Submitted by sonalisl on 18 March, 2022 - 12:00
आई कुठे काय करते…. https://www.maayboli.com/node/73150 या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे. पुढील चर्चेसाठी हा धागा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पण ती नेहमी सारखी छान नाही
पण ती नेहमी सारखी छान नाही दिसत आहे.>>> सन्जनाचा आधीचा लुक आणि ड्रेसेस छान असायचे आता काहितरी टेन्गुळ आल्यासारखे पफ्स,खोटे लटकलेले एक्सटेन्शन आणी काहिही मेकप असतो.
निखिल उन्च आणि गुटगूटित झालाय किमान १० वर्शाचा तरी असेल ना? वयाच्या मानाने त्याला भुमिका अग्दी ४-५ वर्शाच्या मुलासारखी देतात.
गौरीने आधीच साडी दिली होती की
गौरीने आधीच साडी दिली होती की अरुला, ही घ्या तुमची डिझाईनर साडी असे म्हणून. अरुची लाल साडी काही डिझाईन केलेली नव्हती. दागिनेही वेगळे ठरले होते. साडया अगदीच पायघोळ नेसतात, उंच दिसण्यासाठी. संजनाची साडी कॉकटेल पार्टीसाठी योग्य होती. आधी संजनाने वेणी घातली होती ना आशुतोष येतो तेव्हा. संजनाच्या मनासारखा तमाशा होत नाही बहुतेक कारण अरु ठामपणे हे मैत्रीचे उपकार नाहीत तर माझी योग्यताच तेव्हडी आहे असे ठासून सांगते. आता दुसऱ्या दिवशी पेपरच्या पहिल्या पानावर ही बातमी असेल आणि टीव्हीवरसुद्धा हेच दाखवतील.
इथे आई विचार फेकत असते. तिला
इथे आई विचार फेकत असते. तिला अडकवू नका. कसलीच बंधन घालू नका >>> अमा जबरी वर्णन आहे. पाहिला तो भाग. स्वतःचे कमर्शियल इंटरेस्ट बाजूला ठेवून सगळे अरू-सेण्ट्रिक संवाद मारत आहेत.
आणि लायटिंगचे काहीतरी करा म्हणावं. १०० वॅटचे दिवे लावून ते दणक्यात परावर्तित करणारे रंग आहेत सगळ्या भिंतींचे. विशेषतः त्या आशुतोष च्या घरी.
दर वाक्यागणिक अरू कशी इतरांपेक्षा संगीत, ड्रायव्हिंग ते बालसंगोपन सर्व विषयात इतरांपेक्षा भारी आहे याचे दळण आहे. ती संजना किती व्हिलनिश वगैरे आहे माहीत नाही पण तिची ऑफिसमधल्या मिटिंग मधे वैयक्तिक गोष्टीवरून बळंच हेटाळणी केली आहे.
पण त्या शेखरचा रोल पहिल्यांदाच पाहिला. त्याचे संवाद कोणी दुसर्याने लिहीले आहेत का? एकदम धमाल आहे. जेन्युइनली विनोदी. "ओ सेमी-इंग्लिश मिडीयम!" किंवा "तुझ्या फुल्याफुल्यांवर लाथ मारून कोणी घराबाहेर पडले असेल तर...". एकदम अशोक सराफ कॅटेगरी रोल आहे.
पण तो शेखर त्या ऑफिसकरता काम करतो हे त्या दोघींना कसे माहीत नाही? की आपल्याला सरप्राइज म्हणून त्यांनाही सरप्राइज. त्याचे नक्की नाते काय आहे? संजना त्याची एक्स-बायको हे कळाले. बाकीच्यांशी काय नाते ते कळाले नाही. अरू त्याला भावजी म्हणत होती या भागात.
सगळे चांगले पुरुष अरुंधतीला
सगळे चांगले पुरुष अरुंधतीला बहीण मानतात.
