सुतार पक्ष्याचा त्रास (Woodpecker Nuisance)

Submitted by अजय on 4 December, 2009 - 13:51

गेले काही दिवस आमच्या घरात (किंवा घराबाहेर) एका सुतार पक्षाशी लढाई करतो आहे. घराला लाकडाचे आवरण ( wood siding) आहे आणि आठवड्याला एक अशी ६-८ मोठ्या संत्र्याच्या/छोट्या नारळाच्या आकाराची भगदाडे पाडून ठेवली आहे. दर आठवड्यात कुठे नवीन भगदाड आहे ते शोधणे आणि आणि ते बुजवणे हा मोठा वैताग झाला आहे. कबुतरे आणि खारींचा त्रास होई नये म्हणून अगोदरच्या मालकाने काही चांगल्या सोयी केल्या आहेत पण त्याचा या पक्षावर काहीही फरक पडत नाहीये. आणि तोच सुतार पक्षी आहे कारण त्याला बर्‍याच वेळा हाकललं आहे.

या घटनेवर सहज कार्टून तयार होईल.

इंटरनेटवर शोधाशोध करून काही माहिती मिळवलीय. सुतारपक्षांना पकडणे किंवा मारणे हा दखलपात्र गुन्हा आहे आणि त्यातून तुरुंगात जावे लागू शकते. सुतारपक्षी अतिशय मालकीहक्क गाजवणारे असतात म्हणे (Territorial ownweship). एकदा त्याना घर आवडले की त्यांना ते त्यांचे वाटते आणि ते दुसर्‍या पक्षाला येऊ देत नाहीत. हा पक्षी थंडीत राहण्यासाठी घर करतो आहे. मला आवडणारे सगळे घटक (घराचा रंग, झाडी) हे सुतार पक्षांना आवडतात असेही या शोधातून कळाले त्यामुळे आमचे घर सुतारपक्षांच्या त्रासासाठी High Risk आहे. सुतारपक्षांना आवडणारी कीड घराला लागलेली नाही असे सध्यातरी दिसतेय.

नेटवर यासाठी चमकती टेप, स्प्रे, घुबडाचे डोळे असलेले फुगे, घाणेरड्या चवीचे रंग (सुतार पक्षाच्या), घाबरवणारा कोळी, माणसांना ऐकू न येणारे कर्कश आवाज करणारे भोंगे असे अनेक उपाय उपलब्ध आहेत.

माहिती पुष्कळ झाली आहे. नेटवरच्या अभिप्रायांमधे कुणी एक उपाय करा पण दुसरा कामाचा नाही असे म्हणतो तर दुसरा हा नको तो करा म्हणतोय. मायबोलीकरांपैकी कुणाला यातले उपाय करायची गरज पडली आहे का? कुठला उपाय रामबाण ठरला?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

देवा रे.. असेहि त्रास असतात पल्याड?
अभयारण्यात राहता कि काय.. हरणांनी येउन भाजी खायला? Lol

jokes apart.. पण हे वाचुन मजा वाटली. Happy

सुतारपक्षी हिवाळ्यासाठी घरटं बांधायच्या तयारीत असावा... या हिवळ्यापुरतं राहु द्या ना त्याला तुमच्याकडे.. तसेही पक्षी वर्षानुवर्षे एके ठिकाणी राहिल्याचा अनुभव एकिवात नाहिये.. आमच्या घरात एके ठिकाणी कबुतराने घरटे बांधले होते.. ते आम्ही नेहमी काढुन टाकत असु .. एके दिवशी पाहिलं तर त्यात तीन अंडी होती.. मग मन नाही झालं घरटे काढायचे.. पण नंतर थोडे दिवसाने ते कबुतर आपल्या पिलाना घेऊन निघुन गेले.. म्हणुन माझा सल्ला म्हणुन सांगते.. थोडे दिवसानी निघुन जाईत तो सुतारपक्षीपण.. Proud आणि शिवाय तुमच्या wood siding ला पडणारे भगदाडे पण थांबतील या सीझनसाठी.. बघा हा पण विचार करुन आणि तुम्हालापण पुण्य मिळेल मुक्या (पण टकटक करणार्‍या) पक्ष्याला घर दिल्याबद्दल.. Wink

