आई कुठे काय करते!-२

Submitted by sonalisl on 18 March, 2022 - 12:00

आई कुठे काय करते…. https://www.maayboli.com/node/73150 या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे. पुढील चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शुभ प्रभातः
अन्या संजना कडव्ट प्रवेश परत एकदा होतो. त्यांना हाकलतात मग सर्व अरु कौतुकात मग्न आहेत. अरु कौतुकाची एक चिठ्ठ्या लिहून ठेवलेली ब बास्केट आहे त्यातुन लेखीका रँडम कोट उचलते व कोणाच्याही तोंडात येते. खालील बघा:

अप्पा: अरुंधती जाउदे तुझ्या कार्यक्रमाला नजर लागू नये म्हणून हे गालबोट लागले
सुलेखा भावी सासू ताई: खरं अरु तू छान बोललीस छान उत्तर दिली उत्तम गायलीस
अवि वहिनी कार्यरक्म उत्तम झाला
विशाखा: सगळी लोके तर तुझे गाणे कानात प्राण आणून ऐकत होती. ( नेहरूंच्या समोर ए मेरे व्तन के लोगो लेव्हल आठवली)
इशा: आई तू खरंच खूप छान बोललीस.

आई: मला तुझा खूप अभिमान वा टतो गं हे रडत.

नित्याने हे सर्व ड्रामे पाहिलेले असल्याने भूक लागली म्हणून सर्वांना जेवायला हाकलतो.

मग सर्व गेल्यानंतर स्पेशल आशू: छान गायलीस अरू शाळकरी पोरां सारखे हसतो. आज तुझं गाणं घरा घरात पोहोचलं यशाचा मार्ग कठिण असतो असे काटे असतत. तू एकटी नाहीस मी आहे तुझ्याबरोबर. इथे एक किस हवा होता. पण बाल प्रियकर पडला तसाच निघून गेला.
अरु चे दंड अंमळ जाड झाले आहेत.

यश अनघा: परत चालू.

यशः अल्बम सुपर हिट व्हावा. तिला छान पब्लिसिटी मिळावी, किईर्ती मिळावी.
अनघा: कार्य करम छान झाला मग झाल. नथि ग सक्सीड्स लाइक सक्सेस. तायीला घव घवीत यश मिळू दे.

यश संजनाला नालायक म्हणतो.
अप्पा तिच्याशी नीट वागायची काही गरज नाही.
कार्यक्रम छान झाला. अरु सु असल्याने सासू ची चौकशी करते आई आजारी असल्याने मी त्यांना बघायला येते म्ह णते. अजून दावणीचे दोर काही तुटलेले दिसत नाहीत.
संजनाचा मेजर पाडाव झाल्याने तिची महान चिड्चि ड होत आहे. अन्या संजना व्यक्त होतात अरू ला शिव्या तिची लायकी नाही आशू तिच्या मागे उभा आहे. मोठा प्रवेश आहे संजनाचे केस एकदम केरसुणी सारखे दिसत आहेत. एकदम संजना दीक्षित. मी कोण आहे तिला माहीत नाही.

अरू ला मोहरी संगीत दिग्दर्शक अजून एक गाणे ऑफर करत आहे तिला अरे बाबरे आता हे कसे करायचे असे भाव आहेत तोंडावर. पण यश व आशू आनंद व्यक्त करतत.

प्रोमो मध्ये सासू असा अरु चे कधी भले होणार नाही असे वक्तव्य करते तेव्हा अरू दारात उभी आहे. व डोळ्यात पाणी आणून ऐकते.
म्हातारी ची टांग तोडून निघून जायला हवे होते. अभी यश सर्व आजी वाक्य ऐकत आहेत.

<अरू ला मोहरी संगीत दिग्दर्शक अजून एक गाणे ऑफर करत आहे तिला अरे बाबरे आता हे कसे करायचे असे भाव आहेत तोंडावर. >
प्रत्येक वेळी नवं गाणं मिळालं की ही असंच करणार बहुतेक.

नितीन ला तरी एके करायला पाहीजे होतं… ढेरी आहे, पण बराय… स.ध. ला एके केलं असतं, तर, आई कांचन पण मागे लागली असती, मग आरू अजूनच बावळट वाटली असती…

प्रत्येक वेळी नवं गाणं मिळालं की ही असंच करणार बहुतेक.>>अगदी. जसे प्रत्येक वेळी काम/कामाचे पैसे घेताना करत होती.
डोळ्यात पाणी आणून ऐकते>>> हो. हे अतीच झाले. तिला फारच हौस आहे स्वत:चा अपमान करून घ्यायची. ज्यांना आपण आवडत नाही त्यांच्याकडे जाऊ नये ना तिने.

