे - विशेष गीत.
------
अमा पुन्हा गायब झाल्या? ऑल वेल?

शेवट क्लीअर केलेला नाही. सौरभच्या डोळ्यांत पाणी आणि शशांकच्या चेहर्‍यावर हसू. पण अवंतिका त्याला लटकवत ठेवते आहे असे वाटते. कमेंट्समध्येही अनेकांना शेवट कळलेला नाही. >>>>>> अगदी अगदी. पण शेवटी ती लाजताना दाखवलीये. किव्वा तिची ती उपहासात्मक स्माईल देखील असू शकते.

रोहिणी निनावे अवन्तिकाची लेखिका होती. झीमच्या दिवाळी अन्कात तिने अवन्तिकाच्या शेवटाविषयी लिहिल आहे. तिने शेवट सन्दिग्ध ठेवला. नरो वा कुन्जरो वा अश्या अर्थाने. खर तर तिला अवन्तिकाने दोघान्पैकी कुणाचीही निवड करु नये अस वाटत होत.

मुग्धा गोडबोले सेन्सिबल असेल तर आशुतोषला नाही मारणार. >>>>>>>> सहमत. जुने हिन्दी प्रेम-त्रिकोण असलेले चित्रपट आणि आताचे कोरियन सिरिज, चान्गल्या कॅरेक्टर्सना का मारुन टाकतात देव जाणे!

आता रविवारीही दाखवतात.

आशुबाळाचे केस कापलेत. स्कूलबॉय दिसतोय.

नितीनच्या बायकोचं आजारपण ड्रॉप केलं?

हे दोघेही अरुंधतीच्या ( किंवा कोणत्याही) घरात बूट घालून फिरतात.

अरुंधतीच्या घर सोडण्यापेक्षा अप्पांचं घर सोडणं जास्त गाजतंय.

Lol

परवा ते सगळे अप्पांना समजावत होते की सामाजिक कार्यात भाग घ्या वगैरे. तेव्हा रिकाम्या वेळाबद्दल बोलताना एक मिनीट मला वाटले की अप्पांनाच सांगणार हे आता "उगाच कसल्यातरी मालिका बघत बसता" Happy

मधेच त्या आजींच्या षष्ठीसमारंभाचे भाषण असल्यासारखे "त्यांनी खूप केले" चे कौतुक सुरू झाले.

त्या अनिरूद्ध पासून अप्पा घर सोडून गेलेत हे लपवण्याचा बाकीच्यांचा प्रयत्न म्हणजे "किती पाणी घालाल. आता नुसतेच पाणी आणि आत दुसरे काहीच नाही" अशी अवस्था झाली होती. त्या अनिरूद्धचा आवाज जोराने ओरडायला अजिबात सूट नाही.

पूर्वी घरात फक्त पुरूष हा कर्ता/कमावता असलेली काही घरे असत. तेथील वातावरण पाहिले आहे. त्याला सगळे बिचकून राहात. तो "दमून" वगैरे घरी आला की घरचे वातावरण एकदम बदलत असे. हे आता बाहेरच्या जगात बदलले तरी मराठी सिरीज मधे अजून तसेच आहे असे दिसते.

आप्पाना घ्यायला कान्चन येते तेव्हा आशु आणी नित्याला सगळ माहित असल तरी थान्बवुन घ्यायच कारण कळल नाहि, भयकर ऑड दिसत होत ते
अरुला त्या मठ्ठ कान्चन्बद्दल अजुनही कळवळा बघुन अरुसारखे लोक हे डिझर्व्ह करतात हे म्हणाव लागेल

हा काय वेडेपणा आहे. घर सगळ्यांच असल पाहिजे ना. रोज एक माणूस दुसर्या माणसाला काढायला निघालाय.
आणि कांचन काय काय बोलत होती - तु मला आवडतेस कारण मी बस म्हंट्ल की तू बसणार, उठ म्हणल की उठणार. किती चुकिच आहे हे.

