सुतार पक्ष्याचा त्रास (Woodpecker Nuisance)

Submitted by अजय on 4 December, 2009 - 13:51

गेले काही दिवस आमच्या घरात (किंवा घराबाहेर) एका सुतार पक्षाशी लढाई करतो आहे. घराला लाकडाचे आवरण ( wood siding) आहे आणि आठवड्याला एक अशी ६-८ मोठ्या संत्र्याच्या/छोट्या नारळाच्या आकाराची भगदाडे पाडून ठेवली आहे. दर आठवड्यात कुठे नवीन भगदाड आहे ते शोधणे आणि आणि ते बुजवणे हा मोठा वैताग झाला आहे. कबुतरे आणि खारींचा त्रास होई नये म्हणून अगोदरच्या मालकाने काही चांगल्या सोयी केल्या आहेत पण त्याचा या पक्षावर काहीही फरक पडत नाहीये. आणि तोच सुतार पक्षी आहे कारण त्याला बर्‍याच वेळा हाकललं आहे.

या घटनेवर सहज कार्टून तयार होईल.

इंटरनेटवर शोधाशोध करून काही माहिती मिळवलीय. सुतारपक्षांना पकडणे किंवा मारणे हा दखलपात्र गुन्हा आहे आणि त्यातून तुरुंगात जावे लागू शकते. सुतारपक्षी अतिशय मालकीहक्क गाजवणारे असतात म्हणे (Territorial ownweship). एकदा त्याना घर आवडले की त्यांना ते त्यांचे वाटते आणि ते दुसर्‍या पक्षाला येऊ देत नाहीत. हा पक्षी थंडीत राहण्यासाठी घर करतो आहे. मला आवडणारे सगळे घटक (घराचा रंग, झाडी) हे सुतार पक्षांना आवडतात असेही या शोधातून कळाले त्यामुळे आमचे घर सुतारपक्षांच्या त्रासासाठी High Risk आहे. सुतारपक्षांना आवडणारी कीड घराला लागलेली नाही असे सध्यातरी दिसतेय.

नेटवर यासाठी चमकती टेप, स्प्रे, घुबडाचे डोळे असलेले फुगे, घाणेरड्या चवीचे रंग (सुतार पक्षाच्या), घाबरवणारा कोळी, माणसांना ऐकू न येणारे कर्कश आवाज करणारे भोंगे असे अनेक उपाय उपलब्ध आहेत.

माहिती पुष्कळ झाली आहे. नेटवरच्या अभिप्रायांमधे कुणी एक उपाय करा पण दुसरा कामाचा नाही असे म्हणतो तर दुसरा हा नको तो करा म्हणतोय. मायबोलीकरांपैकी कुणाला यातले उपाय करायची गरज पडली आहे का? कुठला उपाय रामबाण ठरला?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोठी चिचुंद्री >>> ह्म्म. डोळ्याखाली काळी वर्तुळं आलेली.

मृच्या घरामागे मगरी? छोट्याच्या मोठ्यापण होत असतील ना? तो पाँड किती लांब आहे घरापासून?

कैच्याकैच आहे हे सगळं. पण मजा वाटतेय वाचायला. गेले २ दिवस हा माझा आवडता बाफ झालाय.

माझा नवरा मराठीत रॅकुनला काही वेळा "घुस"च म्हणतो. एकदा रात्री बाहेरून परत आलो आणि मुलं झोपली होती त्यांना उचलून वर नेतेवेळि चुकून गराजचा दरवाजा थोडा वेळ उघडा राहिला तर ही "घुस"णारच होती. तेवढ्यात लक्ष गेलं.

