गेले काही दिवस आमच्या घरात (किंवा घराबाहेर) एका सुतार पक्षाशी लढाई करतो आहे. घराला लाकडाचे आवरण ( wood siding) आहे आणि आठवड्याला एक अशी ६-८ मोठ्या संत्र्याच्या/छोट्या नारळाच्या आकाराची भगदाडे पाडून ठेवली आहे. दर आठवड्यात कुठे नवीन भगदाड आहे ते शोधणे आणि आणि ते बुजवणे हा मोठा वैताग झाला आहे. कबुतरे आणि खारींचा त्रास होई नये म्हणून अगोदरच्या मालकाने काही चांगल्या सोयी केल्या आहेत पण त्याचा या पक्षावर काहीही फरक पडत नाहीये. आणि तोच सुतार पक्षी आहे कारण त्याला बर्याच वेळा हाकललं आहे.
या घटनेवर सहज कार्टून तयार होईल.
इंटरनेटवर शोधाशोध करून काही माहिती मिळवलीय. सुतारपक्षांना पकडणे किंवा मारणे हा दखलपात्र गुन्हा आहे आणि त्यातून तुरुंगात जावे लागू शकते. सुतारपक्षी अतिशय मालकीहक्क गाजवणारे असतात म्हणे (Territorial ownweship). एकदा त्याना घर आवडले की त्यांना ते त्यांचे वाटते आणि ते दुसर्या पक्षाला येऊ देत नाहीत. हा पक्षी थंडीत राहण्यासाठी घर करतो आहे. मला आवडणारे सगळे घटक (घराचा रंग, झाडी) हे सुतार पक्षांना आवडतात असेही या शोधातून कळाले त्यामुळे आमचे घर सुतारपक्षांच्या त्रासासाठी High Risk आहे. सुतारपक्षांना आवडणारी कीड घराला लागलेली नाही असे सध्यातरी दिसतेय.
नेटवर यासाठी चमकती टेप, स्प्रे, घुबडाचे डोळे असलेले फुगे, घाणेरड्या चवीचे रंग (सुतार पक्षाच्या), घाबरवणारा कोळी, माणसांना ऐकू न येणारे कर्कश आवाज करणारे भोंगे असे अनेक उपाय उपलब्ध आहेत.
माहिती पुष्कळ झाली आहे. नेटवरच्या अभिप्रायांमधे कुणी एक उपाय करा पण दुसरा कामाचा नाही असे म्हणतो तर दुसरा हा नको तो करा म्हणतोय. मायबोलीकरांपैकी कुणाला यातले उपाय करायची गरज पडली आहे का? कुठला उपाय रामबाण ठरला?
"अॅनिमल कन्ट्रोल" वाल्यांना
"अॅनिमल कन्ट्रोल" वाल्यांना कळवा. ते येऊन पकडून घेऊन जातील आणि दुसरीकडे नेऊन सोडतील किंवा झू मध्ये देतील.
काय अजब प्रॉबलेम्स असतात नाही
काय अजब प्रॉबलेम्स असतात नाही इथे
खरंच की अमृता... मला आवडणारे
खरंच की अमृता...
मला आवडणारे सगळे घटक (घराचा रंग, झाडी) हे सुतार पक्षांना आवडतात>>>> म्हणजे नक्की कोणते रंग? कदाचित माहितीचा दुसर्यांना उपयोग होऊ शकेल.
खरच ना! एकाव, वाचाव ते नवलच
खरच ना! एकाव, वाचाव ते नवलच की... शुभेच्छा
अजय, फारच गंभीर समस्या आहे
अजय, फारच गंभीर समस्या आहे ही. माझ्या मुलाच्या शाळेने सुचवलेला उपाय आहे एक प्लॅस्टिकचे घुबड. मला या उपायाबद्दल फारशी खात्री नाही, पण प्रयोग करायला फार खर्चिक आणि वेळखाऊ तरी नाही.