संजनाचा एक्स नवरा तिला बहीण मानतो.
अरुंधतीची नणंद विशाखा - तिचा नवरा केदार अरुंधतीला बहीण मानतो. त्यांनी भाऊबीजसुद्धा केली. झालंच तर दीरसुद्धा भावासारखाच.
संजना घरच्या गोष्टींवरून ऑफिसात अरुंधतीची हेटाळणी करत असते (आणि ऑफिस- आशुतोषवरून घरी) त्यामुळे तिच्या एक्सकरवी तिला सव्याज परतफेड करण्यात आली.
आपल्यासारखीला अनिरुद्धसारखा खडूस , बेकार म्हातारा मिळाला आणि अरुंधतीसारखीला आशुतोषसारखा क्युट, प्रेमळ , बिझिनेस टायकून मिळतोय यामुळे संजनाच्या पोटात दुखतंय.
शेखर काय काम करतो हे त्या लोकांनाच काय , लेखकांनासुद्धा आतापर्यंत माहीत नव्हतं, तो सुद्धा बेकार होता . आता त्यांना अचानक त्याची आठवण आली आणि त्याला होर्डिंग्जचं काम दिलं.
इथे नात्यांचा खूप गुंता आहे. यशची होणारी बायको संजनाची भाची आहे. तिची आई आणि संजना- अनिरुद्ध एकाच ऑफिसात होते.
शेखर आहेच भारी, त्याचे वन
शेखर आहेच भारी, त्याचे वन लायनर मजा आणतात.
भरत भारी लिहीलंय, हाहाहा.
भरत भारी लिहीलंय, हाहाहा.
दर वाक्यागणिक अरू कशी इतरांपेक्षा संगीत, ड्रायव्हिंग ते बालसंगोपन सर्व विषयात इतरांपेक्षा भारी आहे याचे दळण आहे. >>> हाहाहा.
इथे नात्यांचा खूप गुंता आहे.
इथे नात्यांचा खूप गुंता आहे. यशची होणारी बायको संजनाची भाची आहे. तिची आई आणि संजना- अनिरुद्ध एकाच ऑफिसात होते. >>> थँक्स. अधूनमधून बघितल्याने सगळा गोतावळा डोक्यात क्लिअर नाही.
शुभप्रभातः टाळ्यांच्या
शुभप्रभातः टाळ्यांच्या गजरात सुरुवात.
अँड द ऑस्कर फॉर बिग ड्रामा फॉर वन साँग गोज टु मिस जोगळेकर.
आधीच टाळ्या. अनघा भरपूर निवेदन करते दात दाख्वत. आशुतोश सरांचे कौतूक. म्ग हा उभा राह्तो व कसंच कसचं मी कोण काय वगैरे बोलून ह्याचे वडील बिल्डर होते पण त्यांना गाण्याचा शौक होता व कलाकारांना आपण प्रोत्साहन दिले पाहिजे असे बाबा म्हणत. मग ह्याचे अल्बम मागचे अमेरिकेत पहिला अल्बम कसा जन्मास आला हे सांगत आहे. भाशण ह्याचे वडील बिल्डर असल्याने
ह्याला खरे तर अल्बम करत मजेत जगत आहे. बापने करोड बनाये है और अभि नितिन बिझनेस देख रहा . तो इन्हे आशिकी करते फिर रहा. आता हा नित्याला पन मला तू हवा आहेस म्हणतो. असाच पाठीशी रहा म्हणे.
मग आई चे आभार.
अरु च्या ओळखीच्या वेळी चा अन्या येतो. सूट ब्यागेतून काढून बरेच दिवसांनी.
मग दीप प्रज्वलन . सर्व म्हातारे समई लावतात
मग सीडी चे अनावरण.
लिप सिंक. मग तिचे अन्या कडे लक्ष जाते व एकदम लक्ष बिन सते पण ती सावरू न घेते.
