Submitted by दिनेश. on 16 November, 2009 - 17:21
गाणी आणि नृत्य, हा अनेक वर्षे हिंदी चित्रपटाची खासियत राहिलेली आहे. अर्थवाही शब्द, सुयोग्य चाल आणि गायकाची कारागिरी, याना पुरेपूर न्याय देणारे चित्रीकरण अनेकवेळा झालेय. इथे आपण अश्या गाण्यांची चर्चा करु. या चित्रीकरणात, नेमके काय आवडले, तेच लिहायचे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला आठवतय त्या प्रमाणे या
मला आठवतय त्या प्रमाणे या गाण्याला महुआ घटवारन या लोककथेचा संदर्भ आहे. हि एक सुंदर तरुणी, एका तळ्याजवळून गायब झाली, आणि परत कधीच आली नाही. त्या नंतर त्या तळ्यावर कुठलीच तरुणी जात नाही वगैरे. या कथेचा संदर्भ तिसरी कसम मधे आलाय.
बंदीनी मधलेच, आशाचे
ओ पंछी प्यारे, सांज सकारे
बोले तू कौनसी बोली, बता रे
हे पण छान चित्रीत झालेय. हे गाणे एका स्त्री कैदीच्या तोंडी आहे, आणि याला जेलमधल्या कामातून निघणार्या ( जसे पाखडणे वगैरे ) आवाजांचे संगीत आहे.
कोणी काही म्हणो, मला आवडलेले
कोणी काही म्हणो, मला आवडलेले गाणे म्हणजे,' मैने प्यार किया' मधील 'आजा शाम होने आई' ! जरा वेगळ्या धाटणीचे चित्रीकरण अन एकदम फ्रेश गाणे!
इतर आवडलेल्या गाण्यात,' चांदनी' मधील ,'मेरे हाथों मे नौ नौ चुडीया'
श्रीदेवीच्या नख-यांकडे अगदी बघत बसावेसे वाटते.
तसेच बॉर्डरमधील ,'संदेसे आते है...' ह्या गाण्यातील विशेषकरुन
'ए गुजरनेवाली हवा बता....' या कडव्यामधे
'वही थोडी दुर है घर मेरा,
मेरे घर में है मेरी बुढी मां
मेरी मां के पैरों को छुके
उसे उसके बेटे का नाम दे"
या ओळींच्या वेळेस खरोखरच, व्हरांड्यात बसलेल्या मां च्या पायांना हवा स्पर्श करते तेव्हा मां चे ते चलबिचल होणे! परफेक्ट टायमिंग! मस्त चित्रीत झालेय ते गाणे
अग्निसाक्षी मधले, मनिषा
अग्निसाक्षी मधले, मनिषा कोईराला चे कुठले रे ते गाणे ? तिचा नाच डोळ्यासमोर आहे, पण मला शब्द नेमके आत्ता आठवत नाहित. ती पण एक आवडती नटी. पण वाया गेली.
इन्कार करना मुश्किल है इकरार
इन्कार करना मुश्किल है इकरार करना मुश्किल है...
कितना मुश्किल है यारा दिल लगाना ...
तू चंदा मै चांदनी, तू तरुवर
तू चंदा मै चांदनी, तू तरुवर मै शाख रे
तू बादल मै बिजूरी, तू पंछी मै आस रे
असे सुंदर शब्द असलेले गाणे, आहे रेश्मा और शेरा सिनेमातले. संगीत जयदेव आणि पडद्यावर वहिदा रेहमान आणि सुनिल दत्त ( या सिनेमात, अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, राखी, रंजित आणि संजय दत्त पण होते ) हे गाणे गायलेय लताने आणि उत्तरोत्तर त्याची चाल अनवट होत जाते. देस, मांड आणि पिलू
या तिन्ही रागात हे गाणे फिरत राहते, हे सर्व राजस्थानी लोकगीतातले राग आणि या गाण्याचे पडद्यावरचे चित्रण पण अप्रतिम आहे. राजस्थानी लोकांचा रांगडा रासवट प्रणय, या दोन कलाकारानी नेमका उभा केलाय. तिखट मिरची वहिदाने चावणे आणि तिच मिरची सुनीलने सहज खाणे. उंटावरची सवारी, वाळवंटातील रात्र, शेकोटि, सगळे कसे त्या मातीतले नव्हे रेतीतले.