<अरू ला मोहरी संगीत दिग्दर्शक अजून एक गाणे ऑफर करत आहे तिला अरे बाबरे आता हे कसे करायचे असे भाव आहेत तोंडावर. >
प्रत्येक वेळी नवं गाणं मिळालं की ही असंच करणार बहुतेक. >>> Lol

म्हणजे ते सगळे "मला तर टेन्शन आले आहे/सगळे व्यवस्थित होईल्/अरू किती छान आहे/अरू कशी भर पब्लिक मधे त्याच्याबरोबर" - सगळे संवाद रिसायकल करता येतील Happy

मी तिला सोडणार नाही, असं संजना अरुंधती बाबत म्हणते.
इंग्रजीतही म्हणते - I won't leave her

I wont spare her हवं ना?

भरत... Lol
पण म्हणतात असेही... I won't leave her..
म्हणजे आपण भारतीय जेव्हा इंग्लिश बोलतो तेव्हा......

अरू ला मोहरी संगीत दिग्दर्शक अजून एक गाणे ऑफर करत आहे तिला अरे बाबरे आता हे कसे करायचे असे भाव आहेत तोंडावर.>>> हो म्हणे फार लवकर लवकर होतय सगळ.
आत्ता?? ५ मिनिटापुर्वीच राणाभिमदेवी आवेशात यव आणी त्यव करुन मी कशी पुढे जाणार अस सन्जनाला एकवल ना? आता कुकरच्या शिट्ट्या भराभर होतायत का?असे भाव काय घेवुन बसलिये पण अरु म्हणजे आदर्शतेच,नम्रतेच्,चानुलपणाच,त्यागाच प्रतिक ना मग ती स्वतःसाठी काही चान्गल घडतय म्हणुन आनदी कशी असु शकेल?
आय गेट इट सन्जना, एके नसता तर हिला कशाला मोहरिरने विचारल असत.

आत्ताच नवीन प्रोमो पाहिला. कान्चन अप्पान्ना हाकलते घरातून. अप्पा अरुकडे राहायला जातात. डिट्टो अनुपमा.

कान्चन अप्पान्ना हाकलते घरातून. अप्पा अरुकडे राहायला जातात. >>> वाह! माझे घर म्हणणारे आप्पा घराबाहेर पडले तर. अरू आता पुन्हा आदर्श सून मोड मधे सुखी होईल… आप्पा गोळ्या घेतल्या का? चहा करू का? नाश्ता-जेवण वेळेत.
तिकडे अन्याला पण सुखाची झोप लागेल. रात्री तिच्यावर नजर ठेवायला नाही जावे लागणार.

असं नाही. कांचन अप्पांना सुनावते की या घरावर तुमचा आता काहीही हक्क राहिलेला नाही. मी नीट ऐकलं नाही, पण घर बांधण्यात तुमच्यापेक्षा अनिरुद्धचा वाटा मोठा आहे , असं म्हणते. शिवाय घर (कांचनच्या मते) तिच्या (आपा->अरुंधती-> कांचन) आणि अनिरुद्धच्या नावावर आहे.
तेव्हा अप्पा मी घर सोडून जातो म्हणतात.

अरे? ते मागे वडिलोपार्जित घर दाखवले होते ना? मग आन्याचा घरबांधणीशी काय संबंध.. ?

तो दिवस लवकर. येवो जेव्हा माझं घर माझं घर म्हणणार्या म्हातारीला संजना हात धरून घराबाहेर काढेल.
तिथे अनुपमा मधे तर म्हातारीचा थयथयाट आणि शिव्याशाप देणं चालू आहे. बापरे,,,, एवढं poisonous कसं असू शकतं कोणी. बिनडोक आहेत ते अनु अनुज. डायरेक्ट लग्न करून यांच्या समोर येऊन उभे राहिले असते,,, काय करून काय घेतलं असतं त्या बाईने तेव्हा?

खरतर अरुला कशाला जायच असत लोचटासारख तिथे परत परत, ज्या सासुने एवढा अपमान केला तिथे कशाला जायच, ती गेल्याने गोष्टि अजुन पेटल्या, हिला स्वाभिमानाची पोटली बान्धुन तिथे सासुच्या चरणीच व्हायची असते.