Home Improvement च्या एका एपिसोडमध्ये दाखवला होता हा त्रास. त्यात टिम एक घुबडाचे लाकडी चित्र ठेवतो ,ते पण सुतारपक्षी अर्धे करतो असे दाखवले होते.:फिदी: नक्की आठवत नाही पण शेवटी बहुतेक त्यांचा त्रास संपतो.
तुमच्या HOA च्या मीटींगमध्ये बघा न बोलुन्,अजुन कुणाला त्रास होत असेल तर काहीतरी उपाय नक्की सापडेल. आमच्या नेबरहूडमध्ये (भरपूर फुले असल्याने) बर्‍याच घरांच्या बॅक्/फ्रंट पोर्चमध्ये bee-hives चा त्रास होता. मागच्या वर्षीपासुन HOA ने लोकल प्रोफेशनल बी कीपर्सना सांगितले आहे, आता पुर्ण कम्युनिटीमधले bee-hives ते काढुन जातात.

>>>भारतात फक्त कावळे, चिमण्या, पाली आणि झुरळं इतकेच त्रास माहीत होते.

आणि कबुतर विसरलात की काय?
एका कबुतराला थारा दिला की काही दिवसांनी अनेक कबुतरांचा वेळी अवेळी ऐकू येणारी पंखांची फडफड आणि तो डोकं उठवणारा गुटर्गु.. आवाज. कितीही प्रयत्न केला त्यांना उडवायचा तरी परत काही वेळाने तिथेच येतात. सद्ध्या खूपच त्रास अनुभवत आहे. Sad

नात्या Lol Lol

मजा आली हे सर्व वाचुन,
बहुतेक हे पक्षी आणि प्राणी पण आपापसात चर्चा करत असतील
" आम्हाला होणारा माणसांचा त्रास ( Human Nuisance ) Happy

काही मायबोलीकरांनी त्यांच्याही घरी असा त्रास होत आहे आणि मी काय केले अशी विचारणा केली. माहितीसाठी इथे लिहतोय.

मी दोन्-तीन उपाय केले ते तेंव्हातरी उपयोगी पडले. यात सगळ्यात कॉमन असलेली गोष्ट म्हणजे सुतारपक्षाला, त्याच्या नजरेच्या टप्प्यात काही हललं, तर भिती वाटते. पण फक्त पानांच्या वार्‍याने झालेल्या हालचालीकडे त्याला दुर्लक्ष करता येतं. त्यामुळे कुठून तरी त्याच्या डोळ्यात चमकणारे किरण जातील हे बघायचं.
१) अ‍ॅल्युमिनियम फॉईलच्या १-१.५ इंच रुंदीच्या , १ फूट लांबिच्या पट्ट्या कापून टांगायच्या. त्या भिंतिच्या एका कोपर्‍याला टांगल्या तर दोन्ही बाजुच्या कोपर्‍याचं रक्षण व्हावं
२) पार्टी स्टोअर्स मधे चमकत्या प्लॅस्टीकचे भिरभिरे मिळतात. ते लावले.
३) त्याच स्टोअर मधे चमकत्या प्लॅस्टीकचे चंदेरी रंगाचे रीथ मिळाले ते वरून टांगून लावले.

घर सगळ्यान्चेच अस्ते हे मात्र खरे आहे, माना वा नका मानु! Happy
बाकी मला हा प्रॉब्लेम आला अस्ता तर मी त्या पक्षाच्या जोडीने पटाशिहातोडी घेऊन अजुन दोनचार भोके पाडली अस्ती! Proud

@चिन्गुडी,
सुतारपक्षी भगदाड न पाडता राहिला असता तर हरकत नाही. पण सगळं घर संपूर्ण लाकडाचं असताना आणि शून्याखाली २० डिग्री थंडीत राहताना ती भगदाडं आम्हाला जिवंत ठेवू शकली नसती हो. नुसतं बाहेर लाकडाचं सायडींग नाही. तिच भिंत आहे. तिथे भगदाड पडलं की बाहेरून थेट बर्फ आत येतो.

@limbutimbu
या थंडीत राहून पहा आणि मग म्हणा मी अजून भोके पाडली असती. Happy

ओह अजय, असाही प्रॉब्लेम आहे होय! मग अवघड आहे
बायदिवे, इकडे कोम्बडीमेष म्हणुन बारिक तारेची जाळी मिळते तशी टेकसने ठोकुन बसवली तर उपयोग होऊ शकेल का?