अरु कांचनला घेउन येते तो सिन बघुन ऑफिसातल्या livesite incident management ची आठवण झाली. अनिरुद्ध = incident, संजना = junior developer/pm, wanting to prove themselves but creating more chaos, अरु = seasoned developer/pm, performs e2e analysis, gives commands, mitigates and leaves

पूर्वी घरात फक्त पुरूष हा कर्ता/कमावता असलेली काही घरे असत. तेथील वातावरण पाहिले आहे. त्याला सगळे बिचकून राहात. तो "दमून" वगैरे घरी आला की घरचे वातावरण एकदम बदलत असे. हे आता बाहेरच्या जगात बदलले तरी मराठी सिरीज मधे अजून तसेच आहे असे दिसते.>>>>>>>>>>मराठी सिरियल्स मध्ये अजून बरेच काही तसेच आहे

प्राजक्ता, आपल्याला ऑड वाटले तरी सीरीयल वाल्यांना हवेच आहेत ना आशु नित्या प्रत्येक प्रसंगात !
कैच्च्या कै! मी तर जाम त्या कांचन चे तोंड बघितले नसते.....!!
उलट अन्या ने तिला चांगले सुनावले.......... अरु पेक्षा!

अन्याचे पितृप्रेम अचानक कसे काय उफाळून आलेय? एरवी तर मातृभक्त असतो नेहमी. त्याला कधीचे फुटेज मिळत नव्हते ना म्हणून आता भडास काढून घेतली.

उलट अन्या ने तिला चांगले सुनावले.......... अरु पेक्षा! >>> हो. तो तर अरुलाही सुनावतोय तुझा काय संबंध? निघ इथून. ही बया as usual त्या घरात जाणार च' आणि अपमान करून घेणारच , याची प्रेक्षकांनी सवय करून घ्यावी आता. धन्य. यशला नव्हतं सांगता येत म्हातारीला घरी घेऊन जायला?

मराठी कुडी +११‌ .

अरुसारखे लोक हे डिझर्व्ह करतात हे म्हणाव लागेल >>> +१११
असे लोक अनिरुद्ध आणि त्याच्या आईसारख्या लोकांची गुलामगिरी करायलाच जन्म घेतात वाटतं.

अमा पुन्हा गायब झाल्या? ऑल वेल? > +१>> हाय आहे ना. पन कथानक जामच बोअर आहे. काय लिहिणार मी तरी. आजो बा आजीचे भांडण जुने मुरलेले लोणचे फसफसले आहे. हा भाग अनु पमा मध्ये फार नाटकीय पद्धतीने घेतला होता तिथे एकूणच ह पा ड्रामे असतात. ह्या अई कुठे काय करते मध्ये साधारण कोनीतरी घरा बाहेर हरवते. सैर भैर मध्ये चालत राहते मग कोणतेतरी टर्शरी कॅरेक्टर ओळाखून गुराला दावणीस आ णून बांधते. मुख्य म्हण जे सर्व परिस्थितीत अरु मान उंच करू करू तो व्यक्ती शोधत फिरत राहते. मागे इशा हरवली तेव्हा असेच. आत तिच्यामागे
आशू असतो. इतका तेलकट माणूस पहिले शॉवर घ्यायला पाठिवला पाहिजे.

आज म्हातार्‍याने परत विनंती केली अरू शी लग्न करा म्हणून. हे सासरा विधवा सुनेचे लग्न लावून देतो हे फार घिसे पिटे आहे. गाय ही कायम बांधलेलीच हवी. मोकाट फिरायला नको. एक

एकदा नवर्‍याला खरे बोलली तर कांचन एकदम आरोपी च्या पिंजर्‍यात व नीघ इथून लेव्हल ला. ह्या घरच्या बाप्यांना काय सोने लागले आहे का?!
नित्याची बायको गंभीर आजारी आहे तरी हा इथेच आजोबाचे कवतिक ऐकत बसला आहे. ह्यातले मला काहीच पट ले नाही. समृद्धी बंगल्या ऐवजी एक एक खोल्यांची चाळ हवी प्रत्येकाची स्वतंत्र खोली व घर.

Pages