परसात स्टोरेज शेड असतील तर रॅकून हमखास त्यात घरोबा थाटतात. आम्ही वैतागून शेड काढून टाकले.
टेक्सासमध्ये समर सुरु व्हायच्या बेताला साप अति दिसतात. पहिले लॉन्मोइंग मार्च-एप्रिलमध्ये होइल तो दिवस तर नक्कीच Sad

mala raccoon farm saga mule mahit zale Proud
But te cute disatat tya game madhye.
google kelyawar bekkar disale Sad

kharutai baddal vaeet saaeet bolanaryano, janata maf karanar nahi Lol

खार आवडणार्‍‍यांना खारीच्या कर्कश्श ओरडण्याचा त्रास होत नाही का ? आमच्या घराभोवती नारळ, बदाम अशी मोठी मोठी झाडं आहेत आणि वर्षानुवर्षं त्यावर खारी रहात आहेत. दुपारी सगळं सामसूम असताना कर्कश्श ओरडत बसणे हा एकमेव उद्योग आहे त्यांना. बाकी काही त्रास नाही पण.

आमच्या घरात लहानाच्या मोठ्या झालेल्या खारी फक्त भूक लागली कि आणि मांजर दिसली तर एकमेकांना (आणि बाहेरच्या खारींना) धोक्याची सुचना द्यायला म्हणुन हाक टाकतात. त्यांना खायला टाकले कि गप्प होतात.
बाहेर इतक्या खारी आहेत कि आवाजाची सवय झाली. Happy

अरे देशातल्या खारी जरा गोंडस वाटतात तरी. पण इथल्या भल्या मोठ्या,बर्ड फूड कहीही युक्त्या करून खाणार्‍या खारी बघा - खरंच क्रीपी वाटतात !! अज्जिबात गोंडस दिसत नाहीत ! (डावीकडचे देशी खारीचे चित्र आहे)
khari.jpg

बापरे! देशी खारीपेक्षा नंतरच्या फोटोंतल्या दोन कसल्या खतरनाक दिस्ताहेत! बर्डफीडमधले दाणे खाणारी तर अक्षरशः स्टंटमास्टर वगैरे वाटते. Proud

हो हो. मगरी येतात. आणि मला त्यांच्याबद्दल लिहायला फारच आवडतं! Proud आताच्या घरी अंगणात आणि डबक्यात फार अंतर नाही. पण त्यांचं येणंही क्वचित आहे. आधीच्या अपार्टमेंटमधे सतत आणि बर्‍याच यायच्या. पण अंगणानंतर ७-८ पायर्‍या उतरून मग छोटं डबकं होतं. तिथे यायच्या. आता अशी सोय नाही. खरंच मोठ्या मगरी आल्या तर थेट मागल्या दारी येऊ शकतात.

फ्लोरिड्यात हा त्रास भरपूर आहे. स्विमिंग पूलमधे, पार्किंग लॉटमधे मगरी दिसणं बर्‍याच लोकांसाठी नॉर्मल आहे.

बर्ड फूड खाणार्‍या खारी Angry इतक्या बदमाष आहेत. आम्ही पुढे मागे दोन फीडर लावली होती. मेल्यांनी त्याची तोड-फोड करून सगळा माल लॉनवर सांडला आणि पोट फाटेस्तोवर खाल्ला. दाणे खायला आलेल्या पक्ष्यांवर दादागिरी पण करतात Angry

इथे एक किस्सा म्हणजे मैत्रीणीच्या घरातले खारूताईला रोज काही ना काही खायला द्यायचे. ठराविक वेळेला मग ती यायचीच.
पुढे पुढे बंद केले यांनी खायला देणे कारण मॅनेजमेंटच्या नोटीसा यायला लागल्या पक्षी प्राण्यांना काही खायला घालायचे नाही याबद्दल. मग काय ती खार एकदम क्रीपी झाली आणि यांच्या बाल्कनीच्या जाळीचे नुकसान करून टाकले, मोठ्ठे भोक पाडले.
सोसायटीने स्वतःच्या खर्चावर काम करून घ्यायला लावले.

तसेही प्राणी पक्षी आवडण्याच्या कॅटेगरीतली मी नाही आणि नवर्‍याला अतिशय आवड प्राणी पक्ष्यांना खाऊ घालायला.
त्यालाही या नोटीसबद्दल सांगितलेय थोडे दिवस गप्प बसला. पुन्हा पक्षी, खारी दिसायला लागल्या की याचं प्रेम उफाळून येतं :रागः
इथे ते गीज (मोठ्ठी बदकं) पण खूप फिरतात. त्यांनाही नवरा ब्रेड, पोळी असं काहीबाही देत बसतो खायला. खातात आणि लगेच शी करून जातात मेले. ती हिरवी पातळ शी चुकवून चालता चालता नाकीनऊ येतात.