सिनेमाची कथा पण वेगळीच होती. (बहुतेक वहिदाला या भुमिकेसाठी राष्ट्रिय पुरस्कार मिळाला होता. )
yes Shanky, tech gaaNe te.
yes Shanky, tech gaaNe te. malaa jhop laagalI nasatee, te shabd aaThavalyaashivaay ( aamachyaakaDe devanaagareeche baaraa vaajale aahet aattaa )
आणखी एक टर्निंग पॉइन्ट ठरलेले
आणखी एक टर्निंग पॉइन्ट ठरलेले गाणे.... मै तेरी दुष्मन दुश्मन तू मेरा... मै नागन तू सपेरा...
नगिना... श्रीदेवी, अमरिशपुरी, बहुतेक लक्ष्मी-प्यारे...
यानंतर या गाण्याच्या/थीमच्या बर्याच नकला झाल्या... नगीना २ (निगाहे) मध्ये श्रीदेवी असूनही या गाण्याच्या उंचीला त्यातले गाणे पोहोचले नाही....
कभी अलविदा ना केहना
कभी अलविदा ना केहना चित्रपटातलं 'तुम्ही देखो ना ये क्या हो गया...
हे गाणं फार सुंदररित्या चित्रित केलंय... सर्वांचे ड्रेस एकसारखे, जवळ जवळ संपुर्ण गाणं स्लो मोशन मध्ये शूट केलंय.. (कृचूभूद्याघ्या) माझं अत्यंत आवडतं गाणं...
गाण्यांमधील अजुन एक टर्निंग
गाण्यांमधील अजुन एक टर्निंग पॉईंट म्हणजे , ८०च्या दशकातील 'हिम्मतवाला' चित्रपटातील 'नैनो मे सपना ' हे श्रीदेवी व जितु वर चित्रीत झालेले गाणे.... या गाण्यापासुन गाण्यात एकावर एक रचलेले हंडे/कळशा/ मटके एवढच नाही तर ढोल/ डफल्या/ साड्या/ ओढण्या यांचा ट्रेंड सुरु झाला...तो नव्वदच्या दशकापर्यंत चालू होता! तत्कालीन तोहफा, मवाली, ...इ. जितेंद्र/ श्रीदेवी/जयाप्रदा यांचे चित्रपट ते अगदी नव्वदीतला मीनाक्षीचा 'आज का गुंडाराज', शाहरुख/ दिव्या भारतीचा 'दिवाना' पर्यंत!
दक्षे अनुमोदन. साड्या व
दक्षे अनुमोदन. साड्या व गाण्याचे शब्द अप्रतिम आहेत. तसेच त्यान्ची रीअॅलिटी अतिशय नीरस व दोघांचेच मिळून जे विश्व तयार झाले आहे ते असे स्वप्नमय भास मय पण असह्य सुन्दर. जादूमय प्रकाशाने भारलेले.
ते गाण्यात सुन्दर व्यक्त होते. ते व मितवा गाण्यासाठी तरी केजो चे आभार मानले पाहिजेत.
दिनेश दा, रफी चे बा होशो
दिनेश दा,
रफी चे बा होशो हवास में दीवाना मैं आज वसीयत करता हूं गाणे व त्या बद्दल काही माहीत आहे का? सान्गा हं
दिल ढूंढता है फिर वही फुरसत
दिल ढूंढता है फिर वही
फुरसत के रात दिन
हे मौसम सिनेमातील गाणं पण सुंदर चित्रीत झालय. प्रौढ संजीवकुमार जुन्या आठवणी जागवत फिरत असताना त्याला तरुणपणच्या दिवसात शर्मिला टागोर बरोबर फिरतानाचे दिवस आठवतात. एकाच फ्रेम मधे वयस्कर संजीवकुमार आणि तरुण संजीवकुमार आणि शर्मिला टागोर दिसतात. कल्पना छान. गुलजार च्या शब्दांना मदनमोहनच्या संगीताने गाण्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलय. लतादिदी आणि भूपेंद्र च्या आवाजाने गाण्यात जान आणलीय.