माझी लढाई सद्ध्या "चिपमंक" नामक नाजुकशा खारीशी आहे. माझ्या मुलाचे (आताचे वय वर्षे १७) कित्येक वर्षे असे म्हणणे आहे की घर त्यांचे, आपण भाडेकरू.
त्यांना मारणे हा दखलपात्र गुन्हा असल्याने पेस्ट कंट्रोलचे लोकही काही मदत करत नाहीत. भगदाड बुजवायला, दुरुस्त करायला मात्र पुष्कळ कंपन्या तयार असतात. मी deterrent किंवा repellent च्या शोधात आहे.
माझ्या मित्राला असाच त्रास
माझ्या मित्राला असाच त्रास झाला होता, पण तो रॉबिन पक्षामुळे होता. त्याला खिडकीत स्वतःचे प्रतिबिंब दिसायचे आणि वाटायचे की आपल्या हद्दीत हा कोण आला नविन. मग ते रॉबिनबुवा जोर लाउन धडका मारत बसायचे. ८-१० वेळा पडले की मग विश्रांतीला जायचे. काही तासांनी परत तेच धडकसत्र सुरू ! त्याला चमकत्या टेपचा उपाय लागू पडला. घुबड किंवा रंग यावर जावे लागले नाही असे तो म्हणाला.
माझ्या मित्राला असाच त्रास
माझ्या मित्राला असाच त्रास झाला होता, >> झक्की का?
LOL नात्या ..
LOL नात्या ..
सध्या चमकत्या टेप पासून सुरु
सध्या चमकत्या टेप पासून सुरु करतो आहे. पाहू काही फरक पडतो का.
नासामधे SpaceShuttle ला पक्षांचा त्रास होऊ नये म्हणून चमकती टेप आणि घुबडाचे डोळे असलेले फुगे वापरतात असे कळाले.
http://video.google.com/videoplay?docid=-3034767380048223610&hl=en#
सुतार पक्षांना भरपूर झाडीच्या जवळ असणारी गडद रंगाची (लाल, डार्क ब्राऊन) घरे आवडतात. Tongue-and-Groove/Board-and-Batten या प्रकारचे आवरण आहे. या लिंकवर सगळ्यात खाली फोटो ८ मधे असलेले भगदाड पहा. आमच्या घरी तशीच (थोडी मोठीच) भगदाडे केली आहेत.
http://www.birds.cornell.edu/wp_about/damage.html
नेटवर शोधले तर असे अभिप्राय आहेत की प्लॅस्टिकचे घुबड वापरले तर ते कसे तरी करून कायम हलते ठेवावे लागते. नाहीतर ते खरे नाही हे सुतार पक्षाना कळते म्हणे.
चिपमंक साठी तुम्ही कोल्ह्याची लघवी शिंपडून पाहिली आहे का? आमच्या घराच्या पायरीवर रोज सकाळी ऑफीसला निघायला बाहेर पडले की एक साप मस्त सूर्यस्नान करत पडला असायचा. तेंव्हा अॅनीमल कंट्रोलवाल्याने तो उपाय सुचवला होता. साप, चिपमंक, खारी याच्यावर तो उपाय आहे. आपल्याला विचित्र वाटते पण इथे ती व्यवस्थित पॅकबंद करून , ब्रँडेड, लेबल वगैरे लावलेली मिळते. होम डेपोत मिळते किंवा इथे पहा.
http://www.predatorpee.com/Merchant2/merchant.mv?Screen=CTGY&Store_Code=...
आणि तुमच्या मुलाचे अगदी बरोबर आहे. दुसरा मालक येईपर्यंत आपण त्या घराचे पाहुणे किंवा राखणदार असतो म्हणाना. घर सगळ्या प्राण्यांचच असतं.
लोल नात्या !
लोल नात्या !