बापरे.. मला प्राणी खुप आवडतात..

ससुल्या.. हरीण आणि हे सगळे पक्षी रोज माझ्या घरी येत असतील तर किती मजा येईल असे वाटत होते.

पण इथे कोणीतरी पारव्यांच्या (ग्रे कबुतर) त्रासाशी तुलना केली आणि पटकन डोळे उघडले. लांबुन क्युट वाटणारे प्राणी-पक्षी भलतेच उपद्रवी असु शकतात याची जाणीव झाली.

मी पण ईथे भाज्या लावल्या की ससेबुवा खाऊन जातात, आणि लेकीने छान कोवळी गाजरं त्यांच्या पानासकट बाहेर ठेवली तर त्या कडे बघितल पण नाही...
पुदिना, ढब्बु मिरचीला फक्त खाल्ले नाहीये त्याने.
सध्या बदकांचा प्रचंड त्रास होतो आहे... सतत दरवाज्याशी बसलेली असतात आणि पॅटिओवर प्रचंड घाण पण करतात.. किती हाकलल तर पुन्हा तेच.. Sad वैताग आला आहे बदकांचा.

बापरे काय काय नवीन कळतंय.
रच्याकने आम्ही नवीन घरात शिफ्ट होतोय एडिसनला तिथे मोठी बदकं दिसली गिज का काय म्हणतात ते.
त्यांची मोठी फ्यामिलीच दिसली Proud
यांचा काही त्रास नसतो ना?
घराला बेसमेंट पण आहे तिथे काही अशा उपद्रवांचा कोणाला काही अनुभव?

बापरे किती एक्झॉटिक प्राणी-पक्ष्यांचा त्रास आहे तुम्हा लोकांना. आम्हाला लहानपणी छान वाटतात तेच पक्षी आता त्रासदायक झालेत.

सध्या, माझ्या बाल्कनीत लावलेलं लेमनग्रास कबुतरं येऊन हक्कानं खाऊन जाताहेत.

हा धागा अतीच आवडलाय मला. मजा वाटत आहे एकेक वाचताना.

काय एकेक अनुभव - आपलेच प्रतिबिंब खिडकीच्या काचेत दिसल्यामुळे 'हा कोण आला आपल्या हद्दीत' असे वाटून खिडकीवर धडका मारणे, आठ दहा धडका झाल्या की दमून विश्रांती घेऊन पुन्हा धडका मारणे Lol

घुबडाचे डोळे, प्लॅस्टिकचे घुबड - Lol

क्रूरसिंग सारखे हासणे, तिघे चौघे एकदम खिदळले तर झाडाखालून जायची हिम्मत न होणे - Lol

विचित्र केकाटणे - Lol

<< आपलेच प्रतिबिंब खिडकीच्या काचेत दिसल्यामुळे 'हा कोण आला आपल्या हद्दीत' असे वाटून खिडकीवर धडका मारणे, >> पूर्वीचं एक बालगीत आठवलं- "चिंव चिंव चिमणी छतांत, आरसा लोंबे भिंतीला... "! आमच्या भारतात पण पक्ष्यांचं असंच असतं- असायचं, म्हणूं हवं तर !! Wink

@अंजली_१२
Geese सारखा त्रासदायक पक्षी दुसरा नाही. शक्य असल्यास ते घर घेऊ नये.. भर थंडीतही ते कुठे जात नाहीत..खूप घाण करतात, खूप आवाज करतात.. मैत्रेयीला विचारावं.. Happy

आपलेच प्रतिबिंब खिडकीच्या काचेत दिसल्यामुळे 'हा कोण आला आपल्या हद्दीत' असे वाटून खिडकीवर धडका मारणे>>>>>>>>>>>>>>>>

माझ्या गॅलरीच्या काचेला चिमण्यानी आणि तशाच एका छोट्या पक्ष्याने चोच मारुन मारुन...काचांवर ओरखडे उठ्वले होते......इतके की शेवटी मी काचेला पेपर चिटकवला............इतके करुन देखील भागले नाही त्यांचे.....काही दिवसांनी इथे असणारा पक्षी कुठे गेला या कुतुहुलाने...त्यांनी तो पेपर फाडला........आणि काच दिसल्यावर " अरे लेका तु इथे लपलेला का " अश्या अविर्भावात .....जास्तच जोमाने चोच मारायला सुरुवात केली...
आता काचच काढुन टाकली..आणि जाळी लावली त्या जागी....
.
.
काच तर खराब होतेच त्याचे काही नाही बर्याचदा पक्ष्यांच्या चोचींना सुध्दा इजा होते......