मी अगदी अलिकडे हे गाणं बघितलं
मी अगदी अलिकडे हे गाणं बघितलं (तसा पिक्चर आधी बघितला होता पण देसी स्टोर मधल्या त्या DVD वरची प्रिंट अजिबात चांगली नव्हती आणि हे गाणं तर बहुदा नव्हतंच ..) काहि का कारणाने असेना पण पिक्चर येऊन गेल्यावर बहुदा वर्षां-दोन वर्षांनी हे गाणं लक्ष देऊन बघितलं आणि प्रचंड आवडलं .. फक्त एका गोष्टीचा अपवाद वगळता ह्या पूर्ण गाण्याची केमिस्ट्री अगदी झकास जमली आहे असं वाटतं .. Youthfulness, romance, glamor आणि त्याबरोबरच गाण्याचं संगीत, गायकांचे आवाज, गाण्याचं चित्रीकरण आणि हो, नायक-नायिकेची वेषभूशा सुद्धा सगळं अगदी मस्त .. गाणं आहे, 'खुदा जाने ..' बचना ऐ हसीनो या पिक्चरमधलं ..
http://www.metacafe.com/watch/yt-B60zgr-Phc4/hd_khuda_jaane_bachna_ae_ha...
ह्या गाण्यात एक गोष्ट खटकली ते म्हणजे गाण्याचे शब्द .. तसे शब्द छानच आहेत पण esp. दुसरं कडवं अजिबात suit होत नाही पडद्यावरच्या रणवीर आणि दिपीका ला .. एकूणच शब्द सूचित करत असलेल्या अर्थासारखं काही intense ह्यांच्या आयुष्यात घडत असेल किंवा त्यांच्या personality मध्ये असेल असं अजिबात वाटत नाही .. चांगले चांगले कपडे घालून, छान छान ठिकाणी जाऊन ग्लॅमरस गाणी म्हणण्यापर्यंत ठिक आहे पण 'दिल कहे के आज तो छुपालो तुम पनाह में के डर है तुमको खो दूंगा, दिल कहे सम्भल जरा खुशी को ना नजर लगा के डर है मै तो रो दूंगा' अशा शब्दांवर आणलेलं उसनं गांभीर्य काही शोभत नाही त्यांना .. :p
दुसरं माझं आवडतं गाणं म्हणजे, दिल चाहता है मधलं 'जाने क्युं लोग प्यार करते है' .. तसं ह्या गाण्याची कथेला गरज होती की नाही कळत नाही पण गाणं मात्र फारच छान .. प्रिती झिंटा आणि आमिर खुप फ्रेश दिसले आहेत .. प्रिती चे ड्रेसेस् मस्त .. ती ह्या पिक्चर मध्ये जशी दिसली आहे तशी कुठल्याच पिक्चर मध्ये दिसली नाही .. खरंतर 'दिल चाहता है' माझा अतिशय आवडता पिक्चर .. मी बहुतेक किमान २०-२५ वेळा तरी बघितला असेन आतापर्यंत आणि अजूनही बघत राहीन ..
आर्या, एक अगदी जूना सिनेमा,
आर्या, एक अगदी जूना सिनेमा, साऊथचाच होता. नाव बहुतेक चंद्रलेखा. त्यात पहिल्यांदा हे प्रचंड मोठे ढोल वगैरे होते. मला पुर्वी वाटायचं या चैने मधल्या मरिना बीच वर हे सगळे कायमचेच मांडलेले आहे.
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=l7LLlymgJJE
(पॉकेट मे रॉकेट)
हे एक एकदम नवीन. मस्त चित्रीकरण आहे. रणबीर कपूर चा नाच, चेहर्यावरचे भाव, सेल्स ऑफिस चा सेट अप सर्व धमाल आहे.