नात्या
नात्या
चिपमंक साठी तुम्ही कोल्ह्याची
चिपमंक साठी तुम्ही कोल्ह्याची लघवी शिंपडून पाहिली आहे का?>>त्यांच्यासाठी हा उपाय तात्पुरता असतो. त्यांनी दगडांच्या भिंतींमधे केलेली भगदाडे बुजवण्याचा उद्योग हा माझा समरटाईंम जॉब आहे
माझा शत्रू ससा
इथे फ्लोरिडात हरणांच्या
इथे फ्लोरिडात हरणांच्या त्रासामुळे को. ल. ला खूप मागणी आहे असं पेस्ट कंट्रोलवाला दुकानदार म्हणाला. पण पावसानंतर त्याचा परिणाम होत नाही. तिखट शिंपडून पण फायदा नाही.
इथे 'न्युइसन्स क्रेन्स'चा फार त्रास आहे. एकतर रात्रीबेरात्री विचित्र केकाटतात. काचेच्या दारं खिडक्यांवर धडकतात. कारच्या काचांना धडकीमुळे तडे जातील इतके हट्टेकट्टे पक्षी आहेत. त्यांच्या जवळपास असाल तर अंगावर येतात! पण बदकं, क्रेन्स वगैरेंना शूट करायला परवानगी नाही. लोक सगळे प्रकार करून थकतात आणि शेवटी उन्हाळा कधी येतो आणि कधी एकदाचे हे पक्षी परत (उत्तरेला) जातात ह्याची वाट बघतात!
उत्तरेकडचे पक्षी ना, मग बरोबर
उत्तरेकडचे पक्षी ना, मग बरोबर आहे!
(बरी संधी मिळाली आज :फिदी:)
आमच्याकडे कुकुबारा नावाचा एक
आमच्याकडे कुकुबारा नावाचा एक पक्षी आहे, चंद्रकांता नामक भारतीय दुरचित्रवाणी धारावाहिक मधील क्रुरसिंग नावाचे पात्र जसे जोराने हसते... हा हा हा... तसे हा पक्षी ऑरडतो. तो ऑरडला कि क्षणभर क्रुरसिंग मागुण येतो आहे कि काय ? अशी शंका येते!
पण तो बाकी काही त्रास देत नाही.
अजय, होम डिपो मध्ये एक
अजय, होम डिपो मध्ये एक instrumentमिळत. ते प्लग इन करायच, इलेक्ट्रिक आउट्लेट मध्ये. त्याने हमिंग साऊंड येतो ज्याच्या frequency मुळे प्राणी वगैरे दूर जातात. ते ट्राय करून पाहिल आहे का?
चंप्या ४-५ कुकाबारा रात्री
चंप्या ४-५ कुकाबारा रात्री खिदळायला लागले की ते असलेल्या झाडांखालून जायची हिंमत होत नाही अनेकदा.
आणि ह्या वुडपेकरसारखेच इथले व्हाईट कोकॅटूज घराचं लाकूडकाम अगदी चोचींनी मोडूनतोडून टाकतात.
खालच्या आर्टिकलमधले त्यांना हाकलायचे उपाय (जेल, पतंग, नेट इ.) इथे लागू होतील का माहित नाही.
http://www.abc.net.au/science/articles/2003/10/09/2045456.htm
खरंच, काय एक एक अजब समस्या
खरंच, काय एक एक अजब समस्या आहेत. मी तर पहिल्यांदाच ऐकतोय हे..
अजय, तुम्ही एखादं मस्त फोटोसकट ललित लिहा ना ह्याच्यावर.. छान मजा येईल वाचायला.
नात्या
नात्या
नात्या
माझा शत्रू ससा >>>>> अगदी
माझा शत्रू ससा >>>>>
अगदी अगदी. आमच्या सगळ्या भाज्या (spe पालक,लेट्युस,मेथी) खावुन टाकतो ससा. पेटुनिया, कॉसमॉस ची झाड कोवळी असतानाच खाल्ली. वैतागुन मी यावेळी फॉल मध्ये काही लावलच नाही यावेळी.