स्विमिंग पूलमधे, पार्किंग लॉटमधे मगरी दिसणं बर्‍याच लोकांसाठी नॉर्मल आहे.>>>>> बापरे काय हे? अ‍ॅटॅक नाही करत ना या मगरी?

नाही करत. त्यांच्या वाटेला गेलो नाही तर त्या आपल्याकडे ढुंकूनही बघत नाहीत.>>>> हुश्श..
अवांतर: नवर्‍याला फ्लोरीडाला अजिबात न्यायला नको. ये गं माझी बाई म्हणत अल्पेनलिबे खायला देईल Proud

बर्ड फूड खाणार्‍या खारी >> हल्ली थोडि वेगळ्या प्रकारचे squirrel proof bird feeders मिळतात ती वापरून बघ. २-३ try केल्यावर १ मस्त मिळालेय ज्यातून खारींना खाता येत नाही.

मला तर कायोटी कोल्ह्याची छोटी बहीण वाटते आणि इकडे चक्क कुत्रा Uhoh
आम्च्या कडे गावकुसाबाहेर संध्याकाळी ड्राइव्ह असेल तर हमखास दिसते.

देशी खारीच्या पाठीवर रामाने हात फिरवला ना , म्हणून जरा सौम्य आहेत Proud
या आपल्या इथल्या यु एस मधल्या खारी एकजात जंगली घुशींची माजलेली भूतं वाटतात !

>>हल्ली थोडि वेगळ्या प्रकारचे squirrel proof bird feeders मिळतात ती वापरून बघ. २-३ try केल्यावर १ मस्त मिळालेय ज्यातून खारींना खाता येत नाही. >> आम्ही तेच केलंय. नाहीतर आधीच्या बर्ड फिडर मधून नुसते नट्स, सूर्यफुलाच्या बिया ह्या बलाढ्य खारी काढून पळवून न्यायच्या आणि आलेल्या छोट्या पक्ष्यांना पण हुसकावून लावायच्या. नंतर बारीक जाळी असलेला फीडर लावला तेव्हा त्यांना आता तोंड घालता येईना. मग पक्षीच खायला लागले. Happy

एकदा माझ्या मुलीचे शूज मागच्या अंगणात काही दिवस राहिले. नेहमी फ्लिपफ्लॉप सारख्या हवेशीर चपला बॅकयार्डात वापरतो पण हे शुज कधीतरी तिथेच राहिले मग काही दिवसांत या खारींनी त्या शूज मध्ये बरेच अन्न साठवून ठेवले होते. Happy

गीज ना चिरमुरे खूप आवड तात : स्वानुभव.
(कुत्र, मांजर ह्यांनाही आवडतात. पूर्वी घरी येणारं एक मांजर चिरमुर्‍याकरता नरडीचा घोट घ्यायलाही तयार होईल असं वागायचं.. त्याच्यासमोर चिरमुरेखायचे म्हणजे तारेवरची कसरत.)

नानआ Lol तुझी पोस्ट वाचून खूप हसले.

माझ्या मैत्रिणीच्या घरी एक मांजर होती, तिला बेसनाचे पदार्थ फार आवडायचे. कांदा भजी तर फारच.
फरसाण वगैरे असेल तर ती मटण माश्यांकडे ढुंकुनही पहायची नाही.

नानबा Lol तुझी पोस्ट वाचून खूप हसले.

माझ्या मैत्रिणीच्या घरी एक मांजर होती, तिला बेसनाचे पदार्थ फार आवडायचे. कांदा भजी तर फारच.
फरसाण वगैरे असेल तर ती मटण माश्यांकडे ढुंकुनही पहायची नाही.

मृण्मयी , फ्लोरिड्यात हा त्रास भरपूर आहे. स्विमिंग पूलमधे, पार्किंग लॉटमधे मगरी दिसणं बर्‍याच लोकांसाठी नॉर्मल आहे.>>> बापरे हे भयानकच आहे.

Pages