धिंगाणा.कॉम वर हिन्दी गाणी पण
धिंगाणा.कॉम वर हिन्दी गाणी पण आहेत.
अजब प्रेम की गजब कहानी मधील तू जाने ना पण छान गाणे आहे. आतिफच्या आवाजात खास मुस्लिम नजाकत आहे व चित्रीकरण ही सुन्दर आहे. कत्रिना ना काळ्या ऐवजी शुभ्र पांढरा गाउन द्यायला हवा होता. अतीशय सुन्दर दिस्तो तिला तो रंग. मी अर्धवट झोपेत सिनेमा बघत होते मध्येच हे चान्गले गाणे आल्यावर पॉपकॉर्न मध्ये हिरा सापड्ल्या सारखे वाट्ले.
मी तो हिरा लगेच कानात घातला.
...
...
मी मज वर, दिनानाथांच्या,
मी मज वर, दिनानाथांच्या, सुहास्य तूझे मनास मोही ची दाट छाया आहे. हे दिनानाथांचे गाणे, कृष्णार्जून युद्ध , या सिनेमातले.
बाई मी विकत घेतला श्याम वर सीमा आणि राजा परांजपे, यानी अप्रतिम अभिनय केलाय. पायाला बसणारे चटके, चेहर्यारव दिसावेत, म्हणून सीमाला भर रस्त्यावर अनवाणी वावरावे लागले होते. मराठी पाऊल पडते पुढे, मधे सुलोचना, मा आल्हाद पासून अनेक कलाकार आहेत. (यात हेमंतकुमारचाही आवाज आहे) घनश्याम सुंदरा, ठीक चित्रीत झालेय (पंडितराव नगरकर, संध्या, ललिता पवार वगैरे )
आशाची अनेक मराठी गाणी, सुमार वकुबाच्या नट्यांमूळे वाया गेलीत. पण आपण हिंदी गाण्याबद्द्ल लिहितोय ना !!!
नवरंग मधलं 'तुम सैंय्या गुलाब
नवरंग मधलं 'तुम सैंय्या गुलाब के फुल, हुई क्या हमसे भूल, जो हमको छोड चले, यूं नाता तोड चले...
हे कर्णमधुर गाणं... चित्रिकरणात ही बाजी मारून गेलंय..... महिपालचं मन वळवण्याचा प्रयत्न करणारी संध्या संपुर्ण चित्रपटात तुलनात्मकरित्या या गाण्यात सर्वात सुंदर दिसली आहे. (दुसर्या क्रमांकावर 'आधा है चंद्रमा' मध्ये) नृत्य ही बर्यापैकी मृदु आणि हळूवार....
एक धागा सुखाचा शंभर धागे
एक धागा सुखाचा शंभर धागे दु:खाचे.......... चित्रीकरण आणि गाण्याचा भाव पूर्ण एकरूप झाले आहेत...
जामोप्या : दुर्दैवाने
जामोप्या : दुर्दैवाने (तुमच्या) हा धागा मराठी गाण्यांबद्दल नाही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मराठीला स्थान मिळालेच पायजे.
मराठीला स्थान मिळालेच पायजे. .......
हिंदी गाणे घ्या: मेरे ढोलना सुन... मेरे प्यार की धुन......... अप्रतिम गाणे. भूलभुलैय्या.
गाणे खमाज रागामध्ये बांधले आहे. सरगमचा काही भाग रागेश्रीत आहे. चित्रीकरण अप्रतिम आहे... मूळ तमिळ्/तेलगु का कुठल्यातरी भाषेत गाण्याचे शब्द रा-रा असे आहेत. ते गाणे यू ट्युबवर मुद्दाम शोधुन पाहिले.... चित्रीकरण सारखेच आहे... पण हिंदी गाणे ऐकायला जास्त सुंदर वाटते... पूर्वी खमाज हा राग मी ब्लॅकलिस्ट केलेला होता. तुणतुणे- तंबोरे वाजवणार्यांचा राग , गायनाला स्कोप नाही, म्हणून ब्लॅकलिस्ट केला होता, कधी ऐकत नव्हतो..... पण या गाण्याने पार झोपच उडवली... पिक्चर २ वेळा खास या गाण्यासाठी पाहिला, तेंव्हा समजले हा खमाज आहे... ( कृपया जाणकारानी गाण्याचा राग बरोबर आहे का सांगावे.)