दुसरे आमचे शत्रु म्हणजे वास्प. ते मात्र पेस्ट कन्ट्रोलने गेले.
जर ते प्रोटेक्टेड कॅटॅगरी बर्ड खाली येत असतील तर अॅनिमल कंट्रोलवाले लगेच येवुन बंदोबस्त करुन जातील.
नात्या अक्षरशः
आमच्याकडे हरणांचा प्रॉब्लेम
आमच्याकडे हरणांचा प्रॉब्लेम आहे. ससे तर आहेतच. यावर्षी मेथी, टोमॅटो, वांगी, भेंडी सगळी रोपं कुरतडून खाल्लीत. फक्त दोन टोमॅटो पदरी पडलेत. आता कुंपण लावल्याशिवाय भाज्या लावायच्याच नाहीत असं ठरवलंय
अन ससुला तर मेला लावलेल्या भाज्या खातो, पण चांगलं किसून, प्लेटमधे ठेवलेल्या गाजराकडे ढुंकून बघत नाही.
>> मस्त फोटोसकट ललित लिहा ना
>> मस्त फोटोसकट ललित लिहा ना ह्याच्यावर.. छान मजा येईल वाचायला
फचिन, अरे त्रासलेत ते! ललित काय लिहा!
जाता जाता : ते मथळ्यात 'पक्ष्याचा त्रास' असं हवं. (आणि यावर कोणी 'त्रासलेत ते! शुद्धलेखन काय सुधारायला सांगता!' असं म्हणू नये. :P)
नात्या!
बर त्रास संपल्यावर लिहा
बर त्रास संपल्यावर लिहा
स्वाती
स्वाती
देवा.. काय्काय त्रास असतात
देवा.. काय्काय त्रास असतात ना??
आमच्याकडे फक्त चिमण्या-कावळॅ आणि कर्कश्य ओरडणारे पोपट
ससे आणि साप आम्ही राहायला आलो तेव्हा आमच्या प्रचंड पसरलेल्या कॉलनीत चुकुन दिसायचे. साप तर ब-याच वेळा बाथरुममध्ये सापडायचे. लोकांनी आधी मारले, मग जनजागृती झाल्यावर फायर ब्रिगेडला बोलावुन साप पकडवुन दिले.. आता फक्त माणुस आणि कुत्रे उरलेत कॉलनीत....
अजय, तुम्ही एखादं मस्त
अजय, तुम्ही एखादं मस्त फोटोसकट ललित लिहा ना ह्याच्यावर.. छान मजा येईल वाचायला.>> कोणाचे काय नि कोणाचे काय ?
खरच काय एकेक त्रास आहेत ना?
खरच काय एकेक त्रास आहेत ना? वाचून खूप आश्चर्य वाटलं. भारतात फक्त कावळे, चिमण्या, पाली आणि झुरळं इतकेच त्रास माहीत होते.
माझ्या एका कलीगकडे लाकडी
माझ्या एका कलीगकडे लाकडी कुंपण होतं स्विमिंग पूलच्या सभोवार. त्यांना सुतार पक्ष्याचा इतका त्रास झाला की शेवटी त्यांनी व्हायनल कुंपण लावून घेतलं. घुबडांचा काहीच उपयोग झाला नाही म्हणे.
ससे अन हरणांचा उपद्रव काय वर्णावा

डच आयरिसेस, हॉस्टा, गुलाब, भाज्या, गुलबक्षी, शेवंती, सगळं काही त्यांच्यासाठीच लावत असतो आम्ही
दुरुन डोंगर साजरे म्हणजे काय
दुरुन डोंगर साजरे म्हणजे काय ते आत्ता कळल
हरणं, ससे, वेगवेगळे पक्षी !
हरणं, ससे, वेगवेगळे पक्षी ! हे ऐकून किती मस्त निसर्गाच्या सानिद्ध्यात रहाता तुम्ही असं वाटतं. पण त्या बरोबर येणारा त्रास पण कैच्याकैच दिसतोय
Pages