मग अरु परत एकदा तेच चार ओळी म्हण्ते. अल्बमात एकूण आठ गाणी आहेत. पण अरुचेच गाणे पुश करत आहे बाल प्रियकर.
मग अनघा ताई ताई आँ मोला पॉण शाँ ग ना तुला कॉ य वॉटा ते म्हणून अरु ला भरीस पाडते. मग अरु पार विमल सकट सर्वांचे उसासे टाकत आभार मानते. व विशेस श करून आशूचे कौतूक. एकदम भावनिक मोमेंट. हात जोडुन वगैरे. पण अन्या खवट कटाक्ष टाकत आहे.
आता प्रेस कॉन्फरन्स सुरू होते व संगीत विद्यालयाची घोषणा करतो. मग काही थातुर मातूर पत्रकार प्रश्न करत आहेत.
आता संजनाचे खवट पत्रकार येतील बहुतेक. बीएम सीचा अर्थ संकल्प असल्याचे फीलिन्ग आले आहे.
मग एक जण संजनाचा पाकीट पत्रकार अरु च्या लाइफ बद्दल प्रश्न करून सारे वैयक्तिक डीटेल विचारून घेतो.
प्रोमोमध्ये अरुची आई रड कुंडीला आली आहे व अन्या खूश आहे की असे गॉसिप छापून येइल . पहिले चांगला बॉस असेल तर संजनाला सॅक करील आशू बॉई.
सन्जना काय करतेय याकडे "लक्ष
सन्जना काय करतेय याकडे "लक्ष असत माझ" अस म्हणत नित्याच लक्ष आहे त्यामुळे सन्जना गेट कि़क्ड आउट ऑफ जॉब
आशु द ग्रेट गबरु आपल घाबरु अन्यालाही जेल मधे टाकणार आहे अस एक दोन युट्युबर म्हणतायत.( भयकर इरिटेटिन्ग व्हिडियो आहेत ते)
नीलेश मोहरीरचा फोटो लावला
नीलेश मोहरीरचा फोटो लावला बुवा एकदाचा.
इथे नात्यांचा खूप गुंता आहे.
इथे नात्यांचा खूप गुंता आहे. >>> ते आहेच,, वरुन आपल्या होणा-या सासुला ताई म्हणायची पण पध्दत आहे यांच्यात,, आधी अनघा आणि आता अरु. काल परवाच्या भागात म्हणत होती , येते हं सुलेखा ताई
भरत आणि भाग्यश्री१२३..
भरत आणि भाग्यश्री१२३..
सगळे चांगले पुरुष अरुंधतीला बहीण मानतात.... म्हणजे आशु चांगला पुरुष नाही का..?
असलेल्या किंवा होणार्या सासूला ताई म्हणण्याची पद्धत..!!!
म्हणजे आशु चांगला पुरुष नाही
म्हणजे आशु चांगला पुरुष नाही का..>> इरादे नेक नै.
चांगला. पुरुष. अलग अलग है.
अरुंधती घरून निघताना त्याला
अरुंधती घरून निघताना त्याला जखमेवरून सांगत होती तेव्हा पण तेच वेडसर भाव आले होते.
अरुंधतीसाठी तो चौथं मूल असेल.
वेडसर भाव....
वेडसर भाव....
खरेच... कास्टींग अगदीच गंडलेलं आहे आशुतोष चं..... !!
कोण काढला हा हिरो.....? बरं...त्याला कपडे तरी चांगले द्यायचे... हेअर स्टाईल, शूज, चष्मा, संवाद ? .... तर तेही नाही! त्याच्या साठी त्याचे व्यक्तीमत्व डिफाईन करणारे डायलॉग्ज.... तर तेही गचाळ! त्याला झुरळाला घाबरणारा, रक्त पाहातच फेफरे येणारा.......कोमल हृदयाचा करुन टाकला... !!