जामोप्या माफ करा पण
जामोप्या माफ करा पण वैयक्तिकरित्या मला हे गाणं ऐकायला ही आवडलं नाही कधी आणि पाहिल्यावर![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
तर भयंकर मोठा अपेक्षाभंग झाला होता... शायनी आणि विद्या बालन म्हणजे वजनदार आई आणि मुलगा नाचतायंत असं वाटतं.
बाकी कृपया ही पोस्ट पर्सनली घेऊ नका..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शायनी आणि विद्या बालन म्हणजे
शायनी आणि विद्या बालन म्हणजे वजनदार आई आणि मुलगा नाचतायंत असं वाटतं >
)![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दक्स, गाण परत पहा,, शायनी नाचलेला नाही त्यात...(नशीब
विद्या बालन आणि एक केरळी का तामिल नट आहे नाचणारा.. शायनी राजा च्या वेशात आहे त्या गाण्यात..
वजनदार आई आणि मुलगा >> तू नुकताच पा सिनेमा पहिलास काय ?
दक्षे मग तु निट नाही पाहिलंस
दक्षे मग तु निट नाही पाहिलंस गं..शायनी नाही नाचत, कोणीतरी दाक्षिणात्य नट आहे. अतिशय सुंदर नाचलाय तो, त्याच्यासमोर विद्या अगदी ओढुन ताणुन नाचतेय असेच वाटते.
जे असेल ते.. शायनी वाचलाच
जे असेल ते..
शायनी वाचलाच म्हणायचा....
विद्या बटाट्याच्या पोत्याप्रमाणे दिसते ना? झालं...
जामोप्या ते गाणे खरेच सुन्दर
जामोप्या ते गाणे खरेच सुन्दर आहे भुलभुलैयातले. विद्या मेंट्ल पेशंट असते त्यामुळे ती थोडी मनातून भरकट्लेली आहे ते चान्गले व्यक्त होते. हा एका कंट्रोल्ड नर्तकीचा परफोर्मन्स नाहीये कथानकात. तर तिचा स्वतःवरील ताबा सुट्त चालला आहे हे दर्शवायचे आहे.
विद्या बटाट्याच्या
विद्या बटाट्याच्या पोत्याप्रमाणे दिसते ना? झालं...
नाही गं, ह्या गाण्यात ती सुंदर दिसते. पण नाचताना चेह-यावर आणि स्टेप्स्मध्ये खुप ताण जाणवतो. बहुतेक तिला धड नाचता येत नाहीय त्याचे टेंशन घेतलेय तिने. आणि त्यात भर म्हणजे तो पुरूष कलाकार ट्रेंड डान्सर आहे. त्याचा गाण्यातला नाच अगदि प्रेक्षणिय आहे. भुलभुलैयाच्या एका दाक्षिणात्य आवृत्तीतही तोच आहे...
बाकी ती दिसायला थोराड आहे आणि मला काही फारशी आवडत नाही. पण माझे एकुण मत न्युट्रल आहे तिच्याबद्दल. तिचा मुन्नाभाई आणि परिणिता पाहिलाय मी. त्यात रोलला साजेशी दिसते.
आत्ताच परत पाहील गाण. चांगली
आत्ताच परत पाहील गाण. चांगली दिसत्ये विद्या ह्यात.
http://www.youtube.com/watch?v=yMXNEPeG3ls&feature=related
दक्षिणा, मेरे सैया गुलाब के
दक्षिणा, मेरे सैया गुलाब के फूल, मधेच ते उंच काठ्यांवर नाचणारे कलाकार आहेत ना ? कि ते दूसरे गाणे. (तिचा काळा मेकप आहे ना ? )
Pages