मला हा बाफ वाचायला प्रचंड गंमत वाटतेय
एकीकडे आपल्याला हा अनुभव का येत नाही म्हणून दु:ख आणि आनंद पण वाटतोय Happy

अरे ती बदकं फार त्रास देतात खरंच. इतका आवाज करतात! आमच्या जवळ पाँड आहे त्यामुळे भरपूर असतात ..हल्ली नाहियेत. बहुतेक थंडीतच येतात जास्त Happy
सध्या आमच्या घरी पण सुतार पक्षी हजेरी लावत आहे! भोके नाही पाडत आहे, पण दर थोड्या वेळाने येऊन फायरप्लेस ची उंच गेलेली चिमणी असते ना त्याच्या मेटल च्या टोकावर बसून जोsssरात आवाज करतो चोचीने टर्र्र्र्र्र्र... असा . तो त्यांचा टेरीटरी मार्क करण्याचा अन मेट्स ना अट्रॅक्ट करण्याचा प्रकार असतो म्हणे ! त्या आवाजाची फ्रीक्वेन्सी प्रचंड असते , घरात कुठेही, अगदी बेसमेन्ट मधे असलं तरी हा आवाज ऐकू येतो! ती चिमणी इतकी उंच आहे की तिथे वर चढणे शक्य नाही, काही लटकवायला वगैरे. नवरा आणि लेक दोघे त्याला उडवायला काही काही उपाय करून पहातात. आर्यक ने आयपॉड वर हॉक चा आवाज डाउनलोड करून स्पीकर्स वरून तो ऐकवून पाहिला ! कसले काय, काही फायदा झाला नाही. अजून काय तर बाहेर जाऊन टेनिस चे बॉल उंच फेकत रहातात तो आला की Lol मग जातो उडून.
आता गॅस चा फुगा आणून बघणार आहे पार्टी सिटीतून Happy

काही दिवसांनी इथे असणारा पक्षी कुठे गेला या कुतुहुलाने...त्यांनी तो पेपर फाडला........आणि काच दिसल्यावर " अरे लेका तु इथे लपलेला का " अश्या अविर्भावात .....जास्तच जोमाने चोच मारायला सुरुवात केली...
आता काचच काढुन टाकली..आणि जाळी लावली त्या जागी....<<< Rofl

आता गॅस चा फुगा आणून बघणार आहे पार्टी सिटीतून <<< Lol

आमच्या या घरी या (स्प्रिंग) सीझनला दरवर्षी काळ्या मुंग्या येतात. सीझनपुरत्याच येतात आणि नंतर समर सुरू झाला की नाहीशा होतात. मला पहिली एकदोन वर्षं प्रचंड वैताग आला. पहिला विचार 'आपण पुरेशी स्वच्छता ठेवत नाही की काय' हाच येतो मनात! आणि माझ्यासारख्या फ्रीकला हा विचार किती ताप देतो हे मला सांगता येणार नाही आणि तुम्हाला तितकंच फ्रीक असल्याशिवाय पोचणार नाही. Proud
पण एव्हाना मी निर्ढावले आहे. शक्य तितकी स्वच्छता ठेवायची, बेट स्टेशन्स जागोजागी लावायची, अती होईल तेव्हा/तिथे स्प्रे वापरायचा आणि समरची वाट पहायची; मनस्ताप करून घ्यायचा नाही असं ठरवलं आहे.

नशीबाने काळ्या धावर्‍या मुंग्याच येतात.

आमच्या मुंग्यांना अ‍ॅक्वागार्ड चे पाणी लागते..:) फिल्टर च्या भोवती लाल मुंग्या जमा होउन पाणी पीत असतात..
ज्या दिवशी फिल्टर भरुन ठेवला नसेल तेव्हा बाजुला कुठे ही लाल मुंग्या दिसत नाही... पाणी भरुन ठेवले की १ तासाच्या आत लाईन लागते......
हा प्रकार पहिल्यांदा मी पहिला आहे बदलापुर ला आल्यावर .........:)

Pages