मी ते त्या आशुतोष च्या घरी
मी ते त्या आशुतोष च्या घरी येतात व तेथे पुन्हा त्याच्या स्वभावाबद्दल चर्चा होते तिथपर्यंत आलो आहे. अर्थात तो सुद्धा एक बदलच वाटला. कारण एरव्ही सगळी चर्चा उपस्थित व्यक्तींनुसार फक्त अरू कशी छान आहे/अरू कशी छान नाही या मुद्द्यांभोवतीच फिरत होती. पण आता तो बहुचर्चित "इव्हेण्ट" कसा आहे त्याबद्दल तुफान कुतूहल आहे. त्यामुळे वरचे अमांनी लिहीलेले वरवर वाचले फक्त
घर्रगुती कार्यक्रम आहे.
घर्रगुती कार्यक्रम आहे.
पुढल्या खुर्च्यांवर सगळे घरचेच लोक बसलेत.
दुसरा एक गायक आणि गायिका उभे केलेत.
शुभप्रभात
शुभप्रभात
प्रेस कॉन्फरन्स चालू आहे नीलेश मोहरी पण अरु चे कौतूक करतो.
मग संजनाचे पाकीट पत्रकार खडूस प्रश्न विचारायला लागतात त्यांची नेत्रपल्लवी अवीने नोटिस केली आहे. त्याचे उत्तर अरू देते . मागे आई कुठे काय करते संगीत वाजत आहे. मी शंबर टक्के म माझ्या वाट्याला जे आलं त्यला मी १००% न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे. मग दुसरा अगदीच गाण्यसाठी घर सोडलेत का असा खडूस प्रश्न विचारतो आशू वैतागतो व पर्सनल प्रश्न विचारू नका म्हणतो. अन्या संजना खूश होतात
यश व अवि पण त्या पत्रकारांच्या मागे गेले आहेत.
आई रड कुंडीला आली आहे. अन्या खडूस पणे गॉसिप होईल वगैरे बकतो. फारच खडूस हसतो. अन्या सँडिस्ट आहे व त्याला अरूला दु:खी करण्यातच सूख आहे हे अगदी समोर येते. सर्व सपोर्टिन्ग पार्टी सपोर्ट करतात संजना तिथेच पीडी घेते फुटेज ची व पाकीट देत अस्ते तेव्हा अवि व यश पकडतात.
तो माणूस लगेच कबुली देतो व यश पेन ड्राइव पण घेतो परत. आता ही विधान सभेत च पुरावा म्हणून दाखल होईल.
त्याला हाकलून देतात व मग आशू सर्व निर्णय अरु च्या हाती देतो व संज ना इज फायर्ड फायर्ड फायर्ड. अरु झिं दाबाद. सत्याचा विजय असो.
अन्या नामा निराळा कुत्सि त भावाने बघत आहे.
प्रोमो मध्ये तो आशू वर बोट उगारून कायतरी बोलून सटकायला बघतो पन नित्या त्याचा हात खाली घेतो. अरू एकदम कठोर पणे बघत आहे.
ती अगदी ज्येश्ठा गौर मुख वट्या सारखी दिसते बरोब्बर ह्या गेट अप मध्ये. चांगला भाग जरूर बघा. यु गेट दॅट सोप ऑपेरा रश.
इन अदर न्यूजः विल स्मिथ ने क्रिस रॉकला थोबाडित मारली. इसकु बोलते पती. बाकी सब लफडेपती.
भारी अपडेट!
भारी अपडेट!
बाय द वे, विल स्मिथही आधि जोकवर हसला मग बाय्कोला आवडलेल दिसल नाही आणी घरी गेल्यावर बाय्को पुजा बान्धेल हे जाणवल मग उठुन जाउन एक झापडित ठेवुन आला, जोक वॉज इन एक्सट्रीमली बॅड टेस्ट पण तरी विल स्मिथला निषेध बोलुनही नोन्दवता आला असता, त्याने कोड ऑफ कन्डक्ट ब्रेक केला त्यामुळे अॅकेडमीने त्याला तिथेच बाहेर काढायला हव होत अॅवॉर्ड वैगरे दुरच राहिल.