बांधण्यात तुमच्यापेक्षा अनिरुद्धचा वाटा मोठा आहे , असं म्हणते. शिवाय घर (कांचनच्या मते) तिच्या (आपा->अरुंधती-> कांचन) आणि अनिरुद्धच्या नावावर आहे.> हो. पण मला वाटते संजनाने ते संपुर्ण घर स्वत:च्या नावावर करून घेतले आहे. वेळ आली कि अविनाश, कांचनला सुद्धा घराबाहेर काढणार ती.

कांचनच्या नावावर घर कर म्हणून अरुंधतीच्या सह्या घेतल्या तेव्हा कांचन आणि अरु या दोघींनीही पेपर्स वाचले नव्हते.
बाकिच्या लोकांचे विना हरकत, वारसाहक्क सोड पत्रक, रजिस्ट्रार कार्यालयाच्या वाऱ्या असे काही नसते या लोकांच्यात ते एक बरे आहे. ‘पेपर्स बनवून/करून आणलेत‘ हे वाक्य तरी कशाला टाकतात काय माहित! सरळ एका चिठ्ठीवर मी —हे घर ——च्या नावावर करतो असे लिहून सही करावी. प्रेक्षक समजून घेतील.

I won't leave her.... सेमी ईंग्लिश मिडियम आहे, समजून घ्या. Happy
फटाकडी बाई, ईंग्लिश नाही बोलली तर भारतीय लेखकांचा पगार कापला जातो.

फटाकडी बाई, ईंग्लिश नाही बोलली तर भारतीय लेखकांचा पगार कापला जातो. >>> Lol नावही संजना वगैरे टाइप "मॉड" हवे.

तमाम आजी लोकांच्या डोक्यात जे आजच्या मुलींविषयी स्टीरीओटाइप्स असतात ते तोडण्याऐवजी आणखीनच खुंटे बळकट करतात या बिनडोक व्यक्तिरेखा.

तमाम आजी लोकांच्या डोक्यात जे आजच्या मुलींविषयी स्टीरीओटाइप्स असतात ते तोडण्याऐवजी आणखीनच खुंटे बळकट करतात या बिनडोक व्यक्तिरेखा. >>> खरं आहे.

तमाम आजी लोकांच्या डोक्यात जे आजच्या मुलींविषयी स्टीरीओटाइप्स असतात ते तोडण्याऐवजी आणखीनच खुंटे बळकट करतात या बिनडोक व्यक्तिरेखा.>>> अगदी अगदी , आणी दोन्ही बाजुने खुन्टे बळकत होत असतिल म्हणजे अरु कशी सहनशिल, सगळ करणारी आदर्श सुन तिकडुनही खुन्टा बलकटच होतोय.

अप्पानी दुसरं लग्न केलं अशीही बातमी वाचली आम्ही>>> smiley36.gif
आप्पनी खरच दुसर लग्न केल तरी मठ्ठ कान्चन म्हणेल हे सगळ अरु मुळेच झाल.

हा एक भारि किस्सा नुकताच घडलेला, माझी आई ,वहिनी-भाऊ आणी इतर काही फॅमिली मेबर एका टुरसोबत अदमानला चालले आहेत, मुबई विमानतळावर फ्लाइटची वाट पाहात असताना त्याना आशुतोष म्हणजे ओमकार गोवर्धन भेटला, आई ही सिरियल बघत असल्याने तिला लगेच ओळखता आले त्याने खूप छान कॉर्डीयलि गप्पा मारल्या, फोटोहि काढले ते फॅमिली ग्रुपवरही टाकले मी त्याना गमतित म्हटल" अरु नाही का बरोबर" तर वहिनीला कळल की मी पण ही सिरियल बघते तिने ओमकारला विचारल की माझी नणद तुमचि सिरियल बघते तुम्ही बोलाल का? तर छान बोलला व्हिडियो कॉलवर,
इतर सगळ्यानी ऑलरेडि बोलून त्याला हैराण केल असणार त्यामूळे मी अगदी २च मिनिट बोलले.
सिरियल मधे जरा प्रौढ दिसयाला त्याला चश्मा आणि ढगळ पगळ सुट दिलेत वाटत. एरवी नो चश्मा , डेनिम आणी जॅकेट लुकमधे छान स्मार्ट वाटत होता.504EB134-AF5D-4710-AD0F-B8876C6DFCAD.jpegC853F77E-E91F-4F85-9E14-410B594EF207.jpeg

अग तो छान आहे खरंतर, झी युवाच्या सिरीयलमधे मला कसला आवडला होता, स्मार्ट एकदम, खळ्याही खुलून दिसायच्या. इथे त्याच्या चष्म्याकडेच लक्ष जातं पहीलं, आणि बावळत वाटतो.

Pages