तो माणूस लगेच कबुली देतो व यश
तो माणूस लगेच कबुली देतो व यश पेन ड्राइव पण घेतो परत. आता ही विधान सभेत च पुरावा म्हणून दाखल होईल. >> हाहाहा
ती अगदी ज्येश्ठा गौर मुख
ती अगदी ज्येश्ठा गौर मुख वट्या सारखी दिसते बरोब्बर ह्या गेट अप मध्ये.>>
अमा, कसले परफेक्ट निरिक्षण तुमचे!
पत्रकारांना मारहाण.
पत्रकारांना मारहाण.
ज्याने घटस्फोटाबद्दल प्रश्न विचारला तो तर पळून गेला.
संजनाची नोकरी गेल्याचं ऐकून अनिरुद्ध खुष झालेला दिसतोय
ट्रायल
ट्रायल
तो शेखर संजनाचा मुलगा बदलला
तो शेखर संजनाचा मुलगा बदलला का (कलाकार), जुना बरा होता की. तो जुनाच सोनीच्या ताराराणीत होता का, अजून त्या रेशिमगाठीत, का मी कन्फुस्ड.
तो एक सीन बघितला, तो मुलगा काकू जेवायला चल करत असतो त्या सीनमधे कोणीच इंप्रेसिव्ह वाटलं नाही, त्या मुलासह सर्व बोअर होते. अरु, आशू, निखिल, संजना, अनि होते.
नाहि निखिल तोच आहे, हेअर कट
नाहि निखिल तोच आहे, हेअर कट वैगरे चेन्ज झालाय, जरा गुटगुटित पण वाटतोय. मुल पटापट ग्रो होतात.
संजनाची नोकरी गेल्याचं ऐकून अनिरुद्ध खुष झालेला दिसतोय>>> लिमिटेड एक्सप्रेशन प्रॉब्लेम आहे अन्याचा, कुणी बोलत असताना भुवया उडवल्यासारख करतो नाहितर शिरा ताणून अन्गावर धावुन येतो.
आशु पण मेन्गळटच आहे, चिडल्याचे हाव भाव पण निट देता येत नाहित त्याला.
ती अगदी ज्येश्ठा गौर मुख वट्या सारखी दिसते बरोब्बर ह्या गेट अप मध्ये.>>>> अगदी अगदी परफेक्ट निरिक्षण, छान दिसत होती अरु
त्या तिथे अनुजला बघून मराठी
त्या तिथे अनुजला बघून मराठी वाल्याना कोणी हिरो दिसला नाहीका. आशुची निवड अगदीच नाही पटली. मोठी मोठी नावं येत होती स ध, रा शृंगारपुरे, अजिंक्य देव.
एरवी मला ओमकार गोवर्धन आवडतो पण इथे अजिबात बघवत नाही त्याला.
अजिंक्य देव>>> मग तर संजना
अजिंक्य देव>>> मग तर संजना अन्याला सोडून याच्या मागे लागली असती
हाहाहा. खरं आहे.
हाहाहा. खरं आहे.
कसला आहे ना अजिंक्य देव अजूनही.
आता पुन्हा सन्जना अन्याबरोबर
आता पुन्हा सन्जना अन्याबरोबर बेक्कार घरी बसेल. हिची पहिली नोकरीसुद्दा हिच्याच चुकीमुळे गेली.
कसला आहे ना अजिंक्य देव
कसला आहे ना अजिंक्य देव अजूनही.>>+१
अशुतोष फारच बोरिंग आहे. असा अभिनेता घ्यायला हवा होता ज्याला बघून प्रेक्षकांनाही वाटायला हवे कि अरूने त्याच्या प्रेमात पडावे.
Pages